#धर्मनाथ बीज 🔱🙏🚩 #ओम श्री नवनाथाय नमः #ओम शिवगोरक्ष #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
धर्मनाथ बीज
धर्मनाथ बीज उत्सव आगळा
नाथभक्तांघरी अनुपंम्य सोहळा.१
लोककल्याणास्तव नाध अवतार,
राव रंक नाही भेद कृपा सर्वांवर.२
राव त्रिविक्रम देही संचरूनी मच्छिंद्रनाथ,
रेवतीसी दिधला पुत्र बाळ धर्मनाथ. ३
देह आपुला सांडुनिया मच्छिंद्रनाथांनी,
गोरक्षांचा शब्द राखीला वचनालागुनी़. ४
शव राखिलेले गुहेत मच्छिंद्रनाथांचे,
वीरभद्रे शव ते नेले कैलासपुरीते. ५
रणी वधुनिया गोरक्षांनी वीरभद्राते,
शव मिळविले त्यांनी मच्छिंद्रनाथांचे.६
संजीवनी प्रयोगांनी उठविले गुरूते,
आश्वासुनी रेवती धर्मनाथ बा़ळाते.७
माघ शुद्ध द्वितीयेच्या मंगल दिनाशी,
अनुग्रह दिला गोरक्षांनी धर्मनाथांशी.८
देवसुरवर,यक्षगण,गंधर्व आणि प्रजाजन,
होती सकळही तृप्त भक्षूनी प्रसादालागून.९
प्रतिवर्षी मिळावा प्रसाद बीजेचा महणूनी,
गोरक्षनाथ देती आशिर्वाद उत्सवाकारणी .१०
नवनाथ भक्तांसाठी ही आनंदाची पर्वणी ,
भक्त रेवाशंकर लागे नवनाथांच्या चरणी .११
आज धर्मनाथ बीजेच्या मंगल व पवित्र दिनी माझे काव्य पुष्प धर्मनाथांच्या व नवनाथ चरणी समर्पित ़🙏💐🚩
नातभक्त कवी श्री रेवाशंकर वाघ ठाणे
Rewashankar Wagh
@everyone


