☘️ #मुलींनो_सावधान!
शरीरसुख म्हणजे प्रेम नव्हेच!
आजचं जग हे 'इन्स्टंट' झालं आहे. मैत्रीपासून रिलेशनशिपपर्यंतचा प्रवास खूप वेगाने होतोय. पण या वेगामध्ये, प्रेमाच्या नावाखाली अनेकदा फसवणूक होताना दिसते. आजकालच्या अनेक नात्यांमध्ये 'प्रेम' आणि 'आकर्षण' यातली गल्लत होताना दिसतेय. म्हणूनच, "शरीरसुख म्हणजे प्रेम नव्हे," हे वेळीच समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
आकर्षण की प्रेम?
सुरुवातीच्या काळात कुणाकडे तरी बघून मनाला छान वाटणं, सतत त्या व्यक्तीशी बोलू वाटणं, हे सर्व नैसर्गिक आहे. पण यालाच प्रेम समजण्याची चूक अनेकजण करतात. हे केवळ शारीरिक आकर्षण (Infatuation) असू शकतं. आकर्षण हे बाह्य सौंदर्यावर आणि शरीरावर अवलंबून असतं, जे वेळेनुसार कमी होऊ शकतं. पण प्रेम हे स्वभावावर, विचारांवर आणि एकमेकांच्या आदरभावावर टिकून असतं.
प्रेमाची खरी कसोटी
मुलींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा – जो मुलगा तुमच्यावर खरं प्रेम करेल, तो तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाला जास्त जपेल. ज्याच्यासाठी फक्त शरीरसुख महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही केवळ एक 'गरज' असता. एकदा ती गरज संपली की, अशा नात्यातली गोडीही संपते.
जेव्हा एखादा जोडीदार "तू माझ्यावर प्रेम करतेस, तर हे (शारीरिक संबंध) सिद्ध कर," अशी मागणी करतो किंवा त्यासाठी भावनिक ब्लॅकमेल करतो, तेव्हा ते प्रेम नसून निव्वळ वासना असते. प्रेम कधीच पुरावा मागत नाही, आणि प्रेम कधीच तुम्हाला अशा गोष्टी करण्यास भाग पाडत नाही ज्यासाठी तुमची मानसिक तयारी नाही किंवा ज्याची तुम्हाला भीती वाटते.
शरीरसुख क्षणिक, सन्मान कायमचा
शरीरसुख हे काही क्षणांचे सुख देऊ शकते, पण त्याने आयुष्यभर पुरेल असा आनंद आणि समाधान मिळत नाही. खऱ्या प्रेमात संयम असतो. समोरच्या व्यक्तीच्या सन्मानाची, तिच्या सुरक्षिततेची आणि तिच्या संमतीची काळजी असते.
जे नातं फक्त शारीरिक गरजांवर उभं असतं, ते वादळासारखं येतं आणि तितक्याच वेगाने उद्ध्वस्त करून जातं. पण जे नातं विश्वासावर आणि आदरावर उभं असतं, ते कितीही संकटे आली तरी टिकून राहतं.
सावधानता बाळगा!
त्यामुळे, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुणाच्या तरी गोड बोलण्याला भुलून किंवा 'तो सोडून जाईल' या भीतीने स्वतःचं अस्तित्व आणि स्वाभिमान गमावू नका. तुमचं शरीर हे तुमची खासगी मालमत्ता आहे, त्यावर अधिकार कोणाचा असावा हे ठरवण्याचा हक्क पूर्णपणे तुमचा आहे.
प्रेम करा, पण डोळे उघडून. जिथे शरीरापेक्षा मनाला महत्त्व आहे, जिथे तुमच्या 'नाही' म्हणण्याचा आदर आहे, तिथेच खरं प्रेम आहे. बाकी सगळा केवळ भास आहे!
👉"केवळ मुलचं दोषी असतात असे नाही तर सर्व प्रकाराला मुलीही तेवढ्याचं जबाबदार.
प्रेम म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, एकमेकांवरील अतूट विश्वास म्हणजेच प्रेम असते. प्रेम हे मन मोहून टाकनाऱ्या बाळाच्या हास्यासारखं असतं, प्रेम ही एकमेकांच्या सहवासात आपल्या साथीदाराला जपन्यासाठी केलेली धडपड असते, प्रेम म्हणजे मनाने मनासाठी केलेली साठवण असते, प्रेम करण्यासाठी शरिराने एकत्र आलेचं पाहीजे असे काहीचं नसते.
शरिरापेक्षा दोन आत्मांचे सुंदर मिलन असते. दोन हृदय तुटूनही आजन्म सलनारी सुंदर जखम असते आणि ती जखम खोलवर रूजत असते. प्रेम हे दोघांमधील होणाऱ्या दुराव्याचा भास घडवत असते, एकंदरीत प्रेम म्हणजे प्रेमचं असते.
सध्या प्रेमाच्या नावाखाली युवतींची फसवणूक करन्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काही युवक तर विविध आकर्षनांनी मुलींना जाळ्यात फसवण्याचे काम षडयंत्र रचून करत असतात. मुलींना प्रेमाचे चॉकलेट द्यायचे आणि शोषण करून सोडून द्यायचे असे प्रकार सर्रास घडत असून यामुळे अल्पवयीन मुलींचे आयुष्य उध्वस्त होत आहे. प्रेमाच्या नावाखाली युवक युवतींसह विविध स्वप्ने रंगवीतात, त्यांचे शारिरीक शोषण केले जाते व त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते किंवा त्यांचा देहव्यापारही होतो बहुदा.
प्रेमाची विविध स्वप्ने रंगवलेल्या मुलीची सर्व स्वप्ने एका क्षणात चकनाचूर होतात, तिची फसवनुक झाली कळते. ती कुनाला तोंड दाखवु शकत नाही, समाजात तिला आधार देण्याऐवजी तिची छेड काढली जाते व घडलेल्या प्रकाराने मानसिक संतुलन बिघडलेली मुलगी समाजभिती पोटी आत्महत्येसारखा अगदी टोकाचा पर्याय निवडते व सुंदर जिवण संपवून घेते. अशा प्रकाराला जास्तीत जास्त अल्पवयीन मुलीचं बळी पडतात. काय चुक असते त्या नाजूक सुकूमार कळ्यांची? फक्त एवढीचं की ते मुलांवर विश्वास टाकुन आपले सर्वस्व त्यांना अर्पन करतात.
त्या चुकीची भरपाई त्यांना आपला जिव गमावुन करावी लागते. प्रेमाच्या नावाखाली हे असले प्रकार आनखी किती दिवस चालनार? या समस्येला गंभिरतेने घेवुन याला कुठेतरी आळा बसला पाहीजे. त्यासाठी आई-वडील, शाळा व्यवस्थापन समिती, शिकवणी वर्गाचे संचालक तसेचं पोलिसांनी वेळीचं सावध होऊन या लफडेबाज ठगांपासुन मुलींचे संरक्षण करायला पाहीजे. परंतु या प्रकाराची माहिती असुनही या लोकांनी माहिती नसल्यासारखं वागणं भविष्यात मुलींचे आयुष्य धोक्यात घालू शकते, संपवु शकते.
मुलींना मुलांच्या प्रेमाचा काही अशाप्रकारे मोह पडलेला असतो की, त्या काय करीत आहेत, कशा वागत आहेत याची जाणीवचं त्यांना नसते. ट्युशन, कॉलेज, मैत्रीनींकडे जाते असे सांगुन मुलगी बाहेर पडते ती थेट मुलांसोबत बगीचे, हॉटेल किंवा सिनेमागृहात आणि आता त्यांची हिम्मत एवढी वाढली की चक्क रस्त्यावर उभे राहुन अश्लिल चाळे करायलापण घाबरत नाहीत. त्यांना संपुर्ण जगाचा विसर पडलेला असतो व दिवसेंदिवस त्यांचे मनमानी वागणे वाढत जाते. प्रेमाचा अर्थही माहिती नसलेली ही कारटी शरीर संबधांपर्यंत जावून पोहोचतात.
अशा प्रेमीयुगलांना पोलिसांनी किंवा स्थानिक नागरीकांनी वेळीचं हटकले तर कित्येक मुला-मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासुन वाचु शकतील. आजच्या शिक्षित तरूणींनी स्वतः जागरूत होत तरूणांच्या प्रेमजाळात न फसता आपले शिक्षण, करिअर, परीवार याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
#जपुन_वावर_पोरी, सार्यांचा तुझवर डोळा आहे
#हवसेने_भुकेला__नराधम, तु समजू नको #भोळा आहे.... #❤️I Love You #🌹प्रेमरंग #😘Love U बायको #😍फक्त प्रेम वेडे #💏नवरा-बायको


