⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 १५ जानेवारी इ.स.१६५६
(पौष वद्य ४ चतुर्दशी शके १५७७ संवत्सर मन्मथ वार मंगळवार)
महाराजांनी छापा घालुन जावळी काबीज केली.
महाराजांच्या बळापुढे चंद्रराव मोरे यांचे बळ अपुरे पडू लागले. चतुर्बेट संभाजी कावजी कोंढालकर यांच्या हाती पडले. जोहोरखोरेही रघुनाथपंतांनी काबीज केले. हणुमंतराव मोरे या धुमश्चक्रीत मारला गेला. तर प्रतापराव मोरे निसटून विजापूरला पळून गेला. सिवथर खोरेही महाराजांनी जिंकले. इथल्या बाबाजीराऊ या मोरे यांचा कारभारी याला कैद करून महाराजांनी त्याचे डोळे काढले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढविली. पण अखेर चंद्ररावास माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. जावळीवर महाराजांचे निशाण लागले तो दिवस होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/MeKJEQOiNZE
📜 १५ जानेवारी इ.स.१६६०
दौलोजीची कोकणावर चाल - खारेपाटण कोट जिंकला
जेव्हा छत्रपती शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो.
अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली.
राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम ह्याला ही जहाजे सुपूर्त करण्यात आली. जेव्हा त्याला रुस्तुमेजमानच्या २८ डिसेंबर १६५९ च्या पराभवाबद्दल कळले तेव्हा त्याने राजापूरहून पळ काढला. १२ जानेवारी १६६० ला छत्रपती शिवरायांनी पाचशे मावळे राजापूरला व आणखी दोनशे जैतापूरला पोहोचले.
अब्दुल करीम, महमूद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला. जैतापूरला काही इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली. १५ जानेवारी १६६० ला त्यांनी राजापूर सोडले व खारेपाटणला गेले. त्यांनी खारेपाटणच्या कोट घेतला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जानेवारी इ.स.१६८१
(माघ शुद्ध ६ षष्ठी शके १६०२ संवत्सर रौद्र वार शनिवार)
राज्याभिषेकाचे तुलादान विधी!
राज्याभिषेकाचे तुलादान विधी पार पडले. त्याजबरोबर विधीवत करावयाचे अनेक विधी जसे विनायक शांती व इतर धार्मिक वेदोक्त विधी आजच्या दिवशी पार पडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जानेवारी इ.स.१६८५
गाजीउद्दीनखान बहादूर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी भिडला. गाजीउद्दीनखानाने रायगडाच्या पायथ्याची एक वाडी जाळली. मराठ्यांचे अनेक अधिकारी व सैनिक त्यावेळी मारले गेले. कवी कलश याने सैन्य पाठवून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मोगली सैन्याने बरेच लोक बायकामुलांसह कैद केले. केली. छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी पाचाडात होते. गुरे-ढोरे जप्त केली. निजामपूर व जवळील ३ ठिकाणी जाळपोळ मोगली सैन्य तिकडे येत आहे हे समजल्यावर ते रायगड किल्ल्यावर गेले. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाडजवळ ४ मैलांच्या (सुमारे ७ कि. मी. च्या) अंतरावर गाजीउद्दीनखानाचा डेरा होता. छत्रपती संभाजी महाराजांची १५ हजारांची सेना घेऊन हंबीरराव व रुपाजी भोसले हे मोगली सैन्यावर तुटून पडले. बाण आणि बंदुकीची लढाई झाली. चारही बाजूंनी मोगली सैन्य लढत होते. पण मराठे सुद्धा तितकेच तीव्रपणे लढत होते. मोगलांनी भरपूर लुट मिळविली आणि ते कोथळा गडाच्या परिसरात गेले.
https://youtu.be/MeKJEQOiNZE
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#पानिपतचे_तिसरे_युध्द
📜 १५ जानेवारी इ.स.१७६१
रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोर अहमद शहा अब्दाली यांच्यातझाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा,अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जानेवारी इ.स.१७६८
अलिजा बहाद्दूर महादजी शिंदेंना सरदारकी बहाल
पानिपतच्या तिसर्या लढाईत दत्ताजी शिंदे,जनकोजी शिंदे यांच्या मृत्युनंतर महादजी शिंदे यांना १५ जानेवारी १७६८ या दिवशी सरदारकी मिळाली, ते उज्जैनचे जहागीरदार बनले आणि त्यांना सरंजामी नेमणूकही मिळाली.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि ज्यांनी तिच्यावर कळस चढवला ते महादजी शिंदे,ज्यांच्याबद्दल कसल्याहि प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, काटकसरी, कृष्णभक्त, सुदृढ, मध्यम उंचीचा, काळासांवळा, साध्या रहाणीचा, कवि, परधर्मसहिष्णु, शकुनादिकांवर भरंवसा ठेवणारा, त्यावेळच्या मानानें सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा होते म्हटले जाते .
महादजी शिंदेचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. ग्वाल्हेरच्या या सिंहात असामान्य शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण होते. त्यांच्या कतुर्त्वामुळे इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जात. पानिपतची लढाई, वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसर्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. अस्थिर अशा मराठा साम्राज्याला महादजींमुळे स्थैर्य लाभले. मुघल, इंग्रज आणि आप्तस्वकीयांच्या विरुद्ध ते आजन्म लढले .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ जानेवारी इ.स.१९१९
कोल्हापूरचे"राजर्षि शाहू महाराज" यांनी आदेश काढुन स्प्रुश्य-अस्प्रुश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था करुन दीली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #📜इतिहास शिवरायांचा


