@bbcnewsmarathi
@bbcnewsmarathi

BBC News मराठी

हे बीबीसी न्यूज मराठीचं अधिकृत पेज आहे.

"कोल्हापूर मला स्वर्गासारखं वाटलं." तब्बल 80 वर्षांनंतर पोलंडचे नागरिक कोल्हापूरला येऊन भावूक होतात तेव्हा... 👨👩👧👦 दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात आश्रय नाकारला गेल्यानंतर पोलंडच्या नागरिकांना कोल्हापूरच्या संस्थानाने आसरा दिला होता. कोल्हापूरच्या वळिवडे या गावात पोलीश नागरिकांची छावणी उभारण्यात आली होती. 1943 ते 1948 अशी 5 वर्षं महिला आणि लहान मुलांसह 5 हजार पोलंडवासीय इथं रहात होते. त्यामुळं कोल्हापूरशी पोलीश नागरिकांचं भावनिक नातं तयार झालं. 1943 ते 1948 दरम्यान वळिवडे इथं बालपण गेलेले 12 पोलंडचे नागरिक इतर शिष्टमंडळासह 6 दिवसांच्या कोल्हापूर भेटीवर आले होते. वळिवडे गावात पोलंडवासियांच्या त्या काळातील आठवणी जपण्यासाठी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्या स्मृती जपणाऱ्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. तर यावेळी वळिवडे गावात भारतीय पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवत, औक्षण करत आणि फुलांचा वर्षाव करत या फेटेधारी पोलंड नागरिकाचं आदरातिथ्य करण्यात आलं. . . . #poland #history #culture #kolhapur #polish #memories #childhood #gratitude #Indianculture
#

✨सोमवार

✨सोमवार - ShareChat
2.5k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..