मटण ही अशी गोष्ट आहे ज्यामुळ लोक एकत्र येऊ शकतात. कुणाच्या पण घरी मटण आणल की त्या घरातल वातावरण एकदम अचानक प्रसन्न होते. सासू-सून सोबत मसाला तयार करायला घेतात मुलगा कुठ कोथिंबीर, कांदा गोष्टी कापून देत असतो तर मुलाचा बाप सारख स्वयंपाक घरात चकरा मारत असतो. एवढ सोबत आनंदात कुटुंब फक्त दिवाळीला येताना पाहीलय अन मटण असताना, पण दिवाळीला लय खर्च असतो त्यामुळ आठवड्यातून दोन-तीन वेळा मटण आणुन सर्वांना कौटुंबिक आनंद देण्याचा पुण्याच काम केल पाहीजे. मटण घरातले सगळे रुसवे फुगवे बाजूला काढून सोबत आणतय.
घरी मटण असेल तर घरातले लोक वेळेवर घरी येतात.
नळी ज्याला आवडते तो घरातल्या स्त्रीशी चांगला वागतो.
कलेजी वाला.. काळीज काढून द्यायला तयार होतो.
घरात शिळे अन्न उरत नाही.
घरातल्यांच्या बॉड्या बनतात.
देशासाठी मजबूत हाडे तयार होतात.
एकंदर.. मटण घराला जोडून ठेवते. #🤘टाईमपास😝 #⚡व्हायरल जोक्स😂 #😆हसा आणि हसवा😂 #😋आम्ही खादाडी🥧 #🤘जबरदस्त जोक्स😝