🌧🌧🌧🌧🌧
*मलाही दिवाळी पहायची आहे*
या वेळेस पाऊस म्हणाला
मी परत नाही जाणार ,😏
दिवाळीची मजा
मी पण अनुभवणार ...🤗
मी आल्यावर लोक करतात
नुसते उपास अन् तापास, 🙃
कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास...🙁
वास घेऊन पदार्थांचा जेव्हा
होईल मी तृप्त, 😌
मगच ठरवलय मी
ह्या थंडीत होईल लुप्त... 🌫
चातुर्मासातला फराळ म्हणजे
साबुदाणा अन् भगर, 😖
त्याला कशी येणार
दिवाळीच्या फराळाची सर... 🤨
छत्री -रेनकोट बघून बघून
मी ही कंटाळलोय, 😩
दिवाळीचे नविन कपडे
बघायला मी थांबलोय ...😍
म्हंटल होत आपणही कुर्रम- कुरम मस्त चकली खाऊ, 😉
पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही होईल मऊ - मऊ ...😒
लाडू बसला फुगून
करंजी बसली गुरफटून, 👿
"अतिथी देवो भव"
सारेच कसे गेले विसरून... 🤔
मला बघून सारेच जण हिरमुसून बसले, 😼
उदास चेहरे बघून त्यांचे
मलाही रडू फुटले... 😭
बघायचा होता मला
तो फटाक्यांचा धूर, 🎆
पण रडण्याने माझ्या
आला नदीला परत पूर... 🌊
शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहायचे, 💃🏽🕺🏼
चकल्या नाही तर नाही
कांदा-भज्यांवरच दिवाळी करायचे... 🎊🏮🌷🍀🌷🍀🌷🍀 #पाऊस #बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #पाऊस