Mr. Vik@s
ShareChat
click to see wallet page
@36832142
36832142
Mr. Vik@s
@36832142
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌹देवी देवता🙏 परान्न दोष सांगितले आहेत ,त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळावयास हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही . ,कोणाकडे अन्नग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहेत . अन्न हे दोष अथवा वासना वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहेमी येते . सांप्रत काळात परान्न हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात . का असं सांगितलं असेल ? कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होते ?? कैक उदाहरणे यादाखल देता येतील . नकारात्मक आणि सकारात्मक देखील . थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे . ब्रह्मावर्तास आप्पा खाडिलकर नावाचा एक ब्राह्मण होता . त्याला एकदा रक्ताची हगवण सुरु होऊन तो फार अशक्त झाला . त्या वेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला कि तुम्ही पंचपक्वांन्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल . हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेऊ घातले . याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला . थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते ,त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी हि अवस्था झाली आहे . तू यातून बरा होशील असे दिसत नाही . यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य . शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहावसान झाले .हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम . दत्त माहात्म्यात विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूढ असा पुत्र जेवला तेव्हा ,सतीचे हाताने मिळता अन्न l तयाचा भ्रम गेला निघोन ll असे म्हटले आहे . हा अन्नाचा सकारात्मक परिणाम . प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरीत आले होते ,दत्त महाराजांना आग्रहाने जेऊ वाढल्याचे फळ हे मोक्षस्वरूप होते ,यापेक्षा अधिक कोणते फळ असेल ??? आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतिकरिता उपयुक्त ठरते . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
🌹देवी देवता🙏 - ப்u a ( ப்u a ( - ShareChat
हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी , नाहीत . ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर साधारण मनुष्य आहोत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो . कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं . आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं .इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे , आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते . आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका . फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे . जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत*. जगणं कोणाचंही सोपं नसतं . आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं . सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो . आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका . कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो. ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही. कृतज्ञ रहा. ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही. कृतज्ञ रहा. तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले. कृतज्ञ रहा. ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचेजीवन विसंवादात आहे. कृतज्ञ रहा. तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला. कृतज्ञ रहा. ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले. कृतज्ञ रहा. कृतज्ञ रहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त "ईश्वरी कृपा" आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे. म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात.कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, आत्मविश्वास. जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🌹देवी देवता🙏 समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते? ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. माधुरी दामले ह्यांच्याकडून फॉरवर्ड *संजीवन समाधी* नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी "संजीवन समाधी" घेतलेली आहे. सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, असे म्हणा हवे तर. संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्रीसंत नामदेव महाराजांनी माउलींच्या समाधिवर्णनाच्या आपल्या अभंगांत केलेला आहे. श्री नामदेवरायांच्या गाथ्यात "श्रीज्ञानदेव समाधिमहिमा" नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे. यात प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथच, संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माउलींचे व त्यांच्या समाधीचे माहात्म्य कथन करीत आहेत. या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात. त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्रीपांडुरंग म्हणतात की, "त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्यदेहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी." माउलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही, हेच देवही येथे सूचित करीत आहेत. सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधीबद्दलची विशेष . ..... सद्गुरू श्री माउलींनी श्रीभगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर, देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. म्हणजे माउलींना ते माहीत नव्हते असे नाही, पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले. आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर हेच माउलींचे अनादिस्थान आहे. तेथेच त्यांनी या पूर्वी एकशेआठ वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची एकशेनववी वेळ होती समाधी घेण्याची, असे नामदेवराय सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले. नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ-यावर मृगाजिन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली. आदल्या दिवशी, कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माउलींना स्वत: भोजन वाढले . त्या अमृतमय अन्नामुळे माउलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माउलींची पूजा झाल्यावर, एकीकडून श्री निवृत्तिनाथ व एकीकडून श्रीभगवंतांनी हाताला धरून माउलींना त्या समाधिविवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माउलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला, भीममुद्रा लावली आणि ते 'संजीवन समाधी'त गेले. त्यानंतर श्रीपांडुरंग व श्री निवृत्तिनाथ बाहेर आले. संजीवन समाधी साधण्यासाठी तत्त्वांचा तत्त्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. सद्गुरु श्री माउलींनी समाधीविवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्त्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर, ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माउलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्त्वाचा लय झाल्यावर माउलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्याजागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्त्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायूतत्त्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माउलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. "संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की, माउलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील." संजीवन सामाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत. जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे. 'जातस्यहि ध्रुवो मृत्यु:' या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पांचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो. ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात. परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणूनच सद्गुरु श्री माउलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते ! इथे कोणाही महात्म्यांची मी श्री माउलींशी तुलना करत नाहीये. जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माउलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत. फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे. कृपया कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. श्रीसंत महात्मे यासाठीच श्रीक्षेत्र आळंदीला व सद्गुरु श्री माउलींच्या समाधीला "नित्यतीर्थ" म्हणतात. हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे, म्हणूनच ते नित्यतीर्थ होय. श्री माउलींचे समाधीविवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे. तेथे पांचभौतिकताच नाही कसलीही. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पांचभौतिक देह उपयोगाचा नसतो. तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो. या समाधीविवराला कालाचा स्पर्शच नाहीये. तिथे काळ कार्यच करीत नसल्याने, त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत. त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही साडेसातशे वर्षे उलटली तरी जसाच्या तसाच आहे. सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने या समाधिविवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजण्या ईतक्या सत्पुरुषांनाच लाभलेले आहे. पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दश: एकच आहे. माउलींच्या समाधिसोहळ्यास श्रीसंत जनाबाई उपस्थित नव्हत्या. म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या, त्यावेळी माउलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्यदृष्टीने पुन्हा दाखवला होता. श्री माउलींचे त्यांच्यावर पुत्रवत् प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली. श्रीसंत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. माउलींच्या गळ्याला टोचणारी अजानवृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधीविवरात गेले होते. त्यानंतर साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी, श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्रीसंत विठाबाई महाराजांना श्री माउलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले. गंमत म्हणजे श्रीसंत विठाबाईंचे अभंग मला काही वर्षांपूर्वी वाचायला मिळाले होते. सद्गुरु श्री ज्ञानदेवांच्या समाधिस्थ स्वरूपाविषयी आपल्या "श्रीज्ञानदेव विजय" ग्रंथातील ओळ ज्ञानेशांची समाधिस्थिती । पुनश्च येणे देहावरती । याची घेतली प्रचिती । त्रिशतकोत्तर नाथांनी ॥१५.६३॥ पूर्वजांनी जया पाहिले । तया नाथांनीही देखिले । आजही तैसेचि संचले । समाधिस्थ ज्ञानेश्वर ॥१५.६५॥ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्यअवतार असल्याने, आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपाप्रसाद करीत आहेत. "कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच आहेत." सद्गुरु श्री माउली हे जसे एकमेवाद्वितीय ( Unique ) अवतार आहेत, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीयच आहे. त्यांच्यासारखे केवळ तेच ! अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू !! त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची, त्याचे मनन-चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे, हेच माउलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही ! या देवदुर्लभ भाग्यासाठी परमकनवाळू करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणीं, सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी दंडवत प्रणाम करून त्याच अनुपम-सुखदायक श्रीचरणीं, त्यांच्या महन्मंगल जयंतीपर्वाच्या पूर्वसंध्येला तुलसीदल रूपाने विसावून धन्य होतो !
🌹देवी देवता🙏 - 4  raoo आज्ञाचक faa चक अवाहत चक मणिपूर 59 Hun   Tuer | Pea der तानेश्चराच्या देहात नटलेला श्री कडलिनी जगदवेचा महायोग 4  raoo आज्ञाचक faa चक अवाहत चक मणिपूर 59 Hun   Tuer | Pea der तानेश्चराच्या देहात नटलेला श्री कडलिनी जगदवेचा महायोग - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 भक्तीचे दोन टप्पे प्रत्येक दत्त भक्त अनुभवत असतो . पहिल्या टप्प्यात दत्त महाराज हे तुमच्या मनाजोगे होऊ देतात तर दुसऱ्या टप्प्यात दत्त महाराज हे आपल्या मनाप्रमाणे करतात . आता आपल्या मनाप्रमाणे दत्त महाराज जेव्हा करतात तेव्हा तो उद्धार असतो पण हे पटकन कळून येत नाही . ते कळेपर्यंत बराच काळ लोटलेला असतो . या दोन टप्प्यांचे वर्गीकरण इह आणि पर -पार असेही करता येईल . दत्त माहात्म्यात हे दोन्ही टप्पे स्पष्ट कळून येतात . कार्तवीर्याचे उदाहरण घ्या किंवा अलर्काचे घ्या किंवा यदूचे घ्या . आधी सर्वाना मनोजोगे सर्व काही मिळालेले आहे . पण दुसरा टप्पा खऱ्या कृपेचा दिसून येतो . यात काय नाहीये ? दर्शन आहे ,सहवास आहे ,उपदेश आणि मार्गदर्शन आहे . ज्यावर इतकी कृपा झाली त्याचा आणखीन काय उद्धार होणे बाकी आहे ? अहो ,जागे असताना स्मरण दुर्लभ आहे ,स्वप्नात देखील ज्याचे दर्शन दुर्लभ आहे असे दत्त महाराज स्वतः उपस्थित होत जेव्हा काही उपदेश करतात तेव्हा काय अवस्था असेल भक्ताची ! त्यातही कार्तवीर्य आणि अलर्काला दत्त महाराजांनी आलिंगन दिलेले आहे . ज्याच्या पादुकांचे दर्शन राजधानीत दुर्लभ आहे अशा दैवताची गळाभेट म्हणजे काय योग असावा ? आता हे सर्व थोर थोर दत्त भक्त होते आणि त्यांच्या योग्यतेला साजेसे त्यांना दत्त महाराजांनी ज्ञान दिले पण मग आपल्यासारख्या सामान्यांना हा दुसरा टप्पा कसा कळावा . प्रश्न आहे ? दत्त कृपेने सर्व काही क्षेम झाले आणि महाराज या मायेतून बाहेर काढू इच्छित असले कि अनेक गोष्टींची न्यूनता समोर येते .धन व्यय ,आप्त स्वकीयांचा वियोग ,पद आणि अधिकार यांचे नष्ट होणे , लोकापवाद --- वगैरे वगैरे . धन हानी होताना महाराज म्हणतात ,मी श्रीवल्लभ आहे अर्थात माझ्यासोबत साक्षात लक्ष्मी आहे पण ती चंचल आहे तेव्हा त्या मायेत मला विसरणे किती योग्य आहे ? वियोग होणे हि एक आणखीन दुःखद बाब ,हे सर्व नश्वर आहे अर्थात एक दिवस तुला देखील येथून जायचे आहे हे इथे अधोरेखित होते ,पद आणि अधिकार --- अहो ज्याला मुक्तीचा अधिकार महाराज देऊ इच्छित आहेत त्याने ह्या क्षणिक मायेत का गुरफ़टावे ? या पदापेक्षा दत्त महाराजांच्या पदाची इच्छा धरावी . आणि लोकापवाद हा आणखीन एक पैलू . मला समाजात मान्यता मिळावी किंवा एक स्थान असावे हि सर्वांच्या मनातील धारणा . अहो आपल्याविषयी केवळ एक नकारात्मक गोष्ट ऐकताच जे दूर होतात त्यांची संगती काय म्हणून हवी आहे ? केवळ दत्त महाराजांची संगती योग्य आहे अन्य कोणाचीही नाही . संकटात ,दुःखात ,अंतकाळी केवळ महाराज सोबत असतात . तेव्हा आपल्या भक्तीचा कोणता टप्पा सुरु आहे हे ओळखा आणि दत्त महाराजांची प्रार्थना करा . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 भेटणे हा कधीच योगायोग नसतो… तो पूर्वजन्मी केलेल्या सत्कर्मांचा, प्रार्थनांचा आणि अंतःकरणातून उमटलेल्या प्रांजळ हाकेचा परिणाम असतो. कित्येक जन्मांची पुण्याई एकत्र आली की सदगुरू सोबत अशी दिव्य भेट घडते. म्हणूनच गुरू भेटले की मनात एक वेगळीच ओळख निर्माण होते… जणू आपण त्यांना आधीपासूनच कुठेतरी ओळखत होतो. किती भावस्पर्शी आहेत या निर्मळ भावना.. © श्री दत्तरूप ll मनातील चलबिचल, वाढणारा गोंधळ हे सगळ माझ्या सोबत नेहमीच घडतं हे जाणणारे आपण सर्वच पण एकदा का गुरूच्या सान्निध्यात आलो की मनातले वादळ शांत होत.मनाच्या कोपऱ्यात दडलेले गुंते आपण कुणालाच सांगू शकत नाही, ते ते क्षणात ओळखतात. आपण कधीच न बोललेल्या वेदना ते नजरेतूनच वाचतात.आणि कधी कधी एका शब्दाने, किंवा अगदी शांततेनेही हृदयाला दिलासा देतात. खरं सांगू का, त्यांच्या नुसत्या उपस्थितीत एक सुरक्षितता जाणवते जणू काही आपण योग्य हातात आहोत. © श्री दत्तरूप ll अनेकजण आयुष्यात खूप शोध घेतात, पण सद्गुरू सापडत नाहीत. होत का अस कधी? बहुदा तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल ना?.. कारण गुरूंची भेट ही प्रयत्नाने नाही, तर पात्रतेने मिळते. ही पात्रता एखाद्या जन्माची नसते ती अनेक जन्मांच्या जपातून, आवडीने केलेल्या भक्तीतून तयार होते. म्हणूनच गुरू मिळणे म्हणजे “भाग्य”, “कृपा”, आणि “पुण्याई” या तिन्हीचा एकत्रित आशीर्वाद. आणि एकदा का सद्गुरू लाभले, तर जीवन खरंच बदलतं. रस्ता पूर्वीचाच असतो, पण चालायची शक्ती वेगळी असते.अडचणी पूर्वीच्याच असतात, पण त्यांना सामोरे जाण्याचा शक्ती वेगळ्या रूपात असते. आणि "जे काही होईल… माझे गुरू माझ्यासोबत आहेत."हे मात्र आपण मनाशी घट्ट करून ठेवतो. बरोबर ना... खरं तर गुरू भेटतात तेव्हा कळत की नियतीने आपल्याला योग्य ठिकाण शोधून दिलय आणि देवाने आपल्या जीवनात सत्कार्य करण्यासाठी सद्गुरूंचा हात ठेवला आहे. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || © श्री दत्तरूप ll --------------------------------------------------------- #श्रीदत्तरूप #दत्तरूप #दत्तगुरु #नृसिंहवाडी #श्रीदत्त #दत्तजयंती #दत्त #गाणगापूर #स्वामीसमर्थ #सद्गुरू #गुरू
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
❗२१ नोव्हेंबर❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌷🌷प्रवचनाचा विषय🌷🌷 🟥🟫🟥भगवंताजवळ काय मागावे🟥🟫🟥 💠एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला, आणि त्याला 'तुम्ही कुठले' असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तालुक्याचे नाव सांगेल, इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल; तसेच दुसर्‍या प्रांतात गेलातर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल, आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात.💠 🔹️तसेच , मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे, त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येई पर्यंत, जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते.🔹️ 🪞सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत.🪞 💢आपण प्रथम अशी कल्पना केली की, श्रीमंतीमध्ये सुख आहे. त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही, तर तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे❓💢 🏵एकच वस्तू एकाला सुखरूप तर दुसर्‍याला दुःखरूप वाटते; म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही.🏵 ❄जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते, ती उद्या तशी वाटेलच असे नाही.❄ ♦आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही. म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पनादेखील खोटीच असली पाहिजे; ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे❓♦ 🔸️जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो. ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो.🔸️ 🛟संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी, नाती, वगैरे गोड लागत नाहीत. त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही. हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे.🛟 💮एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावेत; त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात.💮 🌀कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या. त्यात खरे हित आहे, आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल.🌀 ⭕कल्पनेचे खरे-खोटेपण हे अनुभवाअंती कळते; म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे. अशी रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे.⭕ 🍥"अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे," या वृत्तीमध्ये राम नसून, काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे, आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे. हेच परमार्थाचे खरे मर्म आहे.🍥 🌲#बोधवचन: कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नाम देखील फळ देईल.🌲 🌹#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹 🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 माहिती अणि दत्त जन्म कथा🌹💐 मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात. 💐🌹दत्तजयंतीचे महत्त्व🌹💐 दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले .... मन हे न्हाले भक्ती डोही । अनुसया उदरी धन्य अवतार ।। केलासे उद्धार विश्वाचा या । माहुरगडावरी सदा कदा वास ।। दर्शन भक्तास देई सदा । चैतन्य झोळी विराजे काखेत ।। गाईच्या सेवेत मन रमे । चोविस गुरूचा लावियला शोध ।। घेतलासे बोध विविधगुणी । *दत्तजन्म कथा* दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो. अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली. श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहे. महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते. #shreedattarajgurumauli #dattagurumaharaj
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🌹देवी देवता🙏 काळजी' असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,* *विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते. सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात एक फाटक्या वेषातील व्यक्ती, हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली. सेवकांनी तिला रांगेने ये सांगितले. परंतु, ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यवसान वाद-विवादात झाले. सेवक त्या व्यक्तीला मठाधीपती यांच्याकडे घेऊन आले. स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली. स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, 'स्वामीजी, माझ्या घरात सहा लहान-लहान मुले आहेत. ती उपाशी आहेत. त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे.'* *'अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना?'- स्वामीजी उत्तरले.* *'काय सांगावं? भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर? मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो. म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद द्या स्वामी....'* *स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला. प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, 'तू इथे विष्णुसहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस?' तोंडघशी पडणार, या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.* *ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:।* *भूतकृद् भूतभृद् .....* *एवढे म्हणून ती थांबली. कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते. त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, 'तुला १००० नावांपैकी फक्त ६ च नावे पाठ आहेत? त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर. 'भूतभृद्' म्हणजे, अशी व्यक्ती, जी अखिल विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते. तुला जर, हा अर्थ उमगला असता, तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता. म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर. ती व्यक्ती खजिल होऊन प्रसाद घेत निघून गेली. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तीभावाने विष्णुसहस्रनामाचे पठण करू लागली. मठात सामुहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते. मात्र, काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली. भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला. सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली. स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर, त्या व्यक्तीचे येणे बंद झाले, असे कळले. सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला. स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची, असे ठरवले. ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती. स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहीली आणि नतमस्तक झाली. स्वामीजींनी तिची ख्यालीखुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले. आपण घरीच स्तोत्रपठण करतो, असे ती म्हणाली. कुटुंबाच्या पालपोषणाचे काय? असे विचारले असता, ती व्यक्ती म्हणाली...'स्वामीजी! विष्णुसहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसादपात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो. आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत, धन्य झालो.' यावर स्वामीजी म्हणाले, 'मी कोणीही सेवक पाठवला नाही. स्वयं परमात्मा तुमची क्षुधाशांती करण्यासाठी सेवकरूपाने तुझ्या द्वारी आला. हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे. भगवंतावर अशीच श्रद्धा कायम ठेव. कारण, तोच या जगाचा पालनकर्ता आहे.* Whatsapp वरून साभार
🌹देवी देवता🙏 - O2s O2s - ShareChat
जन्म पत्रिका सद्गुरू बदलू शकतात..... गुरुसान्निध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या. जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते. सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही. दत्त अवतार वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना आहे. एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला. ती एका ज्योतिषाकडे गेली असता त्याने मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असल्याचे सांगितले. ती बाई रडत टेंबे स्वामींकडे गेली. स्वामींनी पत्रिका पाहिली. व स्वतः पत्रिकेतील ग्रहांची स्थाने बदलून नवी पत्रिका मांडली. त्यांच्या या कृतीने मुलाचा मृत्यूयोग टळला. जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते. कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते. पण प्रवाशाचे ते नसते. तसेच या सद्गुरुंच्या शक्तीचे आहे. म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरू त्याच्या मदतीला धावून जाणारच. पण आपल्या हाकेत ती श्रध्दा, ती आर्तता असली पाहिजे! गुरुच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा, असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच नव्हे; गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा करा म्हणून मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी, म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल, असे करा. गुरुकृपा हि केवलम् ! शिष्य परम मंगलम् ! #🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 महात्म्य - एक प्रभावी उपासना.* *प.पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना ही कांडे आहेत.* *कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके १८२३ मध्ये (सन १९०१) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्रीदत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकावन्न अध्याय असून पाच हजार चारशे ओव्या आहेत. श्री महाराजांनी यांत उपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविधा भक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु व यदु या चार भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्रीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे की, या ग्रंथात प्रपंचाचे सतत सान्निध्य ठेवावे. या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथा प्रमाणे नित्य करत असतात.* *आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांग सुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे. महाराजांच्या स्वरूपाप्रमाणे हा ग्रंथही अत्यंत चित्ताकर्षक असाच आहे. कितीही वाचन झाले तरी ‘नित्य नवं नवं’ असाच तो आहे. सगुण स्वरूप साक्षात्काराची ज्ञानशक्ती व वैराग्यरूपसाधने रसभरित वाणीने महाराजांनी यात सांगितली आहेत. महाराज अल्पकाम असल्याने देवाजवळ काही मागत नसत. परंतु या ग्रंथात सान्निध्य ठेवण्याकरता त्यांनी श्रीदत्तप्रभूंजवळ प्रार्थना केली आहे. ते म्हणतात,‘हे प्रभो दत्तात्रेया, मी मागतो पसरूनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।’ (अ. ५१ ओ. ११०) व या प्रार्थनेप्रमाणे दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे असा अनुभव वाचकांसही येतो. त्यांच्या इतर कोणत्याही ग्रंथात याप्रमाणे महाराजांनी प्रार्थना केलेली दिसत नाही. यावरून या ग्रंथाची थोरवी किती आहे, हे सहजच लक्षात येण्यासारखे आहे.* *श्रीगुरुचरित्राप्रमाणे महाराजांनी दत्तमहात्म्याचेही एकावन्न अध्यायच केले आहेत. याची ओवी संख्या पाच हजार चारशे केली आहे. यात श्रीदत्तमहाराजांचे सांगोपांग चरित्र व सहस्त्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रल्हाद वगैरे भक्तांची व तद्नुषंगाने अत्रि, अनसूया, रेणुका, जमदग्नी इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळवाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्तिज्ञान, वैराग्य, निष्कामकर्म इत्यादि परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपाने वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा सर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदी अमृतमय आहे. त्यामुळे त्याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यात बिलकूल संशय नाही.* *प. पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्व पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना हि कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके १८२३ मध्ये (सन १९०१) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्री दत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकावन्न अध्याय असून पाच हजार चारशे ओव्या आहेत. श्री महाराजांनी यांत औपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविधा भक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु व यदु या चार भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्रीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे कि या ग्रंथात प्रभूंनी सतत सानिध्य ठेवावे.* *श्रीदत्त महात्म्य या ग्रंथाची रचना भाविक जनांच्या आग्रहावरून महत्पूर येथे शके १८२३ (इ.स.१९०१) च्या चातुर्मासांत झाली असें श्री स्वामीमहाराजांच्या पत्रावरून कळते. त्यांतच पुढे ते म्हणतात, ‘(श्रीदत्तपुराणातील) तृतीयाष्टकापासून सहाव्याच्या सहाव्या अध्यापर्यंत आजपर्यंत (श्रावण शु।।११) ओव्या लिहिल्या. प्रायः प्रत्यही एकशें आठ होत गेल्या. तेवढ्याचाच अध्याय ठेवला. उद्यां पन्नास अध्याय पुरा होईल. सुमारें साडेपाच हजार ओव्यांचा ग्रंथ झाला. आतां पुढें लिहिण्याची इच्छा होत नाहीं...’ यानंतर अवतरणिकेचा एक अध्याय झाला. असे एकूण ५१ अध्याय आहेत. गुरुचरित्राच्या अध्यायांचीच संख्या येते.* *प. पू. योगिराज श्री गुळवणीमहाराज यांनी प्रकाशित केलेल्या श्रीदत्तमाहात्म्याचे संपादन पं. आत्मारामशास्त्री जेरे यांनी केले आहे. त्यांच्या शब्दांत ‘प्राकृत दत्तमाहात्म्यस्वरूप ही सुद्धां एक सर्वश्रेष्ठ अशी महाराजांची लीला आहे. आबालवृद्धांस सुलभबोध करून देणाऱ्या दत्तमाहात्म्य ग्रंथासारखा सर्वांगसुंदर ग्रंथ वाङ्मयात अपूर्वच आहे! सगुणस्वरूप साक्षात्काराची ज्ञान, भक्ति व वैराग्यरूप साधने रसभरित वाणींने महाराजांनी यांत सांगितली आहेत. महाराज आप्तकाम असल्याने देवाजवळ काहीं मागत नसत. परंतु या ग्रंथांत सतत सान्निध्य ठेवण्यांकरीतां त्यांनी श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली आहे. ते म्हणतात, ‘प्रभो दत्तात्रेया, मागतों पसरूनी हात। ह्याग्रंथी सतत सान्निध्य ठेवी।। (५१:११०) व या प्रार्थनेप्रमाणें दत्तमहाराजांचे या ग्रंथात सान्निध्य आहे असा अनुभव वाचकांसही येतो. यांत श्रीदत्तमहाराजांचें सांगोपांग चरित्र व सहस्रार्जुन, अलर्क, यदु, आयुराजा, परशुराम, प्रह्लाद वगैरे भक्तांची व तदनुषंगानें अत्रि, अनसूया, जमदग्नि इत्यादिकांचीही चरित्रे अत्यंत रसाळ वाणीने वर्णन करून स्वस्वाधिकारानुरूप साधकांचे भक्ति, ज्ञान, वैराग्य, निष्कामकर्मयोग इत्यादि परमार्थमार्ग अत्यंत स्पष्ट व निश्चित स्वरूपानें वर्णिले आहेत. साल व कोयरहित आम्रादि फळांचा गाभा जसा गसर्वच अमृतमय असतो तसाच हा ग्रंथ अगदीं अमृतमय आहे. त्यामुळे याच्या निरंतर सेवनाने मूळचाच अमृत असणारा मानव अमृतमय होईल यांत बिलकुल संशय नाही. हा एकच ग्रंथ वाचकाच्या सर्व कामना पूर्ण करून त्याला परब्रह्म पदवी देणारा आहे.’ खुद्द श्रीस्वामी महाराजांनीच ग्रंथाच्या शेंवटीं त्याच्या प्रयोजनाविषयी म्हटले आहे, ‘मंदां विशेंषेंकरून। नुमजे औपनिषदज्ञान। त्यांकरितां हे लेखन। करवी अत्रिनंदन दयाळू।। (५१:१०६) कलियुगातील अशक्त जीवांना उपनिषदांचे श्रवण, मनन, निदिध्यासनादि मार्ग अगम्य आहेत. तसेंच त्यांचा अधिकारही मर्यादित आहे. म्हणून गीतेच्या वचनाप्रमाणे स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादि सर्व जीवांना ह्या ग्रंथाद्वारें श्रीस्वामी महाराजांनी मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे. ह्या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायापासून ग्रंथाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक ओवीचे तिसरे अक्षर क्रमाने वाचल्यास मांडुक्योपनिषद, भद्रं कर्णेभिः व स्वस्ति नो हे शांतिमंत्र, ईशावस्योपनिषद्, पूर्णमदः..., अतो देवा अवंतु नो हे मंत्र साकार होतात. हें श्रीमहाराजांच्या वरील वचनाचेंच द्योतक आहे.* *त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपत्तीपैकी बरेचसे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. त्या ग्रंथांची महत्ता केवढीही मोठी असली तरी सर्वसामान्य लोकांना त्यांचा विशेष उपयोग होण्यासारखा नाही. हे ध्यानात घेऊन श्रीमहाराजांनी मराठीत जे साहित्य निर्माण केले आहे, त्यात प्रस्तुत ग्रंथाची योग्यता अनेक दृष्टींनी अलौकिक आहे. प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप व त्याच्या निर्मितीचे कारण यांवर महाराजांनी स्वत:च प्रकाश टाकलेला आहे. ते लिहितात,* *"जगदुद्धारार्थ परमेश्वर । अत्रीच्या घरी धरी अवतार । त्याच्या चरिताचा विस्तार । वर्णिला सुंदर पुराणी ॥ तत्सारभूत दत्तपुराण । औट सहस्त्र निरूपण । ते अपरिचित गीर्वाण भाषण । प्राकृतजन नेणती ॥ म्हणोनि हा ग्रंथारंभ । ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ । भक्तवत्सल पद्मनाभ । चित्तक्षोभहर्ता जो ॥ श्रीदत्तपुराणाचे तीन भाग । ज्ञानोपासनाकर्मयोग । त्यांतील उपासनाकांड भाग । ईश्र्वरानुराग दावी जो ॥ जेथे कार्तवीर्याचे आख्यान । अलर्काचे विज्ञान । आयुयदूंचे उद्धरण । हेंचि वर्णन मुख्यत्वे ॥"*
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat