#ओम शिवगोरक्ष #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम श्री नवनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
*श्री गुरूदेव दत्त / हर हर महादेव /नवनाथ महाराज की जय* //🙏🙏🙏🌺🌺🌹🌹🌹
*नक्की वाचा सर्व ग्रुप अँडमिन्सची विनंती.* 👇🏻🌺🙏
*ॐ हरीनारायण अवतारो /* *तत्स चौऱ्यांशी सिद्ध गुरुये /*
**जरा जन्म त्वयं त्राते /*
*महा सत्य गुरूदासीने / त्वमेव* *भक्त गुरु दाता /भक्त* *क्लेश हारीने / नम तत्* *सत्यस्य गोरक्ष नाथाय* *नमौस्तुतै //**
// जोवरी जगती ठसा नाथपंथाचा अजरामर आहे / तोवरी चंद्र सुर्य वेद विश्वात पाहे //
सर्व भाविक भक्तांना श्री शंभु जती शिव चैतन्य गोरक्षनाथ महाराज प्रगट दिनाच्या मन:पुर्वक हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
नमस्कार माऊलींनो उद्या रोजी महा कार्तिक त्रयोदशी शनिवार दिनांक ३/११/२०२५ विश्वातील महायौगी राजाधिराज महाराज महासदगुरूशिष्य महातापसी साबरी विद्याजनक जग्गन्नाथ दिननाथ भक्त वत्सल कारूण्यामुर्ती दयासागर त्रैलोकपालक श्रुती शास्त्रपुरान स्तुतीकारक भक्त क्लेशहारक भक्त चिंतामनी कामधेनु क्रुपासिंधु परब्रम्ह सच्चिदानंद हरी नारायण अवतार शिव शंभु जती श्री सदगुरू चैतन्य गोरक्षनाथ महाराज यांचा प्रगट दिन सोहळा आहे .
तरी आपल्या फेसबुक व वाँट्सअप वरील सर्व भाविक भक्तांनी व ग्रुप मेंबर्सने नोंद घ्यावी की उद्या जास्तीत जास्त नामसाधना व श्रींचे पोथी वाचन करावे .
नवनाथ भक्तीसार ग्रंथातील अध्याय २ व ९ पठन करून मनोभावे नवनाथांची आरती करावी नामसाधना जप करावा ,व आपल्या नियोजनानुसार कुठलाहि गोड पदार्थ श्री चैतन्य नवनाथ महाराजांना दाखवावा ,व तोच नैव्यद्य जेवताना सर्वांनी प्रसाद म्हणुन घ्यावा.
नवनाथ ग्रंथात वर्णन केल्याप्रमाने श्री गुरू नाथादि नाथ महायौगी चैतन्य मच्छींद्रनाथांनी सरस्वती नावाच्या ब्राम्हण स्त्री ला संतान नसल्याने पुत्रप्राप्ती साठी सुर्याचे वीर्य मंत्राने दिलेले भस्म सरस्वती नावाच्या विप्र ब्राम्हण स्त्रीने इतरांच्या सांगण्यावरून गाईच्या गो मातेच्या शेणाच्या उकीरड्यावर टाकुन दिले.
तेथेच बारा वर्षांनी श्री गुरू चैतन्य गोरक्षांचा जन्म जाहला व श्री चैतन्य मत्सेंद्रनाथ त्यांस तेथुन जगत भक्तीप्रसार जगदउद्धार कार्यास घेऊन गेले.
माऊलींनो यातुन मुळ तर्क हाच की नाथपंथीय महायौगियांनी साधु संतांनी रूषी मुनींनी आपल्याला हितासाठी दिलेले मार्ग आपण दगडासारखे भिरकाऊन टाकतो व नको ता गोष्टिंच्या मागे लागुन स्वताला विनाशाकडे ओढत नेतो .
परंतु अभ्यास नीट केला तर नवनाथांनी आपल्याला विनाशाकडुन अविनाशापर्यंत विश्वापासुन परमेश्वरापर्यंत जायचा सढळ मार्ग म्हणजेच गुरूक्रुपा करून घ्या असे सांगितले आहे परंतु आपण कधी याचा विचारच केला नाहि ,
न्द्यान अभिमान याच गोष्टिंमधे अजुन आपण अडकुन आहोत परंतु माऊलींनो सावध व्हा.
हे शरीर म्हणजे आपले अस्तित्व नाहि आपण या देहापेक्षा कुणीतरी वेगळे आहोत देह क्षणभंगुर आहे परंतु आपण चिरामय निरंजन निराकारी आत्मा आहोत .आणि याची अनुभुती स्वस्वरूपाची ओळख होणे आहे तर गुरूक्रुपा खुप आवश्यक आहे.
अन्यथा पुन्हा पुन्हा जन्म म्रुत्युचे फेर भोगावे लागतात.
पुन:रूपी जननम् पुन:रूपी मरनम् पुन:रूपी मात्रु जठरे शयनंम्
पुन्हा पुन्हा जन्म म्रुत्यु आणि आईच्या पोटि नऊ महिने गर्भवास सहन करावा लागतो मग जनिम माणसाचा असो कींवा जनावरांचा कीड्या मुंग्यांचा फरक पडत नाहि.
म्हणुनच जन्म म्रुच्यु चुकविन्यासाठी स्वसरूपाची ओळख करा आणि नवनाथांनी सांगितलेसा शाश्वत निरंजन निर्विकार मार्ग आचरणात आणा.
केवळ साबरी म्हणजे नवनाथ नाहित कींवा साबरी मुळे नवनाथ घडले नाहित ,जोवर नवनाथ साधु संत आहेत तोवर साबरी विद्या सिद्ध आहे जगतात ,
या संतांच्या पवित्र समाध्या आपल्या पवित्र भारत भुमीत असल्याकारणे मोठ्यातल्या मोठ्या महासंकटातुनहि आपण सहज मुक्त होत आहोत त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्या दासांवर.
म्हणुनच त्या सरस्वती नावाच्या ब्राम्हण स्त्रीला नाथांचा खरा प्रसाद समजला नाहि तिने तो फेतुन दिला . पण आपल्याला नाथ दत्त सेवेत मिळालेला जन्मच प्रसाद म्हणुन समजा हा जन्म व्यर्थ घालु नका हिच सर्व गुरूबंधु ग्रुपअँडमिन्सची मनापासुन कळकळीची विनंती.
// ज्याने गुरू नाहि केला / त्याचा जन्म वाया गेला //
सर्वांना श्री शंभु जती शिव चैतन्य गोरक्षनाथ महाराज प्रगट दिनाच्या मन:पुर्वक हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
ओम कैलास पतै हरहर महादेव
श्री गुरूदेव दत्त
ओम शिव चैतन्य मच्छींद्रनाथाय नम:
ओम शिव शंभु जती गोरक्षनाथ महाराज की जय.
नवनाथ महाराज की जय.
अलख निरंजन जय गुरू आदेश.

