⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २६ जानेवारी इ.स.१६७१
( माघ वद्य एकादशी, शके १५९२, संवत्सर साधारण, गुरुवार )
शंभुराजांना स्वतंत्र राज्यकारभार सोपवला :-
शंभुराजांना चौदावे वर्ष सुरू झाले होते. अंगापिंडाने मजबूत असणारे शंभूराजे यांना लष्करी विद्ये बरोबरच राज्यकारभार देखील यायला हवा या हेतूने सदरेवर बसवून कारभार चालविण्यास सांगितले.
शंभूराजांच्या मदतीस महादजी यमाजी यांना त्यांचे मुतालिक म्हणून नेमून, कारभाराची जाण येण्यास आजच्या दिवशी सुरवात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/80h9PtSyTD0
📜 २६ जानेवारी इ.स.१६८०
१६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्यांनी सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उद्भवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांना विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलतखान यांनी २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखान यांना माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१६८०
२६ जानेवारी १६८० रोजी दौलत खानाचा उंदेरीवर हल्ला झाला, तो फसला. या विषयी इंग्रजी पत्रातील उल्लेख असा
"Dowlett caun came out with all vessels, assaulting Henry in three places and had 3000 men to land, but the suddy beate him off with the loss of four men and seven wounded; but the news from chaul is that Dowlett caun hath received great damage, hath killed outright 200 men, and about 100 more wounded and hath lost several vessels. Shivajee's people have brought a gun to tull that reached to Hendry, but hath done the suddy noe great harme, and the suddy has guns that reacheth to the maine which hath killed several"
२६ जानेवारी च्या पहाटे दौलतखान आपले संपूर्ण आरमार घेवून उन्देरीवर चालून आला व मोठे युद्ध सुरु झाले याच दरम्यान रसदेने भरलेल्या २० होड्या खांदेरीला गेल्या. इंग्रज आणि मराठे यांचे वकील तहासाठी बराच कथला करीत होते आणि उभाय्पाक्षांना मान्य होईल अशी तहाची कलमे करण्यात ते व्यस्त होते. शिवाजीराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण सांभाळीत होता. त्याच्या सोबत सुरनवीस अण्णाजी दत्तो यांना पाठवण्यात आले होते. इंग्रजातर्फे राम शेणवी दुभाषी व मध्यस्थीचे काम करीत होता व निर्णय मुंबई व सुरत दोन्हीकडील अधिकारी मिळून घेत होते. दिनांक २८ जानेवारीला उभय पक्षांना यश आले आणि तहाची कलमे ठरली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१६८३
छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांचे पारिपत्य करण्याचे औरंगजेबाच्या प्रयत्नांच्या यशापयशाविषयी इंग्रज वखारवाल्यांच्या नोंदी! पत्रात सुरतकर इंग्रज मुंबईकर इंग्रजांना लिहितात: "जमिनीवरून बादशहा औरंगजेब आपल्या मोठ्या सैन्यानिशी छत्रपती संभाजी महाराजांवर फार जोराने चढाई करीत आहे आणि समुद्रमार्गाने ह्या भागात कोणी पाहिले नाही इतके मोठे आरमारही छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलुखावर झडप घालीत आहे." "परंतु छत्रपती संभाजी महाराज मोगलांना फार जड जातील यात शंका नाही".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/80h9PtSyTD0
📜 २६ जानेवारी इ.स.१७४०
दि. २६ जानेवारी १७४० या दिवशी नानासाहेबांनी मस्तानीला पर्वतीच्या बागेत कैद केले. नानासाहेबांनी लगेच चिमाजीआप्पांना घडलेले सारे पत्राद्वारे कळवले आहे. नाना लिहितात, "मस्तानीस बागास बोलावून कैद
केली. कोणी हत्यार धरिले नाही. रात्री घरास घेऊन जाऊ. मग घरी ठेवावेसे जाले तर स्वामींचे (आप्पांचे) लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेवू अथवा चोरून दहा माणसे बरोबर देऊन कोथळागड (घनगड) येथे भलते जागा पाठवू. स्वामींनी राऊंचा जीव जतन करावा..." यानंतर मात्र नानासाहेबांनी मस्तानीला शनिवारवाड्यातल्या तिच्याच महालात नेऊन भवताली चौक्या बसविल्या. नंतर चिमाजीआप्पा पैठण येथे बाजीरावांपाशी गेले. यावेळेस
बाजीराव आणि चिमाजीआप्पा यांच्यात मस्तानीबद्दल अनेक वाद झाले असावेत, असे वाटते. आप्पांनी राऊंना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बाजीरावांना ते काही पटले नाही. शेवटी नाईलाजाने बाजीरावांची तब्येत जपण्यासाठी चिमाजीआप्पांनी मस्तानीला कैदेतून सोडून बाजीरावांकडे रवानगी करण्याचे ठरवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१७७४
राघोबा दादा ना पेशवाई ची वस्त्रं तर मिळाली ... पण त्यांनी ज्या पध्दतीने ती मिळवली त्या मुळे कारभारी नाराज होते ....कारभाऱ्यांच्या गुप्त मसलती चालु झाल्या ...कारभारी म्हणजे कोण तर नाना फडणवीस, सखाराम बापु, त्र्यंबक राव पेठे, रामशास्त्री, मालोजी घोरपडे... या मंडळींनी ठरवले राघोबा दादा ला पेशवे पदा वरून दुर करायचे... हेच होते "बारभाई कारस्थान"
राघोबाला दुर करून मग कोणाला पेशवे करायचे ?
ठरले गंगा बाईच्या नावाने कारभार करायचा... तिला मुलगा झाला तर पुढचा पेशवा... नसता दत्तक विधान करायचे...
बाहेर काय चालू याची गंगा बाईंना अजिबात कल्पना नव्हती ती बिचारी अबला अडकली होती आनंदी बाईच्या महालात...
नाना आणि मंडळी बोलुन चालुन मुत्सद्दी, त्यांनी गंगाबाईंना २६ जानेवारी १७७४ ला शनिवार वाड्यातुन सुखरूप बाहेर काढून पुरंदरावर नेले... त्या वेळेस पार्वती बाई त्यांच्या बरोबर होत्या...
ज्या दिवशी गंगा बाई पुरंदरावर पोहोचल्या त्या दिवशी नाना आणि मंडळींनी राघोबा विरुद्ध रणशिंग फुंकले... आणि पेशवाई चा कारभार गंगा बाईंच्या नावे सुरु केला... पुरंदरावरच पार्वती बाईंनी त्यांचे साधे पणाने डोहाळ जेवण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१८३१
क्रांतिवीर संगोळी रायन्ना या स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्मदिवस १५ ऑगस्ट पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस २६ जानेवारी पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली हि आदरांजलीच म्हणावी लागेल...
क्रांतिवीर संगोळी रायन्ना कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र याच व्यक्तिमत्वा बद्दल घेतलेला हा आढावा..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/80h9PtSyTD0
📜 २६ जानेवारी इ.स.१९४४
२६ जानेवारीला सुभाषबाबूंनी रंगून येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. नेताजींची अमरवाणी, "तूम मुझे खून दो - मै तुम्हे आजादी दुंगा !" ही इथूनच प्रगट झाली. १८ मार्च १९४४ या दिवशी १०,००० सैन्यानिशी नेताजींनी मातृभूमीत प्रवेश करून इंफाल, मोरा, कोहिमा या ठिकाणी प्रतिपक्षावर विजय मिळवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀


