#जय जय राम कृष्णा हरी
‼️वारी सौख्य शांती मार्गाची‼️
⚜️⚜️⚜️🚩⚜️⚜️⚜️
🚩आनंदी°पहाट 🚩 श्रमसाफल्याच्या आनंदाची🚩
🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹
आता कोठे धावे मन ।
तुमचे चरण देखलीया ।
भाग गेला शीन गेला ।
अवघा झाला आनंद ॥
प्रेमरस पडली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ।
तुका म्हणे आम्हा जोगे ।
विठ्ठल घोगे खरे माप ॥
.... संत तुकाराम
मन.. जे वायूवेगाने धावतं. तो मनाचा गुणधर्म. क्षणोक्षणी धावणाऱ्या मनाला आवर घालणे हे अत्यंत अवघड. पण यावर मार्ग आहे. पायी चालणाऱ्या वारकरी बांधवांनी जेव्हा पंढरी गाठली, चंद्रभागा स्नान केले.. विठ्ठलाचे मुखदर्शन.. प्रत्यक्ष दर्शन, मंदिराचे कळसदर्शन घेतले, तेव्हा या धावणाऱ्या मनाचा प्रवास मनाचा प्रवास थांबतो तो विठ्ठल चरणाशी थांबला. चालण्याचा शीण पळाला. मन आनंदले.. कृतार्थ भाव जागला.
आज विठ्ठल दर्शना साठी आपण पात्र ठरलो हा जीवनातील मोठा आनंद क्षण. हे घडले ते परमेश्वर भक्तीचा लळा लागल्यामुळे. पण यासाठी भाविक कुटुंबात जन्म मिळायला हवा. शिवाय सहकारीही तसेच भेटायला हवेत. हे असे भाग्य लाभते ते प्राप्त जन्मातील सत्कृत्ये आणि पूर्व जन्म पुण्याईने.
पंढरपूर वारी. जगात विश्वास संपत असताना वारीत मात्र सर्वत्र परमेश्वरावर श्रद्धा, विश्वास सापडतो. वारीतील नित्य नामस्मरण.. आरती आणि हरिपाठ यामुळे जीवनाला वळण लागते. वारीमुळे लाभते निर्मळ मन.. समत्वभाव.. अजातशत्रूत्व. समोरच्या जीवात परब्रह्म अंश असल्याची जाणीव. वारी शिकवते दूराग्रह संपवत विवेकी.. संयमी.. शांतीप्रिय.. स्वावलंबी साधे पण संपन्न जीवन जगण्याची कला.
सामान्यच काय, विठ्ठल दर्शनाचा आनंद संत मंडळींनाही झाला. तुकोबांचा जीव कासावीस झाला होता. पोटातील गर्भाला काय हवे हे मातेचे डोहाळे सांगतात. गर्भ आणि माता यांचे जसे अतूट नाते तसेच तुकोबा आणि विठ्ठल यांचे नाते होते. मग जेव्हा बिठ्ठल दर्शन झाले तेव्हा मात्र ते देहभान विसरले. मनाचा डोह आनंदस्वरुप झाला. त्या डोहावर तरंग उमटले तेही आनंदाचेच.
विठ्ठल दर्शनाचा हाच आनंद ज्ञानोबा माऊलींनाही पण झाला. ते म्हणतात की, विठ्ठल-रखुमाई म्हणजे आपल्यावर आजन्म माया करणारे आईवडीलच. ते सर्व सुखाचे आगर आहेत. या विठ्ठल रखुमाईची कृपा आपणावरही राहो हीच मनोकामना.
‼ जय जय रामकृष्ण हरी‼
🌹🙏 सुमंगल प्रभात🙏🌹
०७.०७.२०२५
🌻🥀🚩🌸🛕🌸🚩🥀🌻


