*एक दिवस सहलीला जाऊ,*
*बाहेरच जग जरा पाहून येऊ*||धृ||
रोज ट्रेन मध्ये धक्के बुक्के खातो....,रोज ट्रेन मध्ये धक्के बुक्के खातो, आज जरा आपण *निवांत* जाऊ
रोजच आहे आयुष्यात ती कटकट नी खटपट.....,रोजच आहे आयुष्यात ती कटकट नी खटपट, आज जरा *आनंदाने नाचू नी गाऊ*
रोजच ऐकतो यंत्रांची घरघर- घरघर,....रोजच ऐकतो यंत्रांची घरघर- घरघर
आज जरा *पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आनंद घेऊ*
रोजच घेतो आतमध्ये केमिकल नी गॅस....रोजच घेतो आतमध्ये केमिकल नी गॅस....एक दिवस *शुद्ध हवा नी प्राणवायू* घेऊ.
रोजच जेवतो घरच आपण.....रोजच जेवतो घरच आपण, एक दिवस जरा *चमचमीत* खाऊ.
रोज पितो चहा नी कॉफी...रोज पितो चहा नी कॉफी, एक दिवस *लिंबू -सरबत* पिऊ.
रोज जातो इतरांसोबत....रोज जातो इतरांसोबत, एक दिवस *आपल्यांसोबत* राहू.
रोज जगतो इतरांसाठी...,रोज जगतो इतरांसाठी...,आज जरा *स्वतः साठी* जगून पाहू
*एक दिवस सहलीला जाऊ नी*
*बाहेरच जग जरा पाहून येऊ*||धृ|| #कविता