Dr Amol Melage
ShareChat
click to see wallet page
@amolmelage
amolmelage
Dr Amol Melage
@amolmelage
🚩🚩🚩क्षत्रियकुलांवतस्🚩🚩🚩
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली.पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती.महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या.फेब्रुवारी १६६५ मध्ये शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती.पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते.ते असे,"शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते.त्याने आता ८० जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठवली आहेत आणि स्वतः खुष्कीच्या मार्गाने जाऊन त्यांना मिळावे असा त्याचा बेत आहे. 📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६७० जंजिऱ्याचे बंड फेब्रुवारी १६७१ मध्ये झाले. त्यापूर्वी थोडे दिवस अगोदर नोव्हेंबर १६७० मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या उत्तरेकडे १०० मैलावर नागाव येथे १६० लहान जहाजे, १०,००० घोडेस्वार व २०,००० पायदळाचे सैनिक जंजिऱ्याला वेढा घालण्याचा पूर्ण तयारीनिशी एकत्र जमवले होते. कुदळी, फावडी, पहारी यांसारखी खाणकामाची कित्येक हत्यारेही त्यांच्याजवळ होती. २४ नोव्हेंबर रोजी आरमाराच्या ह्या तुकडीने नागाव सोडले आणि २६ नोव्हेंबर रोजी ही तुकडी माहीला आली. त्याच दिशेने मराठ्यांच्या सैन्यानेदेखील जमिनीवरून#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:29
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५४ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते. उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे. मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे. उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात. 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५९ अफझलखान वधाची बातमी विजापूरास समजताच साऱ्या शहरात खळबळ, गोंधळ आणि रडारड सुरू झाली. दुःखात शहर बुडाले. अली आदिलशहाने नौबत बंद केली. अफझलखानाबरोबर असलेले फाझलखान, मुसेखान, अंकुशखान वगैरे मंडळी विजापुरा येऊन पोहोचली. अफझलखानाचा मुलगा फाझलखान यास सर्वात जास्त दुःख झाले. तो मोठ्या दुःखाने खाली मान घालून विजापूरच्या सुलतानास भेटावयास गेला. त्यानंतर तीन दिवसांनी विजापुरात बातमी पसरली की शिवाजीराजे फौजेसह कोल्हापूरकडे दौड#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:29
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_नोव्हेंबर_१६८३ "छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठा सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली. धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "शंभूराजे" नी पहिले व संतापाने बेभान झालेल्या शंभूराजेंनी त्यांचा पाठलाग करण्यासाठी आपला घोडा पाण्यात घातला. "खंडोबल्लाळ चिटणीस" यांनी पाण्यात उडी मारून राजांना आडवले आणि राजांचा घोडा तीरावर आणला. शंभूराजेंच्या या रौद्र तांडवामुळे व्हाइसरॉय चे आणि फिरांग्यांचे धाबे दणाणले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_नोव्हेंबर_१६९९ स्वत: औरंगजेब बादशहा दख्खन काबीज करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी आला व आजच्या दिवशी २४ नोव्हेंबर १६९९ रोजी त्याने साताऱ्यातील "किल्ले वसंतगड" ताब्यात घेतला व नंतर त्याचे नामकरण "किले-द-फतेह" केले.#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:30
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २२ नोव्हेंबर इ.स.१६७९ छत्रपती शिवाजी महाराज सण १६७९ मध्ये औरंगाबाद स्वारीवर होते त्यावेळी दिलेरखान आपला विजापूरचा वेढा उठवून महाराजाना शह देण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने निघाला. दिलेरखानासोबत यावेळी शंभुराजे होते. जालगिरी वरून कूच करून त्याने तिकोट्या वर धाड घातली. गावे लुटण्याबरोबरच दिलेरखानाने तिथल्या प्रजेची कत्तल करणेही सुरू केले. तिकोट्याहून अथनीला आलेल्या दिलेरखानाने ते शहर लुटून प्रचंड संख्येने माणसे कैद केली आणि या कैद्यांची कत्तल उडवण्यास प्रारंभ केला. शंभुराजेंनी दिलेरखानाच्या या कृत्याला विरोध केला. या मुद्द्यावरून दिलेरखान आणि शंभुराजेंचा वाद टोकाला गेला. यावेळी शिवाजी महाराज आणि विजापूरकर यांच्यात सलोखा होता. तिथे असलेल्या महाराजांच्या माणसांनी गुप्तपणे शंभुराजेंची भेट घेतली. महाराजांनीही शंभुराजेंना परत स्वराज्यात येण्याबद्दल पत्र लिहिले होते. शंभुराजेंच्या मनावर या गोष्टीचा परिणाम होऊन त्यांनी स्वराज्यात परत जायचे नक्की केले. ठरल्या योजनेनुसार शिवाजी महाराजांच्या माणसांनी दिलेरखानाच्या पक्क्या बंदोबस्तातून शंभुराजेंची सुटका केली. 📜 २२ नोव्हेंबर इ.स.१६८७ गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग कर्नाटक प्रांतात होता तो जिंकण्यासाठी कासीमखान या सरदाराला मोठे सैन्य देऊन रवाना केले होते. हे सैन्य एप्रिल १६८७ च्या सुमारास कर्नाटकात पोहोचले. त्यांनी तुमकुर,चिकनहळ्ळी,चंद्रगिरी व पेनुगोडा ही म्हैसूर#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६६५ ( कार्तिक वद्य सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, रविवार ) छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे यांच्या छावणीत दाखल! राजे शिवराय तहानंतर विजापूरच्या मोहिमेसाठी सुमारे ९-१० हजाराच्या फौजेसह मिर्झाराजांच्या छावणीत दाखल झाले.. संदर्भ: शि.च.वृ.स ३ पृ ४२ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६६७ गोव्यातील पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींबद्दल छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाइसरॉयला सावधानतेचे पत्र पाठवले. पोर्तुगीज स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन त्यांचे आरमार उभे करत होते तसे झाले तर तो स्वराज्यासाठी एक धोका होता. त्यांना शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाइसराॅयला वकीलामार्फत पत्र पाठविले व तसे न करण्याचा इशारा दीला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६८१ संगमनेरचा ठाणेदार "नारोजी" याने मराठ्यांना अडविण्यासाठी "औंढा" पट्ट्यात वाटा रोखून धरल्या. पण मराठे हुशारीने तिकडे फिरकलेच नाहीत. उलटच्या दिशेने संगमनेरपासून २० कोसावर पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत भोजपुऱ्यात चौथरा वसूल करत निघून गेले व तिथे चकमकही झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१७७२ श्रीमंत थोरले माधवराव यांचे निधन. वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांनि इहलोकची यात्रा संपली. तसेच रमाबाई पण त्यांचे बरोबर सती गेल्या. श्रीमंत माधवराव पेशवे यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मध्ये क्षयरोगाने अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:28
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती