*_काढा एक दिवस पिकनिक_*
*_मैत्रीसाठी,_*
*_एकदा तरी भेटूया_*
*_कुठे तरी,_*
*_भेटून घट्ट होतील_*
*_मैत्रीच्या गाठी,_*
*_पुसून धूळ साफ करू_*
*_आपली नाती._*
*_बस्स झालं व्हॉटसअप,_*
*_गुडमाॅर्नींग,_*
*_भेटून एक मिठी मारु_*
*_आनंदी._*
*_दोन चार शिव्या हासडू_*
*_प्रेमाच्या,_*
*_पोटभर हसण्याला_*
*_भेटू नगदी._*
*_ब-याच दिवसांत_*
*_मैफिल जमली नाही,_*
*_मनातली जळमटं पुसली_*
*_नाही._*
*_साठून राहिल्या गोष्टी_*
*_खराब होतात म्हणे,_*
*_बाहेर काढू सारे_*
*_पर्वा कसली नाही._*
*_खरंच मित्रांनो..._*
*_काढा एक दिवस_*
*_मैत्रीसाठी,_*
*_काहीच नाहीतर,_*
*_गप्पा मारण्यासाठी._*
*मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* #मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
00:49

