ओम नमो आदेश गुरुजी
सत् नमो आदेश जी
माया मच्छिंद्रनाथजी को आदेश
कविनारायण आले जन्माला
नवनाथांचा उध्दार झाला
शिवपुत्र म्हणती मच्छिंद्रनाथाला
जसा कालिचा विरचं बांधला !! धृ !!
कालिना अवतार घेतला असा
बोलु लागली आघोरी भाषा
नाथांनी घातल्या चारीच्या दिशा
कालिना सोडला पिराचा मशा
आलख निरंजन आवध तो दिला
जसा कालिचा विरचं बांधला
शिवपुत्र म्हणती मच्छिंद्रनाथाला
जसा कालिचा विरचं बांधला !! 1 !!
कालिच्या हातात पिराचं कडं
आडूळ गावाच्या शिवाच्या पुढं
नाथानं केलं देविला वेडं
कालिनं सोडलं पिराचं मडं
हातात चिमटा घेऊन वाजवू लागला
जसा कालिचा पिरचं बांधला
शिवपुत्र म्हणती मच्छिंद्रनाथाला
जसा कालिचा विरचं बांधला !! 2 !!
कालिची होती आघोरी शक्ती
नाथांची होती शिवाची भक्ती
रनात उभा मच्छिंद्र विरं
कालिचा बांधला बारावा पिरं
झोळितुन उदी फेकु तो लागला
जसा कालिचा विरचं बांधला
शिवपुत्र म्हणती मच्छिंद्रनाथाला
जसा कालिचा विरचं बांधला... #मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣


