Mr. Vik@s
ShareChat
click to see wallet page
@36832142
36832142
Mr. Vik@s
@36832142
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#कुंकुमार्चन म्हणजे काय व ते कसे करतात ??!! ========= ◆ कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ? इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. ◆ देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ? देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. ◆ त्या संबधी कोणती काळजी घ्यावी ? कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणा पासून मस्तका पर्यंत वाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. ◆ कुंकुमार्चनाचे शास्त्र कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्ती तील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते कुंकुमार्चन करण्या साठी विषेश दिवसाची जसे पोर्णिमा अमावस्या गुरु पुष्यामृत योग लक्ष्मी पुजन मंगळवार शुक्रवार निवड करावी मूळ कार्यरत शक्‍ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशा तून झाली अाहे. शक्‍ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या गंध लहरींच्या सुवासा कडे ब्रह्मांडातील शक्‍ती तत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्ती तील सगुण तत्त्वाला जागृत करण्या साठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्त्वाला प्रसन्न करणार्‍या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्‍ती तत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्‍या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. ◆ फलश्रुती :- अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्य सिध्दी साठी याची सहायता होते. परमेश्वरावर असलेली श्रद्धा व गुरूंवर असलेली अपार भक्ती यामुळे माणूस आयुष्यात असाध्यही साध्य करू शकतो..! #🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - ShareChat
#🙏जय माता दी ललिता पंचमी माहिती पंचमीचे दिवशी व्रत ते *उपांगललिता हो* *अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ॥* *रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो* *आनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो ।।उदो।। हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. एखाद्या करंडकाचे झाकण हे हिचे प्रतीक मानून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात. ललितादेवीचे ध्यानमंत्र असे आहेत- *नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम।* *भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।* '' कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.'' या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवैद्यासाठी लाडू, वडे, घारगे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन (वाण) देतात. रात्री जागरण व कथा श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी ललितादेवीचे विसर्जन करतात.
🙏जय माता दी - ShareChat
#🙏जय माता दी रूप (५) || स्कंदमाता ||  अस्त्र-शस्त्र : कमळ  वाहन : सिंह  मंत्र : या देवी सर्वभू‍तेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। (हा मंत्र ५ व्या दिवशी जाप करावा) दुर्गेचे पाचवे रूप ' स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे. नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. माहिती संकलन-:निखिल आघाडे.
🙏जय माता दी - ukmha ~ ukmha ~ - ShareChat
२६ सप्टेंबर भगवंताला विसरणे ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने, निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची, हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखीलमिळत नसे; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ?* *त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो, त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही, ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही.* *आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की, आपण जगतासाठी देव मानतो, तर् संत देवासाठी जगत मानतात.* *खरे म्हणजे, जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते, ती समजावून सांगायला फार कठीण असते; ती खरी अनुभवानेच जाणायची असते.* *ज्याचा अनुभव दुसर्यावर अवलंबून आहेतो अपूर्ण समजावा; म्हणजेच, जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दॄष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात,म्हणजेच त्याच्या नामात, राहाण्याचा प्रयत्न करावा.* *सर्व कीर्तनांचे सार हेच असते. फक्त मांडणी निराळी.* *रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो 'हूं, हूं' करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारूती अती बुद्धीमान्; त्याने 'सीतेला कसे ओळखायचे' म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही !* *तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, "तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला* *रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज." तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली.* *ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला, आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही.* *मारुतिरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले, याला आता काहीतरी 'चिरंजीव' असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही;* *म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला.* 🌹 *२७०. सर्व संतांचे सांगणे आहे की, मनापासून भगवंताचे नामघ्या आणि आपले कर्तव्यकर्म करा.* 🙏🌹 *श्रीराम जय राम जय जय राम* 🌹🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - இலலட5 இலலட5 - ShareChat
#🙏जय माता दी भवानी ! तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची आहे. श्रीछत्रपती शिवाजीमहाराजांनी १६५६ मध्ये कोकण व घाटमाथ्याच्या सीमेवर असलेला जावळी प्रांत काबीज केला. संरक्षणदृष्ट्या या प्रदेशाची उपयुक्तता लक्षात घेऊन, सह्याद्री पर्वताच्या रांगेतील भोरप्या डोंगरावर असलेल्या पुरातन गढीच्या ठिकाणी महाराजांनी प्रतापगड या किल्ल्याची स्थापना केली. प्रतापगडाची उंची समुद्रसपाटीपासून ३५४३ फूट आहे. महाबळेश्वरपासून हा किल्ला वीस किलोमीटर अंतरावर असून किल्ल्यापर्यंत वाहनांनी जाता येते. वाडा - कुंभरोशीपासून पायी किल्ल्यावर जाता येते. पूर्वी या किल्ल्यावर असलेल्या गढीस ढोपरा किंवा गुढ्यादुर्ग हे प्राचीन नाव होते. (शिवकालीन प. सा. सं. ३ नं. २६४०) १६५६ मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली. १६५७ मध्ये किल्ला पुर्ण झाला. शिवरायांनी महाराष्ट्रात बांधलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये हा किल्ला अभेद्य व उत्तम दुर्गशैलीचा मानला जातो. या किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर याने शिवरायांचे सेनापती मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली केले. मोरोपंतांनी या पूर्वी राजगड, रोहिडा व पुरंदर या किल्ल्यांचे बांधकाम केलेले होते. गडाच्या पायर्‍या चढून गेल्यावर प्रथम पश्चिमाभिमुखी मुख्य दुर्गद्वार लागते. या दुर्गद्वाराची बांधणी शिवकालीन मराठा शैलीतील असून, दरवाजाच्या दोन्ही बाजूस व्याघ्रमुखे कोरलेली आहेत. या दरवाजातून वर गेल्यावर पूर्वेकडे तोंड असलेला भग्न दरवाजा आढळतो. या दरवाजातून शिवाजीमहाराज अफझल खानाच्या भेटीस गेले होते. अफझल बुरुजाच्या बांधकामानंतर या दरवाजाचा वापर कमी होत गेला. प्रतापगड प्रामुख्याने दोन भागांत विभागलेला आहे. वरचा बालेकिल्ला व खालच्या भागास खालचा किल्ला म्हणतात. खालच्या किल्ल्याचे क्षेत्रफळ ३२० यार्ड लांब व १२० यार्ड रुंद आहे. ही लांबी दक्षिणोत्तर असून रुंदी पूर्वपश्चिम बालेकिल्ल्याच्या तटापर्यंत आहे. किल्ल्यावर एकूण चार तलाव व दोन विहिरी आहेत. या खोदलेल्या तलावातील कातळाचा वापर किल्ल्याच्या भिंती व बुरूज बांधण्याकरिता करण्यात आला. गडावरील पायर्‍यांचे नूतनीकरण, १९५७ मध्ये पंडित नेहरूंच्या प्रतापगड भेटीच्या वेळी करण्यात आले. काही ठिकाणी मूळ उंच पायर्‍यांचे दर्शन होते. मुख्य दरवाजा ओलांडून उजवीकडे असलेल्या तलावापासून पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याकडे जाणार्‍या मार्गाच्या डावीकडे श्री भवानीमातेचे मंदिर आहे. तुळजापूरची तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. मंबाजी पानसरे व इतर जाणकार व्यक्तींना बिहार - बंगाल प्रांताच्या सीमेवर असलेल्या श्वेतगंडकी व त्रिशुलगंडकी, नद्यांच्या संगमाच्या परिसरात पाठवले तेथून दिलेल्या मोजमापानुसार काळ्या एकसंध पाषाणाची शिळा आणवून, निष्णात नेपाळी कारागिरांकरवी तुळजाभवानीची सुंदर मूर्ती घडवली. ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची आहे. या मूर्तीकरिता वापरलेला पाषाण काळा कुळकुळीत असून त्यावर सुवर्णरेखा उमटलेल्या आहेत. महाराजांनी चिरेबंदी देवालय बांधून त्यात १६६१ मध्ये अत्यंत श्रद्धापूर्वक व विधिवत मोठ्या समारंभपूर्वक मोरोपंत पिंगळ्यांच्या हस्ते भवानीमातेची प्रतिष्ठापना केली. भोसल्यांच्या परंपरागत कुलदैवताची स्थापना करून शिवरायांनी प्रतापगडावर नवे अधिष्ठान व पुण्यक्षेत्र वसवले. देवीच्या पूजेअर्चेसाठी व मंदिराच्या कायम व्यवस्थेकरिता व्यवस्थापक, पुजारी, पुराणिक, गुरव, चौघडेवाले आदींच्या नेमणुका करून त्यांना गडावर निवासस्थाने बांधून दिली. महाराजांनी अष्टभुजा आदिशक्तीस सालंकृत करून, उंची रेशमी जरीची वस्त्रे, सोन्याचा मुगुट अनेकविध अलंकार व पूजेची उपकरणी, भवानीमातेस अर्पण केली. येथे देवळात पूजापाठ, नैवैद्य व उत्सवही सुरू झाला. याचे सुंदर वर्णन सभासद बखरीत करण्यात आलेले आहे. देवीचे देवालय प्रशस्त असून गाभार्‍याचे व रंगमंडपाचे काम शिवकालीन आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर गणेशमूर्ती आहे. चार ते साडेचार फूट उंचीच्या व तेवढ्याच रुंदीच्या सिंहासनावर तुळजाभवानी विराजमान आहे. ही रेखीव, तेजःपुंज, प्रसन्न मूर्ती दोन ते अडीच फुटांची असून या मूर्तीच्या उजव्या बाजूस कोनाड्यात, एक ते दीड फूट उंचीची महिषासुरमर्दिनीची सुंदर मूर्ती आहे. भवानीमातेच्या मूर्तीसमोर प्राचीन स्फटिकाचे शिवलिंग आहे. गडाचे बांधकाम करताना मोरोपंत पिंगळ्यांना हे शिवलिंग सापडले होते. गर्भगृहात छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज युद्ध मोहिमेअगोदर देवीच्या दर्शनास येत व ध्यानधारणा करीत असत. शिवराज्याभिषेकाच्या वेळी (२० मे १६७४) महाराजांनी भवानीमातेस सोन्याचे छत्र अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आढळते. मंदिराच्या छतावर शिशाचे आच्छादन सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्या कारकीर्दीत (१८१८-१८३९) करण्यात आले. मंदिराच्या आवारात दोन शिवकालीन दीपमाळा असून वीज पडून त्यांचे थोडे नुकसान झालेले आहे. १९२७ मध्ये लागलेल्या आगीत या मंदिरातील कीर्तनमंडप व पुराणमंडपाचे नुकसान झाले तेव्हा सातारच्या छत्रपतींनी व फलटणच्या निंबाळकरांनी याचा जीर्णेद्धार केला. नुकतेच सातारच्या श्रीमंत छत्रपतींकडून या मंडपांचे अत्यंत सुंदर व कलात्मक नूतनीकरण करण्यात आलेले आहे. मंदिरासमोर नगारखाना असून मंदिराच्या आवारात डाव्या बाजूस अनेक प्रकारच्या शिवकालीन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या सभोवती तटबंदीसारखी भिंत असून येथून भवानी तलाव व दख्खन बुरुजाचे दर्शन होते. डिसेंबर १९२९ मध्ये या मंदिरात मोठी चोरी झाली. या देवीचे लाखो रुपयांचे दागिने व रत्ने चोरीस गेली. या संदर्भात मुंबईच्या पठाणांच्या टोळीला भोर संस्थानात अटक करून त्यांच्यावर खटले भरून, १९३१ मध्ये शिक्षा देण्यात आली. या घटनेची हकिकत तत्कालीन ‘ज्ञानप्रकाश‘मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. छत्रपती संभाजीराजे, शाहु छत्रपती, ताराबाई व अनेक मराठा सरदारांची भवानीमातेवर नितांत श्रद्धा होती. संकटात धावून येणार्‍या या देवीच्या दर्शनास महाराष्ट्रातून हजारो भक्त या गडावर येतात. सातारच्या श्रीमंत छत्रपतींचे हे खासगी देवस्थान असून येथील व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. नवरात्रात येथे घटस्थापना, सप्तशतीचे पाठ, गोंधळ, कीर्तन, होमहवन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवकालापासून चालत आलेले पूर्वापार धर्मविधी सातारच्या छत्रपती घराण्याकडून अत्यंत धर्मबुद्धीने व भक्तिभावाने पार पाडले जातात. श्री भवानी मंदिरापासून बालेकिल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने व रहिवाश्यांची घरे आहेत. प्रतापगडाचा इतिहास कथन करणारे संस्कृती दर्शन संग्रहालय व तेथील स्लाईड शो प्रेक्षणीय आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून या दरवाजाव्यतिरिक्त बालेकिल्ल्यास आणखी तीन दरवाजे आहेत. बालेकिल्ला ३० ते ४० मीटर उंचीच्या तटबंदीने वेढलेला असून आत महाराजांच्या सदरेचे व इतर वास्तूंचे अवशेष आहेत. आत केदारेश्वराचे मंदिर आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अनावरण केलेल्या श्री छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा लक्ष वेधून घेतो. किल्ल्यावर अफझल बुरूज, केदार बुरूज, यशवंत बुरूज, रेडका बुरूज, असे गनिमी युगतंत्रास उपयुक्त असे बुरूज आहेत. तसेच येथे अफझलखानाचा दर्गा व मुख्य दरवाजाच्या पुढे अफझल खानाच्या भेटीची जागा असून अफझलखानाचा वध महाराजांनी येथेच केला व इतिहासप्रसिद्ध युद्ध येथेच झाले. दर्‍याखोर्‍यांनी भरलेल्या गर्द वृक्षराजीने वेढलेला, श्री शिवरायांच्या कुशल युद्धतंत्राची साक्ष देणारा व आदिमाया, आदिशक्ती श्री भवानीचे अधिष्ठान असलेला प्रतापगड महाराष्ट्रातील दुर्गांमध्ये दुर्गश्रेष्ठ आहे.
🙏जय माता दी - 4180 4180 - ShareChat
#🌹देवी देवता🙏 वर्णन केलेल्या श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांच्या लीला फारच अगम्य आहेत .अगम्य अशा या लीलाना कोणत्याही संकल्पना अथवा चौकटीत बसवता येत नाही . दत्त महाराजांच्या लीला म्हणूनच वेदांनाही न कळणाऱ्या म्हटल्या आहेत ,वेदा अगोचरु ll असे याचे वर्णन आहे . आज जर एखाद्या रोगाकरिता दत्त महाराजांनी एक उपाय सांगितला असेल तर त्याच गोष्टीसाठी तोच उपाय महाराज पुढील वेळॆस सांगणार नाहीत . उदाहरण घ्यावयाचे झाल्यास कुष्ठ रोगाचे घेता येईल . आजही वैद्यक शास्त्रात हा रोग अत्यंत दुर्धर मानला जातो ,गुरुचरित्रात या रोगाला समूळ नष्ट करताना महाराजांनी तीन खेपेस तीन वेगवेगळ्या लीला दाखविल्या आहेत पहिल्या खेपेस चाळीसाव्या अध्यायात नरहरी विप्राचे कुष्ठ महाराजांनी औदूंबराच्या शुष्क काष्ठाला पालवी फुटताच नष्ट केले . हे काष्ठ चार वर्षे शुष्क होते हे विशेष . सरपण म्हणून त्याची निर्गत लागणार होती . हि फांदी भली मोठी आणि जड असावी असे दिसते कारण काष्ठ उचलोनि डोईवर असा याचा उल्लेख आहे . डोक्यावर वाहून ते काष्ठ संगमेश्वरासमोर रोवले .सात दिवस उपवास करून नरहरीने त्या काष्ठाला पाणी घातले . या त्याच्या निष्ठेने गुरुमहाराज प्रसन्न झाले आणि त्यानंतर गुरुमहाराजांच्या कमंडलूतील अमृत जल सिंचनाने त्या काष्ठाला पालवी फुटली आणि इकडे नरहरीचा रोगपरिहार झाला . दुसऱ्या वेळी पंचेचाळिसाव्यात नंदीनामा ब्राह्मण आधी चंदला परमेश्वरी देवी नंतर तुळजापूर येथील जगन्माता आणि त्यानंतर गाणगापूर येथे गुरुमहाराजांकडे आला . गाणगापूरला आला तो शिवरात्रीचा पुढील दिवस होता . त्याच्या अनंत यातनांना पाहून गुरुमहाराजांचे मन कळवळले . सोमनाथ ब्राह्मणाला म्हणाले याला संगमावर संकल्प पूर्वक स्नान घालून अश्वत्थ प्रदक्षिणा करून याची जुनी वस्त्रे टाकून द्यावी आणि नवी वस्त्रे देऊन आणावे , स्नान करताच नंदीनामाचा शरीरवर्ण पालटला आणि रोगपरिहार झाला . किंचित कुष्ठ राहिले होते ते मनातील किंतुमूळे . याचा परिहार महाराजांनी स्तुतीकाव्य केल्याने सांगितला . यावर नंदीनामाने आपली असमर्थता दाखवताच गुरुमहाराजांनी त्याच्या जिव्हेवर विभूती प्रोक्षण केले आणि नंदीनामाने अपार काव्य केले ,राहिलेल्या किंचित कुष्ठाचाही परिहार झाला . तिसऱ्या खेपेस महाराजांची बहीण रत्नाई या कुष्ठ रोगाच्या परिहारासाठी गाणगापूर येथे आली आणि पापविनाशी तीर्थात स्नान करण्याची महाराजांची आज्ञा होताच तिने तीन रात्री स्नान केले आणि तिच्या कुष्ठाचा परिहार झाला . सिद्धांनी या वेळी आपल्या उपस्थितीत हि लीला झाल्याचे कथन केले आहे . सिद्ध म्हणे नामधारकासी l आम्ही देखील दृष्टीसी l स्नान करिता त्रिरात्रीसी l कुष्ठ तिचे परिहरिले ll ( अ ४९ -ओ ८३) गुरुमहाराजांच्या अर्थात दत्त महाराजांच्या लीला खरोखर अगम्य आहेत ,ह्या लीलांचे रोज स्मरण होणे ,मनन होणे ,आणि माझ्यासारख्या पाप्याचा भक्त म्हणून त्यांनी स्वीकार करणे हि देखील एक लीलाच नाही का ?? श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
🌹देवी देवता🙏 - তয়্স  1/ তয়্স  1/ - ShareChat
#🙏जय माता दी राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५. तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत. संदर्भ : करवीर रियासत, पान २६४ सेनापती घोरपडे घराण्याची कैफियत. आज या दिवसाचे औचित्य साधून मंदिर मध्ये सजावट करण्यात आली. साैजन्या ऐश्वर्या मुनिश्वर
🙏जय माता दी - ShareChat
#दुर्गेचे_चवथे_रूप#कुष्मांडा सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च। दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।। दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे. #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏जय माता दी
🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 - ShareChat
देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना, तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात . माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातुनच खरा कळतो. चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी एक वेळेस चालेलं . पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही . आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत, हे फक्त दोघानांच माहीत असते ..एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा ! त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका , एक "मनाचं बालपण " आणि दुसरे "अंतःकरणातील देवपण "! हे संपलं कि माणूस संपला ! #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ( ( - ShareChat
#🙏जय माता दी दिनांक 25 सप्टेंबर 2025 शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके 1947 च्या तृतीया वृद्धी तिथीला नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मातंगी रूपात सजली आहे . दशमहाविद्यापैकी मातंगी ही संगीत देव विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध आहे ज्या वेळेला भंडासूरदैत्याचा संहार करण्यासाठी सर्व देवांच्या आवाहनानुसार भगवती ललिता प्रगट झाली त्यावेळेला विषङ नावाच्या दैत्याला मारण्यासाठी राजश्यामला अर्थात मैत्रिणी देवीचा अवतार झाला. पुढे हिमालयाने आपल्या घरी आदिशक्तीने कन्या रूपात अवतार घ्यावा म्हणून जगदंबेची उपासना केली त्यावेळेला भगवती ललिता पार्वती रूपाने हिमालयाच्या घरी अवतीर्ण झाले. हिमालयाचा मित्र असणाऱ्या मातंग मुनींनी ललितेची प्रिय सखी असणाऱ्या राजशामलेची उपासना याच कारणासाठी केल्यानंतर भगवती राजश्यामला त्यांची कन्या रूपात प्रगट झाली मातंग ऋषींची कन्या म्हणून ती मातंगी. हे मातंगी संगीत विद्येची देवता मानली जाते तिच्या उपासकात संगीतविद्येला तसेच ती विद्या असणाऱ्या गायक वादकांना प्रचंड सन्मान दिला जातो कारण वाद्यांचा किंवा संगीताचा अपमान हा मातंगीचा अपमान मानला जातो. मातंगी याच रूपान भगवती पराशक्तीच्या प्रत्येक अवताराच्या वेळेला अवतार धारण करत असते रेणुका अवतारात मातंगीचे मस्तक जळवूनच रेणुका पुनर्जीवित करण्यात आली. भवानीच्या अवतारात देखील मतंग नावाच्या दैत्याच्या संहारासाठी देवी मातंगी स्वतः युद्ध करायला आली असा उल्लेख तुरजा महात्म्य ग्रंथात आहे. श्री मातंगीची अनेक आयुध वर्णन उपलब्ध असली तरी आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई हातामध्ये ढाल अंकुश चंद्रहास खड्ग आणि पाश धारण केलेल्या रूपामध्ये सव्य ललिता सणात विराजमान आहे. महन्मंगल भगवती मातंगीच्या कृपेच्या सुरांनी तुमचे आमचे आयुष्य सुरेल व्हावे हीच करवीर निवासिनी चरणी प्रार्थना श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः
🙏जय माता दी - கு shri_oo kkoee Pejak கு shri_oo kkoee Pejak - ShareChat