⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७७
( अश्विन शुद्ध दशमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, बुधवार )
ज्ञछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद करवून त्या प्रांताचा कारभार हरजीराजे महाडीक या आपल्या मेहुण्यांकडे सोपविला. त्यांच्या मदतीस जैताजी काटकर आणि दादाजी काकडे या दोन मराठे सरदारांना जिंजीस पाठवून दिले. हरजीराजेंनि आपला जम कर्नाटकात चांगला बसविला होता. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत कर्नाटकातील महसूर, मदुरा, रामनाड, त्रिचनापल्ली एकेरी इत्यादी पाळेगारांची छोटी-छोटी राज्ये होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७९
महाराजांनी शामजी नाईक यांना विजापुरास रवाना केले.
विजापुरचा सरदार मसाऊदखान हा दिलेरखानास दाद देत नव्हता, म्हणून विजापुरचे भले भले सरदार व सर्जाखानासही फोडून आपल्या झेंड्याखाली आणले. दिलेरखानाने मोठ्या उत्साहाने भीमा ओलांडली व लगेच सप्टेंबर मध्ये त्याने मंगळवेढे जिंकून घेतले. नाईलाजाने मसाऊदखानाने विजापुरच्या रक्षणार्थ महाराजांना विनवणी केली. महाराजांनी शामजी नाईक यांच्या बरोबर १० हजार स्वार धान्य, आणि सामानसुमानांचे २ हजार बैल आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली विजापुरास पाठविले. वकिल म्हणून विसाजीपंत नीळकंठराव हेपण विजापुरास निघाले. मसुदखानाने विजापुरच्या किल्ल्यावर संरक्षणाची व्यवस्था मजबूत करून ठेवली. महाराजांनी विजापुरवरिल संकट लक्षात घेऊन, मसाउदखानाशी बोलणी करण्यासाठी आपले मुत्सद्दी शामजी नाईक यांना रवाना केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८४
सुर्यकांत इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर झालेल्या त्यासंबंधी लंडनला पत्र पाठवले.
सुरतकर इंग्रजांच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून मुंबईकर इंग्रजानी तिथल्या रहिवाश्यांच्या सहाय्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता झुगारून बंड केले आणि इंग्लंडच्या चार्लस राजाने मुंबई बेट ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.मुंबईचा गव्हर्नर म्हणून रिचर्ड केजविन ची नेमणूक केली गेली.अधिकार मिळताच केजविनने मराठ्यांशी धरसोडीचे धोरण सोडून तह केला आणि सिद्दीचा बंदोबस्त करून त्याला मुंबईत प्रवेश बंद केला.केजविन ने या तहाची माहिती लंडनला कळवली होती,यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या सुरतकरांनी लंडनला लिहून पाठवले की,"मुंबईच्या बंडखोराकडून संभाजीकडे गेलेल्या कॅ. गॅरीच्या कामाची आम्हाला कारवारकडून काहीच बातमी मिळाली नाही.परंतु संभाजीराजांनी त्यास झिडकारून लावला असून हा कारभार महागात पडला आहे.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८९
छत्रपती राजाराम महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन
छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा पडला. रायगडावरील महाराणी येसूबाई आणि मुत्सद्दी मंडळींनी राजाराम महाराजांना स्वराज्याचे वारसदार बनवून त्यांचे मंचकरोहन केले.पुढील धोका ओळखून नियोजित योजनेनुसार राजाराम महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यासह रायगड सोडून मुघलांना हुलकावणी देत प्रतापगड मार्गे पन्हाळगडावर आले.पण मुघलांनी पन्हाळ्यालाही वेढा दिला.मुघलांशी सुरू असलेली लढाई महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन आघाड्यावर लढण्यासाठी राजाराम महाराजानी जिंजीला जायचे ठरवले.त्यानुसार वेषांतर करून मानसिंग मोरे,प्रल्हाद निराजी,कृष्णाजी अनंत, निळो व बहीरो मोरेश्वर,खंडो बल्लाळ,बाजी कदम,खंडोजी कदम या व इतर काही सहकाऱ्यासह राजाराम महाराज पन्हाळ्यावरून मध्यरात्री गुप्तपणे निसटून गेले.छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून गेले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २६ सप्टेंबर इ.स.१७१५
आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष....
पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५.
तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले.
छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २६ सप्टेंबर इ.स.१७५९
पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी
पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य तीर्थशेत्र श्रीभीमाशंकर येथील होणारी वृक्षतोड व जंगली प्राण्यांची शिकार यावर बंदी घालावी याकरिता महादजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना २६-०९-१७५९ रोजी पत्रे लिहून यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली. जंगल व वन्यप्राणी यांचे संवर्धन याविषयी असलेली जागरूकता याविषयीचे महत्व विषद करणारी हि पत्रे म्हणजे तत्कालीन निसर्गाविषयी असलेली काळजी दर्शविते.
श्रीभीमाशंकर क्षेत्राच्या आजूबाजूस तीर्थक्षेत्र व वनराई असून त्यात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्यास असतात. त्या ठिकाणी झाडांची तोड केली जाते. त्यासंबंधी ताकीद देण्यात यावी . तीर्थक्षेत्राच्या परिसरातील वृक्षतोड न करता तीर्थक्षेत्राच्या राईबाहेरील झाडांची तोड करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, रामचंद्र कृष्णराव तसेच मुकादम आणि देशमुखांना भीमाशंकरच्या आसपासच्या प्रांतात झाडे न तोडण्याचे आदेश जारी करावेत.
श्रीभीमाशंकर क्षेत्रात निरुपद्रवी सांबर व अन्य वन्यजीव आश्रयास असतात. भोवर गावातील गावकरी व कोकण प्रांतातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करतात. तीर्थक्षेत्राच्या तीन कोस परीसरात शिकार करण्यास मनाई करण्यात यावी . शिकार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, यासंबंधी ताकीद देणारी पत्रे जारी करावीत .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀