श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
ShareChat
click to see wallet page
@266210066
266210066
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
शेतकर्‍यांसाठीचा माहितीचा खजिना👌
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती *कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे नियंत्रण* * पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मशागत, कीड प्रतिकारक वाणाचा वापर यासह यांत्रिक, भौतिक, जैविक पद्धतींचा संयुक्तिक वापर केला जातो। किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न असतो। कीडनाशकांचा मर्यादित आणि अचूक वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासोबतच वातावरणाचा समतोल राखता येतो। 👉 *कामगंध सापळा म्हणजे काय?* ▪️ पतंगवर्गीय कीटकामध्ये (Lepidoptera) मादी आणि नर यांचे मिलन होण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या गंध सोडला जातो। काही कीटकांच्या प्रजातींमध्ये नराद्वारे सोडलेल्या गंधाकडे स्वजातीय मादी आकर्षित होते। तर काहींमध्ये मादी नराला आकर्षून घेण्यासाठी आपल्या शरीरातून गंध सोडते। अशा गंधामुळे विजातीय पतंग आकर्षिले जातात। ▪️ कापसावरील बोंड अळ्यांचा मादी पतंग विशिष्ठ प्रकारचा गंध आपल्या शरीराद्वारे सोडतात। नर पतंग त्याकडे आकर्षिले जातात। असे गंध कृत्रिमरीत्या तयार करून गोळ्यांच्या स्वरूपामध्ये सापळ्यामध्ये वापरले जातात। या गोळ्यांना ल्यूर अथवा सेप्टा म्हणतात। त्या प्लॅस्टिकच्या सापळ्याला कामगंध सापळे म्हणतात। 🐛 *कापसावरील बोंड अळीसाठी विशिष्ट कामगंध ल्यूर* ▪️पतंग - कामगंध ल्यूर ▪️अमेरिकन बोंड अळी - हेलील्यूर ▪️ठिपकेदार बोंड अळी - इरव्हिट ल्यूर ▪️शेंदरी बोंड अळी - पेक्टिनो ल्यूर ▪️अन्य अळ्यांसाठी ल्यूर ▪️तंबाखूवरील अळीसाठी - स्पोडोल्यूर ▪️पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी - ईरिन ल्यूर 👉 *कामगंध सापळा व त्याचे प्रमाण* ▪️ सापळ्याच्या वरील भागाला छप्पर असून, तिथे ल्यूर बसविण्यासाठी जागा असते। ▪️ त्याखाली पतंग आत येण्यासाठी काही मोकळी जागा सोडून एक कडे असते। त्यावर प्लॅस्टिक पिशवी बसवलेली असते। ▪️ हा सापळ्याच्या छप्पर पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट उंचावर राहील अशा प्रकारे काठीला बांधावे। ▪️ पिशवीचा खालचा भाग बंद करून काठीला बांधावा। 👍 *फायदे* ▪️ किडीच्या आगमनाचे संकेत त्वरित मिळतात. त्यानुसार व्यवस्थापनाची दिशा निश्चित करता येते. ▪️ किडींची आर्थिक नुकसानीची पातळी निश्चित करता येते. उदा. अमेरिकन बोंड अळीचे ८ ते ९ पतंग प्रति सापळा सतत ५ ते ६ दिवस आढळणे. ▪️ कीड नियंत्रणासाठी वापर केल्यास रासायनिक कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च कमी होतो. ▪️ किडींची संख्या कमी असतानाच सापळ्याद्वारे पिकाचे संभाव्य नुकसान
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती गांडूळ सक्रीय होतात* ➖➖➖➖➖➖➖➖➖ सुक्ष्मपर्यावरण उपलब्ध झाल्यानंतर जेंव्हा गांडुळ सक्रीय होतात तेव्हा ते आपली समाधी भंग करतात आणि जमिनीच्या पृष्ठभागाकडे यायला लागतात. आपला सिद्धांत आहे की, खोलवरची अन्नद्रव्यांचा महासागर असते आणि गांडूळ जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर यायला लागतात तेव्हा ते, खोलवरील ही खनिज समृद्ध माती, वाळूचे कण, चुनखडी, आपल्या सोबत वर आणतात या जमिनीतील रोग निर्माण करणारे राक्षस जंतू खातात व त्यांना नष्ठ करतात. परंतु त्याच वेळेला जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जंतू व बुर्शी गिळतात ,मात्र त्यांना नष्ठ करीत नाहीत . उलट या जंतूना बलवान सचेतन व कार्यशील करुण विश्टेवाते वर जमीनिवरआणून सोडतात. ➖➖➖➖➖➖➖➖➖ गांडुळाच्या आतडीमध्ये अशी काही पिसार्इ यंत्रणा (ग्राईंडींग मशीन) असते की खाल्लेले सर्व पिसून काढले जाते. व त्यापासुन तयार झालेली विष्ठा, गांडुळ जमिनीच्या पृष्ठभागावर आणून रोपांच्या ,पिकांच्या मुळीपाशी आणून टाकतात. गांडुळ ज्या छिद्रामधून वर आलेत त्या छिद्रातून ते पुन्हा प्रवेश करत नाहीत तर दर वेळी दुसरे छीद्र पाडून जमिनीमध्ये घुसतात व तिसर्या छीद्रातून वर येतात व विष्ठा जमिनीवर टाकतात. ➖➖➖➖➖➖➖➖➖ देशी गांडुळ जाता येता आपल्या शरिरांमधून वर्मीवाश ( फ्लूर्इड )स्प्रे करतात आणि छिद्रांच्या भिंती लिंपून टाकतात. या स्त्रावामध्ये जीवाणूंच्या जगण्याला आवश्यक व मुळांच्या विकासासाठी आवश्यक विशिष्ट संजीवकं , पोषणद्रव्य , आमिनो आम्ल व प्रतिकारशक्ती वाढविणारे , प्रतीपिंड(अँटीबॉडीज) असतात. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ही गांडुळ 24 तास जमिनीमध्ये खालीवर करत असतात व जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडत असतात. कितीही पाऊस पडला तरीही संपूर्ण पावसाचे पाणी ह्या छीद्रांमधून झिरपल्या जाते व जमिनी अंतर्गत भुजलामध्ये संग्रहीत होतो. व नैसर्गिक पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन तयार होते. ➖➖➖➖➖➖➖➖➖ *गांडूळाच्या विष्ठेमध्ये काय असते ?* देशी गांडुळाच्या विष्ठेमध्ये सगळया खनिजांचे अनंत भंडार असते. त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश (पोटॅश), 8 पट चुना (कॅल्शीअम), 10 पट मग्न (मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन ताकद आणि स्फूर्ती घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात. ➖➖➖➖➖➖➖➖➖ *धन्यवाद* 🙏
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी ‘पीडीएम’च्या वापरात गफलत नको*🌱 सौजन्य : अॅग्राेवन पुणे : राज्यात शेतीमधील पीक पोषण व्यवस्थापनात पालाशचा (Potash) वापर करताना ‘एमओपी’ (म्युरेट ऑफ पोटॅश) व ‘पीडीएम’ (पोटॅश डिराव्हड फ्रॉम मोलॅसिस) यामध्ये गफलत होत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे पालाशचा वापर योग्य प्रमाणात होत नसल्याचे कृषी विभागाला आढळून आले आहे. बाजारात रासायनिक घटकांपासून तयार केलेले एमओपी, तसेच साखर कारखान्यांमधील उसाच्या मळीवर प्रक्रिया करून बनवलेले पीडीएम उपलब्ध आहे. दोन्ही खतांमधून पिकाला पालाश या मुख्य अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. एमओपी साधारणतः मिठासारखे चूर्ण स्वरूपात दिसते. तसेच दाणेदार स्वरूपातदेखील विकले जाते. यात पालाशचे प्रमाण ६० टक्के आहे. कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाच्या म्हणण्यानुसार, बाजारातील ५० किलोच्या ‘एमओपी’च्या पिशवीतून ३० किलो पालाश पिकाला मिळत असते. मात्र ‘पीडीएम’मध्ये हेच प्रमाण १४.५० टक्के इतके आहे. त्यामुळे ५० किलोच्या पीडीएम पिशवीतून जवळपास ७.२५ टक्के पालाश पिकाला मिळू शकते. याचाच अर्थ पोटॅशची खरेदी करताना शेतकऱ्यांनी खताच्या पिशवीवरील पालाशचे मूळ प्रमाण किती याची खात्री केली पाहिजे. ‘एमओपी’ व ‘पीडीएम’ या दोन्ही खतांत मुख्य घटक पालाश असल्यामुळे गफलत होते. परंतु त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिफारशींप्रमाणे पिकांना योग्य खत मिळत नाही. परिणामी, पिकांच्या वाढीवर व एकूण उत्पादनावरदेखील प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे पालाशच्या प्रमाणाची माहिती घेऊन पिकांना खताची मात्रा द्यावी लागेल. ‘पीडीएम’मधून अवघे ७.२५ टक्के आणि ‘एमओपी’मधून ३० टक्के पालाश मिळणार असल्यास पिकाला नेमके किती खत हवे तसेच किंमत किती होते आहे. याचा हिशेब करावा लागेल. कृषी विभाग व बारामती ‘केव्हीके’ने त्यासाठी *‘कृषिक अॅप’* तयार केले आहे. या अॅपचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास प्रमाण बिनचूक काढता येते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. *अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.* 🔹‘पालाशचा वापर अभ्यासूपणे व्हावा’ : पिकांसाठी ‘एमओपी’ किंवा ‘पीडीएम’ या दोन्ही खतांमधून मिळणारे पालाश उपयुक्तच आहे. त्यामुळे पिकात शर्करा निर्मिती व खोडे मजबूत होण्यास मदत होते. पीक सशक्त होते व कीड-रोगापासून बचाव करण्याची नैसर्गिक ताकद वनस्पतीला मिळते. शेतीमालाची चव, रंग, तजेला व टिकवण क्षमता हे गुण वाढविण्यातदेखील पालाशचा सहभाग असतो. हवामान बदलामुळे पिकांवर येणारा जैविक व अजैविक स्वरूपाचा ताण सहन करण्याची क्षमता तयार करण्याचा पालाशचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पालाशचा वापर अभ्यासूपणे झाला पाहिजे, असे गुणनियंत्रण विभागाचे म्हणणे आहे. 💬पालाश खताचा वापर करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. ६० टक्के प्रमाण असलेल्या ‘एमओपी’ची एक पिशवी शेतकरी वापरत असल्यास आणि त्याला पर्याय म्हणून पीडीएम वापरायचा असल्यास एक नव्हे, तर चार पिशव्या वापराव्या लागतील. त्यानंतरच कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार पिकाला खत मात्रा मिळेल. - दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती *घरी बनवुया मिश्रखते* ◀⬅               15:15:15 युरिया                       33  किलो  सिं सुपर फॉस्फेट              94  किलो  म्यूरेटऑफपोट्याश             25 किलो               10:26:26  युरिया                          22 किलो  सिं.सूपर फॉस्फेट                 163 किलो म्यु.ऑफ पोटयॉश                43 किलो                 20:20:00        युरिया                       43  किलो   सिं.सुपर  फॉस्फेट             125 किलो     म्यू.ऑफपोट्यॉश               00 किलो                 19:19:19 युरिया                         41 किलो  सिं.सूपर फॉस्फेट                119 किलो  म्यू.ऑफ पोट्यॉश                23 किलो                         (टिप  :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)                  15:15:15 युरिया                           20 किलो  डी ए पी                        33किलो  म्युरेटऑफ पोट्यॉश                25 किलो                  10:26:26                 डी ए पी                        56 किलो  म्युरेटऑफ पोट्यॉश                43 किलो                  12:32:16 डी ए पी                        70 किलो  म्युरेटऑफ पोट्यॉश                27 किलो                  20:20:00 युरिया                          26 किलो  डी ए पी                        43 किलो                  19:19:19 युरिया                          25 किलो डी ए पी                        41 किलो   म्युरेट ऑफ पोट्यॉश              32किलो                  18:18:10  युरिया                          24 किलो  डी ए पी                        39 किलो  म्युरेटऑफ पोट्यॉश                17किलो तयार मिश्रण लगेच वापरावे, Ssp दाणेदार असावे फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा कृषी विभाग ,सिंदखेड राजा 🙏🙏
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी उद्देशाची पिके✅ ✅ (i) पंक्ती पिके: जी पिके संपूर्ण शेतात एकसमान अंतर ठेवून ओळीत घेतली जातात. ई g कापूस, एरंड, ज्वारी इ. ✅(ii) आधार पिके: काही वेगाने वाढणारी पिके द्राक्षांचा वेल पिकांना सहाय्यक म्हणून काम करतात. उदा. एरंडी, सुपारीच्या वेलीमध्ये शेवरी, चवळी/बीनमध्ये ज्वारी. ✅ (iii) वारा तोडणारी पिके: शेतातील पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी सीमेवर घेतलेली पिके. ✅(iv) आच्छादित पिके: आच्छादित पिके प्रामुख्याने माती झाकण्यासाठी आणि वारा आणि पाण्यामुळे नष्ट होणारी आर्द्रता आणि धूप कमी करण्यासाठी घेतली जातात. उदा. शेंगदाणे, राजमा, चवळी, मूग. ✅(v) सायलेज पिके: घट्ट सायलो खड्ड्यात आंशिक किण्वन करून रसाळ स्थितीत संरक्षित केलेले पीक. उदा. मका, ज्वारी, बाजरी. कृषी परीक्षा लायब्ररी टेलिग्राम चॅनेल ✅(vi) नगदी पिके: विक्रीसाठी घेतलेले पीक लगेच पैसे आणते. उदा. कापूस, तंबाखू, बटाटा, ऊस. ✅(vii) हिरवळीचे खत पिके: कोणतेही पीक जे सेंद्रिय पदार्थांच्या व्यतिरिक्त जमिनीची स्थिती सुधारण्यासाठी उगवले जाते आणि जमिनीत गाडले जाते. उदा. सूर्य भांग, धैंचा, ग्लिरिसिडिया. ✅(viii) कुरण पिके: कुरणात किंवा गवताळ प्रदेशावर विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात ज्या सामान्यतः वाढतात. उदा. धरो, झिंजवो. ✅(ix) पकडलेली पिके: प्रतिकूल परिस्थितीमुळे निकामी झालेल्या मुख्य पिकाला पर्याय म्हणून घेतलेले पीक. उदा. चवळी, तीळ, हिरवे हरभरे. ✅(x) सापळा पिके: कीड, कीटक, रोग यांच्यापासून संरक्षणासाठी शेताच्या सीमेवर घेतलेले पीक. ✅(xi) नर्स पिके: इतर पिकांना त्यांच्या लहान अवस्थेत संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणारे पीक. उदा. अद्रकामध्ये क्लस्टर बीन, उसामध्ये सूर्य भांग. ✅ (xii) सहचर पिके: दोन पिके एकमेकांना फायदेशीर व्हावीत या उद्देशाने एकत्र घेतली जातात. उदा. मका आणि हरभरा. ✅ (xiii) मिश्र पिके : दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच वेळी एकाच जमिनीवर घेतली जातात. उदा. बाजरी + चवळी + हिरवे हरभरा. 🙏🙏
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती खतांची वैशिष्ट्ये : पिकांना ठिबक सिंचनमधून व फवारणीद्वारा दिली जाणारी विद्राव्य खते कशी असावीत त्यांची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. १ पाण्यात पूर्णतः विरघळणारी खते (विद्राव्य) – ही खते एक – दोन किंवा तीन (बहू) पोषक अन्द्राव्याचे असलेले असून ती पाण्यात टाकली असता ताबडतोब विरघळतात. हे बहुमुल्य अन्द्राव्याचे द्रावण सिंचनाच्या पाण्यासोबत देणाऱ्या क्रियेलाच फर्टीगेशन असे संबोधिले जाते. २ विद्राव्य खतांचा वापर- ठराविक सिंचन पद्धतीतून (ठिबक अथवा सूक्ष्म तुषार) नगदी पिकाच्या उत्पादनासाठी शेतात व तसेच संरक्षित वातावरण निर्माण करता येईल अशा ग्रीन हाउस, शेड नेट मध्ये वाढविल्या जाणाऱ्या पिकांसाठी केला जातो. ही खते फुलशेती भाजीपाला, फळबाग, बागेतील / घरात येणाऱ्या कुंड्यातील सुशोभीत झाडांकारीता वापरता येतात. ३ ठिबक सिंचामध्ये : पिकांची मुळे ठराविक क्षेत्राममध्येच वाढतात. या करिता तेथील माती परीक्षण वरचेवर करणे आवश्यक आहे . त्या माध्यमात पिकांच्या वाडीबरोबरच पोषक द्रव्य्रांचे प्रमाण सतत घटक असल्या कारणाने त्यांचा ठिबक सिचनातून ठराविक प्रमाणात नेहमी खते योग्य राहील. ४ खतांचे प्रामाण : जास्त झाल्यास व पाण्याचा पुरवठा मर्यादित असल्यास खतांचा क्षारभार जमिनीत वाढेल व त्यामुळे झाडांतील अन्नरस उलट प्रवाही होऊन अति क्षारामुळे जमिनीत शोषला जाईल व झाडाची वाढ खुंटून ती मरू शकतात. ५ विद्र्व्य खतांची तीव्रता : ठिबक सिंचनातून खते देतांना खतांचा क्षारभार (सोल्ठ इंडेक्स) किती आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. जर सर्वच खते अति क्षाराची दिली तर झाडांना ती खते शोषून घेण्याकरिता लागणारा दाब (Osmotic Pressure, Turgure pressure) पुरेसा नसेल तर झाडांना मुळाकडे आधिक उर्जा द्यावी लागेल आणि त्यामुळे फुलधारणा, होणेस विलंब होतो. साहजिकच त्यामुळे फळाच्या काढणीस विलंब होतो बहार अकाली पुढे जातो त्या खतांची तीव्रता (Concentration) अति प्रमाणात असल्यास झाडांची मर होण्यांची शक्यता आहे विद्राव्य खतांचा क्षारभार ४० ते ५० दरम्यान ठेवला तर ती सर्व पोषकद्रव्ये मुळाच्या केशतंतू विनासायास पिकांना पूर्णत: उपलब्ध होतात. ६ सामू – झाडांच्या मुळाच्या केशतंतू जवळील, जमिनीचा सामु ६ ते ७ असल्यास झाडे पोषकद्रव्ये आदिकाधिक शोषून घेऊ शकतात. आपल्याकडील जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ७.५ ते ८ असल्याकारणाने फॉस्फरस, पोटॅश, मग्नेशियमच्या कमतरतेबरोबर लोह, मंगल (मॅग्नीज) जस्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर आढळते. तेव्हा ठिबक सिंचनातून देणारी खते ही आम्लयुक्त (अॅसिडीक) ज्यामुळे ठिबक सिंचनाच्या पाण्याचा सामू ५.५ ते ६ पर्यंत आणू शकतील, तसेच दिलेली खते केशतंतू जवळ पोहोचल्यानंतर तेथे देखील त्या खतामुळे आम्लधर्मी सामू तयार होईल अशी विद्राव्य खते आम्ल युक्त असल्यामुळे ताबडतोड लागू पडतात. शिवाय सिंचनाच्या लॅटरल, ड्रिपर, नोझल इत्यादीमध्ये क्षाराचा साका साठत नाही आणि स्वतंत्रपणे अॅसिड वॉश देण्याची गरज पडत नाही. आम्लधर्मीय खताची मात्रा ८५ ते ९० टक्के पूर्णत: लागू पडते. हे गुणधर्म असलेल्या खत कंपन्याचीच खते वापरावीत. ७ सुक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खते – सुक्ष्म पोषक द्रव्यापैकी लोह, मंगल (मँगनीज) व जास्त ही झाडास / पिकास जमिनीचा सामू ४.४ ते ५.५ असल्यास उपलब्ध होऊ शकतात. परंतु एवढा जमिनीचा सामू खाली आणणे धोकादायक असून त्या जमिनीत अॅल्युमिनियम व लोह, स्फुरदाची उपलब्धता झाडांना अजिबात होऊ देत नाही. व त्याचे स्थिरीकरण होईल अॅल्युमिनियमचे स्फुरदयुक्त क्षार पिकांना अपायकारक ठरतात. लोह, मंगल व जस्त शक्यतो चिलेटेड फॉर्म मध्ये देणे अत्यंत आवशक आहे. चिलेटेड म्हणजे पूर्णत: रासायनिक प्रक्रियेने लोह, मंगल व जस्तेचे मेंटॅलिकेशन सेंद्रिय पदार्थात करणे उदा: इथिलीन डाय अमीनटेट्रा अॅसीटेड (ई.डी.टी.ए) यामध्ये या मूलद्रव्यांचे अणु वेष्ठीलेले असतात. त्यामुळे त्यांची विद्राव्यता वाढते, जेणेकरून ते फवारणी अथवा पाण्यापासून दिले असता झाडांना सहज सुलभरीत्या उपलब्ध होऊन कार्यरत होतात. ही सुक्ष्म द्रव्ये नत्र, स्फुरद, पालाशयुक्त मिश्रणामधुन दिली असता त्यांची उपलब्धता कमी होते. म्हणून हायसोल उत्पादीत मायक्रोसोल किंवा १९:१९:१९ सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त ग्रेड प्रति एकर शक्यतो फवारणीने (१२५ ते २५० ग्रेम २५० लिटर पाण्यात प्रति एकरी प्रति आठवडा) याप्रमाणे दिलेले सूक्ष्म द्रव्यांची कमतरता दिसून येत नाही. ८- खताची विद्राव्यता – ठिबक सिंचानातून देणाऱ्या खतांची विद्राव्यता (Solubility) किती आहे हे पाहणे आवश्यक आहे. एक लिटर पाण्यात १५० ग्रॅम हायसोल एन.पी.के खत टाकल्यास ते पूर्णत: पाण्यात ५ ते ७ मिनिटात विरघळते तसेच हयसोल के (पोटेशियम सल्फेट) १०० ग्रॅम विरघळते. म्हणजेच त्याची विद्राव्यता अनुक्रमे १५ ते १० टक्के आहे. (तक्ता क्र ४.२ मध्ये विविध विद्राव्य खतांचे पाण्यात विरघळण्याचे प्रमाण दिलेले आहे) या तीव्रतेच्या खतां चा सामू २ ते ३.५ पर्यंत असल्या कारणाने द्रावण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सोडण्यापूर्वी १० पट (१०० लिटर) पाण्यामध्ये मिसळलेले असता त्याचा सामू ४ ते ५.५ पर्यंत होतो व ते द्रावण व्हेंचुरी अथवा एचटीपी वा डोझामेट्रिक तत्सम प्रकारच्या पंपाने (किंवा) फर्टीलायझर टँक वापरल्यास सिंचन पाण्याच्या दाबाने ठिबक सिंचन पद्धतीमध्ये देणे सोईस्कर होते व त्या सिंचन पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ पर्यंत होतो हे विशेष महत्वाचे आहे. ९ विद्रव्य खतांचे स्वरूप (फॉर्मुलेशन) – विद्राव्य खताच्या द्रावणातून उपलब्ध होणारी पोषकद्रव्ये पिकांना ताबडतोब शोषून घेता येईल अशा स्वरुपात असावीत. उदा. हायसोल मधील नत्र १० टक्के ते २५ टक्के नायट्रोजन फॉर्म मध्ये व ९० ते ७५ टक्के अमोनिकल व नंतर नायट्रेट स्वरुपात होण्यास ७ ते १२ दिवस लागतात तेव्हा अमाईड नत्र ऊस / कापूस व ऊस पिकांना घ्यावयास हरकत नाही. परंतु भाजीपाला, फळभाजी, फुल शेती व फळ बागांकरिता (बहराच्या वेळी) अमाईड खते देण्याचे टाळावे कारण ज्यादिवशी ते ठिबक सिंचनातून दिले जाते. त्याच दिवशी अथवा पुढील दोन ते तीन दिवसात लागू न पडल्याने पिकांची / झाडांची वाढीव पुढील पंधरा दिवसात बदलते व नको असतांना नत्रांचे प्रमाण जमिनीत व त्याचा विपरीत परिणाम होण्याचे टाळता येत नाही. १० विद्राव्य खतांची तीव्रता – अति तीव्र (विद्राव्य खतांच्या) द्रावणामुळे त्या पोषकद्रव्यांचे इतर पोषकद्रव्याबरोबर व जमिनीत असणाऱ्या इतर घटकांबरोबर स्थिरीकरण होऊन खतांच्या ज्यादा दिलेल्या मात्रांचा दुष्परिणाम, शिवाय विनाकारण ज्यादा खर्च होतो. जमिनीच्या व जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील क्षार विशेष, क्लोराईड्स, नायट्रेट्रस, कार्बोनेट्स वाढविण्यास आपणच कारणीभूत होतो. हे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच योग्य तीव्रतेचीच विद्राव्य खते घ्यावीत.
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब लोकसंख्येला ९५ टक्के अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती पिकाच्या मुळाला आधार, अन्न आणि पाणी देते. मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रियांद्वारे मातीच्या जडण घडणाचे काम करतात. म्हणून माती हे सजीव माध्यम आहे. कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंनी समृद्ध, पोषक अन्नद्रव्ये, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम माती हेच मानवी संस्कृतीच्या विकासाचे उगम स्थान आहे. म्हणून मातीला आपण काळी आई म्हणतो. शेतीसाठी तर मातीचे महत्त्व फारच आहे. आता प्रश्न पडतो की असे काय घडले की मातीसाठी असा दिवस साजरा करण्याची वेळ यावी. तर मग ही आकडेवारी पहा. भारताच्या ३२८.७३ दशलक्ष हेक्टर जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १२०.४० दशलक्ष हेक्टर एवढी जमीन नापीक होत चालली आहे. पाणी आणि हवेमुळे देशातील दरवर्षी ५.३ अरब टन सुपीक मातीची धूप होऊन ती नष्ट होत आहे! महाराष्ट्राच्या ३.०७ दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी सुमारे ४२.५० टक्के जमीन खराब आहे. राज्यातील १५९ लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळाच्या छायेत येते. इतर राज्याच्या तुलनेत ऊस वगळता इतर सर्व पिकांची उत्पादकता कमी असून राज्यात सुमारे १४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर माती आणि पाणी संवर्धनाची तात्काळ गरज आहे. मातीची निर्मिती प्रक्रिया अतिशय किचकट असून खडकांपासून बारीक मातीचे कण निर्मितीसाठी शेकडो वर्ष लागतात. ऊन, वारा, पाऊस या निसर्गचक्राद्वारे हळूहळू अनेक प्रकारचे खडक खंडित होत होत मातीत रूपांतरित होतात. मातीचे प्रारूप चार घटकात विभाजित केले जाते. ज्या मातीत ४५ टक्के मातीचे कण, २५ टक्के पाणी, २५ टक्के हवा आणि ५ टक्के सेंद्रिय कर्ब असते ती पिकाच्या वाढीसाठी आदर्श माती! हे प्रमाण जर बिघडले तर मातीचे आरोग्य बिघडले असे समजावे. मातीची सुपीकता आणि उत्पादकता हे मातीचे गुणवत्ता मोजण्याची दोन परिमाणे आहेत. मातीची सुपीकता म्हणजे पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवण्याची मातीची अंगभूत क्षमता. ही क्षमता मातीच्या निर्मिती प्रक्रियेपासून तयार झालेली असते. ती सहजासहजी बदलता येत नाही. पिकाच्या वाढीसाठी १७ अन्नघटक लागतात. यापैकी एक अन्नघटकाची जरी कमतरता भासली तर पिकाच्या वाढीवर आणि पर्यायाने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुपीक मातीत सर्व अन्नघटक पुरेशा प्रमाणात, पिकाला उपलब्ध होतील अशा स्वरूपात असतात. मातीची सुपीकता प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याची तपासणी करून ठरवली जाते. म्हणून दर तीन वर्षांने मातीची आरोग्य पत्रिका काढली पाहिजे. मातीची उत्पादकता पिकाच्या एकरी उत्पादनाशी संबंधित आहे. मातीचे आरोग्य बिघडण्याची प्रमुख कारणे आहेत पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर, एकच एक पीक वारंवार घेणे आदी. केवळ रासायनिक खतांमुळे जमीन खराब होते असे सर्रास बोलले जाते, हे सत्य नाही. रासायनिक खत हे पिकाचे अन्न आहे जे कमी मात्रेत अधिक अन्नद्रव्ये पिकाला हवे तेव्हा उपलब्ध करतात. जमीन खराब होते रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापर व शिफारसीपेक्षा जास्त वापरामुळे! खऱ्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या जास्त वापरामुळे. पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाणी पीक मुळावाटे हवे तेवढे शोषून घेते, बाकीचे जमिनीत साचून राहते. साचलेले पाणी मातीमधील हवा बाहेर काढून त्याची जागा घेते. वेळीच पाण्याचा निचरा नाही झाला तर पिकाची मुळे गुदमरतात. झाडाची वाढ खुंटते. साचलेल्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते मात्र पाण्यातील क्षार जमिनीवर मातीच्या कणात अडकून राहतात. उसासारख्या पिकाला जेव्हा शेतकरी सतत पाणी देतात तेव्हा अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते. क्षार मातीचे कण जोडतात. माती कडक होते. मातीचे रंध्र बंद होतात. पाणी मुरत नाही. ओलावा टिकत नाही. परिणामी पिकाची वाढ होत नाही आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून जास्त पाणी देणे कधीही घातक असते. मातीचे आरोग्य तपासणी करण्यासाठी शेतातून मातीचा योग्य पद्धतीने नमुना काढून तो प्रयोगशाळेत तपासून घेणे हे अभ्यासू शेतकऱ्याचे पहिले कर्तव्य आहे. प्रयोगशाळेत मातीमधील उपलब्ध नत्र, स्फूरद, पालाशचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, मातीचा सामू, विद्युत वाहकता आदी घटकांचे प्रमाण, त्याला अनुकूल पीक व त्या पिकासाठी खताची शिफारस या बाबीची विस्तृत मातीची आरोग्य पत्रिका तयार करून शेतकऱ्याला दिली जाते. मातीचा सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक) ६.५ ते ७.५ असल्यास पिकाच्या विकासासाठी आदर्श असतो. मातीतील सेंद्रिय कर्ब हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सेंद्रिय कर्ब हे मातीत राहून पिकाच्या वाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या जिवाणूंचे खाद्य असते. शिवाय सेंद्रिय कर्ब जर जास्त (१% पेक्षा जास्त) असेल तर जमिनीत पाणी चांगले मुरते, ओलावा टिकून राहतो, माती भुसभुशीत राहते. म्हणून चांगले कु जलेले शेणखत, लेंडीखत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर रासायनिक खतांसोबत आवश्य करावा. पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी १७ अन्नद्रव्याची गरज असते. नत्र, स्फूरद आणि पालाश हे मुख्य अन्नघटक आहेत जे बहुतांश शेतकरी १०:२६:२६, १२:३२:१६ आदी ग्रेडच्या स्वरूपात वापरतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे दुय्यम अन्नघटक असून शेतकरी यांच्या वापराकडे दुर्लक्ष करतात. याहीपुढे आणखी ११ अन्नघटक जे एकरी काही ग्रॅममध्ये लागतात. द्राक्षे किंवा डाळिंब उत्पादक सोडले तर सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर फारच कमी शेतकरी करतात. युरियासारखे प्रचलित, स्वस्त खते अधिक वापरून शेतकरी पिकाचे आणि मातीचेही नुकसान करत आहेत. माती परीक्षण अहवालनुसार खते वापरल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहिलच आणि उत्पादनसुद्धा वाढणार आहे. शेतातील काडी कचरा, गवत न जाळता मुलस्थानी पिकाच्या अवशेषाचे विघटन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढू शकते. पाणलोट क्षेत्र विकासावर भर देऊन माथा ते पायथा मृद-जलसंधारणाचे उपचार प्रभावीपणे राबवायला हवेत. शेतातील झाडांची संख्या घटत आहे. बांधावर, पाणलोट क्षेत्रात, गायरान आदी क्षेत्रात वृक्षारोपण असेल तरच मातीची धूप थांबू शकेल. पिकाची फेरपालट करावी. मातीची सुपीकता टिकवण्यसाठी संतुलित खत वापर गरजेचे आहे.जिवाणूचा वापर झाला पाहिजे माती हे अत्यंत दुर्लभ पण दुर्लक्षित संसाधन आहे ही जागरूकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे असून मातीचे संगोपन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे.
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती उत्पादन क्षमता वाढण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी आवश्यक घटक कोणते* 👉 आधी पाहुयात आपण आज पिकास काय देत अहोत....... 1. 10.26.26 - NPK 2. DAP - NP 3. 12 :32:16 - NPK 4. 0: 52: 34 - PK 5. युरिया - N 👉👆 याचा अर्थ आपण पिकाला फक्त 3 मुख्य अन्न द्रव्यच देत अहोत. *मात्र पिकाला एकूण 16 अन्न घटक लागतात* 1. हवेतून 3 मिळतात - C.H.O 2. मुख्य अन्न घटक 3 - N.P.K 3. दुय्यम अन्न घटक 3 - Ca. Mg. S. 4. सुक्ष्म अन्न घटक 7 - fe. Zn. B. Cl. Cu. Mo. Mn 👆👆उत्पन्न कमी होण्याचे मुख्य कारण. पिकाला आवश्यक घटक न देणे. *मातीच्या सुपिकतेसाठी आवश्यक घटक* 1. *जिवाणु* 2. गांडूळ 3. अन्न घटक 16 4. पाणी 5. हवा 6. सेंद्रिय कर्ब (ह्यूमस) 7. जमिनीचा सामू( Ph) 8.C:N ratio 9.EC लेवल 10.CEC लेवल परंतू आज आपण मातीत काय देत अहोत? फक्त 3 मुख्य अन्न घटक. ते पण रासायनिक खतांच्या माध्यमातून. याचा दुषपरिणाम म्हणजे जमिनीतिल जीवाणु , गांडूळ संपले. जीवाणु संपल्यामुळे जमिनित हवा जात नाही, पाणी मूरत नाही, त्यामुळे जमिनीतिल सेंद्रिय कर्ब कमी झाला. याचा परिणाम मातीची सुपिकता कमी झाली व उत्पन्न घटले. *जर मातीची सुपिकता व उत्पन्न वाढवायचे असेल तर, सेंद्रिय औषधे वापरावे लागतील. सेंद्रिय खते व औषधे, मनुष्य, पीक किंवा मातीला हानिकारक नाहीत.* *या मध्ये असणारे सर्व घटक आहेत जे तुमची जमीन / माती सुपीक करण्याला मदत करतील व तुमचे पीक जोमाने वाढेल.* 🙏🙏
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी रोग व उपाय यावर थोडस* *वेळ मिळाल्यास नक्की वाचा...!* बदलत वातावरण जेवढं महत्वाचं आहे तेवढ महत्वाचं *आहे एकाच जमिनीत एकाच कुळातील पिके घेणे....* म्हणजे आपल्या भागात खरीप मध्ये सोयाबिन तूर तर रब्बी मध्ये हरभरा पेरल्या जातो.. *आणि महत्वाचे म्हणजे सोयाबीन, तूर,हरभरा हि* *तिन्ही पिके मर रोगाला बळी पडतात* कारण मर रोगाला कारणीभूत असलेली बुरशी ला वर्षभर जगण्यासाठी साधन पिकाच्या रूपाने मिळत असत... अन दिवसे दिवसे मर रोगाची बुरशी एवढी प्रतिकार होत चालली आहे की बीजप्रिक्रिया केलेले बियाणे,तसेच काही प्रतिकार असेलेले बियाणे सुद्धा काही प्रमाणात या रोगाला बळी पडताना दिसत आहेत...! *यावर सध्या उपाय म्हणजे पिकाची आणि मर रोगाची साखळी तोडणे हा आहे...* आणि तो करण्यासाठी महत्वाचे पिकाची फेरपालट करणे अंत्यत महत्वाचे आहे ... त्या शिवाय दुसरे पर्याय जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत...! शेतकरी बंधूनी एक डाळ वर्गीय जसे सोयाबीन, तूर खरीप किंवा रब्बी हरभरा मसूर यापैकी कोणतेही एक आणि एक कड धान्य ज्यामध्ये खरीप ज्वारी,मका,बाजरी, सूर्यफूल किंवा रब्बी सुरफुल,करडई,रब्बी मका,गहू या पैकी एक किमान घ्यावे *म्हणजे डाळ वर्गीय पिकावर येणार मर रोग हा कड धान्य पिकावर येत नाही...* त्यामुळे त्या च्या साखळीत खंड पडून बऱ्यापैकी त्याचा प्रादुर्भाव कमी करता येतो...! ज्वारी,सूर्यफूल हे पिके त्यांच्या मुळातून जमिनितं एक रासायनिक द्रव सोडत असतात त्यामुळे हानिकारक बुरशीची वाढ होत नाही... व मर तसेच मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव ज्वारी वर दिसत नाही....! *त्यामुळे पीक फेरपालट करणे अत्यंत महत्वाचे आहे...!* *तसेच तीन वर्षातून एकदा हिरवळीचे पिके जसे ताग, बोरू ,चवळी,उडीद,मूंग घेऊन फुलोरा अवस्थेत शेतात गाडने गरजेचे आहे त्यामुळे शेतात असलेली सेंद्रिय कार्बनी कमतरता, भरून निघू शकेल,तसेच नत्र ची उपलब्धता होईल व रासायनिक खते वापर कमी होईल,तसेच सुष्मजीवांचे प्रमाण सुद्धा वाढेल...!* *तसेच रासायनिक खते नियंत्रणात वापर वापरावी,अतिरिक्त वापरामुळे जमिनीतील महत्वाचे सुष्मजीव,बुरशी नष्ट झाल्याने हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे...* तसेच शेणखताचा वापर करताना *Trichoderma या मित्र बुरशीचा* त्यातून वापर करावा...! अन महत्वाचे म्हणजे आपण बियाण्याला केलेली *बीजप्रक्रिया आपल्या पिकाला फक्त सुरवातिच्या अवस्थेत मर रोगापासून वाचवू शकते कायम स्वरूपी * नाही ही गोष्ट ध्यानात घेणे गरजेचे आहे....! कारण बीजप्रिक्रिया केलेली तूर अचानक शेंगा लागलेल्या असताना पूर्ण वाळू शकते या वरून मर रोगाचा ताकद अंदाज येतो.... . मर रोग हा तीन टप्यात येतो.... म्हणून याच्या नियंत्रणासाठी Chemical वर भर देण्यापेक्षा आपल्या मातीला सुष्मजीवाणी समृद्ध केल्यास नक्की नियंत्रण मिळेल... हाच एक आशावाद आहे...! अन जैव विविधता हाच निसर्गाचा पाया आहे...! हवं सुद्धा महत्वाचं आहे..! मनपूर्वक धन्यवाद...! वरील माहिती स्वलिखित असून गेल्या एक वर्षा पासून स्वतः केलेल्या निरीक्षण,संशोधन,प्रत्यक्ष लागवड ची आधारे दिलेली आहे... यातील प्रत्येक मुद्दे आपल्याला पटतील असे नाही पण जर समृद्ध शेती करायची असेल तर वरील गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे महत्वाचे आहे...! *सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत:-*🙏🌼🌿👳 *©कृषिमित्र महेश भागवत आखरे पाटील* *ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम* *विवेकानंद कृषि महाविद्यालय हिवरा आश्रम ता.मेहकर जि. बुलढाणा 443303🌿🙏
#🌱मी शेतकरी तूर, मूग, उडीद पिकावरील रोगनियंत्रण🌱_* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* *_📍उडीद व मूग_* *_१) भुरी_* _हा रोग वाढीच्या कोणत्याही अवस्थेत आढळतो. पीक फुलोऱ्यात असतांना पानावर पांढरट भुरकट बुरशीची वाढ दिसते. त्यानंतर पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरट बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो. ही वाढ पुढे देठांवर व शेंगावरही आढळून येते. दमट व कोरडे वातावरण हया बुरशीच्या वाढीसाठी पेाषक असते. हवेतील आर्द्रता ८० टक्के किंवा त्याहून अधिक असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. रोगाचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो._ *_नियंत्रण_* _शेत व लगतचा भाग दुधी, सार या तणांपासून मुक्त ठेवावा.  रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात मिसळणारे गंधक (८० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._ *_२) करपा रोग_* _रोगाची लागण झाडांच्या सर्व भागांवर आढळून येते. रोपावस्थेत असतांना खोडावर व पानांवर सुरवातीस अनियमित आकाराचे तपकिरी ठिपके दिसतात. खोडकूज होऊन रोपे कोलमडतात. रोगग्रस्त झाडे पूर्णपणे वाळतात. पीक फुलोऱ्यात असतांना रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडे मर होते. पीक काढणीनंतर बुरशी जमिनीत बऱ्याच काळापर्यंत रोगट झाडाच्या अवशेषांवर जिवंत राहते._ *_नियंत्रण_* _◆शेतात वनस्पतीचे कुजलेले अवशेष, कचरा व काश्या असू नयेत. रोगट झाडे व रोगाचे अवशेष नष्ट करावेत. जेणेकरून मर रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढणार नाही._ _◆दाणे भरत असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये._ _◆रोग दिसताच मॅंकोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी रोगाच्या तीव्रतेनुसार १० ते १२ दिवसांनी करावी._ *_३) लीफकर्ल_* _हा रोग मुगापेक्षा उडीद पिकावर मोठ्या प्रमाणावर येतो. तो लीफकर्ल विषाणूमुळे होतो. विषाणूचा प्रसार एका झाडापासून दुसऱ्या झाडावर मावा, पांढरी माशी, तुडतुडे या किडींद्वारे होतो. पाने खालच्या बाजूस वळतात वेडीवाकडी होतात. फुलातील भागाची विकृती होते. शेंगांची संख्या कमी होते व झाडाची वाढ खुंटते. शेंगातील बियांचे वजन घटते व उत्पादनात घट होते._ *_नियंत्रण_* _◆रोगट झाडे काढून नष्ट करावीत._ _◆शेतातील रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी किडींचे नियंत्रण करताना शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करावा._ *_📌सोयाबीन_* _*१)* शेंगावरील करपा/अॅन्थ्रॅकनोज_ *_नियंत्रण_* _◆रोगग्रस्त झाडे व झाडांचे अवशेष जाळून नष्ट करावेत._ _◆रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._ _◆पानावरील ठिपके (अल्टरनेरिया व सर्कोस्पोरा)_ *_नियंत्रण_* _रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. रोग दिसताक्षणी पायरॅक्लोस्ट्राॅबीन २० टक्के डब्ल्यूजी ८ ते १० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._ *_२) भुरी_* _या रोगाचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत असून कोरडे-उष्ण व दमट हवामान पोषक आहे._ *_लक्षणे_* _पानांच्या दोन्ही पृष्ठभागावर अनियमित आकाराचे पांढरे चट्टे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर पांढऱ्या बुरशीची पावडर पसरलेली दिसते. अशी रोगग्रस्त पाने कालांतराने वाळून पानगळ होते._ *_नियंत्रण_* _रोग दिसताक्षणी पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._ *_३) मोझॅक_* _हा रोग सोयाबीन मोझॅक व्हायरस (पॉटीव्हायरस) या विषाणुमुळे उद्भवतो._ *_नियंत्रण_* _पेरणीसाठी विषाणुमुक्त बियाणे वापरावे. सोयाबीनचे प्रतिवर्षी तेच ते वाण घेण्याऐवजी एक ते दोन वर्षांनी वाणांची अदलाबदल करावी. शेतातील विषाणूबाधित रोगग्रस्त झाडे त्वरीत उपटून जाळावीत किंवा जमिनीत खोल पुरुन टाकावीत. विषाणू वाहक मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारशींत कीटकनाशकांचा वापर करावा._ *_४) तांबेरा_* _या रोगास साधारणत: २० ते ३० अंश से. तापमान व ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रता अनुकूल असते. रोगाच्या बुरशीचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो._ _*लक्षणे :* पानांच्या खालील पृष्ठभागावर मुख्य शिरेजवळ लहान आकाराचे पिवळसर तांबूस ठिपके दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानांच्या दोन्ही बाजूंना, पानाचे देठ, कोवळे खोड, फांद्या आदींवर क्षणे आढळून येतात. रोगग्रस्त झांडाची पाने वाळून गळतात. शेंगातील दाणे बारीक व सुरकुतले होतात. त्यामुळे उत्पादनात ४० ते ९० टक्क्यांपर्यंत घट येते._ *_नियंत्रण_* _◆रोगास प्रतिकारक्षम वाणांची (उदा. फुले कल्याणी, एमएयूएस-७१, एमएयूएस-१६२ ) लागवड करावी._ _◆रोगाची लक्षणे दिसताक्षणी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली किंवा प्रॉपीकोनॅझोल १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._ *_🎯तूर_* *_१) मर रोग (फुजॅरियम ऑक्सीस्पोरम)_* _या रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत होतो. जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व ओलावा २० ते २५ टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येते._ *_नियंत्रण_* _◆पीक फेरपालट करावी_ _◆तुरीत ज्वारी, बाजरी, मका यासारख्या तृणधान्यांचे आंतरपीक घ्यावे._ _◆रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत._ _◆मर रोगास प्रतिकारक्षम वाणांची उदा. विपुला, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, आयसीपीएल ८७१९१ आदींची लागवड करावी._ _◆पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ६ ग्रॅम प्रति किलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी._ *_२) वांझ रोग (विषाणू)_* _हा रोग विषाणूमुळे होतो. विषाणूचा प्रसार एरिओफाईड कोळीमार्फत होतो तुरीची कोवळी पाने पिवळसर पडतात पानांची, फांद्याची व झाडाची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडाला फुले किंवा शेंगा लागत नाहीत._ *_नियंत्रण_* _◆तूर पिकाचा खोडवा घेण्याचे टाळावे._ _◆रोगग्रस्त झाडे त्वरित उपटून नष्ट करावीत._ _◆कोळी किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._ _◆वांझ रोगास प्रतिकारक्षम तुरीचे वाण उदा. विपुला, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ यांची लागवड करावी._ *~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~* *✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️* #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती