ShareChat
click to see wallet page
search
बायको रुसते तेंव्हा.. बायको रुसते तेंव्हा.. शांत राहणं पसंद करा.. उगीच तिला चिडवू नका.. राग हळू हळू होतो शांत.. विनाकारण डिवचू नका.. चूक असेल तुमची.. आधी माफी मागा तीची.. थोडीशी काम घरातली.. वाटून घ्या बायकोची.. एखादा विनोद करा.. बघा जरा हसते का ती... नाहीतर हळूच जवळ ओढा.. बघा शेजारी बसते का ती.. बायको रुसते तेंव्हा.. जेवायला बसला की.. स्वतः ताट वाढून घ्या.. तीच्या आधी मुद्दामून.. तिचपण ताट वाढून दया.. घ्या एक घास बिनधास्त.. बघा भरवून खाते का ती.. लागलाच ठसका पाणी पाजा.. बघा पाणी पिते का ती.. तरीपण नाही झाली शांत.. गुपचूप झोपी जा.. दुसऱ्या दिवशी तीच्या आधी.. झोपेतून जागे व्हा.. बायको रुसते तेंव्हा.. एक काम करा सकाळी.. पाणी अंघोळीला ठेऊन दया.. सवय नसली तरी.. घर किचन जाडून घ्या.. चहा येतोच सर्वाना.. त्यादिवशी तुम्ही करा.. तीच आवरून झाल ना.. कप समोर धरा.. निरखून पहा तिच्याकडे... थोडी का होईना हसेल ती.. बोलेल ही नक्कीच नाहीतर.. चूप बसेल ती.. बायको रुसते तेंव्हा.. डब्बा नेऊ नका कामावर.. ति मग टेन्शन घेईल.. कामावर जेवायच्या वेळेला.. बघा फोन येईल.. उचलू नका कट करा.. बाहेर जेवा त्यादिवशी.. घरी जाल ना चेहऱ्यावर तीच्या.. काळजी दिसेल अशी.. मग बोलेल ती जवळ येईल.. तिला जवळ घ्या.. तिला आवडेल ते खाऊ घाला..अन बस वेळ दया..|| #कवी #कविता #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग
कवी - Meta 4l Meta 4l - ShareChat