दो दिल एक जान..
"एsssss..... तो माझा बॉय फ्रेंड आहे... तु त्याच्या पासुन लांब रहायचं सांगून ठेवतेय..." एक मुलगी दुसऱ्या मुलीला खुन्नस देऊन बोलत होती....
"शट अप दिया..... कालच तो मला आय लव्ह यू बोलला.... त्याचं माझ्यावर प्रेम आहे... तुच त्याच्या आजूबाजूला फिरकु सुद्धा नकोस!!" समोरची मुलगी डबल खुन्नस देऊन म्हणाली...
"यू लायर....... विराज मी सोडून दुसऱ्या कोणालाच लाईक नाही करत.... तु... तु ना दूर रहा त्याच्या पासुन.... विराज फक्त माझा आहे... त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केलास तर सोडणार नाही मी तुला..." पहिली वाली आग ओकणाऱ्या डोळ्यांनी तिच्या पुढे बोट करून म्हणाली...
"ओके अस आहे तर चल आपण त्यालाच विचारूयात..." दुसरी वाली बोलली...
"येस्स!! चल..." म्हणत त्या दोघी पण आता मुलं कॉलेजच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत होती तिकडे जायला निघाल्या...
पण त्याचं वेळी त्या दोन मुलींचं चालेल भांडण बाजुला उभ्या मुलाने ऐकल होतं... तो त्यांच्या आधी ग्राउंडच्या दिशेने धावला.....
"विराजsssssss...... विराजsssssss........ हे सिक्सरsssss........." विराजने सिक्सर मारला तशी त्यांची टीम विनर झाली, तसा एकच जल्लोष झाला.... "हेयेssss विराजssss..... विराजsssss......" टीम मेंबर त्याच्या दिशेने धावत येत ओरडत होते... विराज बॅट वर हवेत फिरवत त्यांच्या दिशेने आला... तसा सगळ्यांनी मिळून त्याला गराडा घातला... त्याच्या नावाचा गजर करत आता त्या सगळ्यांनी त्याला खांध्यावर उचलून घेतलेलं....
त्याचं वेळी त्याने डोक्यावरच हेल्मेट बाजुला केलं.... तशी तिथे असणाऱ्या हजारो मुलींची धडकन जाग्यावर थांबली.... घामाने डबडबलेला त्याचा हॅन्डसम फेस जास्तच चमकत होता... हलकीशी तुरळक बेअर्ड जास्त नव्हती आत्ता कुठे मीसरूट फुटलेलं त्याला पण तो सेम राजची फोटो कॉफी होता..... हजारो करोडो दिलो की धडकन...
"विराजsssssss...... विराजsssssss........ पूर्ण कॉलेज ग्राउंड अजुनही त्याच्या नावाच्या जल्लोषाने दुमदुमत होत.... त्याच्या टीम मध्ये सगळ्यात छोट्या असलेल्या विराजने समोरच्या टीमला चितपट केलेल... शेवटच्या चार बॉल मध्ये सलग चौकार षटकार मारून त्याने त्याच्या टीमला विजय मिळऊन दिलेला... त्यामुळे त्याची टीम त्याला डोक्यावर घेऊन नाचत होती...
"वीरssssss..... वीरssssss......... वीर....." ओरडत गर्दीतून त्याचा मित्र त्याच्या जवळ आला.... तसा विराज आता खाली उतरला...
"व्हॉट हॅपेंड ब्रो!! चिल कर... डोन्ट वरी आपली टीम विन झाली..." विराज नॅपकिनने चेहऱ्यावरचा घाम टिपत म्हणाला...
"टीमचं सोड!! आता तुझी वाट लागणार आहे..." तो विराजचा फ्रेंड धावत आल्या मुळे धापा टाकत बोलत होता....
"व्हॉट..... वाट लागणार... ऍनी व्हॉट आर यु टॉकिंग अबाऊट??" विराजने समोरच्या मुलाच्या हातुन पाण्याची बॉटल घेत विचारलं... बाजुला असणाऱ्या मुलांचा गडबड गोंधळ अजुनही सुरूच होता.. त्यामुळे विराजला त्याचा मित्र काय बोलतोय ते नीट ऐकु येत नव्हतं... त्यात तो चेहऱ्यावर असे काही एक्स्प्रेशन आणत होता की विराज गोंधळून गेला...
"ओके..... तिकडे चल..." म्हणत ऍनी विराजला घेऊन तिथुन बाजुला गेला....
"व्हॉट प्रॉब्लेम ऍनी?? बोल पटकन काय झालं??" विराज किंचित वैतागून म्हणाला...
"प्रॉब्लेम....... तो बघ तिकडे प्रॉब्लेम तुला शोधत आहे... त्या दोघी आत्ता तुला विचारायला आल्या आहेत तुला त्या दोघींपैकी कोण आवडत???" ऍनी वैतागून म्हणाला....
"यार ऍनी!! दोघी पण जबरदस्त हॉट आहेत ना..." विराज डोळा मारत त्याच्या खांध्यावर कोपर टेकून तिकडे गर्दीत त्याला शोधणाऱ्या त्या दोघींकडे बघुन मिश्किल हसत म्हणाला.. त्याला शोधताना पण त्या दोघी एकमेकींशी भांडत होत्या...
"सिरियसली वीर.... तुला त्या दोघी पण आवडतात??" ऍनी अविश्वासाने त्याच्याकडे बघत पुढे म्हणाला.... "पण त्या तुला का शोधतायत माहित आहे का?? त्या दोघींपैकी कोणावर तुझं प्रेम आहे हे विचारणार आहेत त्या तुला!! अन्सर तयार ठेव!!" ऍनी चिडून म्हणाला.. तसा आत्ता कुठे विराज वास्तवात आला..
"व्हॉट??? अरे यार सीली गर्ल्स..... ऍनी वेट मी एक कॉल करतो... त्या इकडे आल्या तर सांग त्यांना विराज कुठे आहे ते माहित नाही..." हे बोलून विराज गालात हसुन डोळा मारत तिथुन थोडं बाजुला गेला आणि त्याच्या मोबाईल वरून त्याने एका नंबर वर कॉल लावला...
############
"आरु आर यू मॅड???? नशिब त्या मुलीने तुला वाजवली नाही..." आर्वीला तिची फ्रेंड स्वरा समजावत होती.... ही तिचं स्वरा आहे बर का जिच्या सोबत आर्वी लहानपणी स्कुल मधून मज्जा करायला गेलेली.. आणि ती सापडत नव्हती म्हणुन आरोहीचा जीव गळ्याशी आलेला... लहानपणा पासुन दोघी एकत्रच आहेत.😊
"स्वरा अग मला सिरियसली हेच वाटलं की तो मुलगा त्या मुलीची छेड काढतोय म्हणुन मग पकडली कॉलर आणि दिली ठेऊन!! आई शप्पत पण नंतर त्या मुलीचा फेस बघायला तु हवी होतीस.... डेंजर चिडलेली माझ्यावर ती...." आर्वी पोट धरून हसत तो सीन तिच्या फ्रेंडला सांगत होती की तेवढ्यात तिच्या हातातला मोबाईल वाजला तशी तिने स्क्रीन पाहिली....
"यार आता हा का मला कॉल करतोय..." आर्वी मोबाईल स्क्रीन कडे बघत तोंड कसनुस करत म्हणाली...
तसं स्वराने पण तिच्या हातातल्या मोबाईल स्क्रीन वर नजर टाकली.... "विराजsssss...... तेरा हिरो..." स्वराने आर्वीला चिडवलं...
"गप्प ग अस काही नाही, आय एम डॅम शुअर त्याचं काहीतरी काम असणार..." हे बोलत तिने कॉल घेतला...
"बोल..." अटीट्युड मध्ये म्हणाली..
"आर्वी मला तुझी हेल्प हवीय! आत्ता लगेच माझ्या कॉलेजला ये..." विराज पलीकडून म्हणाला... 'हा मला हेल्प पण आशी मागतोय जशी काय हेल्प मागुन मलाच हेल्प करतोय...' शेवटचं वाक्य ती मनातच बोलली..
"व्हॉट??? आत्ता..... माझं लेक्चर आहे मला नाही जमणार..." ती पण आता अटीट्युड मध्ये सरळ नकार देत म्हणाली...
"आरु यार प्लिज ये ना..... खरच मला आत्ता तुझी हेल्प हवीय!" त्याचं बोलणं ऐकुन तिने मोबाईल समोर पकडला आणि खरच विराजचा नंबर आहे का ते बघितलं... त्यानंतर आज सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवला आहे ते ही पाहिलं... स्वरा मात्र आत्ता तिच्याकडे विचित्र नजरेनं बघत होती...
'द विराज मराठेला माझी हेल्प हवीय??' तिने मनातूनच स्वतःला प्रश्न केला...
"आर्वी आर यू देअर???" त्याने पलीकडून विचारलं
"अम् हो आहे.." आर्वी नाक फुगवत बोलली..
"ओके येतेयस ना मग जरा लवकर ये..." तो पुन्हा थोडं विनंतीच्या सुरात म्हणाला...
"ओके बट कसली हेल्प हवीय तुला?" तिने विचारलं
"तु आधी ये तरी नंतर सांगतो तुला... आणि जरा लवकर ये उगाच टाइम पास नको करुस.." तो पलीकडून आरोगन्टली बोलला...
तसा आता तिने वैतागून कॉल कट केला...
"काय ग... काय म्हणत होता विराज??" स्वराने डोळे मिचकावत विचारलं
"त्याला हेल्प हवीय!! आणि त्यासाठी मला त्याने त्याच्या कॉलेजला बोलावलंय... यार हा विराज ना राहिसजादा नुसता हुकूम सोडतो... असा डोक्यात जातो ना..."
"मग राहुदेत जायचं..." स्वरा मुद्दामच म्हणाली...
"नसतेच गेले, पण अजुन कुठल्या प्रॉब्लेम मध्ये फसला म्हणजे अवनी आंटीला टेन्शन..." आर्वी तोंड छोटं करत म्हणाली...
"ओके चल तु पण आपण पटकन जाऊन परत येऊयात..." आर्वी तिच्या कार जवळ आली.. आणि तिने की लाऊन पटकन डोअर ओपन करून ड्रायव्हिंग सीटवर बसली.. तिच्या बाजुच्या सीट वर स्वरा बसली
"काय ग... त्याच्या नावाने खडे फोडतेस आणि शेवटी त्याच्या मदतीला धाऊन पण जातेस.." स्वरा आता तिला चिडवत म्हणाली...
"तुला सांगितलं ना... हा काहीतरी उद्योग वाढवतो आणि तिकडे अवनी आंटीला टेन्शन येत.. तरी बर याचे कारनामे राज अंकल पर्यंत पोहचत नाहीत... स्वरा तु पाहिलंस ना अवनी आंटीला... किती इनोसन्ट आहेत त्या आणि हा दिवटा त्यांच्या पोटी कसा जन्मला मलाच समजतं नाही..." ड्राइव्ह करता करता आर्वीच तोंड पण सुरूच होतं...
"पण काहीही म्हण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय, त्यात इतका हॅन्डसम अग ती जेनी सांगत होती.. त्यांच्या कॉलेजच्या कितीतरी मुली त्याच्या मागे फिरतात..." स्वरा बोलत होती..
"आणि हा रहीसजादा स्टडी टाइम मध्ये त्या मुलींना फिरवतो... पण राज अंकलच्या समोर याची कशी फाटते ते तु बघितलं नाहीस.. म्हणुन तर आंटी त्यांना याचे पराक्रम सांगत नाहीत.." बोलता बोलता त्या दोघी पुढच्या दहा मिनिटात विराजच्या कॉलेज जवळ येऊन पोहचल्या... आर्वीने त्याला कॉल करुन कुठे आहेस म्हणुन विचारलं... आणि मग तिने कार पार्क केली आणि दोघी पण कॉलेजच्या गेट मधून आत आल्या... मुंबईतल्या टॉप कॉलेज मध्ये विराज होता आणि आर्वी होती ते कॉलेज पण टॉपला होतं...
आर्वी स्वराला घेऊन ग्राउंडच्या दिशेने निघाली होती... "आरु अग कुठे आहे तो, आणि आपण इकडे कुठे निघालोय??" स्वराने विचारलं...
"हेय हाय बेब!!" अचानक त्या दोघींच्या समोर एक मुलगा आला... आर्वीने त्याच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला आणि साईडने जायला निघाली...
"ओ हो हाय हाय रे मेरी जानेमन...?" त्याचा मित्र आता स्वरा जवळ येत बोलला... आणि पहिला मुलगा आत्ता आर्वीकडे नशिल्या नजरेनं बघत पुढे म्हणाला
"हाये रे क्या जवानी हैं, हम तो लूट गये.... बर्बाद हो गये जानेमन... ऐसे मत देखो हम तो हुस्न के पुराणे आशिक हैं.." घाणेरड्या कमेंट्स करत तो एक पाऊल पुढे आला.... तर दुसरा आर्वीला खेटून उभ्या स्वरा जवळ येण्याचा प्रयत्न करत होता...
"स्वरा मागे हो तु, इस पुराणे आशिक को तो मजा चकाना ही पडेगा..." हे बोलत आर्वीने तिच्या टॉपच्या स्लीव्ह पाठीमागे घेतल्या.. आणि खाडकन त्याच्या मुस्काटात ठेऊन दिली....
तसा आता त्वेशाने दुसरा पुढे आला... त्याला पण दोन ठेऊन दिल्या.... दोघांच्याही डोळ्या समोर दिवसा उजेडी काजवे चमकले...
"औकातीत रहायचं समजलं ना... हुस्न का आशिक म्हणे!!" ती लाल बुंद डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोलली...
"एssss....." म्हणत पहिला वाला तिच्या दिशेने येतच होता की तेवढ्यात तिथे विराजचा एक मित्र आला जो आर्वीला पण ओळखत होता...
"आर्वी ते ते... बघ तिकडे विराज!! आज त्याचं काही खरं नाही..." तो बोलला... तसं आर्वीने त्या दिशेला पाहिलं...
थोडया अंतरावर तिला मुला मुलींचा घोळका दिसला....
"विराज बेबी टेल ट्रुथ!! डू यू लव्ह मी..." एक मुलगी एका बाजुने त्याच्या गळ्यात पडून त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत त्याला विचारत होती... त्याचं वेळी दुसऱ्या मुलीने त्याचा चेहरा स्वतःकडे वळवला.... "विराज तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणुन सांग तिला.." दोघींच्या मध्ये विराज चांगलाच फसलेला... खरतर चुक त्या मुलींची नव्हतीच!! पूर्ण कॉलेज मधल्या मुली त्याची स्वप्न पहायच्या त्यातल्याच अनेक त्याच्या मागे फिरायच्या तो पण मग मस्त त्यांना फिरवायचा पण आजचं हे प्रकरण त्याच्या चांगलंच अंगाशी आलं होतं, त्याला आत्ता त्या दोघींपासून सुटका हवी होती, त्याचा मित्र ऍनी तर डोक्याला हात लाऊन बसलेला... त्याचं वेळी विराजला समोरून आलेली आर्वी दिसली.. ब्लु जीन्स त्यावर स्काय ब्लु कलरचा टॉप केसांची पोनी... सिपल ड्रेस मध्ये पण खुप सुंदर दिसत होती ती... त्याने त्या दोघींना झटकलं आणि धावतच आर्वी जवळ आला आणि तिला काही कळायच्या आतच याने तिला घट्ट मीठी मारली... तशी ती blank चं झाली....
क्षणातच तिच्या सर्वांगातून सळसळती वीज वाहून गेली... पहिल्यांदाच ही आशी वेगळी फिलिंग तिच्या तना मनाला स्पर्शून गेलेली.... या पूर्वी ती तिच्या डॅडूच्या मिठीत अनेक वेळा गेली होती... पण आज आतमध्ये काहीतरी वेगळीचं जाणीव तिच्या मनाला झाली...
बाजुला उभी स्वरा तर आत्ता विराज कडे डोळे विस्फारुन बघत होती... विराज आर्वी पेक्षा एक वर्षाने छोटा होता पण तरीही आर्वी त्याच्या पुढे इतकुशी वाटतं होती... शरीराने भरलेला जिम करून कामावलेलं पिळदार शरीर... आर्वीला तर त्याच्या विळख्यातून हलता ही येत नव्हतं... त्या दोन भांडणाऱ्या मुली आणि तिथे असणाऱ्या असंख्य मुलींची हृदय तुटून गेली होती, विराजच्या मिठीत आर्वीला पाहुन...
आणि इकडे आर्वी तर सुन्नचं झालेली... आजूबाजूला इतका गडबड गोधळ सुरु होता पण तिच्या कानात तर फक्त एकच आवाज घुमत होता... धक्क..... धक्क.... धक्क..... त्याच्या ठोक्याचा आवाज....
"वीराजsssssss............ यूssssss......चीटर..... ही ही कोण आहे???" त्या दोघी पण आत्ता आग ओकणाऱ्या डोळ्यांनी त्या दोघांकडे बघत त्याला विचारत होत्या.....
"शी इज माय गर्लफ्रेंड!!" विराज आर्वीला मिठीतुन बाजुला करून तिला एका साईडने कवेत घेत बोलला... आर्वी मात्र अजुनही शॉक मध्ये होती...
आणि स्वरा डबल शॉक झालेली, इतर वेळी मुलांनी तिच्याकडे बघितलं तरी त्या मुलाची बुबळे काढून हातात देणारी ती , आत्ता विराजच्या या वागण्यावर काहीच रियाक्ट नाही झाली ते पाहुन स्वरा विचारात पडलेली...
"समजलं ना.... निघा आता इथुन..." ऍनीने विराज वरून भांडणाऱ्या त्या दोघींना रस्ता दाखवला...
"विराज सिरियसली.... ही तुझी गल्फ्रेंड आहे..." त्याच्या ग्रुप मधल्या लिशाने विचारलं...
तसं आता त्याने आर्वी कडे पाहिलं... तिच्या नजरेत राग आणि प्रश्न दोन्ही पण होतं... ते पाहुन तो तिला बाजुला घेऊन गेला....
"आर्वी आय एम सॉरी.... तु तु पाहिलीस ना सिचुयेशन?? काय करावं मला सुचलंच नाही.... सॉरी यार बट तु हे मनावर घेऊ नकोस...." तो बोलला तसं आर्वीने पुन्हा मान वर करून प्रश्नार्थक नजरेनं त्याच्या नजरेत पाहिलं अन् पुढे म्हणाली..
"तु मला या साठी इकडे बोलवलं होतंस का??" तिने आता प्रचंड चिडून विचारलं.. कारण तिला वाटलेलं तो खरच संकटात सापडला असेल म्हणुन ती लेक्चर बंक करून आलेली...
"ऍक्च्युली... मी तुला बोलऊन तु माझी गल्फ्रेंड आहेस अस खोटं इंटरेक्शन करून देणार होतो त्या दोघींना... पण तु पाहिलं असशील तुला अजुन थोडा लेट झाला असता तर... त्या दोघींनी मला फाडून खाल्लं असत..." तो बेफिकीर पणे हसत बोलला...
तिच्या मात्र काळजाला लागलं त्याचं बोलणं...
"विराज हे शेवटचं!! पुन्हा तुझी ही असली लफडी निस्तरण्यासाठी मला बोलावलंस ना.. आई शप्पत मी आंटी अंकलना सर्व सांगेन..." ती त्याच्याकडे रोखून बघत त्याच्या पुढे बोट करून बोलली... आणि ताडकन तिथुन परत निघाली....
प्रतिलिपि अॅपवर कथा वाचा
दो दिल 💞 एक जान...
https://marathi.pratilipi.com/series/kj1kwrjqefoe?language=marathi&utm_source=android&utm_medium=content_share
☝ ☝ ☝
*कथा वाचण्यासाठी क्लिक करावे*
#✍मराठी साहित्य #☺️प्रेरक विचार #📚मराठी रोमांचक कथा🧐 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🌹प्रेमरंग