विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
मित्रा. नसेन मी या जगात तेव्हा कदाचित श्रद्धांजलीचा महापूर येऊन जाईल कौतुकाचे गोडवे गान्यासाठी हजारो मित्रांचा लोटून दिलेला महासागर...... कोणी हजेरी लावील कोणी असण्याचा भास निर्माण करेल तर कोणी गर्दी पाहण्यासाठी सुद्धा... पण तुझ्यासारखा जिव लागणारा मित्र अंतिम दर्शनासाठी आतुर झालेला असेल डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून देत.... माझ्यासाठी केविलवाना झालेला चेहरा तुला समजाविण्यासाठी आतुरलेली जीभ निशब्द झालेली असेल तुला पाहण्यासाठी आसूसलेले डोळे तेव्हाच बंद झालेले असतील... त्या बाजार गर्दीमध्ये कोणी हसतील कोणी रडतील कोणी आक्रंदनही करतील आजच्या त्याच्या सवडी प्रमाणे व्यक्तही होतील... मग लागतील पेपरच्या बातम्यांचे ढीग जो तो भरभरून लिहिलं तेंव्हा ना मी ऐकायला असेन ना पाहायला ना वाचायला म्हणून म्हणतो मित्रा गोड बोलून घे मनसोक्त हसून घे मस्तपैकी भेटूनही घे कारण उद्याचे दिवस पाहिलेत कोणी....... ऊडूदेत शब्दांचे फुलोरे रंग गगनी पसरू दे हसून एकदा मित्रा तुझे स्माईल मित्रांसाठी असे वरदान ठरु दे. भूमिपुत्र वाघ. #🎭Whatsapp status
अशक्य ही शक्य...(©मंदार जोग) नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेला एक सुंदर अनुभव. काल आम्ही भावंडं सहकुटुंब एकत्र जमलो होतो. पत्ते, गाणी आणि गप्पा मध्ये झोपायला तीन वाजले. सकाळी उठायला उशीर होऊन जवळ जवळ आठ वाजले. पण आज सुट्टीचा दिवस असल्याने काही धावपळ नव्हती. सकाळी परत सर्वांनी एकत्र ब्रेकफास्ट केला आणि आपापल्या घरी आलो. मी शक्यतो कोणताही सण किंवा विशेष दिवस असेल तर आमच्या घराजवळ असलेल्या स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतो. खूप छान वाटतं. त्यानुसार आजही संध्याकाळी मठात जायचं ठरवलं होतं. बायकोशी बोलताना देखील त्याचा तीन चार वेळा उल्लेख केला. आज वॉक ला दांडी मारल्याने संध्याकाळ मोकळी होती. मग आमचा टिव्ही काही दिवस नादुरुस्त झाल्याने नवीन टिव्ही घ्यायचं बऱ्याच दिवसांपासून पेंडींग असलेलं काम करायचं ठरवलं. टिव्ही खरेदी झाली की बायको वॉकला जाणार आणि मी मठात जायचं अस ठरवून मी आणि बायको गाडी न घेता चालत त्या दुकानात गेलो. दुकानात बोलून, मॉडेल ठरवून, किंमत घासाघीस करून होई पर्यंत तास दीड तास गेला. हल्लीच आमच्या कामवाल्या बाईंचा मुलगा दुसऱ्या एका इलेक्ट्रोनिक दुकानात नोकरीला लागला आहे. कामवाल्या बाईंनी आमच्या बायकोला सांगितलं होतं की माझा मुलगा त्याच्या दुकानात सवलत मिळवून देईल. बायकोने त्या पहिल्या दुकानातून त्याला सहज फोन केला तर त्याने ह्या दुकानापेक्षा तीन चार हजार जास्त सवलत दिली. पण ती ज्या कार्ड वर होती नेमक ते कार्ड आम्ही बरोबर घेतलं नव्हतं. मग मेट्रो पकडून आम्ही घरी आलो. बायकोने ते कार्ड घेतलं. मग परत पार्किंग मध्ये वेळ जायला नको म्हणून आम्ही गाडी न घेता रिक्षाने त्या दुकानात गेलो. तिथे एक वेगळाच पर्याय पसंत पडला ज्यात आणखी चार हजार रुपये वाचले. आम्ही शेवटी तो टिव्ही बुक केला. मी जाणार असलेला मठ नऊ वाजता बंद होतो. तिथे वेळेत पोहोचणं अशक्य होतं. बायकोला वाटतं होतं की त्या इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या जवळपास आणखी एक मठ आहे. पण तो तिचा गैरसमज असल्याचं लक्षात आलं. म्हणजे आज टिव्ही खरेदीच्या नादात मठात जाणं चुकलं होतं. मी थोडा खट्टू झालो. पण मग ठरवलं की घरी येऊन गाडी घेऊन जायचं आणि बंद झालेल्या मठाच्या बाहेरून का होईना पण वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घ्यायचं. तिथल्या जाळीतून स्वामींचा चेहरा दिसतो. आम्ही घरी येऊन मठात जायला निघालो. गाडी पार्क करून मी बाहेरून दर्शन घ्यायला गाडीतून उतरत असताना मला मठात एक माणूस जातना दिसला! मला आश्चर्य वाटलं. मी बायकोला म्हणालो "साडे नऊ वाजले तरी मठ अजूनही उघडा आहे बहुतेक. मी आलोच." अस म्हणून मी धावत निघालो. मठाच्या अंगणात पोहोचलो. तिथल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं तर तो म्हणाला "पटापट जा. बंद होतोय!" मी हातपाय धुवून लगबगीने आत गेलो. आत तीन लोक होते फक्त. मी चौथा. पुढले दोघे गाभर्याजवळ दर्शन घेऊन बाहेर पडले. माझ्या पुढला हात जोडून अर्ध मिनिट उभा होता. तो बाजूला झाल्यावर मी स्वामींच्या समोर उभा राहिलो. प्रार्थना केली. अंगारा, तीर्थ, प्रसाद घेतले. नमस्कार करून डोळे मिटून नामस्मरण केलं. डोळे उघडून परत दर्शन घेतलं आणि गाभाऱ्यातील पुजाऱ्याने माझ्याकडे पाहिलं. मी मान हलवून हो म्हणालो आणि मग त्याने गाभाऱ्याचा दरवाजा बंद केला. मी बाहेर येऊन प्रदक्षिणा घातली आणि चपला घालताना गार्ड ला विचारलं की आज मठ इतक्या उशिरा पर्यंत कसा काय सुरू? आणि त्याने आठवण करून दिली की आज श्री नृसिंसरस्वती जयंती आहे. म्हणून आज बंद करायला जरा उशीर झालाय. वर्षाच्या पहिल्या दिवशी मनात होतं त्यानुसार स्वामींच अनपेक्षित दर्शन झाल्याने मी खुश होतो. मी गाडीत येऊन बसलो आणि मठाचा मुख्य दरवाजा बंद झाला. मला फारच भरून आलं. जणू स्वामींची इच्छा होती मला दर्शन द्यायची. मला पोहोचायला एक मिनिट जरी उशीर झाला असता तर गाभारा, मठ आणि बाहेरचा मुख्य दरवाजा बंद झाले असते. जणू स्वामी मला दर्शन देण्यासाठी ते दरवाजे उघडे ठेऊन वाट पहात असावे असं मनाला वाटून खूप खूप समाधान वाटलं. डोळ्यात पाणी दाटलं. आपली श्रद्धा आणि भक्ती मनापासून असेल तर देव कोणत्याही प्रकारे आपल्याला दर्शन देतोच ह्याचा प्रत्यय आला आणि आजच्या दर्शनातून मिळालेला स्वामींचा आशीर्वाद वर्षभर पाठीशी राहील असा आत्मविश्वास देखील निर्माण झाला. आज श्री नृसिंसरस्वती जयंती आहे हे मला अजिबात माहीत नव्हतं. मी टीव्हीच्या नादात मठात न जाऊ शकल्याने थोडी अपराधी भावना मनात घेऊन बाहेरून नमस्कार करायला गेलो होतो. बरं मठ बंदच असणार हे गृहीत असल्याने धावपळ वगैरे काहीही न करता आरामात गेलो होतो. पण मला दर्शन मिळालं. मी आज दर्शन घेणारी शेवटची व्यक्ती ठरलो! माझ्यासाठी अशक्य असलेली गोष्ट स्वामींनी शक्य केली अशी माझी श्रद्धा आणि भावना आहे. आणि ही भावना खूप ऊर्जा, सकारात्मकता देणारी आणि humbling आहे. तसेच नवीन वर्षात पदार्पण करताना खूप आत्मविश्वास देणारी आहे! आपले सर्वांचे नवीन वर्ष श्री स्वामी समर्थ ह्यांच्या कृपेने अतिशय आनंदाचे, आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा! श्री स्वामी समर्थ🙏🏻 टीप - ज्यांना असं वाटेल की मठ आज anyway उशिरा बंद झाला आणि मी योगायोगाने त्या वेळेत पोहोचलो म्हणून ह्यात काही विशेष नाही त्यांच्या मताचा आदर आहे. ज्यांना ह्यात अंधश्रद्धा वगैरे वाटेल त्यांच्याबद्दल देखील राग नाही. पण ह्या पोस्टवर जे चेष्टा वगैरे करायचा प्रयत्न करतील त्यांना मी अजिबात ब्लॉक करणार नाहीये. कारण ती चेष्टा माझी नसेल. त्यांच्या कॉमेंट मात्र डिलीट करून त्यांचा फैसला त्याच्यावर सोडणार आहे ज्याची त्यांनी चेष्टा केलेली असेल! ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी पोस्ट अवश्य शेयर करा. #😍फक्त प्रेम वेडे #💑तुझी माझी जोडी #❤️I Love You #💗प्रेम #🌹प्रेमरंग
*💖प्रेमाची ताकद 💖* 💖 *🚩 एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले ..!!* *🚩 गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते ..!!* *🚩 अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला तर राधा शांत-चित्त होती ..!!* *🚩 गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी, स्मित वदनाने राधा म्हणाली ..* *"कसे आहात द्वारकाधीश ..??"* *🚩 जी राधा त्याला कान्हा-कान्हा म्हणायची तिने 'द्वारकाधीश' असे संबोधल्यावर, कृष्ण नाराजीने म्हणाला ..* *"राधे, मी आज देखील तुझा 'कान्हा'च आहे ..!! तू तरी मला 'द्वारकाधीश' म्हणू नकोस गं ss ..!!"* *"खूप दिवसांनी भेटतो आहोत .. एकमेकांशी सुख-दुःखाच्या गप्पा मारू .. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा, माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती ..!!"* *🚩 राधा म्हणाली ..* *"खरं सांगू ..?? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की, तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही ..!! कारण, तुझी आठवण यायला, मी कधी तुला विसरलेच नाही ..!! आणि माझ्या नजरेत तूच होतास .. फक्त तू ..!! त्यामुळे, माझ्या अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून, मी कधी रडलेच नाही ..!!* *"प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू ..??"* *🚩 श्रीकृष्ण ऐकतच राहिला ..* *🚩 राधा म्हणाली ..* *"तुला कदाचित कटू वाटेल पण, हे सत्य आहे ..!! गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाही कधीच भेटला नाहीस ..!! तू खूप मोठा झालास .. तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली ..!!"* *"पण ह्या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली ..!! यमुनेच्या पवित्र, गोड पाण्याने, तुझे आयुष्य सुरु झाले .. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी, थेट द्वारकेस जावून पोहोचलास ..!!"* *"एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरवसा ठेवलास .. पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास ..!!"* *"कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर, सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस ..!!"* *" 'कान्हा' आणि 'द्वारकाधीश' ह्यांत काय फरक आहे सांगू ..??"* *"तू 'कान्हा' असतास तर, तू सुदामाच्या घरी गेला असतास .. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं ..!!"* *"प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे" ..!!* *'युद्धात जीव घेतला जातो ..!!* *आणि ..* *प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो ..!!* *कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही ..!!"* *"तू तर 'त्रैलोक्याचा स्वामी' आहेस .. महान अशी 'भगवद्गीता' तू जगाला सांगितलीस ..!! पण तू स्वतः काय निर्णय घेतलास ..??"* *"तू राजा होतास .. प्रजेचा पालक होतास आणि तुझेच सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस ..??"* *"तू स्वतः अर्जुना सारख्या 'महारथी'चा सारथी बनलास, अर्जुनाचा 'मार्गदर्शक' झालास .. त्याच अर्जुनाने, तुझेच सैन्य, तुझ्याच नजरेसमोर मारून टाकले ..??"* *"कृष्णा, अरे तुझे सैन्य तुझीच प्रजा होती ना ..?? आणि प्रजा तर स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ..!! तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच, तू असा विनाश बघू शकलास ..!!"* *"इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा ..?? मग जा, पृथ्वीवर जावून बघ .. तुझी 'द्वारकाधीश'वाली प्रतिमा शोध ..!!"* *"नाही सापडणार तुला शोधूनही ..!!"* *"जिथे जाशील तिथे .. घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन ..!!"* *"होय कान्हा, मला गीतेचे महत्व माहिती आहे. आज देखील पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते ..!! समाज गीतेला पुज्य मानतो ..!! पण भरवसा मात्र, युद्ध करणाऱ्या द्वारका-नरेश श्रीकृष्णावर नाही तर, प्रेम करणाऱ्या 'कान्हा'वर ठेवतो ..!!"* *"गीतेमध्ये राधेचा तर दुरून देखील उल्लेख नाही ..!! पण आजही लोक गीतेचा - तुझ्या महान भगवद् गीतेचा - समारोप करताना 'राधे-कृष्ण राधे-कृष्ण' असाच जप करतात ..!!"* 🚩⚜️🌹 *हीच ती खऱ्या प्रेमाची खरी ताकद ..!!* ||•• *वाचण्यात आलेला सुंदर लेख* ••ll🙏🏻 #❤️I Love You #🌹प्रेमरंग #💗प्रेम #💑तुझी माझी जोडी #😍फक्त प्रेम वेडे
#🎭Whatsapp status #🤘 बॉयज अॅटिट्युड कोट्स #😏मतलबी दुनिया #😍Marathi Status King #👌प्रेरणादायी स्टेट्स
🎭Whatsapp status - थांबवून बसल आयुष्य आज, क्षण सोडून श्वास घेतोय साज. धावणं कमी असण्यातही सुख सापडतं, हळू जगण्यातच मन जुळतं. लेखन अंकिता राव थांबवून बसल आयुष्य आज, क्षण सोडून श्वास घेतोय साज. धावणं कमी असण्यातही सुख सापडतं, हळू जगण्यातच मन जुळतं. लेखन अंकिता राव - ShareChat
*वन बेडरुम फ्लॅट* ➖➖➖➖➖ माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रिय कंपनीत नोकरीला लागावे. जेव्हा मी अमेरीकेत आलो तेव्हा हे स्वप्न जवऴपास पूर्ण होत आले होते. आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पोहचलो होतो. मी असे ठरवले होते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की जेणे करुन भारतात गेलो की पुण्यासारख्या शहरात सेटल होईन. माझे वडिल सरकारी नोकरीत होते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट, अन तुटपुंजी पेंशन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे होते. घरची, आई-बाबाची खुप आठवण यायची. एकट वाटू लागायच. स्वस्तातल एक फोन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना काँल करत होतो. दिवस वार्‍यासारखे उडत होते. दोन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली. अजुन दोन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा. लग्नासाठी रोज नवनवीन स्थळ येत होती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मी १० दिवसांची सुट्टी घेतली. मी खुश होतो. आईबाबांना भेटणार होतो. नातेवाईक व मित्रांसाठी खूप सार्‍या भेटवस्तु घ्यायच्या होत्या त्याही राहून गेल्या. घरी पोहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फोटो मी पाहिले, वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडिल समजुतदार होते व दोन दिवसात माझे लग्न लागले. खुप सारे मित्र येतील अस वाटत असताना फक्त बोटावर मोजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर टेकवले. "आम्हाला तुझे पैसे नकोरे पोरा पण वरचेवर भेटायला येत जा "अस बाबा सांगताना त्यांचा आवाज खोल गेला होता. बाबा आता थकले होते, चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत होत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पोहचलो. पहिली दोन वर्ष बायकोला हा देश खूप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत होत. बचत कमी होऊ लागली पण ती खुश होती. हऴुहऴु तीला एकाकी वाटु लागल. कधीकधी ती आठवड्यातुन दोनदा किंवा तिनदा भारतात फोन करु लागली. दोन वर्षानी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचो तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे होते. दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचो. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागन वर्ष सरत होती. भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले होते. एक दिवस अचानक आफीस मधे असताना भारतातन कॅाल आला, "मोहन बाबा सकाळीच गेले रे". खुप प्रयत्न केला पण सुट्टी काही भेटली नाही, अग्निला तर सोडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उदविग्न झालेलं. दहा दिवसात दुसरा कॅाल आला, आईची पण प्राणज्योत मालवली होती. सोसायटी तील लोकानी विधी केले, नातवंडाचे तोंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले होते. आई बाबा जाऊन दोन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पोकळी तयार झालेली, आईबापाची शेवटची ईच्छा, ईच्छाच राहिलेली. मुलांचा विरोध असतानाही भारतात येऊन स्थिरस्थावर होण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात होती. राहण्यासाठी घर शोधत होतो पण आता पैसे कमी पडत होते. नवीन घर ही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत आलो. मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलो. मुले मोठी झाली, मुलीने अमेरिकी मुलासोबत लग्न केल. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो. मी ठरविले होते. आता पुरे झाले, गाशा गुंडाळुन भारतात आलो. चांगल्या सोसायटीत 'दोन बेडरुमचा' फ्लँट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे होते. फ्लॅटही घेतला. आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या 'दोन बेडरुमच्या' फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहतो. उरलेल आयुष्य जिच्यासोबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जीव सोडला. कधीकधी मल वाटते हा सर्व खटाटोप केला तो कशासाठी? ? याचे मोल ते काय? ? माझे वडील भारतात राहत होते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट होता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडिल गमावले, मुलांना सोडून आलो, बायको पण गेली. खिडकितुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते, त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात. अधुन मधुन मुलांचा अमेरिके तून फोन येतो ते माझ्या तब्येतीची चौकशी करतात, अजुनही त्यांना माझी आठवण येते यातच समाधान आहे. आता जेव्हा माझा मृत्यु होईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांच भल करो. पुन्हा प्रश्न कायम आहे, हे सर्व कशासाठी अन काय किंमत मोजून. *मी अजुनही उत्तर शोधतोय.* *फक्त एका बेडरुम साठी?* जगण्याचे मोल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लाऊ नका. 🙏🏻🙏🏻 *मित्र वाढवा मित्र जपा त्यांच्या संम्पर्कात रहा*🙏 साभार : कळवा ✅ संकलन प्रा. माधव सावळे ➖➖➖➖➖ #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #सुप्रभात
#सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
सुप्रभात - *जगाशी बोलायला "फोन*" आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला "मौन" आवश्यक असते ! *फोनवर बोलायला "धन" द्यावे लागते आणि देवाशी बोलायला "*মন' द्यावे लागते* पैशाला महत्व देणारा "भरकटतो" तर देवाला प्राधान्य देणारा "सावरतो"! शुभ सकाळ *जगाशी बोलायला "फोन*" आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला "मौन" आवश्यक असते ! *फोनवर बोलायला "धन" द्यावे लागते आणि देवाशी बोलायला "*মন' द्यावे लागते* पैशाला महत्व देणारा "भरकटतो" तर देवाला प्राधान्य देणारा "सावरतो"! शुभ सकाळ - ShareChat
*म्हणता म्हणता २०२५ संपत आले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले.* आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. *व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे,* *" आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते.."* शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य... *एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.* वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. पुन्हा व.पु. म्हणतात तसं, *" समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..."* *असो, सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतंच...* *तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या..* गुरू ठाकूर यांच्या या दोन ओळी फारच सुंदर आहेत, *"आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे...* *ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे..."* 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
_*31 डिसेंबर म्हणजे कॅलेंडरवरचा शेवटचा दिवस नाही तर मनात चाललेली एक हिशोबाची रात्र असते. वर्षभरात जे झालं ते आठवून माणूस स्वतःशीच थोडा प्रामाणिक होतो. काही यश आनंद देतात तर काही अपयश अजूनही बोचत राहतात. लोक जल्लोष करतात पण आत कुठे तरी शांत विचार सुरु असतो. कोण मिळालं, कोण हरवलं, काय शिकलो आणि काय चुकलो याची उजळणी होते. शुभेच्छांचे मेसेज येतात पण खऱ्या शुभेच्छा मनातच जन्म घेतात. नवीन वर्षाकडून अपेक्षा असतात पण जुने वर्ष सोडताना थोडी हुरहुरही असते. 31 डिसेंबर माणसाला आठवण करून देतो की वेळ थांबत नाही. आपण बदललो नाही तरी दिवस बदलतात. म्हणूनच हा दिवस जल्लोषापेक्षा विचारांचा जास्त असतो. जुन्या चुकांना माफ करून पुढे जाण्याची ही एक संधी असते. आणि म्हणूनच 31 डिसेंबर हा केवळ शेवट नसून नव्या सुरुवातीची शांत तयारी असते.*_ #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☕good morning Friends🌞