ShareChat
click to see wallet page
search
संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. मागील संतानी जो मार्ग दाखविला, त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले, समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली संत शिरोमणी गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन !समाजातील प्रत्येकांचे आयुष्य दाही दिशांनी उजळून काढण्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेणारे संत गाडगेबाबा महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! #श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी💐
श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी💐 - देव माणूस आणि संत माणूस होवून जगण्यापेक्षा माणूस म्हणुनच  मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी ffin" विनम्र अभिवादन ! गोपेवकी नेंपदन गोपाला . देव माणूस आणि संत माणूस होवून जगण्यापेक्षा माणूस म्हणुनच  मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी ffin" विनम्र अभिवादन ! गोपेवकी नेंपदन गोपाला . - ShareChat