
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 महापूजा महावस्त्र श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ अक्कलकोट 22 जानेवारी
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
#✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार भक्तीचे दोन टप्पे प्रत्येक दत्त भक्त अनुभवत असतो . पहिल्या टप्प्यात दत्त महाराज हे तुमच्या मनाजोगे होऊ देतात तर दुसऱ्या टप्प्यात दत्त महाराज हे आपल्या मनाप्रमाणे करतात . आता आपल्या मनाप्रमाणे दत्त महाराज जेव्हा करतात तेव्हा तो उद्धार असतो पण हे पटकन कळून येत नाही . ते कळेपर्यंत बराच काळ लोटलेला असतो . या दोन टप्प्यांचे वर्गीकरण इह आणि पर -पार असेही करता येईल .
दत्त माहात्म्यात हे दोन्ही टप्पे स्पष्ट कळून येतात . कार्तवीर्याचे उदाहरण घ्या किंवा अलर्काचे घ्या किंवा यदूचे घ्या . आधी सर्वाना मनोजोगे सर्व काही मिळालेले आहे . पण दुसरा टप्पा खऱ्या कृपेचा दिसून येतो . यात काय नाहीये ? दर्शन आहे ,सहवास आहे ,उपदेश आणि मार्गदर्शन आहे . ज्यावर इतकी कृपा झाली त्याचा आणखीन काय उद्धार होणे बाकी आहे ? अहो ,जागे असताना स्मरण दुर्लभ आहे ,स्वप्नात देखील ज्याचे दर्शन दुर्लभ आहे असे दत्त महाराज स्वतः उपस्थित होत जेव्हा काही उपदेश करतात तेव्हा काय अवस्था असेल भक्ताची ! त्यातही कार्तवीर्य आणि अलर्काला दत्त महाराजांनी आलिंगन दिलेले आहे . ज्याच्या पादुकांचे दर्शन राजधानीत दुर्लभ आहे अशा दैवताची गळाभेट म्हणजे काय योग असावा ?
आता हे सर्व थोर थोर दत्त भक्त होते आणि त्यांच्या योग्यतेला साजेसे त्यांना दत्त महाराजांनी ज्ञान दिले पण मग आपल्यासारख्या सामान्यांना हा दुसरा टप्पा कसा कळावा . प्रश्न आहे ? दत्त कृपेने सर्व काही क्षेम झाले आणि महाराज या मायेतून बाहेर काढू इच्छित असले कि अनेक गोष्टींची न्यूनता समोर येते .धन व्यय ,आप्त स्वकीयांचा वियोग ,पद आणि अधिकार यांचे नष्ट होणे , लोकापवाद --- वगैरे वगैरे .
धन हानी होताना महाराज म्हणतात ,मी श्रीवल्लभ आहे अर्थात माझ्यासोबत साक्षात लक्ष्मी आहे पण ती चंचल आहे तेव्हा त्या मायेत मला विसरणे किती योग्य आहे ? वियोग होणे हि एक आणखीन दुःखद बाब ,हे सर्व नश्वर आहे अर्थात एक दिवस तुला देखील येथून जायचे आहे हे इथे अधोरेखित होते ,पद आणि अधिकार --- अहो ज्याला मुक्तीचा अधिकार महाराज देऊ इच्छित आहेत त्याने ह्या क्षणिक मायेत का गुरफ़टावे ? या पदापेक्षा दत्त महाराजांच्या पदाची इच्छा धरावी . आणि लोकापवाद हा आणखीन एक पैलू . मला समाजात मान्यता मिळावी किंवा एक स्थान असावे हि सर्वांच्या मनातील धारणा . अहो आपल्याविषयी केवळ एक नकारात्मक गोष्ट ऐकताच जे दूर होतात त्यांची संगती काय म्हणून हवी आहे ? केवळ दत्त महाराजांची संगती योग्य आहे अन्य कोणाचीही नाही .
संकटात ,दुःखात ,अंतकाळी केवळ महाराज सोबत असतात . तेव्हा आपल्या भक्तीचा कोणता टप्पा सुरु आहे हे ओळखा आणि दत्त महाराजांची प्रार्थना करा .
*अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त*
🙏🏻🍃🚩
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #✍️सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार
#✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर









