मनमोहन सिंग यांच्या विरोधातल्या India against corruption, खरं तर ते India against Congress होतं, या आंदोलनात सामील झाल्याबद्दल प्रशांत भूषण यांनी पश्चाताप व्यक्त केलाय.
भारत जोडो यात्रेदरम्यान योगेंद्र यादव यांनीही याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आणि "मी जी चूक केली त्याची भरपाई म्हणून भारत जोडो यात्रेत सहभागी आहे", असंही ते म्हणाले होते.
आपल्याकडे १९७०-९० दरम्यान वंचितांच्या चळवळी मुखर होत्या. सामाजिक चळवळी राजकीयच होत्या आणि असतात, तरी तेव्हा चळवळवाल्यांची भूमिका राजकारणाला दूर ठेवायचं, राजकीय पक्षांपासून दूर राहायचं अशीच होती. तेव्हाचा सत्ताधारी आणि प्रस्थापित पक्ष कॉंग्रेस असल्याने चळवळी करणारे कॉंग्रेसचे विरोधकच असायचे. नेहरूंपासून सुरू झालेला विरोध व्हाया इंदिरा,राजीव असं करत मनमोहन सिंगांपर्यंत टिकला. आणीबाणीत कॉंग्रेस विरोध टोकाला गेला. राजकीय पक्षापासून अलग राहायचं, ही भूमिकाही बदलली आणि तेव्हा स्थापन झालेला जनता पक्ष हा आपला वाटू लागला. पुढे हा पक्षच टिकला नाही आणि पुन्हा कॉंग्रेस सत्तेत आली. कॉंग्रेस विरोध सुरूच राहिला. बिगर कॉंग्रेस - बिगर भाजप अशी तिसरी आघाडी वगैरे प्रयोग फसत गेले. २०११-१२ ला अण्णा हजारे आंदोलनात सगळे कॉंग्रेस विरोधक पुन्हा एकवटले. एव्हाना राजकीय पक्षाबद्दलची अस्पृश्यता संपली होती. उलट, समाजकारण करायचं तर राजकीय सत्ता हवी आणि आपला पक्ष हवा असं वाटू लागलं होतं. ज्यांना आणीबाणीदरम्यान जनता पक्ष आपला वाटत होता, त्यांना भ्रष्टाचार विरोधी आंदोलनादरम्यान आप पक्ष आपला वाटू लागला. अनेकजण तर आम आदमी पार्टीत सहभागी झाले. आपबाबतही भ्रमनिरास होत गेला. दरम्यान, देश भाजपच्या ताब्यात गेला. त्याला, या सगळ्या भूमिका कारणीभूत ठरल्या होत्याच. कुणाला कमी लेखण्यासाठी किंवा घालून-पाडून बोलण्यासाठी ही उजळणी करत नाहीये. आता भाजपची पूर्ण देशावर मजबूत पकड आहे. भाजपसंस्कृती काय आहे, ते दररोज दिसतंय, अनुभवाला येतंय. आणि जाणत्यांच्या लक्षात आलंय की खरा विरोध संघ-भाजपला करण्याची गरज होती आणि आहे. शत्रू कॉंग्रेस नव्हे, संघ असायला हवा, हे किमान महाराष्ट्राच्या, ही संघाची जन्मभूमी असल्याने, पूर्वीच लक्षात यायला हवं होतं. पण आता ते उशिरा का होईना लक्षात आलंय. आणि संघाला सुस्पष्टपणे विरोध करणारा पक्ष म्हणून आता या सगळ्यांना कॉंग्रेस पक्ष आपला वाटू लागलाय. कॉंग्रेसला समर्थन आणि मदत करणारे हात वाढत चाललेत. तशी उघड भूमिकाही घेत चाललेत. भारत जोडो यात्रेपासून यात तरूण मोठ्या संख्येने दिसतात.
खुद्द महाराष्ट्रात राजकीय बकाली किती वाढलीये ! या वातावरणात कॉंग्रेसने लोकांचे प्रश्न उठवत राहाणं, भाजप-संघापासून देशातली लोकशाही वाचवणं, संविधानच सर्वोपरी राहील हे बघणं, या भूमिकेत सातत्य ठेवणं अशी अपेक्षा हे सारे नवकॉंग्रेसजन पुन्हा पुन्हा व्यक्त करतायत. अन्य पक्ष तत्व, नैतिकता, विचारसरणी या बाबतीत जितके खाली खाली उतरत जातील, तितकी कॉंग्रेसची कमान उंचावत जाईल, हे नक्की. महाराष्ट्रातल्या लोकांना नक्की कुणाशी लढायचंय, हे कळू लागलंय. आणि तसं लढू शकणा-याला सक्रीय साथ देणं त्यांनी सुरू केलंय, असं दिसतंय. ही साथ देण्यातही सातत्य असायला हवं.
इतिहासाने १९७५ दरम्यान घेतलेलं वळण कॉंग्रेसपासून सुरू होऊन आता असं कॉंग्रेसपर्यंतच पोचलंय.
आत्ता यात भागीदारी करणं, हे देशाच्या हाकेला ओ देणं आहे. स्वातंत्र्य चळवळीची बूज राखणं आहे. #गांधी_नेहरू_पटेल_आज़ाद_आंबेडकर यांचं देणं फेडणं आहे.
नव्या मनूचा, नव्या दमाचा शूर शिपाई होणं आहे.
प्रेम आणि शांतीच्या साम्राज्याचं प्रेषित होणं आहे.
स्वत:च स्वत:ला उत्तरदायी होणं आहे.
२८ डिसेंबर २०२५,
कॉंग्रेस स्थापना दिवस.
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान
मुंबई काँग्रेस निवडणुक व्यवस्थापन प्रकिष्ठ #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #राहुलजी गांधी #काँग्रेस स्थापना दिवस


