*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ८ डिसेंबर इ.स.१६७७
(मार्गशीर्ष वद्य नवमी, शके १५९९ संवत्सर पिंगळ, वार शनिवार)
स्वराज्यासाठी हुबळीची लूट!
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ४,००० स्वार घेऊन हुबळी पुर्णपणे लुटली. छत्रपती शिवराय सुरतेवर परत एकदा स्वारी सुरतेवर केंद्रीत करणार आहेत अशी हूल उठवून महाराजांनी सर्वांनाच गाफील ठेवले. आणि शत्रूसैन्याचे लक्ष करावयास भाग पाडून मस्तपैकी हुबळी लुटून आपला कार्यभाग साधला व हे धन स्वराज्यासाठी जोडले!
📜 ८ डिसेंबर इ.स.१६८०
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"राजाच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्दीला आमच्या कडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार नाहीत हे उघड आहे. परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम आम्हास मोडावा लागणार हे स्पष्ट आहे. दोघांपैकी कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबतास सुरक्षितता असणे गरजेचे आहे". छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्दीकडून लेखी मिळतील. तर मिळवाव्या. तरीसुद्धा सिद्दीला फार दुखवू नये. यावरून इंग्रजांचे दुटप्पीपणाचे धोरण किती स्पष्ट होते हे कळून येते. पण ते कात्रीत सापडले होते, हे निश्चित.
📜 ८ डिसेंबर इ.स.१६९९
औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला तेव्हा अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू.गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झालेगडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले.
मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले.
गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल असे वाटत होते पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात.
एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली
📜 ८ डिसेंबर इ.स.१७४०
रेवदंडयाचा किल्ला मराठ्यान्नी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला.
'मानाजी आंग्रे' आणि 'खंडोजी मानकर' यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला...
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ७ डिसेंबर इ.स.१६७२
बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र -
प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२
साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे.
📜 ७ डिसेंबर इ.स.१७१५
मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १७१६ च्या दरम्यान दिल्लीला आणण्यात आले.
📜 ७ डिसेंबर इ.स.१७६०
बळवंतराव मेहेंदळे पानिपतला ठार
बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युध्दात वीरमरण पत्करलेले एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये ओंकारेश्वराचे मंदिर बांधले.
📜 ७ डिसेंबर इ.स.१८०३
गव्हर्नर वेलेस्ली स्वत: अचलापुरात तळ ठोकून बसला
१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ६ डिसेंबर इ.स.१६६३
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान...!
मुघल साम्राज्याला हादरा देणारे शिवशाहीतील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची पहिली लूट. शाईस्तेखानाने स्वराज्यात राहून केलेली स्वराज्याची नासधूस, या सर्व काळामध्ये महाराजांचे पन्हाळगडावरून पलायन, चाकणचा वेढा, उंबरखिंडीचे युद्ध, या सर्व घटनांवर मात करीत महाराजांनी रामनवमीच्या दिवशी केलेला शाईस्तेखानाचा पराभव, या सर्व घटनांमुळे स्वराज्याचा खजिना रिकामा होत होता. याची भरपाई म्हणून महाराजांनी एक धाडसी मोहीम आखली. ही मोहीम स्वराज्यात राहून नव्ह, तर स्वराज्याचा बाहेर जाऊन राबवायची होती, मुघली गोटात शिरून, चोख तयारीनिशी महाराजांनी मनसुबा आखला. या नव्या शिलांगणाची मोहीम महाराजांनी आपल्या सगळ्यात विश्वासू हेरावर सोपवली आणि ते म्हणजे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. (स.ब)
गुजरात प्रांतातील सुरत शहर म्हणजे अतिशय समृद्ध आणि श्रीमंत. दिल्लीच्या खालोखाल सुरतेचा मान होता. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या सुरत शहरामधून चाले. या सुरत शहरामधून मिळणार्या जकातीपोटीच औरंगजेबास वार्षिक १२ लक्ष रुपये मिळत असत. डच, इंग्रज, अरबी, फ्रेंच हे सगळे लोक सुरतमधून आपला व्यापार करत असत. सोने, हिरे, मोती, जड-जवाहीर याने सुरतेतील व्यापाऱ्यांचे कोश गडगंज भरलेले असत. अनेक अनमोल वस्तू, चंदन, अत्तरे, केशर, रेशमी कापडाचे ठाण अशा अनेक वस्तूंचा व्यापार सुरतेमधून चालत असे. या सर्व गोष्टी वगळता सुरतेला अनन्यसाधारण महत्त्व होते, कारण यवनी धर्मानुसार मक्का यात्रा अत्यंत पवित्र मानलेली आहे आणि मक्केला जाणारे यात्रेकरू हे सुरतेमधून जात असत. त्यामुळे सुरतेला मक्केचा दरवाजा असे संबोधले जात असे. सुरतेचे मूळ नाव 'सूर्यपूर' असे होते. तापी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले, समुद्र किनार्यापासून २७ मैल आत असणाऱ्या सुरतेची वस्ती तशी दाट होती. पण त्याभोवती यावेळी तटबंदीदेखील नव्हती. (अ.हो.मो)
सुरत राजगडापासून १५० कोस दूर आणि हा सगळा प्रवास मुघली प्रदेशातूनच होणारा. अशा या सोन्याच्या लंकेची खडा-न-खडा माहिती बहिर्जी नाईक यांनी गोळा केली.
सुरतेमधील सर्व धनिक मंडळी, त्यांची संपत्ती, सुरतेमधील मुघली बंदोबस्त ही सर्व माहिती घेऊन बहिर्जी महाराजांसमोर हजर झाले आणि सुरत शहराचा नकाशाच त्यांनी महाराजांपुढे मांडला आणि बहिर्जी महाराजांना म्हणाले, "सुरत मारल्याने अगणित द्रव्य मिळेल." बहिर्जीकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर "लष्कर चाकरी नाफारी काम मनाजोगे होणार नाही याजकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे" या विचारे महाराजांनी स्वतः जाण्याचे निश्चित केले. (स.ब) सर्व सैन्याच्या जमावानिशी महाराजांनी मार्गशीष वद्य द्वितीया, शके १५८५ म्हणजेच ६ डिसेंबर १६६३ रोजी सुरतेसाठी राजगडाहून प्रस्थान केले.
📜 ६ डिसेंबर इ.स.१७०१
मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला.
📜 ६ डिसेंबर इ.स.१९५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
🙏 महामानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन 🙏
📜 ६ डिसेंबर इ.स.१९७६
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ५ डिसेंबर इ.स.१६६७
पोर्तुगीजांशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साकोपंत ह्या नावाचा एक दूत आवश्यक ते अधिकार देऊन रवाना केला. पोर्तुगीजांनी पाद्री सेबास्तियांव मार्तीश ह्याला आपला दूत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे तहाच्या कारारावर त्यांची सही घेण्यासाठी पाठविले.
शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी जो शांततेचा आणि मैत्रीचा करार झाला त्याचा पोर्तुगीज आराखडा पुढील प्रमाणे आहे.
शिवाजी राजे आणि काँद व्हिसे रेई ह्यांच्यामधील मैत्रीच्या आणि शांततेच्या कराराची कलमे
पुढील प्रमाणे :-
(१) दिनांक १९ नोव्हेंबर १६६७ रोजी शिवाजी राजांच्या सैन्याने बार्देशमध्ये शिरून जे पुरूष, स्त्रिया आणि मुले युद्ध कैदी म्हणून नेले व माझ्या राजाच्या प्रजाजनांची गुरे आणि बैल
पळविले, त्यांना शिवाजी राजे ह्यांनी आमच्याकडून कोणतीच युद्ध खंडणी न घेतां आम्हास परत करावे.
(२) आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिलेल्या लखम सावंत आणि केशव नाईक ह्या देसायांना सक्त ताकीद देण्यात येईल की, त्यांनी आमच्या राज्यांत राहून शिवाजी राजे, त्यांचे प्रजाजन, आणि त्यांचे राज्य ह्या विरुद्ध कोणतीच कारवाई करू नये आणि त्यांच्या हातून तसे कृत्य घडल्याची जाणीव आम्हाला झाल्यास अथवा शिवाजी राजांनी ते आमच्या निदर्शनास आणल्यास त्या देसायांना आमच्या स्वामींच्या राज्यांतून ताबडतोब हांकलून देण्यात येईल.
आमच्या स्वामींच्या राज्यात येऊन राहिलेले दुसरे दोन शरणार्थी नारबा सावंत आणि मालू शेणवी ह्यांनाहि अशीच ताकीद दिली जाईल. आणि सर्व प्रकारची अंदाधुंदी टाळण्यासाठी सदरहू देसाई जोपर्यंत आमच्या राज्यात असतील तोपर्यंत त्यांना गोवा बेटाबाहेर जाऊ दिले जाणार नाही.
(३) बालाघाटहून गोवा बेटांत आणि बंदरात आणि बार्देश व साष्टी महालांत जो माल आणि गुरे येतील ती अडविली जाऊ नयेत व त्यांच्यावर कर लादला जाऊ नये. त्याचप्रमाणे
पोर्तुगालच्या राजाच्या ह्या राज्यातून आणि बेटातून जो माल बालाघाटला जाईल, त्याचीही अडवणूक होऊ नये अथवा त्याच्यावर कर लादला जाऊ नये. मग शिवाजी राजे व आदिलशहा
ह्यांच्यामध्ये युद्ध चालू असो वा नसो.
(४) उभय पक्षांची दृढ आणि चांगली मैत्री असावी आणि समुद्रावर आणि जमिनीवर ही मैत्री टिकावी आणि उभय पक्षांपैकी कुणा एकाकडून ह्या काराराचा भंग झाल्यास त्याने
दुसऱ्याकडे तत्संबंधाने तक्रार करावी. आमच्याकडून आगळीक झाल्यास शिवाजी महाराजांनी आमच्याकडे तक्रार करावी आणि शिवाजी महाराजांकडून आगळीक झाल्यास आम्ही त्यांच्यापाशी
तक्रार करावी.
(५) जर शिवाजी राजांना काँद व्हिसे रेई ह्यांच्याशी एखादा महत्त्वाचा सौदा करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तिमार्फत त्या वाटाघाटी करता येतील.
📜 ५ डिसेंबर इ.स.१६७३
शिवरायांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले.
सन इ.स.१६७३ पावसाळा थांबला आणि राजांचे विजयी अश्व पुन्हा दौडू लागले मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागले, याच सुमारास कर्नाटकात यादवी निर्माण होऊन मृत राज्याच्या विधवा पत्नीने महाराजांची मदत मागितल्यावरून राजांनी रायगड सोडला. राजे हुबळी, काद्रा, कारवार, बंकापूर या भागात स्वारीवर गेले. या भागात मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोलखानने सर्जाखानाची रवानगी केली. त्याने मराठ्यांना चांदगड परिसरात घाटले. झालेल्या झुंजीमध्ये मराठ्यांच्या बाजूचे विठोजी शिंदे नामक एक नामांकित सरदार ठार झाले. पण मराठ्यांनी सर्जाखानला मागे रेटलाच व ते बंकापूरच्या दिशेने पुढे सरकले तर बंकापूर ला बहलोलखान हा अडथळा म्हणून समोर आला. चिडलेले मराठे यानंतर पन्हाळ्याच्या रोखाने मागे फिरले. पन्हाळ्याजवळ बेहलोलच्या सैन्याशी मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विठोजी शिंदेच्या हत्येचा सूड सर्जाखानला मारून उगवला.
📜 ५ डिसेंबर इ.स.१७४६
सदाशिवराव भाऊसाहेब अवघ्या सोळाव्या वर्षी महादजीपंत पुरंदरे यांच्यासह दिनांक ५ डिसेंबर सन १७४६ रोजी कर्नाटक मोहीमेवर रवाना झाले. या मोहिमेत पाच्छापूर, कित्तूर, परसगड, बदामी, यादवाड, बसवपट्टण, बागलकोट वगैरे ३६ परगणे काबीज केले. बहादूरभेंड्याचा किल्लाही घेतला.
📜 ५ डिसेंबर इ.स.१७९६
नाना आणि दौलतराव शिंद्यांना परशुरामभाऊंची ही घाई अन विश्वासात न घेता केलेले काम अजिबात आवडले नाही आणि नाईलाज असला तरीही या दोघांनी श्रीमंत बाजीराव पेशवे (दुसरे) यांस गादीवर बसवण्याचे ठरवले. दि. ५ डिसेंबर १७९६ रोजी बाजीरावांना पेशवेपद देण्यात आले. नानांनी सातारकर शाहू महाराजांकडून वस्त्रेही आणली. बाजीराव आता अधिकृतरीत्या पेशवे झाले. चिमाजीअप्पा हे तसं पाहिलं तर वयाने अन् नात्यानेही यशोदाबाईंपेक्षा वडील होते. ते यशोदाबाईंचे चुलत सासरे होते. त्यांचे दत्तकविधान करणे हे अतिशय चुकीचे असून अशास्त्रीय आहे असे पुण्यातल्या धर्मसभेचे मत होते. बाजीरावांनीही गादीवर बसताच
पुण्यातल्या शास्त्री-पंडितांची सभा बोलवून हे दत्तकविधान अधिकृतरीत्या गैर ठरवले आणि तडक चिमाजीअप्पांना नजरकैदेत ठेवले. गादीवर बसल्यानंतर थोड्याच दिवसात बाजीराव पेशवे नाना फडणविसांना न जुमानता स्वतः मुखत्यार होऊन कारभाराचे निर्णय नानांना न विचारता स्वतःच घेऊ लागले. बाजीराव ऐकत नाही आणि हळूहळू तोही रघुनाथरावांच्याच वळणावर जात आहे असे नानांना वाटू लागले. त्यामुळे नाना कडेकोट बंदोबस्तात प्रथम साताऱ्यास जाऊन छत्रपतींची भेट घेऊन महाड येथे राहिले.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ४ डिसेंबर इ.स.१६७९
शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले
औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की , "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा !"
अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली !
संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं ... अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले ( दि. २० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले . तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले ( दि. ३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि. ४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले . संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला . ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले .
📜 ४ डिसेंबर इ.स. १६८२
रणमस्तखानाने कल्याण काबीज केले. त्याच्याशी मुकाबला करण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे यांना रवाना केले. त्यांच्याबरोबर १० हजार स्वार व १२ हजार पायदळ होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी बहादूरखान व या सैन्यात लढाई झाली. कल्याण-भिवंडीपासून ५ मैलांवर असणाऱ्या मेहेंदळी गावात मराठयांच्या दोन हजार स्वारांनी मुघल ठाण्याची लुटालूट केली होती. त्यावेळी मुकर्रबखान मराठयांना तंबी देण्यासाठी धावला. मुकर्रबखान आणि मराठे यांच्याता मेहेंदळी गावाच्या अलीकडे ३० कोसांवर असलेल्या उरण खेड्या जवळ लढाई झाली, त्यात दोन्हीकडील सैनिक मेले व जखमी झाले. त्या लढाईनंतर मुकर्रबखानाने मौजे मेहेंदळी येथे डेरा जमा केला.
📜 ४ डिसेंबर इ.स.१७२७
थोरला बाजीराव पूर्णा परळी प्रांतात आले. पुढे ६ डिसेंबर पौष शु. ५ कसबे नरसीक, ८ डिसेंबरला वाशिम जिल्हा अकोला, ९ डिसेंबरला तालुका मंगळूरपीर जिल्हा अकोला, १० डिसेंबर ला हातगाव, ११ डिसेंबर ला मांजराखेड. तालुका चांदूर जिल्हा अमरावती हे सगळे प्रांत लुटून उध्वस्त केले. म्हणजे डिसेंबर च्या ह्या प्रारंभीच्या काळात राऊ नी तुफानी घोड-दौड करून वाशीम,माहूर, मंगळूरपीर तालुके धुळीस मिळवले. मग अचानक वायव्येस शिरले आणि चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्या जवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली.
📜 ४ डिसेंबर इ.स.१७४८
पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला
निवती गड तसा छोटा आहे. उंचीनेही छोटा आहे, पण छान आहे. गडासंबंधी जास्त काही ऐतिहासिक माहिती वाचायला मिळत नाही. शिवकाळानंतर हा किल्ला १८व्या शतकामध्ये सावंतवाडीच्या सावंतांकडे होता. ४ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढवला. पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माइल खान नावाच्या कॅप्टनने शौर्याची कमाल करून सावंतांकडून हा किल्ला जिंकून घेतला.
📜 ४ डिसेंबर इ.स.१७९१
महादजी शिंदे यांनी एक पत्र पेशव्यांस पाठविले. महादजी शिंदे लिहीतात. "स्वामींचे दर्शन घ्यावयाचा बेत करून मेवाडातून येत असता उदेपुरकर राणाजींचे राज्यात बंदोबस्त नाही. उमराव आपापले जागा मुलुख बळकावून राहीले. भिमसिंगाकडे चित्तोडचा किल्ला. तो भिमसिंग राणाजींचे लक्षात नाही. याकरिता राणाजी येऊन भेटले. चित्तोड वगैरेचा बंदोबस्त करावा म्हणोन बजिदी केली त्यावरून राणाजीसह चित्तोडनजीक येऊन मुक्काम केला. भिरमसिंगाने गोळी वाजवली. सबब मोर्चे लाऊन तोफांची निकड करताच भिमसिंग घाबरा झाला.
📜 ४ डिसेंबर
आज #भारतीय_आरमार_दिन
भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराज.
"आरमार उभारणी" इ.स. १६५९ पासुन शिवरायानी आरमार तळ उभारण्यास सुरूवात केली. पश्चिम किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग बांधले. मालवणचा सिंधुदुर्ग तर जलदुर्गाचे आश्चर्य म्हणावे लागते कारण तो एवढा अचुक व मजबुत बांधला आहे. आरमाराची यादी चित्रगुप्ताच्या बखरीत दिली आहे त्यात "थोर गुराबा ३०, गलबते १००, महागिर्या १५०, लहान गुराबा ५०, होड्या १०, लहान होड्या १५०, तारवे ६०, पाल १५, जुग १५, मचवे ५०. एवढी होती. इंग्रजानीही स्वराज्याच्या आरमाराच्या याद्या वेळोवेळी लिहुन ठेवलेल्या आढळतात. त्यावरून स्वराज्याचे आरमार कारवार पर्यंत गेले तेंव्हा त्यात एका डोलकाठीची ३० टनापासुन १५० टनापर्यंत वजनाची ८५ जहाजे व तीन अतिमोठी जहाजे होती. म्हणून आधुनिक भारताशी अनुबंध असणारा, समुद्र व आरमाराचा गम्भिरपणे विचार करणारा पहिला राजा म्हणजे शिवाजी महाराजच म्हणावे लागेल. पहिले आरमारप्रमुख सरखेल "कान्होजी आंग्रे" होते.
🙏दत्त नामाचे स्मरण करून,
या पवित्र दिनी आपले जीवन धन्य करा
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ३ डिसेंबर इ.स. १६७९
सिद्धीस मूर्खात काढून मराठ्यांची दोन जहाज खांदेरीस पोहचले..!!
१ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला व सिद्दी आणि इंग्रज यांना तो अडवता आला नाही. पुढे ३ डिसेंबर रोजी एक चमत्कारिक घटना घडली. मराठ्यांची २ जहाजे बेटाकडे जाताना सिद्दयाला दिसली व त्याने ती अडवली असता ती थांबली. सिद्दयाच्या लोकांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपण इंग्रज नौका दलातील असून त्यांनी आपल्या नाविक दलाच्या कॅप्टन आणि नौकेचा खलाशी यांचीही नावे त्वरित सांगितली आणि त्यांनी त्वरित जाऊ द्यावे, अशी मागणी केली. कारण आपण काही मराठी नौका दक्षिणेच्या बाजूने येताना पाहिल्या असून त्याची माहिती मिळवण्याकरिता जात असल्याचे सांगितले. सिद्दयाच्या त्या लोकांना खात्री पटली व त्यांनी मराठ्यांना जाऊ दिले व पुढे त्यांना दिसले की, ते खांदेरीच्या आखातात जाऊन तिथेच नांगरले. त्यावरून त्यांना समजले की, ते मराठेच होते व आपल्याला मूर्खात काढून ते पळून गेले. ही माहिती सिद्दयाच्या त्या जहाजावरील एका हशमाने इंग्रजांच्या सेवेतील एका मुसलमानाला दिली व त्यावरून ती इंग्रजांनी नमूद केली. ३ डिसेंबर रोजी सिद्दीच्या आरमाराचा मुख्य सिद्दी कासीम आणि केग्वीन यांची भेट झाली व कासीमने आता आपण बेटावर उतरून काय तो सोक्षमोक्ष लावूया, असे सांगितले असता केग्वीनने आपल्याला मुंबईहून आदेश येईल तसेच आपण वागू, असे सांगितले. यावेळी केग्वीनने सिद्दीच्या जहाजावर काही मराठी गुलाम मंडळी पाहिली व ही कुठून आली विचारले असता सिद्दीने सांगितले की, आपण मराठ्यांच्या मुलुखात शिरून जाळपोळ केली व काही गुलाम पकडून आणले. तसे केग्वीनने हे लिहून मुंबईला पाठवले.
📜 ३ डिसेंबर इ.स.१६७८
छत्रपती संभाजीराजे रोजी मुघलांकडे गेले.
वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात” …..हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की,” छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि छत्रपती संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो छत्रपती संभाजी राजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की , शहजाद्याला छत्रपती संभाजीराजेंकरवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती. करे पुढे सांगतो की ” शहा आलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उदगार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि छत्रपती संभाजी हे सर्व घटना छत्रपती शिवाजीला वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजींना फार आनंद झाला. अशा तऱ्हने छत्रपती शिवाजींनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला.”
अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले त्यावेळेस शहजादा शहाआलम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आलेला होता. आपल्या आधिच्या मैत्रपुर्ण संबंधातुन अर्धवट राहिलेली राजकारण छत्रपती संभाजीराजेंना सिद्धिस न्यायचे होते अशी दाट शंका येते कारण शहजादा औरंगबादेस येईपर्यंत छत्रपती संभाजीराजे मुघलांकडे गेलेच नाहीत. नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजीराजे ३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलांकडे गेले.
फितुर झालेल्या बर्याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजांना मोगलांच्या छावणीतुन हरप्रकारे प्रयत्नकरुन का सोडवले असतील… हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी छत्रपती शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्या पुढील संकटाची(औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रुष्टीने तयारी म्हणून मुद्दाम छत्रपती संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. नंतर या गोष्टीचा छत्रपीसंभाजी राजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते तेव्हा फायदा झाला . कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती संभाजी राजांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर छत्रपती संभाजी राजांना मदत केली.
📜 ३ डिसेंबर इ.स.१७७६
महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) ह्यांची जयंती...!!
यांचा जन्म वाफगाव ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच होळकर साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत..!
📜 ३ डिसेंम्बर इ.स.१८०३
पेशवा बाजीराव द्वितीय पेशवेपदी गादीवर बसला...!!
डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.
📜 ३ डिसेंबर इ.स.१८८९
खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्यांच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.
बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीराम यांनाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली. यातच खुदीराम यांनी किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीराम यांचे सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसर्या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्ल यांनी अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना दि. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 २ डिसेंबर इ.स.१६६७
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामजी शेणवी यांसी पोर्तुगीज गव्हर्नकडे तहाचे पत्र घेऊन पाठवले..!!
#शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन व पोर्तुगीजांशी तह...!!
शिवाजी महाराजाची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगिजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बार्देशमध्ये कोलवाळ – थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगिजांचेे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही.
२२ नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. त्यानंतर खासा विजरई बार्देश मध्ये आला. तोपर्यंत बार्देशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजीराजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी पठविले. २ डिसेंबर १६६७ च्या दिवशी रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढेे या तहाच्या वाटाघाटी ५ डिसेंबर पर्यंत चालल्या व ६ डिसेंबर रोजी तह झाला.
बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून एक रूका (रुपया)ही न घेता शिवाजी महाराजांनी त्यांस सोडून दिले, असे पोर्तुगिजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. ‘‘शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवी.’’ हे पोर्तुगिजांचा शिवाजी महाराजांचा चरित्रकार कॉस्मी-द-ग्वॉद त्यांच्या चरित्रात साक्ष देतो. शिवरायांच्या बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगिजांना चांगली बसली होती. पोर्तुगिजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकविणारा हा पहिलाच भारतीय राजा होता.
📜 २ डिसेंबर इ.स.१६८३
(मार्गशीर्ष वद्य नवमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार रविवार)
दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी पोर्तुगीज व्हाईसरायकडे!
छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून दुर्गादास राठोड गोव्याच्या पोर्तुगिजांच्या भेटीत गेला. या भेटीत पोर्तुगिजांचा मानस काय आहे, औरंगजेबास ते कितपत मदत करणार याचा कानोसा घेण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अधिक्रृत पत्र जवळ नसल्याने दुर्गादास राठोड याला भेटीस बोलावले नाही !
📜 २ डिसेंबर इ.स.१७०२
डिसेंबर १७०२ मध्ये फोंडा किल्ला मराठयांनी सर केला, फोंड्याचा किल्लेदार म्हणून कृष्णाजी अनंत यांची नेमणूक ताराबाईंनी केली. यावेळी बादशहाचा मुक्काम भीमेच्या काठावर असलेल्या बहादूरगडावर होता. फोंडा किल्ला काबीज केल्यानंतर मराठयांनी बहादुरगडावर असणाऱ्या बादशाही छावणीभोवती धामधूम उठविली होती. तरीही बादशहास अद्यापि मराठयांचे अनेक किल्ले जिंकावयाचे स्वप्न मनात बाळगत होता. विशाळगड जिंकून घेतल्या नंतर सैन्यासह २ डिसेंबरला कोंडाणा ऊर्फ सिंहगड जिंकून घेण्यासाठी निघाला. वाटेत त्याने जेजुरीच्या खंडोबाच्या देवालयाची नासधूस केली. श्रींचा कळस व मंडप जाळून टाकला. जेजुरी हुन कूच करुन बादशाह कोंडाण्याच्या पायथ्याशी २७ डिसेंबरला पोहोचला.पुढे तरबीयतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या.भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांच्या ताब्यात दिला. सिंहगड चे नाव बख्शीदाबख्श (ईश्वरदत्त) असे ठेविले.
📜 २ डिसेंबर इ.स.१७४८
१८ व्या शतकात हा निवतीचा किल्ला सावंतवाडीच्या सावंताच्या ताब्यात होता. २ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगिजांनी निवतीवर हल्ला चढवला. त्या वेळी इस्माईलखान हा पोर्तुगिजांच़्या पदरी नोकरीस असलेल्या कँप्टनने शौर्याची कमाल करुन निवतीवर पोर्तुगिजांचे निशाण लावले. हा इस्माईलखान पुर्वी मराठ्यांच्या पदरी सेवेत होता. निवतीच्या किल्ल्यावर व्हाईसराय स्वता: आला होता. काही वर्षांनी निवती सावंतानी पुन्हा जिंकून घेतला.
📜 २ डिसेंबर इ.स.१७५१
२ डिसेंबर रोजी मराठयांनी निजामापासून त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. या दोन महिन्याच्या युद्ध धुमाळीत बुसीच्या तोफखान्याचा मराठयांच्या गनिमी काव्याच्या लढाईपुढे काही उपयोग झाला नाही. म्हणून सलाबतजंगाने तहाची बोलणी लावली. शिंगवे, परगणे राहुरी येथे ७ जानेवारी १७५२ रोजी उभयतास अटी मान्य होऊन तह झाला. या तहात ठरल्याप्रमाणे पेशव्यांनी त्रिंबक किल्ला निजामास परत दिला.
📜 २ डिसेंबर इ.स.१७६०
पानिपतचा रणसंग्राम
नोव्हेंबर सन १७६० रोजी मराठी फौजा व अहमदशाह अब्दाली याच्या फौजांची प्रथम पानिपतावर चकमक झाली. या चकमकीत अहमदशाह अब्दाली याने माघार घेऊन त्याने नोव्हेंबर सन १७६० रोजी दहाड येथे छावणी केली. यानंतर अब्दाली याने पुन्हा माघार घेऊन त्याने २ डिसेंबर सन १७६० रोजी यमुनातीरावर छावणी केली.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 १ डिसेंबर इ.स.१६६१
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला 'शिरपामाळ' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती.
📜 १ डिसेंबर इ.स.१६६३
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहुणचार खाल्लेला शाहिस्तेखान शिवछत्रपतींच्या भीतीने बंगालकडे रवाना...!!
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथील लाल महालात मुक्कामी असलेल्या शाहिस्तेखानावर योजकतेने हल्ला चढविला. पळून जाताना त्याची बोटे छाटली गेली. खानास त्यामुळे कायमची आठवण राहिली, असे रियासतकार सरदेसाई नमूद करतात. निवडक सैन्याच्या साहाय्याने मावळे लाल महालात घुसले आणि त्यांच्या नियोजनबद्ध कृतीने शाहिस्तेखानास जरब बसली. शाहिस्तेखानाचे सैन्य बळ आणि त्याची ताकत पाहता, हे आव्हान महाराजांनी स्वीकारले आणि त्यामध्ये अपूर्व विजय संपादन करण्याचा विक्रम केला. नियोजन, व्यवस्थापन आणि समन्वय यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली. एप्रिल १६६३ मधील लाल महालावरील हल्ल्याच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत २०० निवडक मावळे होते. लग्नाच्या वर्हाडासोबत हे मावळे पुणे शहरात घुसले. शाहिस्तेखानाचा अंगठा व बोटे कापली गेली. त्याचा मुलगा व जावई त्यात दगावला ह्याचा तर दुःख सागर त्याच्या मनात होताच पण शिवछत्रपती पुन्हा त्याला ठार करायला येतील म्हणून त्याने तडक छत्रपती संभाजी नगर म्हणजेच खडसी (औरंगाबाद ) कडे पळून गेला त्याच्या ह्या डरपोक पनास बघून शेवटी औरंग्याने शाहिस्तेखानाची बंगालला बदली केली, त्याची नामुष्की झाली. शिवचरित्रातील हा प्रसंग उत्कृष्ट नियोजन व नेतृत्व गुणाचा प्रत्यय आणून देणारा आहे.
📜 १ डिसेंबर इ.स.१६७५
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात सामील करून घेतला. १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६च्या डिसेंबर-जानेवारीमध्ये छत्रपती शिवराय अजिंक्यतारावर आजारी पडले होते. त्यावेळी तब्बल दोन महिने त्यांनी येथे विश्रांती घेतली होती.
📜 १ डिसेंबर इ.स.१६८३
(मार्गशीर्ष वद्य अष्टमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार शनिवार)
छत्रपती संभाजी महाराजांची सालशेतला धडक पोर्तुगिजांचे धिंडवडे काढले. पोर्तुगिजांचे धर्मांधतेचे वेड फारच वाढले होते. त्याबरोबर स्त्रियांवरचे अत्याचार ननरीज व मोनेस्टीजमध्ये पोर्तुगिजांचा अत्याचार महाभयानक असाच होता. छत्रपती संभाजी महाराजांची एक तुकडी सालशेतमध्ये घुसली तर दुसरी बारदेश वर चालून गेली. मुळात छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य या भागात नवीन त्यात पोर्तुगिजांचा तोफखाना चांगला. शिवाय मजबूत अशी शिबंदी असूनही मराठी सैन्य तटाला भगदाड पाडून घोडदळासकट आत शिरून पोर्तुगिजांना पळवून लावले. पोर्तुगीज सैनिकांची यथेच्छ पिटाई करीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने १० दिवसाच्या प्रयत्नानंतर थिव्हीमचा किल्ला घेतला. इतर दोन किल्ले पोर्तुगीज सैन्य न लढल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात आले! पुढील २ ते ३ दिवसांत चापोरा गड देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात गेला. या चारही गडावरील अत्याचारी १४० पोर्तुगीज फादर्सना मराठी सैन्याने त्याच्या अंगावरील झगे काढून हात मागे बांधून उघड्या पाठीवर कोरडे काढत जेवढी करता येईल तेवढी मानखंडना करून कैदेत ठेवले. महाराजांनी साधारणततः महिण्याभरात सालशत व बारदेश प्रांत लुटून जाळून फस्त केला. या संबंध धामधुमीत छत्रपती संभाजी इतकी दहशत निर्माण केली की या संपूर्ण कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यापुढे उभे राहण्यासही कोणी धजावला नाही. सोबत बारदेशच्या किल्ल्यांतून तब्बल ४६ तोफा छत्रपती संभाजी महाराजांनी नेल्या!
📜 १ डिसेंबर इ.स.१६९७
संताजींच्या मृत्यूनंतर झुल्फिकार
खानाच्या सैन्याने इ. स. १६९७ व्या पावसाळ्यात जिंजीस वेढा घातला. यावेळी राजाराम महाराजांकडे सैन्य नव्हते म्हणून रामचंद्रपंतास धनाजींस सैन्यासह ताबडतोब पाठविण्यास लिहिले. नंतर आणखी आणीबाणीची पत्रे पाठविली. परंतु महाराष्ट्रातून सैन्य लवकर येण्याची शक्यता न वाटल्यामुळे राजाराम महाराजांनी झुल्फिकार खानाबरोबर तहाचे बोलणे लाविले. बोलणी करण्यासाठी आपला दासीपुत्र कर्ण यांस कारकुनासह वांदिवाशला रवाना केले. २ ऑगस्ट १६९७ रोजी राजा कर्ण व कारकून मंडळी बांदिवाशला गेली. त्यांचे बोलणे ऐकून घेऊन झुल्फिकार खानाने ते बादशहास कळविले. ह्या बोलण्यात राजाराम महाराज मोगलांचे स्वामित्व पत्करण्यास तयार असून त्याप्रमाणे तह घडून यावा असा आशय त्यांत होता. परंतु औरंगजेबाने तहास मान्यता न देता जींजी काबीज करण्याचाच कडक आदेश दिला. तेव्हा झुल्फिकार खानाने कर्ण यांस परत पाठविले. यानंतर ८ नोव्हेंबर १६९७ त झुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा कडक केला. किल्ल्याभोवती ठाणी बसवून ती सरदारांत वाटून दिली. दाऊदखान चिखली दुर्गाच्या पायथ्याशी ठाणी बसवून होता. त्याने धाडसाने चमार टेकडीवर हल्ला चढविला आणि एका रात्रीत त्याने किल्ला जिंकून घेतला. झुल्फिकार खानाने मनात आणले असते तर तो जिंजीला ज्या दिवशी पोचला त्याचदिवशी तो किल्ला हस्तगत करू शकला असता पण राजारामास सुखरूपपणे जिंजीहून पळून जाण्यासाठी त्याने मुद्दाम मोहीम लांबविली. राजाराम महाराजांपाशी युद्धसामग्री पुरेशी नव्हती. चमार टेकडी हातची गेली होती हे सर्व पाहून राजाराम महाराज घाबरले. त्यांनी खंडोबल्लाळ यांजला खानाकडे बोलणी करण्यास पाठविले. आपण कोणत्या बाजूने हल्ले करणार, तुम्हास बाहेर निघून जाण्यास कोणीकडुन कशी संधी ठेविली आहे इत्यादी प्रकार खानाने खंडोबल्लाळ मार्फत राजाराम महाराजांस कळविले. खानाच्या सैन्यांत गणोजी शिर्क सरदार होते. त्यांजला खंडोबल्लाळ भेटले आणि छत्रपतींच्या आणि त्याच्या कुटुंबीयांचा बचाव करण्याविषयी त्यांस त्यांनी गळ घातली. गणोजी शिर्के यांना दाभोळीच्या देशमुखीचे वतन हवे होते ते राजाराम महाराजांनी खंडोबल्लाळास दिले होते.खडोजींनी ते वतन लगेच गणोजींच्या हवाली करण्याचे कबुल केले आणि छत्रपतीकडून त्याच्या लेखी सनदा लिहून घेऊन शिरक्यांच्या हवाली करण्याचे कबूल केले. नंतर शिर्के यांनी राजाराम महाराजांस बुरख्याच्या पालखीत बसवून आपल्या आप्तांच्या बायका असे सांगून स्वतःच्या गोटांत आणिले. दुसरे दिवशी शिकारीचे निमित्त सांगून शिर्के राजाराम महाराजांस बरोबर घेऊन बाहेर पडले. जवळच धनाजींची फौज आली होती, तिच्या हवाली राजाराम महाराजांस केले तेथून राजाराम महाराज वेलोरास दि. १ डिसेंबर १६९७ रोजी गेले. वेलोरचा किल्ला मराठयांच्या ताब्यात होता. मानाजी मोरे नावाच्या किल्लेदाराने राजाराम महाराजांची सर्व व्यवस्था नीट ठेवली. अशा रीतीने राजाराम महाराजांची सुटका करवून झुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी मैत्री जोडण्यात त्याचा अंतिम हेतू बादशहाच्या मृत्यूनंतर गोवळकोंड्याचे राज्य घ्यावयाचे व राजाराम महाराजांस विजापूरचे राज्य द्यावयाचे हा होता किंवा काय हे समजण्यास पुरेसा पुरावा उपलब्ध नाही.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६५६
मुअज्जमने दिल्ली सोडली
मुहम्मद आदिलशाहचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्याचा मुलगा अली याला उत्तराधिकारी घोषित करुन बडी बेगम व वझीर मुहम्मद खानने गादीवर बसवला. त्यावेळी अली आदिलशाह फक्त आठरा वर्षांचा होता. आदिलशाही सरदारांमधे ह्या घटनेनंतर लगेच अंतर्गत कलह सुरु झाला.
कर्नाटकातील छोट्या राजांनी ह्या संधीचा फायदा घेऊन हातून गेलेले काही प्रांत पुन्हा जिंकले. त्याचवेळी मुघलांनाही ह्यात त्यांची पोळी भाजून घ्यायची होती. ९ नोव्हेंबर १६५६ ला औरंगजेबला आदिलशाहच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आले. त्याने हा निरोप शाहजहानला पाठविला व आदिलशाहीविरुद्ध कारवाईसाठी कुमक मागवली. २५ नोव्हेंबर १६५६ ला शाहजहानने त्याचा मुलगा मुअज्जम ह्याला वीस हजार सैन्यानिशी औरंगजेबकडे जायला सांगितले. ३० नोव्हेंबर १६५६ ला मुअज्जमने दिल्ली सोडली.
📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६५७
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदराजवळील दुर्गाडी कोटाचे बांधकाम सुरू केले...!!
हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर) च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर इ. स. १६५७ मध्ये घेतला. त्यावेळी महाराजांनी कल्याणबरोबर भिवंडीही ताब्यात आणली. कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवांना येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खोदतांना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळावी ही दुर्गादेवीचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले. दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. या गोदीतून लढाऊ जहाजांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या करीता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले. निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.
📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६६४
एक डच व्यापारी आपल्या आधिकार्याला लिहीतो-
"खवासखानाच्या सैन्यास पोचविण्यासाठी कॅपटन घोरपडे ह्याच्या ताब्यांत विजापूरच्या राजानें जी रोकड रक्कम दिली होती तिच्यीवर बालेघाटांत अकस्मात हल्ला करुन व इतर काहीं जहाजें लुटून शिवाजी राजांनी लूट मिळविली, ती ८ लाख होन असावी असा अंदाज आहे आणि खुष्किच्या मार्गाने त्यांनी ह्या शिवाय २० लाखांचा माल लुटला असावा. कॅपटन घोरपडे ह्याला त्या शिवाजीराजांनी आकस्मात गांठून त्याच्यावर जो विजय मिळविला तो विजय खवासखानाच्या कल्पनेपेक्षां फार निराळ्या प्रकारचा आहे, कारण घोरपडे एक उत्तम सेनापतींपैकी होता. त्याला इतकी जबर दुखापत झाली की, तो लौकरच मेला आणि पैशांखेरीज घोरपड्यांचे दोनशे लोक मारले गेले."
📜 ३० नोहेंबर इ.स.१६६७
हिंदूधर्माच्या व लोकांच्या रक्षणासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज कसे वागत याचे एक उदबोधक उदाहरण म्हणजे ३० नोहेंबर इ.स.१६६७ रोजी गोव्याहून लिहिलेल्या इंग्रजी बातमीपत्रांत आले आहे. यावेळी गोव्याच्या व्हाईसरॉयने ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कंकण पुन्हा बांधले व तेथील चार पादऱ्यांचा बारदेशांतून बाहेर पडूनजवळच्या मुलुखातील हिंदूंना पेचात पकडून ख्रिस्ती करण्यास व जे तसे करण्यास तयार नसतील त्यांचा नाश करण्यास सुरुवात केली. हे ऐकून छत्रपती श्री शिवाजी महाराज संतापले व त्यांनी त्या प्रदेशावर स्वारी करून पोर्तुगिजांना दहशत बसविण्यासाठी पुष्कळ ख्रिस्ती लोकांना त्यांनी ठार मारले आणि पुष्कळांना कैद केले. चार पादऱ्यांचा शिरच्छेद करविला, ही बातमी ऐकून गोवा हाईसरॉयला धडकी भरली व त्याने आपली
हिंदूंचा नाश करणारी धर्मज्ञा मागे घेतली. छत्रपती शिवाजी महाराज धर्माच्या बाबतीत दुराग्रही नव्हते पण स्वधर्मनिष्ठ खास होते.
📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६८६
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिण जिंकून घेण्यासाठी स्वराज्यावर चालून आला. महाराजांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यापासून त्यांनी मुघलांना सर्वच आघाड्यावर टक्कर दिली होती. पण शंभुराजे स्वराज्यासाठी लढत असतानाच स्वराज्यातीलच काही लोक मुघलांना आणि पोर्तुगीजांना सामील होत होते. इंग्रजांच्या बातमीनुसार फेब्रुवारी १६८५ मध्ये गोव्याजवळ राहणारा देसाई संभाजीराजेंना सोडून पोर्तुगीजाना मिळाला होता. कारवारच्या बाजूलाही देसाई व सावंत यांनी बंडखोरी चालू होती. याच दरम्यान मुघल सैन्य खेळणा,पन्हाळा,मिरज व बेळगाव या भागात शिरण्याचा आक्रमक प्रयत्न करत होते.एप्रिल १६८६ च्या दरम्यान मिरजेचा आदिलशाही किल्लेदार असदखान याने मिरजेचा किल्ला मुघलांच्या हवाली केला. हा किल्ला हाती आल्याने मुघलांना तिथे राहण्यासाठी जागा मिळाली. त्यामुळे मुघलांनी अधिक आक्रमक होत कोल्हापूर,पन्हाळा,बेळगाव या भागात हालचाली सुरू केल्या. याच दरम्यान इंग्रजानी स्वाली मरीन हुन लंडनला पाठवलेल्या पत्रात मुघलांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा दिल्याचा उल्लेख केला आहे.
📜 ३० नोव्हेंबर इ.स.१६९४
संताजी घोरपडे शंकराजीपंतांचा निरोप घेऊन जिंजीला जाण्याच्या उद्देशाने प्रथम हैद्राबाद प्रांतात घुसले. पण औरंगजेबने आपल्यावर फौजबंद सरदार रवाना केले आहेत हे समजल्यावर त्या सरदारांस चकविण्यासाठी त्याने हैद्राबाद प्रांतातून जाण्याचे सोडून ते विजापूरच्या भागांत गेले. औरंगजेबने हिंमतखान बहादूर संताजी घोरपडेंच्या पाठीवर सोडला. पण हिंमतखान बहादूर याजपाशी संताजींचा मोड करण्याएवढे सैन्य नव्हते म्हणून त्याच्या मदतीस गाजिउद्दीनखानास पाठविण्यात आले. ३० नोव्हेंबर (१६९४) रोजी हिंमतखानाने संताजी घोरपडेंशी बाणूर गावाजवळ (भूपाळ गडजवळ, खानापूर तालुका, सांगली जिल्हा) लढाई केली. यात संताजींना माघार घ्यावी लागली. जानेवारी १६९५ च्या पहिल्या आठवड्यात रायचूरजवळ हिंमतखान बहादूर आणि संताजींचे युद्ध झाले. त्यांत दोन्हीकडील माणसे जखमी व घायाळ झाली. हिंमतखानाशी संताजींच्या ज्या लढाया झाल्या त्या निर्णायक नव्हत्या. धावपळीच्या लढाया होत्या. गनिमीकाव्यांने शत्रूशी धावत पळत लढत दिल्याचे दिसते.
📜 ३० नोव्हेंबर इ.स.१७१५
व्हिसेरेईने सुरत येथील पोर्तुगीज प्रतिनिधीला पाठविलेल्या पत्राची नोंद! आंग्रे यांचे पारिपत्य करण्यासाठी मोगल बादशहाने असगरअली खान या नावाच्या सरदाराची रवानगी केली. ही बातमी व्हिसेरेईला कळताच त्याला मोठा आनंद झाला. परंतु असालअली खानाने आंग्रे यांचे पारिपत्य केल्याची माहिती पोर्तुगीज कागद पत्रांत आढळत नाही. उलट हा सरदार लांचलुचपतीला बळी तर पडणार नाही ना अशी शंका व्हिसेरेईने सुरत येथील पोर्तुगीज प्रतिनिधीला पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. तो म्हणतो. "लांचलुचपतीला बळी पडणे हे मानवी स्वभावाला अनुसरून आहे. त्यामुळे सरदार असगरअली खान हा आंग्रे यांच्या लांचेस बळी पडणार नाही असे सांगता येत नाही.आंग्रे यांच्यापाशी सोने विपुल आहे त्याच्या बळावर तो मोगल सरदाराला वश करून घेऊन त्याला बादशहाचे हुकुम तहकूब करून ठेवावयास लावण्यास कमी करणार नाही".
📜 ३० नोव्हेंबर इ.स.१८७०
श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज साहेब (कोल्हापूर) यांचे ३० नोव्हेंबर १८७० रोजी फ्लॉरेंस(इटली)मध्ये निधन झाले त्या वेळी त्यांची फ्लॉरेंस येथे समाधी बांधली..
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
📜 २९ नोव्हेंबर इ.स.१६५९
( मार्गशीर्ष वद्य दशमी, शके १५८१, संवत्सर विकारी, मंगळवार )
काल जिंकलेला किल्ले पन्हाळा बघायला शिवराय रात्रीच निघाले.
कालच्या दिवशी स्वराज्यात दाखल झालेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी, महाराज काही मावळ्यांसह पन्हाळगडावर हजर.
प्रतापगडावर अफझलखान रुपी राक्षसाचा खात्मा करून राजांनी कोणतीही उसंत न घेता थेट वाई, कराड , सातारा आणि नंतर कोल्हापूर भाग स्वराज्यात दाखल करून घेतला त्यातच किल्ले पन्हाळगड स्वराज्यात दाखल करून राजे पन्हाळ्याला पोहोचले.
📜 २९ नोव्हेंबर इ.स.१६९४
व्हिसेरेई कौंट द व्हिलाव्हर्द हा पोर्तुगिजांकडील जुना मोगल वकिल शेख महंमद याला लिहीलेल्या पत्राची नोंद! "आपणाला माहिती आहेच की, छत्रपती शिवाजी महाराजांशी आमचे युद्ध झाले तेव्हा पासून त्यांचा आणि आमचा तह झालेला नाही. त्यांना आम्ही आमच्या बंदरात कधीच येऊ दिले नाही. इतकेच नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आणि आमच्या चकमकी उडतात. मग त्या जमिनीवर असोत वा समुद्रावर असोत. गेल्या वर्षी त्यांनी आमच्या काही नौका आमच्या युद्ध नौका शिरल्या व त्यांनी तेथील अनेक नौका जाळून टाकल्या. पकडल्या म्हणून त्यांच्या १ बंदरात शिवाय त्यांचे १ खेडे आणि १ प्राचीन देऊळ त्यांनी जाळून टाकले. मी चौलच्या कॅप्टनला त्यांची शक्य ती हानी करण्याची सुचना देत आहे". व्हिसेरेई कौंट द व्हिलाव्हर्द हा पोर्तुगिजांकडील जुना मोगल वकिल शेख महंमद याला लिहीलेल्या पत्राची तारीख होती २९ नोव्हेंबर इ.स. १६९४.
📜 २९ नोव्हेंबर इ.स.१७२१
ठरल्याप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीझ एकत्रितपणे मराठ्यांच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईहून निघाले. मोहिमेची योजना प्रत्यक्षात आणून पहिला हल्ला मात्र त्यांनी २४ डिसेंबरला केला.आंग्र्यांच्या नेतृत्वाखालच्या मराठी आरमारापुढे इंग्रज आणि पोर्तुगीझ यांच्या संयुक्तफौजांचे सुद्धा काही चालले नाही. ४ दिवसात धूळधाण उडून इंग्रज मुंबईला परत गेले तर पोर्तुगिझान्ना पेशवे थोरले बाजीराव यांच्यासह तह करावा लागला.
📜 २९ नोव्हेंबर इ.स.१७२१
२९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यान गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.
📜 २९ नोव्हेंबर इ.स.१७२८
दोन्ही सैन्यसागर (मराठयांचे आणि गिरीधर व दया बहाद्दूर )२९ नोव्हेंबर १७२८ ला आमझेरा आणि तिरला याच्यामधल्या सपाट मैदानी प्रदेशावर एकमेकांवर आदळले. लढाईला तोंड लागले. गिरीधर बहाद्दूर आणि दया बहाद्दूरच्या तुलनेत अननुभवी असलेल्या चिमाजीअप्पांच्या फौजा जिवावर उदार होऊन गनिमीवर कोसळल्या. त्यांचा आवेश इतका भयंकर होता की, शत्रूची फळी फुटली, शत्रूची दाणादाण उडायला सुरुवात झाली. मुघल सैन्यही प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. पण मराठे त्यांना आवरत नव्हते. गिरीधर बहादूर स्वतः लढाईत हत्तीवर बसून तिरंदाजी करत होता. तिरंदाजी करताना त्याचे ४ भाते रिकामे झाले. ही घनघोर लढाई ५/६ तास सुरू होती,दिवस कलू लागला, तशी मराठ्यांची सरशी होऊ लागली. तितक्यात गिरीधर बहादूराला गोळी लागली आणि तो मृत्युमुखी पडला आणि थोड्याच अवधीत दयाबहादूरदेखील ठार झाल्याचे वृत्त आले. आपले सेनानायक पडल्यावर मुघल सैन्याचा धीर सुटला. मराठ्यांचा प्रचंड विजय झाला. आमझेरा येथील छावणी पूर्णपणे लुटण्यात आली. त्यात अनेक हत्ती, घोडे, अमाप द्रव्य, शस्त्रास्त्र हस्तगत झाली. या युद्धात उदाजी पवार यांनी समशेर गाजवली. मल्हारराव होळकर यांनीही पराक्रम
केला. अनपेक्षित मोठा विजय मिळाला. चिमाजीअप्पांच्या मराठी फौजांनी दोन मातब्बर शाही सुभेदार, अश्रफींचे उमराव पुरते बुडवले. या घटनेने हिंदुस्थानात हाहाक्कार उडाला. सर्वांचे लक्ष या लढाईकडे लागून होते. मराठ्यांना अकस्मात विजय मिळाला. त्यांच्या विजयाचे डंके सर्वत्र वाजू लागले. शत्रूच्या पोटात धडकी भरवणारी अशी ही घटना होती. विजयाची वार्ता टाकोटाक राऊ स्वामींना कळवण्यात आली. त्या दिवशी थोरले बाजीराव पेशवे अंबिकानगर उर्फ नगर जिल्ह्यातील लोणी पेडगाव येथे होते.
📜 २९ नोव्हेंबर इ.स.१८०३
२९ नोव्हेंबर इ.स.१८०३ रोजीं एका बाजूस इंग्रज आणि दुसऱ्या बाजूस नागपूरकर भोसले व शिंदे यांच्या फौजा यांच्या दरम्यान झाली (इंग्रज मराठे युद्ध, दुसरें पहा) आडगांवची लढाई होण्याच्या पूर्वी रघूजी भोसल्याच्या सैन्याची छावणी गाविलगडानजीक आडगांव येथें पडली असून शिंद्याची फौज त्यांच्या छावणीपासून पांच मैलांच्या आंतच सिरसोली येथें होती. रघूजीच्या सैन्याचें आधिपत्य त्याचा भाऊ वेंकाजी उर्फ, मन्याबापू याजकडे असून त्याजवळ या वेळीं रघूजीचें सर्व पायदळ, कांहीं फौज व बऱ्याचशा तोफा होत्या. स्टीव्हन्सन यास जनरल वेलस्लीचा गाविलगडास वेढा देण्याचा हुकुम झाला असल्यामुळें तो तेथून जवळच येऊन पोहचला असून जनरल वेलस्ली हा त्याला मदत करण्याकरितां दक्षिणेकडून येत होता.
📜 २९ नोव्हेंबर इ.स.१८३८
कोल्हापूरचे छत्रपती शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांचं अकाली निधन झालं. तेव्हा गादीवर आठ वर्षांचे शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज आले. गादीवर आलेले बाबासाहेब महाराजांचा स्वभाव शांत आणि मवाळ होता पण त्यांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे वेगळच रसायन होतं.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*













