#🙏नवरात्र स्टेट्स🌺
*यंदाची नवरात्री १० दिवसांची, ११ व्या दिवशी दसरा, जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती तिथी?*
*यंदाची नवरात्री नऊ दिवसांची नसून, १० दिवसांची असून, अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे.*
यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त असून, संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते; तर दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु, चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते. नऊ दिवस उपवासही केला जातो. परंतु, यंदाची नवरात्री नऊ दिवसांची नसून, १० दिवसांची असून, अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे.
*यंदाची नवरात्र १० दिवसांची का?*
२२ सप्टेंबर रोजी प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून, १ ऑक्टोबर रोजी महानवमी म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) साजरी केली जाईल. परंतु नवरात्रीच्या काळात तृतीया तिथी तब्बल दोन दिवस म्हणजेच (२४ व २५ सप्टेंबर रोजी असणार आहे.) त्यामुळे नवरात्री नऊऐवजी १० दिवसांची असेल. तसेच देवीच्या मूर्तीचे विसर्जन नेहमीप्रमाणे दशमी तिथी सुरू झाल्यावर म्हणजे २ ऑक्टोबर रोजी होईल.
शारदीय नवरात्र २०२५ घटस्थापना शुभ मुहूर्त
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता. तसेच अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल.
2025: यंदाची नवरात्र खूपच खास, हत्तीवरून होणार आदिशक्तीचे आगमन! वर्षभरासाठी शुभ-अशुभ संकेत देते ‘ही’ गोष्ट
शारदीय नवरात्री तिथी
२२ सप्टेंबर, सोमवार – प्रतिपदा तिथी
२३ सप्टेंबर, मंगळवार – द्वितीया तिथी
२४ सप्टेंबर, बुधवार – तृतीया तिथी
२५ सप्टेंबर, गुरुवार – तृतीया तिथी
२६ सप्टेंबर, शुक्रवार – चतुर्थी तिथी
२७ सप्टेंबर, शनिवार – पंचमी तिथी
२८ सप्टेंबर, रविवार – षष्ठी तिथी
२९ सप्टेंबर, सोमवार – सप्तमी तिथी
३० सप्टेंबर, मंगळवार – अष्टमी तिथी
०१ ऑक्टोबर, बुधवार – महा नवमी तिथी
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
#🔱नवरात्री व्रत विधि व नियम🙏 #📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 #🔱शक्तिपीठ🙏 #🎶देवी भजन आणि गाणी
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🌷देवी स्कंदमाता🙏
नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती. स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे.
स्कंदमाता देवीचा मंत्र
*सिंहासना गता नित्यं पद्माश्रि तकरद्वया।*
*शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।*
*या देवी सर्वभूतेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता।*
*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।*
#📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🔱नवरात्री व्रत विधि व नियम🙏
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏LIVE: नवरात्रोत्सव 2025🎥 #🔱शक्तिपीठ🙏 #🎶देवी भजन आणि गाणी #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
#🙏नवरात्र स्टेट्स🌺
*_🚩🔱श्री तुळजा भवानी तुळजापूर चे घर बसल्या दर्शन घ्या.प्रत्यक्ष आपण तुळजापूर दर्शनाला आलेलो आहोत
#🔱शक्तिपीठ🙏 असेच वाटेल..!🪷🙏🙏_*
#🙏 देवी कात्यायनी🌷 #🙏LIVE: नवरात्रोत्सव 2025🎥 #🎶देवी भजन आणि गाणी
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग राखाडी🩶 #🙏जय माता दी #🙏जय माता दी #🔱शक्तिपीठ🙏 #🔱शक्तिपीठ🙏 #🙏 देवी कात्यायनी🌷
#🍁ललिता पंचमी🙏 #😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग हिरवा💚 #🎶देवी भजन आणि गाणी #🌷देवी कुष्मांडा🙏 #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍
#😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग हिरवा💚 #🍁ललिता पंचमी🙏 #🎶देवी भजन आणि गाणी #🌷देवी कुष्मांडा🙏 #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍
#🍁ललिता पंचमी🙏 #🎶देवी भजन आणि गाणी #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग हिरवा💚 #🌷देवी कुष्मांडा🙏
#🪴घटस्थापना🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🔱नवरात्री व्रत विधि व नियम🙏 #🔯नवरात्रीचे खास 9 दिवस उपाय👈
#🙏नवरात्री लवकरच🌺 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🧑🎨नवरात्री स्पेशल आर्ट 😍 #😍नवरात्री स्पेशल लुक🥰 #🔯नवरात्रीचे खास 9 दिवस उपाय👈