Amar kokate Patil
ShareChat
click to see wallet page
@amarkokatepatil
amarkokatepatil
Amar kokate Patil
@amarkokatepatil
||રાખા શ્રી શિવછત્રપતી||🚩
#🙏शिवदिनविशेष📜 ८ डिसेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी ४,००० स्वार घेऊन हुबळीची पुर्णपणे लुट केली.
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१६६५ नेताजी पालकरांनी विजापूरकरांकडून ताथवडा उर्फ संतोषगड जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकून घेतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. ८ डिसेंबर १६९९ रोजी औरंगजेबाचे एकेक मातब्बर सरदार तरबियातखान, रहुल्लाखान, मुनिमखान, मीर आतिश, मन्सूरखान, खुदाबंदाखान आणि प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुलगा शहजादे मुहम्मद आजम गडाला वेढा घालून बसले होते. खुद्द औरंगजेब करंज मुक्कामी राहून या सर्वावर देखरेख करत होता. गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले. गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंग्जेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल, असे वाटत होते. पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_डिसेंबर_१७४० रेवदंडयाचा किल्ला मराठ्यांनी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - insta@ History_Maharashtra instogrom @History_Mohoroshtro आजचे ऐतिहासिक दिनविशेष ८ डिसेंबर १६७३ आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकून घेतले. insta@ History_Maharashtra instogrom @History_Mohoroshtro आजचे ऐतिहासिक दिनविशेष ८ डिसेंबर १६७३ आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकून घेतले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 ७ डिसेंबर इ.स.१६७२ बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना पत्र लिहिले..!
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30
#🙏शिवदिनविशेष📜 ६ डिसेंबर इ.स.१६६३ छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान केले...!
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #६_डिसेंबर_१६६३ औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती नागवली होती ह्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती. राजांनी आऊसाहेबांचा आशीर्वाद घेतला आठ हजार घोडेस्वार तयार झाले, सुरतेवर निघण्याची तयारी सुरु झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #६_डिसेंबर_१७०१ मलकापुरास मुक्काम करून विशाळगडानजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - History Maharrashtra इस्टाग्राम आजचे ऐतिहासिक दिनविशेष ६डिसेंबर १६६३ औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती नागवली होती भरपाई म्हणून राजांना सुरतेतील संपत्ती हवी 1 आणि होती. ह्याची : सुरतेवर निघण्याची तयारी आठ हजार घोडेस्वार तयार झाले ' झाली. जय्यत History Maharrashtra इस्टाग्राम आजचे ऐतिहासिक दिनविशेष ६डिसेंबर १६६३ औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती नागवली होती भरपाई म्हणून राजांना सुरतेतील संपत्ती हवी 1 आणि होती. ह्याची : सुरतेवर निघण्याची तयारी आठ हजार घोडेस्वार तयार झाले ' झाली. जय्यत - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 ५ डिसेंबर इ.स.१६७३ छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले.
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:37
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_डिसेंबर_१६६७ पोर्तुगीजांशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साकोपंत ह्या नावाचा एक दूत आवश्यक ते अधिकार देऊन रवाना केला. पोर्तुगीजांनी पाद्री सेबास्तियांव मार्तीश ह्याला आपला दूत म्हणून शिवाजीराजांकडे तहाच्या करारावर त्यांची सही घेण्यासाठी पाठविले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_डिसेंबर_१६७३ शिवरायांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले. सन इ.स.१६७३ पावसाळा थांबला आणि राजांचे विजयी अश्व पुन्हा दौडू लागले मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागले, याच सुमारास कर्नाटकात यादवी निर्माण होऊन मृत राज्याच्या विधवा पत्नीने महाराजांची मदत मागितल्यावरून राजांनी रायगड सोडला. राजे हुबळी, काद्रा, कारवार, बंकापूर या भागात स्वारीवर गेले. या भागात मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोलखानने सर्जाखानाची रवानगी केली. त्याने मराठ्यांना चांदगड परिसरात घाटले. झालेल्या झुंजीमध्ये मराठ्यांच्या बाजूचे विठोजी शिंदे नामक एक नामांकित सरदार ठार झाले. पण मराठ्यांनी सर्जाखानला मागे रेटलाच व ते बंकापूरच्या दिशेने पुढे सरकले तर बंकापूर ला बहलोलखान हा अडथळा म्हणून समोर आला. चिडलेले मराठे यानंतर पन्हाळ्याच्या रोखाने मागे फिरले. पन्हाळ्याजवळ बेहलोलच्या सैन्याशी मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विठोजी शिंदेच्या हत्येचा सूड सर्जाखानला मारून उगवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_डिसेंबर_१६८२ शंभुराजेंचे सरदार नारो त्रिमल आणि मुघल सरदार माणकोजी यांच्यात चकमक झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - insta @History Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष ভিীন 8889 6 पोर्तुगीजांशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साकोपंत नावाचा एक दूत आवश्यक ते अधिकार देऊन रवाना केला. insta @History Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष ভিীন 8889 6 पोर्तुगीजांशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साकोपंत नावाचा एक दूत आवश्यक ते अधिकार देऊन रवाना केला. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_डिसेंबर_१६६९ संभाजीराजांच्या वतीने सरसेनापती प्रतापराव गुजर व निराजी रावजी हे २५०० फौजेसह शहजादा मुअज्जमकडे खडकी ( छत्रपती संभाजीनगर ) येथे होते. त्यांच्या अटकेची खबर औरंगजेबाने डिसेंबर १६६९ मुअज्जमला फर्मानाद्वारे सोडली. फर्मान पोहोचण्याआधीच ही खबर मुअज्जमला कळली व त्याने या सर्व सरदारांना राजपुत्र व फौजेसकट निघून जाण्याचा सल्ला दिला आणि सर्वांचेच प्राण वाचले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_डिसेंबर_१६७८ संभाजीराजे रोजी मुघलांकडे गेले. वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात" "शिवाजीराजे मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले व ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो संभाजीराजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की, शहजाद्याला संभाजीराजेंकरवी शिवाजी महाराजांची मदत हवी होती. "शहाआलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उद््गार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि संभाजीराजे हे सर्व घटना शिवाजीराजांना वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे शिवाजींना फार आनंद झाला. अशा तह्रेने शिवाजींनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला." अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्‍या पुढील संकटाची(औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३_डिसेंबर_१८०३ दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष ३ डिसेंबर १६६९ {ು insta @History_Maharashtra शंभूराजांच्या वतीने प्रतापराव, निराजी रावजी हे फौजेसह शहजादा मुअज्जमकडे असताना औरंगजेबकडून त्यांच्या अटकेचे फर्मान पोहोचण्याआधीच ही खबर मुअज्जमने सर्व सरदारांना देऊन राजपुत्र फौजेसकट निघून जाण्याचा सल्ला दिला आणि सर्वांचेच प्राण व নামল आजचे ऐतिहासिक दिनविशेष ३ डिसेंबर १६६९ {ು insta @History_Maharashtra शंभूराजांच्या वतीने प्रतापराव, निराजी रावजी हे फौजेसह शहजादा मुअज्जमकडे असताना औरंगजेबकडून त्यांच्या अटकेचे फर्मान पोहोचण्याआधीच ही खबर मुअज्जमने सर्व सरदारांना देऊन राजपुत्र फौजेसकट निघून जाण्याचा सल्ला दिला आणि सर्वांचेच प्राण व নামল - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 २ डिसेंबर इ.स.१६८३ छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेनुसार दुर्गादास राठोड मध्यस्थीसाठी गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरायच्या भेटीस गेले..!
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30
#🙏शिवदिनविशेष📜 १ डिसेंबर इ.स.१६६३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाहुणचार खाल्लेला मुघल सरदार शाहिस्तेखान शिवछत्रपतींच्या भीतीने बंगालकडे रवाना...!
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:30