Suraj Chavan
ShareChat
click to see wallet page
@429046716
429046716
Suraj Chavan
@429046716
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎*११डिसेंबर १६६४* ‎*छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला.* ‎ ‎*११ डिसेंबर १६६७* ‎छत्रपती शिवाजी महाराजांकडून पोर्तुगिजांचा वकील यांनी तहाची कलमे शिक्कामोर्तब करून आणली, त्याची पोर्तुगिजांची नोंद...! ‎"आपणाकडे जात असलेले आमचे वकील रेव्हरंड पाद्री गोंसालू मार्तीश, यांनी विजापुरच्या दरबारात आमचे वकील म्हणून पुर्वी काम केले आहे. ते हुषार असल्याने आपणाकडे आमचे वकील म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. ते तहाची कलमे आपल्या सहीसाठी आपणाबरोबर नेत आहेत. ते आपणाला जे काय विदित करतील त्यावर आपण विश्वास ठेवावा.' पोर्तुगिजांचा वकील रेव्हरंड पाद्री गोंसालू मार्तीश यांनी जी तहाची कलमे आपणाबरोबर नेली होती, ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिक्कामोर्तब करून आणली. ‎ ‎११ डिसेंबर १६६९ ‎सरसेनापती प्रतापराव गुजर व निराजी रावजी यांना कैद करण्याविषयीचे औरंगजेबचे फर्मान अखेर आजच्या दिवशी शहजादा मुअज्जमला मिळाले. पण ३ डिसेंबर १६६९ रोजी सगळेजण पळाले होते. ‎शहजादा मुअज्जमने औरंगजेबाला लिहून पाठवले कि सगळे जण पळाले, हाजीर असते तर कैद केले असते. ‎याच घटनेनंतर छत्रपती शिवराय व औरंगजेब बादशहा यांच्यातील तह अधिकृतपणे मोडला. ‎ ‎११ डिसेंबर १६७६ ‎कोल्हापूर परगण्यातील मुरगुडचे देसाई रुद्रप्पा नाईक यांना शिवाजी महाराजांनी पाठवलेले अस्सल आज्ञापत्र. रुद्रप्पाचा मुतालीक चेनप्पा हा शिवाजी महाराजांपाशी आला आणि त्याने सांगितले की, रुद्रप्पानी भुजबळगढीच्या कामाबद्दल नागडगौडा याला पाठवले असता त्याला त्या प्रांतातील एक बंडखोर तोरगळकर याने जीवे मारले. या सार्या घटनेबद्दल महाराजांच्या आणि स्वराज्याच्या सेवेत अंतर पडले म्हणून रुद्रप्पा अतिशय निराश झाले. हा सारा वृत्तांत ऐकून महाराजांनी त्यांना धीर दिला की तुम्ही साहेबकामास आपले इमान अर्पण केले आहे हे आम्ही जाणतो. त्यानुसार शके १५९८ च्या तुमच्या परगण्याचा पैसा (सरकारी हिस्सा) तुम्हाला भरण्याची गरज नाही. पण तुम्ही मात्र त्याप्रांतातील वरकड गनिमाने जी ठाणी घेतली असतील ती उठवून आपली ठाणी बसवणे. तुम्हाला आमच्याकडून सर्व मदत पुरवली जाईल. असे करून आपण यापुढेही आमची मर्जी संपादन कराल असे काम करून दाखवावे... हे पत्र दि. ११ डिसेंबर १६७६ असून पत्राच्या माथ्यावर महाराजांची ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही मुद्रा, पत्राच्या मायन्यात डाव्या कोनाड्यात ‘श्री शिवचरणी तत्पर, त्र्यंबकसूत मोरेश्वर’ ही मोरोपंत पेशव्यांची मुद्रा तसेच समाप्तीला ‘मर्यादेयं विराजते’ ही मर्यादा-मोर्तब आहे. पत्राच्या अखेरीस खुद्द महाराजांनी स्वहस्ते “लेखनसीमा” असे लिहीले आहे. ‎ ‎११ डिसेंबर १६८३ ‎छत्रपती संभाजीराजेंची गोव्यावर चढाई. ‎छत्रपती संभाजीराजेंच्या झंजावातामुळे फिरंग्यांनी आपली राजधानी मार्मा गोव्याला हलवली. ‎ ‎११ डिसेंबर १७३३ ‎बाजीराव पेशव्यांनी जंजिऱ्याचा वेढा उठवला ‎सिद्धी सरदारांनी मुंबईकर इंग्रजांशी संधान बांधून इंग्रजी आरमार जंजिऱ्यात आणले. पावसाळा पण जवळ आला होता. पेशव्याने जंजिरा सर करणे अवघड असल्याचे छत्रपतीना कळविले. प्रतिनिधी व पेश्व्यातील परस्पर स्पर्धा, आकस इ. मुळे त्यांच्या फौजात परस्पर सहकार्य कठीण झाले. पेशव्याने छत्रपतीना पत्र लिहून इंग्रजांच्या मध्यस्थीने युद्धबंदी घडवून आणली व बाजीराव ११ डिसेंबर १७३३ ला जंजिऱ्याचा वेढा उठवून निघून गेले. ‎ ‎११ डिसेंबर १७५५ ‎विजयदुर्गच्या एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र असल्याने खुष्कीचा मार्गही रसद पुरवठ्यासाठी खुला होता. याच कारणास्तव तुळाजी आंग्र्यांनी विजयदुर्ग हे आरमारी मुख्यालय बनवले. पेशव्यांनी इंग्रजांशी तह केलेला पाहून तुळाजींनी ५ नोव्हेंबर रोजी गोवेकर पोर्तुगीजांशी संधान बांधले, पोर्तुगीजांनीही तत्परतेने ५०० सैनिक विजयदुर्गावर पाठवून दिले. दि. ११ डिसेंबर रोजी सह्याद्रीच्या मुलुखातील खारेपाटणजवळ पेशव्यांचे सैन्य घाट उतरत असताना तुळाजींचा सरदार रुद्राजी धुळप याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात पेशव्यांच्या फौजेपुढे रुद्राजींचा टिकाव लागला नाही. स्वतः रुद्राजी आणि एक पोर्तुगीज सरदार जखमी झाले. काही पोर्तुगीज मारले गेले.  पेशव्यांचा सरदार खंडोजी माणकर हे आंग्र्यांचा मुलुख जिंकत दक्षिणेकडे निघाले. जानेवारी १७५६ पर्यंत विजयदुर्ग सोडला तर आसपासचा सर्व प्रदेश पेशव्यांच्या हाती आला होता. ‎ ‎११ डिसेंबर १७६७ ‎पुण्यश्लोक अहिल्याबाई खंडेराव होळकर यांचा राज्याभिषेक. ‎ ‎११ डिसेंबर १७८३ ‎रघुनाथराव पेशवा यांचे निधन. ‎(जन्म: १८ ऑगस्ट १७३४) ‎ ‎११ डिसेंबर सन १८१७ ‎दुसऱ्या बाजीरावाची पेशवे पदावरून हकालपट्टी ‎"पेशवे हे राजे नव्हते" तर "छत्रपतींचे सेवक होते" आणि मुळात "दस्तुरखुद्द छत्रपतींनीच" "बाजीराव रघुनाथराव" यांना दिनांक ११ डिसेंबर सन १८१७ रोजी जाहिरनामा काढून "पेशवे" पदावरून दूर केले होते. खरेतर तेव्हांच बाजीराव रघुनाथराव एक सामान्य मराठे झाले. ‎ ‎११ डिसेंबर १९१७ ‎जव्हारचे लोकहित, कल्याणकारी मा. श्रीमंत राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे साहेब यांचा जन्मदिन. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🙏आई एकविरा 🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 १० डिसेंबर इ.स.१५१० ‎भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) युरोपियन-(पोर्तुगीज)  सत्तेने राज्य केले ‎गोव्यात पोर्तुगीज सत्ता १० डिसेंबर १५१० पासून १८ डिसेंबर १९६१ पर्यंत म्हणजे ४५० वर्षं व ८ दिवस होती. त्यापूर्वी १७ फेब्रुवारी १५१० ते ३० मे १५१० म्हणजे ३ महिने १३ दिवस त्यांनी गोवा आपल्या ताब्यात ठेवलं होतं. एकूण ४५० वर्षं, ३ महिने व २१ दिवस त्यांनी गोव्यावर राज्य केलं. ‎गोव्याचा इतिहास हा एका पारतंत्र्यानं पीडलेल्या, आर्थिक मागासलेपणानं गांजलेल्या, हताश होऊन जे भोगवट्याला आलं आहे ते निमूट स्वीकारणा-या सोशीक जनसमूहाचा इतिहास आहे. अंधा-या खोलीत वर्षानुवर्षं कोंडून पडलेल्या माणसाला दरवाजा अचानक सताड उघडा झाल्यावर जे वाटेल, ते व तसंच मुक्तीनंतर गोव्याच्या जनतेला वाटलं असलं पाहिजे. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या वेळी बंडखोरांनी बॅस्टिल व कॅसल तुरुंग फोडून वर्षानुवर्षं अंधारकोठड्यात खितपत पडल्या कैद्यांना मोकळं केलं, तेव्हा त्यांना कुठं जावं ते कळेना. ते भिरभिरले नि त्यातले बरेच जण आपापल्या कोठड्यात जाऊन पडून राहिले. तसंच काहीसं सुरुवातीला गोव्यातील एका विशिष्ट वर्गाचं झालं. स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कळायला काही वर्षं जावी लागली. ‎ ‎📜 १० डिसेंबर इ.स.१६६२ ‎छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते दाभोळ ही किनारपट्टी जिंकली. ‎         शिवकाळात दाभोळ हे नावाजलेले बंदर होते १६५९ ते १६६१ या दोन्ही वर्षात मराठ्यांनी दाभोळ वर हल्ले केले. ‎का तर फीरंग्यांवर दहशत बसावी म्हणून १६६२ मध्ये शिवाजीराजांनी दाभोळचा स्वराज्यात समावेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळला पुन्हा नव्याने वैभवाचे दिवस दाखवले. ‎ ‎📜 १० डिसेंबर इ.स.१६७८ ‎(पौष शुद्ध सप्तमी शके १६०० कालयुक्त संवत्सर वार मंगळवार) ‎महाराजा जसवंतसिंह राठोड यांचा मृत्यू! ‎          अफगाणिस्तानात जामरुद येथे जोधपुरचा राजा नरेश जसवंतसिंह राठोड मृत्यू पावला. मारवाडचे राज्य गिळंकृत करू पाहणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेब याने मारवाडचे राज्य आपल्या साम्राज्यास जोडून टाकले! औरंगजेबाची धर्मांध महत्वाकांक्षा एवढी टोकास गेली होती की आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या हिंदु सरदारांचीही जिझिया करासाठी त्याने गय केली नाही. त्याने जसवंतसिंहाच्या बायकापोरास कैद करून दिल्लीत नजरकैदेत ठेवले. जसवंतसिंहाचा मुलगा अजितसिंहास मुसलमान करण्याचा इरादा होता. जर अजितसिंहाने मुसलमान होऊन इस्लामचा स्विकार केला तर त्यास मारवाडचे राज्य देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र जसवंतसिंहाच्या मृत्यू नंतर त्याचा एकनिष्ठ सरदार दुर्गादास राठोड याने मोठ्या चातुर्याने अजितसिंहाची व जसवंतसिंहाच्या पत्नीची सुटका केली. ‎ ‎📜 १० डिसेंबर इ.स.१७४७ ‎नानासाहेबांनी उत्तरेत चार स्वाऱ्या केल्या त्यापैकीच ही चौथी शेवटची नेवाईची स्वारी. पेशवे तारीख १० डिसेंबर १७४७ रोजी उत्तरेत जाण्यासाठी पुण्यातून निघाले. सन १७४८ च्या एप्रिल महात पेशवे जयपूर मुलुखात आले. त्यास माधोसिंह सामोरे जाऊन भेटले ही भेट नेवाईस झाली. म्हणून पेशव्यांच्या ह्या स्वारीस नेवाईची स्वारी असे म्हणतात. उत्तरेतील नमूद केलेली पेशव्यांची ही शेवटची स्वारी होय. यानंतर पेशवे उत्तरेस गेलेले दिसत नाहीत. ‎(कालावधी:- १० डिसेंबर १७४७ ते ९ जुलै १७४८.) ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ९ डिसेंबर इ.स.१६५९ ‎दौलोजीची कोकणावर चाल ‎जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो. ‎अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली. ‎ ‎📜 ९ डिसेंबर इ.स.१६८० ‎(मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी शके १६०२ रौद्र संवत्सर वार गुरूवार) ‎गोव्याच्या गव्हर्नरचे तक्रारीचे पत्र! ‎          गोव्याच्या गव्हर्नरने छत्रपती संभाजी महाराजांना एक तक्रार पत्र लिहिले असून त्यात तो लिहीतो की "छत्रपती संभाजी ‎महाराजांनी रामजी ठाकूर नावाचा एक गृहस्थ आपला वकील म्हणून गोव्याला पाठविलेला असून हा मनुष्य वकील नसून दगाबाज आहे". छत्रपती संभाजी महाराजांनी तहाच्या वाटाघाटीसाठी जो माणूस पाठविला त्याच्याशी मी माझ्या राज्याच्या काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्या वर्तनानुसार हा वकील नसून दगाबाज गृहस्थ आहे. मात्र यापुढे असे न करता योग्य ती अधिकारपत्रे पाठवूनच वकील पाठवावा" सदरचे पत्र पोतोवियू पाईश द सांद याने म्हणजे गोव्याच्या गव्हर्नरने डिचोलीचे सुभेदार मोरो दादोजी यांस पाठविले आहे. ‎ ‎📜 ९ डिसेंबर इ.स.१६८१ ‎मराठ्यांचा छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली अभेद्य अशा सागरी जलदुर्ग "किल्ले जंजिरा" वर हल्ला. पण इकडे मुघल सैन्य पनवेल पर्यंत येऊन धडकलं होतं आणि राजधानी "किल्ले रायगड" वर हल्ल्याचा त्यांचा डाव होता. छत्रपती संभाजीराजांना ही खबर मिळताच मराठ्यांना पुन्हा एकदा जंजिऱ्याच्या या मोहीमेतून माघार घ्यावी लागली. कारण त्यावेळी जंजिरा जिंकण्यापेक्षा राजधानी "किल्ले रायगड" वाचविणे महत्वाचे होते. ‎ ‎📜 ९ डिसेंबर इ.स.१६८२ ‎शहाबुद्दीनखान मराठ्यांच्या बिदरला मराठे चौथवसुलीसाठी गेले असता, तेथील ठाणेदार मुकर्रबखान याने मराठ्यांना प्रतिकार केला नाही. प्रदेशात आला! त्यामुळे त्याची मनसब कमी करण्यात आली. ‎जशी मनसब कमी करण्यात येत होती तशी चांगली कामगिरी केली की वाढविली जाई. उदा. उंतुरचा ठाणेदार अहमदखान याने शत्रूवर विजय मिळविला म्हणून त्याची मनसब वाढविण्यात आली. कारण मराठे औरंगाबाद जवळील लासूर येथील जनावरे व तेथील जमिनदाराचा मुलगा यास सामानासह घेऊन जात असता त्याने पाठलाग केला. देशमुखाचा मुलगा व जनावरे सोडवून आणली. शहाबुद्दीनखान मराठ्यांच्या प्रदेशात आला. त्याने जवळ जवळ २० गावे लुटली. ‎ ‎📜 ९ डिसेंबर इ.स.१७५३ ‎मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी शके १६७५, श्रीमुखनाम संवत्सरी रविवारी म्हणजेच दि. ९ डिसेंबर १७५३ या दिवशी नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांचा रमाबाई (जोशी) यांच्याशी मोठ्या थाटात विवाह ‎करण्यात आला. ‎ ‎📜 ९ डिसेंबर इ.स.१७३१ ‎ चिमाजीआप्पांच्या पत्नी रखमाबाई निवर्तल्याला वर्ष होऊन गेलं होतं. आप्पांचं मनही तेव्हापासून उदासच होतं. पण वरकरणी तसं अजिबात ‎जाणवू न देता आप्पा साताऱ्यात राहून पेशव्यांची मुतालकी पाहात होते. नानासाहेबांनाही हळूहळू शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. तेही आप्पांच्या बरोबर साताऱ्यात राहून रोज फडावरची कामं पाहात होते. आप्पांचे चिरंजीव सदाशिवरावही आता सव्या वर्षांचे झाले होते. राधाबाईच्या मनात होते की, आप्पांचे दुसरे लग्न करवे. पण आप्पा कोणाचेच ऐकत्त नव्हते. शेवटी बाजीरावांनी आप्पांना तेवढ्याकरता खास सातारहून बोलावले व त्यांची समजूत काढली आणि शेवटी कोणाचंही नाही, पण आपल्या थोरल्या बंधूंचं ऐकलं, राधाबाईंना अलिबागच्या (कुलाबा) थत्ते सावकारांची कन्या सून म्हणून पसंत होती. चिमाजीआप्पाही लग्नाला तयार झाले होते. दि. ९ डिसेंबर १७३१ रोजी थत्त्यांची कन्या अन्नपूर्णा व चिमाजीआप्पांचा विवाह झाला. सदाशिवपंत केवळ सव्वा वर्षांचे होते. त्यांच्या आयुष्यात त्यांना सावत्र वागणूक मिळू नये, म्हणून आप्पा विवाह करण्यास नकार देत होते. परंतु, अन्नपूर्णाबाईंनीदेखील शेवटपर्यंत भाऊंचा अतिशय मायेने प्रतिपाळ केला. त्यांना सावत्रपणाची अजिबात जाणीव होऊ दिली नाही. ‎ ‎📜 ९ डिसेंबर इ.स.१७६१ ‎छत्रपती महाराणी ताराराणी स्मृतिदिन ‎महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. ‎महाराणी ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले.२५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🙏आई एकविरा 🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ८ डिसेंबर इ.स.१६७७ ‎(मार्गशीर्ष वद्य नवमी, शके १५९९ संवत्सर पिंगळ, वार शनिवार) ‎स्वराज्यासाठी हुबळीची लूट! ‎           छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ४,०००  स्वार घेऊन हुबळी पुर्णपणे लुटली. छत्रपती शिवराय सुरतेवर परत एकदा स्वारी सुरतेवर केंद्रीत करणार आहेत अशी हूल उठवून महाराजांनी सर्वांनाच गाफील ठेवले. आणि शत्रूसैन्याचे लक्ष करावयास भाग पाडून मस्तपैकी हुबळी लुटून आपला कार्यभाग साधला व हे धन स्वराज्यासाठी जोडले! ‎ ‎📜 ८ डिसेंबर इ.स.१६८० ‎मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहीलेल्या पत्राची नोंद! ‎          "राजाच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्दीला आमच्या कडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार नाहीत हे उघड आहे. परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम आम्हास मोडावा लागणार हे स्पष्ट आहे. दोघांपैकी कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबतास सुरक्षितता असणे गरजेचे आहे". छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्दीकडून लेखी मिळतील. तर मिळवाव्या. तरीसुद्धा सिद्दीला फार दुखवू नये. यावरून इंग्रजांचे दुटप्पीपणाचे धोरण किती स्पष्ट होते हे कळून येते. पण ते कात्रीत सापडले होते, हे निश्चित. ‎ ‎📜 ८ डिसेंबर इ.स.१६९९ ‎औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला तेव्हा अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू.गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झालेगडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. ‎मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. ‎गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल असे वाटत होते पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात. ‎एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली ‎ ‎📜 ८ डिसेंबर इ.स.१७४० ‎रेवदंडयाचा किल्ला मराठ्यान्नी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला. ‎ 'मानाजी आंग्रे' आणि 'खंडोजी मानकर' यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला... ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🙏आई एकविरा 🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ७ डिसेंबर इ.स.१६७२ ‎बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र - ‎प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२ ‎साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे. ‎ ‎📜 ७ डिसेंबर इ.स.१७१५ ‎मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १७१६ च्या दरम्यान दिल्लीला आणण्यात आले. ‎ ‎📜 ७ डिसेंबर इ.स.१७६० ‎बळवंतराव मेहेंदळे पानिपतला ठार ‎बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युध्दात वीरमरण पत्करलेले एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये ओंकारेश्वराचे मंदिर बांधले. ‎ ‎📜 ७ डिसेंबर इ.स.१८०३ ‎गव्हर्नर वेलेस्ली स्वत: अचलापुरात तळ ठोकून बसला ‎१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ६ डिसेंबर इ.स.१६६३ ‎छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान...! ‎मुघल साम्राज्याला हादरा देणारे शिवशाहीतील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची पहिली लूट. शाईस्तेखानाने स्वराज्यात राहून केलेली स्वराज्याची नासधूस, या सर्व काळामध्ये महाराजांचे पन्हाळगडावरून पलायन, चाकणचा वेढा, उंबरखिंडीचे युद्ध, या सर्व घटनांवर मात करीत महाराजांनी रामनवमीच्या दिवशी केलेला शाईस्तेखानाचा पराभव, या सर्व घटनांमुळे स्वराज्याचा खजिना रिकामा होत होता. याची भरपाई म्हणून महाराजांनी एक धाडसी मोहीम आखली. ही मोहीम स्वराज्यात राहून नव्ह, तर स्वराज्याचा बाहेर जाऊन राबवायची होती, मुघली गोटात शिरून, चोख तयारीनिशी महाराजांनी मनसुबा आखला. या नव्या शिलांगणाची मोहीम महाराजांनी आपल्या सगळ्यात विश्वासू हेरावर सोपवली आणि ते म्हणजे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. (स.ब) ‎गुजरात प्रांतातील सुरत शहर म्हणजे अतिशय समृद्ध आणि श्रीमंत. दिल्लीच्या खालोखाल सुरतेचा मान होता. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या सुरत शहरामधून चाले. या सुरत शहरामधून मिळणार्या जकातीपोटीच औरंगजेबास वार्षिक १२ लक्ष रुपये मिळत असत. डच, इंग्रज, अरबी, फ्रेंच हे सगळे लोक सुरतमधून आपला व्यापार करत असत. सोने, हिरे, मोती, जड-जवाहीर याने सुरतेतील व्यापाऱ्यांचे कोश गडगंज भरलेले असत. अनेक अनमोल वस्तू, चंदन, अत्तरे, केशर, रेशमी कापडाचे ठाण अशा अनेक वस्तूंचा व्यापार सुरतेमधून चालत असे. या सर्व गोष्टी वगळता सुरतेला अनन्यसाधारण महत्त्व होते, कारण यवनी धर्मानुसार मक्का यात्रा अत्यंत पवित्र मानलेली आहे आणि मक्केला जाणारे यात्रेकरू हे सुरतेमधून जात असत. त्यामुळे सुरतेला मक्केचा दरवाजा असे संबोधले जात असे. सुरतेचे मूळ नाव 'सूर्यपूर' असे होते. तापी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले, समुद्र किनार्यापासून २७ मैल आत असणाऱ्या सुरतेची वस्ती तशी दाट होती. पण त्याभोवती यावेळी तटबंदीदेखील नव्हती. (अ.हो.मो) ‎ सुरत राजगडापासून १५० कोस दूर आणि हा सगळा प्रवास मुघली प्रदेशातूनच होणारा. अशा या सोन्याच्या लंकेची खडा-न-खडा माहिती बहिर्जी नाईक यांनी गोळा केली. ‎सुरतेमधील सर्व धनिक मंडळी, त्यांची संपत्ती, सुरतेमधील मुघली बंदोबस्त ही सर्व माहिती घेऊन बहिर्जी महाराजांसमोर हजर झाले आणि सुरत शहराचा नकाशाच त्यांनी महाराजांपुढे मांडला आणि बहिर्जी महाराजांना म्हणाले, "सुरत मारल्याने अगणित द्रव्य मिळेल." बहिर्जीकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर "लष्कर चाकरी नाफारी काम मनाजोगे होणार नाही याजकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे" या विचारे महाराजांनी स्वतः जाण्याचे निश्चित केले. (स.ब) सर्व सैन्याच्या जमावानिशी महाराजांनी मार्गशीष वद्य द्वितीया, शके १५८५ म्हणजेच ६ डिसेंबर १६६३ रोजी सुरतेसाठी राजगडाहून प्रस्थान केले. ‎ ‎📜 ६ डिसेंबर इ.स.१७०१ ‎मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला. ‎ ‎📜 ६ डिसेंबर इ.स.१९५६ ‎डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी ‎भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१) ‎🙏 महामानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन 🙏 ‎ ‎📜 ६ डिसेंबर इ.स.१९७६ ‎क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू ‎स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००) ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🙏आई एकविरा 🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ५ डिसेंबर इ.स.१६६७ ‎पोर्तुगीजांशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साकोपंत ह्या नावाचा एक दूत आवश्यक ते अधिकार देऊन रवाना केला. पोर्तुगीजांनी पाद्री सेबास्तियांव मार्तीश ह्याला आपला दूत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे तहाच्या कारारावर त्यांची सही घेण्यासाठी पाठविले. ‎शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी जो शांततेचा आणि मैत्रीचा करार झाला त्याचा पोर्तुगीज आराखडा पुढील प्रमाणे आहे. ‎शिवाजी राजे आणि काँद व्हिसे रेई ह्यांच्यामधील मैत्रीच्या आणि शांततेच्या कराराची कलमे ‎पुढील प्रमाणे :- ‎(१) दिनांक १९ नोव्हेंबर १६६७ रोजी शिवाजी राजांच्या सैन्याने बार्देशमध्ये शिरून जे पुरूष, स्त्रिया आणि मुले युद्ध कैदी म्हणून नेले व माझ्या राजाच्या प्रजाजनांची गुरे आणि बैल ‎पळविले, त्यांना शिवाजी राजे ह्यांनी आमच्याकडून कोणतीच युद्ध खंडणी न घेतां आम्हास परत करावे. ‎(२) आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिलेल्या लखम सावंत आणि केशव नाईक ह्या देसायांना सक्त ताकीद देण्यात येईल की, त्यांनी आमच्या राज्यांत राहून शिवाजी राजे, त्यांचे प्रजाजन, आणि त्यांचे राज्य ह्या विरुद्ध कोणतीच कारवाई करू नये आणि त्यांच्या हातून तसे कृत्य घडल्याची जाणीव आम्हाला झाल्यास अथवा शिवाजी राजांनी ते आमच्या निदर्शनास आणल्यास त्या देसायांना आमच्या स्वामींच्या राज्यांतून ताबडतोब हांकलून देण्यात येईल. ‎आमच्या स्वामींच्या राज्यात येऊन राहिलेले दुसरे दोन शरणार्थी नारबा सावंत आणि मालू शेणवी ह्यांनाहि अशीच ताकीद दिली जाईल. आणि सर्व प्रकारची अंदाधुंदी टाळण्यासाठी सदरहू देसाई जोपर्यंत आमच्या राज्यात असतील तोपर्यंत त्यांना गोवा बेटाबाहेर जाऊ दिले जाणार नाही. ‎(३) बालाघाटहून गोवा बेटांत आणि बंदरात आणि बार्देश व साष्टी महालांत जो माल आणि गुरे येतील ती अडविली जाऊ नयेत व त्यांच्यावर कर लादला जाऊ नये. त्याचप्रमाणे ‎पोर्तुगालच्या राजाच्या ह्या राज्यातून आणि बेटातून जो माल बालाघाटला जाईल, त्याचीही अडवणूक होऊ नये अथवा त्याच्यावर कर लादला जाऊ नये. मग शिवाजी राजे व आदिलशहा ‎ह्यांच्यामध्ये युद्ध चालू असो वा नसो. ‎(४) उभय पक्षांची दृढ आणि चांगली मैत्री असावी आणि समुद्रावर आणि जमिनीवर ही मैत्री टिकावी आणि उभय पक्षांपैकी कुणा एकाकडून ह्या काराराचा भंग झाल्यास त्याने ‎दुसऱ्याकडे तत्संबंधाने तक्रार करावी. आमच्याकडून आगळीक झाल्यास शिवाजी महाराजांनी आमच्याकडे तक्रार करावी आणि शिवाजी महाराजांकडून आगळीक झाल्यास आम्ही त्यांच्यापाशी ‎तक्रार करावी. ‎(५) जर शिवाजी राजांना काँद व्हिसे रेई ह्यांच्याशी एखादा महत्त्वाचा सौदा करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तिमार्फत त्या वाटाघाटी करता येतील. ‎ ‎📜 ५ डिसेंबर इ.स.१६७३ ‎शिवरायांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले. ‎         सन इ.स.१६७३ पावसाळा थांबला आणि राजांचे विजयी अश्व पुन्हा दौडू लागले मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागले, याच सुमारास कर्नाटकात यादवी निर्माण होऊन मृत राज्याच्या विधवा पत्नीने महाराजांची मदत मागितल्यावरून राजांनी रायगड सोडला. राजे हुबळी, काद्रा, कारवार, बंकापूर या भागात स्वारीवर गेले. या भागात मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोलखानने सर्जाखानाची रवानगी केली. त्याने मराठ्यांना चांदगड परिसरात घाटले. झालेल्या झुंजीमध्ये मराठ्यांच्या बाजूचे विठोजी शिंदे नामक एक नामांकित सरदार ठार झाले. पण मराठ्यांनी सर्जाखानला मागे रेटलाच व ते बंकापूरच्या दिशेने पुढे सरकले तर बंकापूर ला बहलोलखान हा अडथळा म्हणून समोर आला. चिडलेले मराठे यानंतर पन्हाळ्याच्या रोखाने मागे फिरले. पन्हाळ्याजवळ बेहलोलच्या सैन्याशी मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विठोजी शिंदेच्या हत्येचा सूड सर्जाखानला मारून उगवला. ‎ ‎📜 ५ डिसेंबर इ.स.१७४६ ‎सदाशिवराव भाऊसाहेब अवघ्या सोळाव्या वर्षी महादजीपंत पुरंदरे यांच्यासह दिनांक ५ डिसेंबर सन १७४६ रोजी कर्नाटक मोहीमेवर रवाना झाले. या मोहिमेत पाच्छापूर, कित्तूर, परसगड, बदामी, यादवाड, बसवपट्टण, बागलकोट वगैरे ३६ परगणे काबीज केले. बहादूरभेंड्याचा किल्लाही घेतला. ‎ ‎📜 ५ डिसेंबर इ.स.१७९६ ‎नाना आणि दौलतराव शिंद्यांना परशुरामभाऊंची ही घाई अन विश्वासात न घेता केलेले काम अजिबात आवडले नाही आणि नाईलाज असला तरीही या दोघांनी श्रीमंत बाजीराव पेशवे (दुसरे) यांस गादीवर बसवण्याचे ठरवले. दि. ५ डिसेंबर १७९६ रोजी बाजीरावांना पेशवेपद देण्यात आले. नानांनी सातारकर शाहू महाराजांकडून वस्त्रेही आणली. बाजीराव आता अधिकृतरीत्या पेशवे झाले. चिमाजीअप्पा हे तसं पाहिलं तर वयाने अन् नात्यानेही यशोदाबाईंपेक्षा वडील होते. ते यशोदाबाईंचे चुलत सासरे होते. त्यांचे दत्तकविधान करणे हे अतिशय चुकीचे असून अशास्त्रीय आहे असे पुण्यातल्या धर्मसभेचे मत होते. बाजीरावांनीही गादीवर बसताच ‎पुण्यातल्या शास्त्री-पंडितांची सभा बोलवून हे दत्तकविधान अधिकृतरीत्या गैर ठरवले आणि तडक चिमाजीअप्पांना नजरकैदेत ठेवले. गादीवर बसल्यानंतर थोड्याच दिवसात बाजीराव पेशवे नाना फडणविसांना न जुमानता स्वतः मुखत्यार होऊन कारभाराचे निर्णय नानांना न विचारता स्वतःच घेऊ लागले. बाजीराव ऐकत नाही आणि हळूहळू तोही रघुनाथरावांच्याच वळणावर जात आहे असे नानांना वाटू लागले. त्यामुळे नाना कडेकोट बंदोबस्तात प्रथम साताऱ्यास जाऊन छत्रपतींची भेट घेऊन महाड येथे राहिले. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ४ डिसेंबर इ.स.१६७९ ‎शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले ‎औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की , "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा !" ‎अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली ! ‎संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं ... अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले ( दि. २० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले . तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले ( दि. ३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि. ४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले .  संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला . ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले . ‎ ‎📜 ४ डिसेंबर इ.स. १६८२ ‎रणमस्तखानाने कल्याण काबीज केले. त्याच्याशी मुकाबला करण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे यांना रवाना केले. त्यांच्याबरोबर १० हजार स्वार व १२ हजार पायदळ होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी बहादूरखान व या सैन्यात लढाई झाली. कल्याण-भिवंडीपासून ५ मैलांवर असणाऱ्या मेहेंदळी गावात मराठयांच्या दोन हजार स्वारांनी मुघल ठाण्याची लुटालूट केली होती. त्यावेळी मुकर्रबखान मराठयांना तंबी देण्यासाठी धावला. मुकर्रबखान आणि मराठे यांच्याता मेहेंदळी गावाच्या अलीकडे ३० कोसांवर असलेल्या उरण खेड्या जवळ लढाई झाली, त्यात दोन्हीकडील सैनिक मेले व जखमी झाले. त्या लढाईनंतर मुकर्रबखानाने मौजे मेहेंदळी येथे डेरा जमा केला. ‎ ‎📜 ४ डिसेंबर इ.स.१७२७ ‎थोरला बाजीराव पूर्णा परळी प्रांतात आले. पुढे ६ डिसेंबर पौष शु. ५ कसबे नरसीक, ८ डिसेंबरला वाशिम जिल्हा अकोला, ९ डिसेंबरला तालुका मंगळूरपीर जिल्हा अकोला, १० डिसेंबर ला हातगाव, ११ डिसेंबर ला मांजराखेड. तालुका चांदूर जिल्हा अमरावती हे सगळे प्रांत लुटून उध्वस्त केले. म्हणजे डिसेंबर च्या ह्या प्रारंभीच्या काळात राऊ नी तुफानी घोड-दौड करून वाशीम,माहूर, मंगळूरपीर तालुके धुळीस मिळवले. मग अचानक वायव्येस शिरले आणि चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्या जवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. ‎ ‎📜 ४ डिसेंबर इ.स.१७४८ ‎पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला ‎निवती गड तसा छोटा आहे. उंचीनेही छोटा आहे, पण छान आहे. गडासंबंधी जास्त काही ऐतिहासिक माहिती वाचायला मिळत नाही. शिवकाळानंतर हा किल्ला १८व्या शतकामध्ये सावंतवाडीच्या सावंतांकडे होता. ४ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढवला. पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माइल खान नावाच्या कॅप्टनने शौर्याची कमाल करून सावंतांकडून हा किल्ला जिंकून घेतला. ‎ ‎📜 ४ डिसेंबर इ.स.१७९१ ‎महादजी शिंदे यांनी एक पत्र पेशव्यांस पाठविले. महादजी शिंदे लिहीतात. "स्वामींचे दर्शन घ्यावयाचा बेत करून मेवाडातून येत असता उदेपुरकर राणाजींचे राज्यात बंदोबस्त नाही. उमराव आपापले जागा मुलुख बळकावून राहीले. भिमसिंगाकडे चित्तोडचा किल्ला. तो भिमसिंग राणाजींचे लक्षात नाही. याकरिता राणाजी येऊन भेटले. चित्तोड वगैरेचा बंदोबस्त करावा म्हणोन बजिदी केली त्यावरून राणाजीसह चित्तोडनजीक येऊन मुक्काम केला. भिरमसिंगाने गोळी वाजवली. सबब मोर्चे लाऊन तोफांची निकड करताच भिमसिंग घाबरा झाला. ‎ ‎📜 ४ डिसेंबर ‎आज #भारतीय_आरमार_दिन ‎भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराज. ‎"आरमार उभारणी" इ.स. १६५९ पासुन शिवरायानी आरमार तळ उभारण्यास सुरूवात केली. पश्चिम किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग बांधले. मालवणचा सिंधुदुर्ग तर जलदुर्गाचे आश्चर्य म्हणावे लागते कारण तो एवढा अचुक व मजबुत बांधला आहे. आरमाराची यादी चित्रगुप्ताच्या बखरीत दिली आहे त्यात "थोर गुराबा ३०, गलबते १००, महागिर्या १५०, लहान गुराबा ५०, होड्या १०, लहान होड्या १५०, तारवे ६०, पाल १५, जुग १५, मचवे ५०. एवढी होती. इंग्रजानीही स्वराज्याच्या आरमाराच्या याद्या वेळोवेळी लिहुन ठेवलेल्या आढळतात. त्यावरून स्वराज्याचे आरमार कारवार पर्यंत गेले तेंव्हा त्यात एका डोलकाठीची ३० टनापासुन १५० टनापर्यंत वजनाची ८५ जहाजे व तीन अतिमोठी जहाजे होती. म्हणून आधुनिक भारताशी अनुबंध असणारा, समुद्र व आरमाराचा गम्भिरपणे विचार करणारा पहिला राजा म्हणजे शिवाजी महाराजच म्हणावे लागेल. पहिले आरमारप्रमुख सरखेल "कान्होजी आंग्रे" होते. ‎ ‎🙏दत्त नामाचे स्मरण करून, ‎या पवित्र दिनी आपले जीवन धन्य करा ‎श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🙏आई एकविरा 🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 ३ डिसेंबर इ.स. १६७९ ‎सिद्धीस मूर्खात काढून मराठ्यांची दोन जहाज खांदेरीस पोहचले..!! ‎१ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला व सिद्दी आणि इंग्रज यांना तो अडवता आला नाही. पुढे ३ डिसेंबर रोजी एक चमत्कारिक घटना घडली. मराठ्यांची २ जहाजे बेटाकडे जाताना सिद्दयाला दिसली व त्याने ती अडवली असता ती थांबली. सिद्दयाच्या लोकांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपण इंग्रज नौका दलातील असून त्यांनी आपल्या नाविक दलाच्या कॅप्टन आणि नौकेचा खलाशी यांचीही नावे त्वरित सांगितली आणि त्यांनी त्वरित जाऊ द्यावे, अशी मागणी केली. कारण आपण काही मराठी नौका दक्षिणेच्या बाजूने येताना पाहिल्या असून त्याची माहिती मिळवण्याकरिता जात असल्याचे सांगितले. सिद्दयाच्या त्या लोकांना खात्री पटली व त्यांनी मराठ्यांना जाऊ दिले व पुढे त्यांना दिसले की, ते खांदेरीच्या आखातात जाऊन तिथेच नांगरले. त्यावरून त्यांना समजले की, ते मराठेच होते व आपल्याला मूर्खात काढून ते पळून गेले. ही माहिती सिद्दयाच्या त्या जहाजावरील एका हशमाने इंग्रजांच्या सेवेतील एका मुसलमानाला दिली व त्यावरून ती इंग्रजांनी नमूद केली. ३ डिसेंबर रोजी सिद्दीच्या आरमाराचा मुख्य सिद्दी कासीम आणि केग्वीन यांची भेट झाली व कासीमने आता आपण बेटावर उतरून काय तो सोक्षमोक्ष लावूया, असे सांगितले असता केग्वीनने आपल्याला मुंबईहून आदेश येईल तसेच आपण वागू, असे सांगितले. यावेळी केग्वीनने सिद्दीच्या जहाजावर काही मराठी गुलाम मंडळी पाहिली व ही कुठून आली विचारले असता सिद्दीने सांगितले की, आपण मराठ्यांच्या मुलुखात शिरून जाळपोळ केली व काही गुलाम पकडून आणले. तसे केग्वीनने हे लिहून मुंबईला पाठवले. ‎ ‎📜 ३ डिसेंबर इ.स.१६७८ ‎छत्रपती संभाजीराजे रोजी मुघलांकडे गेले. ‎वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात” …..हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की,” छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि छत्रपती संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो छत्रपती संभाजी राजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की , शहजाद्याला छत्रपती संभाजीराजेंकरवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती. करे पुढे सांगतो की ” शहा आलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उदगार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि छत्रपती संभाजी हे सर्व घटना छत्रपती शिवाजीला वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजींना फार आनंद झाला. अशा तऱ्हने छत्रपती शिवाजींनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला.” ‎अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे. ‎ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले त्यावेळेस शहजादा शहाआलम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आलेला होता. आपल्या आधिच्या मैत्रपुर्ण संबंधातुन अर्धवट राहिलेली राजकारण छत्रपती संभाजीराजेंना सिद्धिस न्यायचे होते अशी दाट शंका येते कारण शहजादा औरंगबादेस येईपर्यंत छत्रपती संभाजीराजे मुघलांकडे गेलेच नाहीत. नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजीराजे ३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलांकडे गेले. ‎फितुर झालेल्या बर्‍याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजांना मोगलांच्या छावणीतुन हरप्रकारे प्रयत्नकरुन का सोडवले असतील… हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी छत्रपती शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्‍या पुढील संकटाची(औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रुष्टीने तयारी म्हणून मुद्दाम छत्रपती संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. नंतर या गोष्टीचा छत्रपीसंभाजी राजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते तेव्हा फायदा झाला . कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती संभाजी राजांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर छत्रपती संभाजी राजांना मदत केली. ‎ ‎📜 ३ डिसेंबर इ.स.१७७६ ‎महाराजा यशवंतराव होळकर  (प्रथम)  ह्यांची जयंती...!! ‎यांचा जन्म वाफगाव  ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच होळकर साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत..! ‎ ‎📜 ३ डिसेंम्बर इ.स.१८०३ ‎पेशवा बाजीराव द्वितीय पेशवेपदी गादीवर बसला...!! ‎डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले. ‎ ‎📜 ३ डिसेंबर इ.स‌.१८८९ ‎खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्यांच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले. ‎बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीराम यांनाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्‍या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली. यातच खुदीराम यांनी किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीराम यांचे सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्ल यांनी अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना दि. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले. ‎ ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - ShareChat
‎*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* ‎📜 २ डिसेंबर इ.स.१६६७ ‎छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामजी शेणवी यांसी पोर्तुगीज गव्हर्नकडे तहाचे पत्र घेऊन पाठवले..!! ‎ #शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन व पोर्तुगीजांशी तह...!! ‎शिवाजी महाराजाची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगिजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बार्देशमध्ये कोलवाळ – थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगिजांचेे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही. ‎२२ नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. त्यानंतर खासा विजरई बार्देश मध्ये आला. तोपर्यंत बार्देशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजीराजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी पठविले. २ डिसेंबर १६६७ च्या दिवशी रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढेे या तहाच्या वाटाघाटी ५ डिसेंबर पर्यंत चालल्या व ६ डिसेंबर रोजी तह झाला. ‎बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून एक रूका (रुपया)ही न घेता शिवाजी महाराजांनी त्यांस सोडून दिले, असे पोर्तुगिजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. ‘‘शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवी.’’ हे पोर्तुगिजांचा शिवाजी महाराजांचा चरित्रकार कॉस्मी-द-ग्वॉद त्यांच्या चरित्रात साक्ष देतो. शिवरायांच्या बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगिजांना चांगली बसली होती. पोर्तुगिजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकविणारा हा पहिलाच भारतीय राजा होता. ‎ ‎📜 २ डिसेंबर इ.स.१६८३ ‎(मार्गशीर्ष वद्य नवमी शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर वार रविवार) ‎दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी पोर्तुगीज व्हाईसरायकडे! ‎           छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून दुर्गादास राठोड गोव्याच्या पोर्तुगिजांच्या भेटीत गेला. या भेटीत पोर्तुगिजांचा मानस काय आहे, औरंगजेबास ते कितपत मदत करणार याचा कानोसा घेण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे अधिक्रृत  पत्र जवळ नसल्याने दुर्गादास राठोड याला भेटीस बोलावले नाही ! ‎ ‎📜 २ डिसेंबर इ.स.१७०२ ‎डिसेंबर १७०२ मध्ये फोंडा किल्ला मराठयांनी सर केला, फोंड्याचा किल्लेदार म्हणून कृष्णाजी अनंत यांची नेमणूक ताराबाईंनी केली. यावेळी बादशहाचा मुक्काम भीमेच्या काठावर असलेल्या बहादूरगडावर होता. फोंडा किल्ला काबीज केल्यानंतर मराठयांनी बहादुरगडावर असणाऱ्या बादशाही छावणीभोवती धामधूम उठविली होती. तरीही बादशहास अद्यापि मराठयांचे अनेक किल्ले जिंकावयाचे स्वप्न मनात बाळगत होता. विशाळगड जिंकून घेतल्या नंतर सैन्यासह २ डिसेंबरला कोंडाणा ऊर्फ सिंहगड जिंकून घेण्यासाठी निघाला. वाटेत त्याने जेजुरीच्या खंडोबाच्या देवालयाची नासधूस केली. श्रींचा कळस व मंडप जाळून टाकला. जेजुरी हुन कूच करुन बादशाह कोंडाण्याच्या पायथ्याशी २७ डिसेंबरला पोहोचला.पुढे तरबीयतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या.भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांच्या ताब्यात दिला. सिंहगड चे नाव बख्शीदाबख्श (ईश्वरदत्त) असे ठेविले. ‎ ‎📜 २ डिसेंबर इ.स.१७४८ ‎१८ व्या शतकात हा निवतीचा किल्ला सावंतवाडीच्या सावंताच्या ताब्यात होता. २ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगिजांनी निवतीवर हल्ला चढवला. त्या वेळी इस्माईलखान हा पोर्तुगिजांच़्या पदरी नोकरीस असलेल्या कँप्टनने शौर्याची कमाल करुन निवतीवर पोर्तुगिजांचे निशाण लावले. हा इस्माईलखान पुर्वी मराठ्यांच्या पदरी सेवेत होता. निवतीच्या किल्ल्यावर व्हाईसराय स्वता: आला होता. काही वर्षांनी निवती सावंतानी पुन्हा जिंकून घेतला. ‎ ‎📜 २ डिसेंबर इ.स.१७५१ ‎२ डिसेंबर रोजी मराठयांनी निजामापासून त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. या दोन महिन्याच्या युद्ध धुमाळीत बुसीच्या तोफखान्याचा मराठयांच्या गनिमी काव्याच्या लढाईपुढे काही उपयोग झाला नाही. म्हणून सलाबतजंगाने तहाची बोलणी ‌लावली. शिंगवे, परगणे राहुरी येथे ७ जानेवारी १७५२ रोजी उभयतास अटी मान्य होऊन तह झाला.  या तहात ठरल्याप्रमाणे पेशव्यांनी त्रिंबक किल्ला निजामास परत दिला. ‎ ‎📜 २ डिसेंबर इ.स.१७६० ‎पानिपतचा रणसंग्राम ‎ नोव्हेंबर  सन १७६० रोजी मराठी फौजा व अहमदशाह अब्दाली याच्या फौजांची प्रथम पानिपतावर चकमक झाली. या चकमकीत अहमदशाह अब्दाली याने माघार घेऊन त्याने नोव्हेंबर सन १७६० रोजी दहाड येथे छावणी केली. यानंतर अब्दाली याने पुन्हा माघार घेऊन त्याने २ डिसेंबर  सन १७६० रोजी यमुनातीरावर छावणी केली. ‎ ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 ‎*♠️ अजय सोनवणे* ‎https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*WhatsApp ग्रुप लिंक* ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* ‎https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA ‎ ‎*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* ‎https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb ‎*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* ‎*महाराष्ट्र राज्य* ‎*-----------☆★۩۞۩★☆-----------* ‎*जय जगदंब जय जिजाऊ* ‎  *जय शिवराय जय शंभूराजे* ‎           *जय गडकोट* ‎       *!! हर हर महादेव !!* ‎
🙏आई एकविरा 🙏 - ShareChat