#🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🙏भक्ती सुविचार📝 . .ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll
. ------------------------------------------
'श्री ज्ञानेश्वर महाराज गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना वंदन करतात. भगवंतांना वंदन करतात व अतिशय विनम्रतेने श्रोत्याशी संवाद साधत साधत अमृतवाणीने सर्व गीतार्थ नायबोलीत सोप्या व सुटसुटीत भाषेत समजावून सांगतात.
*************************************************
. मग म्हणितले जी स्वामी l भलेणी ममत्व देखीले तुम्ही l
. म्हणोनी कृष्णार्जुना संगमी l प्रयाग वटु जाहलो ll
***************[ ज्ञानेश्वरी-१०/१६]*****************
. ------- अर्थ ------
. . मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, 'स्वामी, आपण कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिल्यामुळे कृष्णार्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या प्रयागावरील वटवृक्ष झालो आहे.'
. ------विश्लेषण -----. .
. विभूतीयोगाच्या दहाव्या अध्यायाची सुरुवात करताना नेहमीप्रमाणेच श्री ज्ञानेश्वर महाराज गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना वंदन करतात. भगवंतांना वंदन करतात व अतिशय विनम्रतेने श्रोत्याशी संवाद साधत साधत अमृतवाणीने सर्व गीतार्थ नायबोलीत सोप्या व सुटसुटीत भाषेत समजावून सांगतात.
. ते म्हणतात, 'स्पष्टपणे बोध करण्यात चतुर असलेल्या विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या परावाणी रुपी श्री सद्गुरो, तुम्हाला माझा नमस्कार असो. संसाररूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या, तुर्यावस्थेचे लीलेने पालन करणाऱ्या आपणास नमस्कार असो. अखिल जगाचे पालन करणाऱ्या, चंदनाप्रमाणे श्रेष्ठ असणाऱ्या, श्री गुरो तुम्हास माझा नमस्कार असो. चतुर चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा, श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. गुरुकृपेचे माहात्म्य मला वाणीने वर्णन करता येणार नाही. अहो, सूर्याला चकचकीत करण्यासाठी त्याला उटणे लावता येईल का?'
. किती दृष्टांत ! किती उदाहरणे! किती मधाळ भाषा! किती विनयशीलता ! श्री. ज्ञानेश्वर महाराजांचे थोरपण वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. स्वतः परमार्थाचे आचरण करून जगास उपदेश करणारे ते सर्वश्रेष्ठ संत आहेत.
. ll राम कृष्ण हरी, माऊली ll