दिवाळी आली की, वाटतं राजा तू आहेस,
तू अजुनही जिंवत आहेस . . .
प्रत्येक अंगणात तुझे गडकिल्ले उभे राहतात⛰️
त्याला खिंडारे नसतात,
ना भग्न अवस्थेतले तुझे राजवाडे असतात,
असतं ते फक्त चैतन्य ...😍
नव्या उमेदिनं सळसळणारं ...🔥
मशाली, चिरागदाने, शामदाने नसतातं,
पण असतात पणत्या
तुझ्या मांगल्याचं स्वरुप सांगणा-या 🔥
गड बांधताना ⛰️
एक-एक चिमुकला अभियंता
आपापली विचारशक्ती लावतो,
चिखलाने माखलेले हात, बरबटलेले कपडे,
पण तोंडावर तेज विलसत असतं,
एक भावना मनात ज्वलंत असते की,
"हो राजा तुला बसायला,
तुझा रुबाब अन् थाट दिसायला,
तुला विराजमान व्हायला
एकच एक जागा ह्या भूतलावर आहे,
ते म्हणजे गडकोट,
आणि ती मी जागा निर्मीली आहे,
माझ्या अंगणातल्या गडावर
माझ्या राजाचं वास्तव्य असेल,
माझ्या गडाचा मीच हिरोजी इंदुलकर!!!
याहून माझ्यासाठी आनंदाची
दुसरी गोष्ट नाही !!"
आणि हे सारं पाहताना
तुझे डोळे आकाशात
पाणावले नसतील तर नवलच !
आणि एक वाक्य
त्या गडक-यांच्या मनात
नेहमी गुंजत राहिल,
*"उभाच राहिन मी सांगेन गाथा तुझ्या पराक्रमाची, ⚔️*
*आठवण सदा करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची.”*
गडकोट म्हणजे शिवराय ⛰️
#गडपती 👑 उजी #✨शुभ दीपावली🪔