Mrs.Manjusha ....
ShareChat
click to see wallet page
@manjusha148
manjusha148
Mrs.Manjusha ....
@manjusha148
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #✍️सुविचार
🎭Whatsapp status - मिट्टी कै बने शरीर को यह गुरूर हो चला कपडो पर लगी धूल उसकी शान Mera Mann क्म कर देगी। मिट्टी कै बने शरीर को यह गुरूर हो चला कपडो पर लगी धूल उसकी शान Mera Mann क्म कर देगी। - ShareChat
#✍️सुविचार #🎭Whatsapp status
✍️सुविचार - जो चीज तुम्हें रूलाती है वही तुम्हारा मोह & जो चीज तुम्हें रूलाती है वही तुम्हारा मोह & - ShareChat
आई.... आज अंजलीचा बऱ्याच दिवसांनी फोन आला, "संध्याकाळी भेटायला येते. तुझ्याशी बोलायचं आहे" म्हणाली.... माझं मन भूतकाळात एकदम खूप मागे गेलं. तेव्हा आम्ही पाचवीत शिकत होतो. अंजली, उषा आणि मी, आम्ही तिघी मैत्रिणी. अंजलीची आई बरेच दिवस आजारी होती, आणि नंतर ती गेलीच... तिची आजी गावाकडे असायची. पण सून आजारी असल्याने ती पुण्याला आली. आई गेल्यानंतर अंजलीला फार वाईट वाटले. आम्हालाही... आम्हाला जमेल तसं ऊषा आणि मी तिला सांभाळत होतो. आजी घरी होती. ती प्रेमाने तिचं सारं करायची. हळूहळू अंजली नॉर्मल झाली. परीक्षा, अभ्यास, खेळ, असं नेहमीचं रूटीन सुरू झालं. असेच काही महिने गेले.. आणि एके दिवशी अंजलीने मला आणि उषाला घरी बोलावले. एका कोपऱ्यात नेऊन ती म्हणाली, "आधी देवाची शपथ घ्या.. तुम्ही हे कोणाला सांगणार नाही..." "अगं पण झालं काय ?" रडवेल्या आवाजात ती म्हणाली, "बाबा नवीन आई घेऊन येणार आहेत..." बाप रे, आम्ही हबकलोच... "म्हणजे, तुला आता सावत्र आई येणार ?" "हो ना गं ...." असं म्हणून ती रडायलाच लागली. काय करावं आम्हाला सुचेचना.. सावत्र... या शब्दाशी आमचा कधी संबंधच आला नव्हता.... तेव्हा आमच्या वर्गात कोणालाच सावत्र आई नव्हती... आता आपल्या मैत्रिणीला सावत्र आई येणार... आता तिचं कसं होणार?.. ही चिंता आम्हाला लागली. तिने देवाची शपथ घातली होती त्यामुळे कोणाला सांगता पण येत नव्हते... आमच्या तिघींचं चिमुकलं भावविश्व पार हादरून गेलं होतं... आणि याला काही उपाय आमच्याकडे नव्हता. तिला आता तिची सावत्र आई छळणार... त्रास देणार... तिला मारणार... उपाशी ठेवणार.. वगैरे... असचं आमच्या मनात यायला लागलं. कोणीतरी म्हटलेलं अंजलीनी ऐकलं की.... "आता लग्न केलं नाही तर तीन वर्ष परत करता येत नाही म्हणे." म्हणजे काय, हे पण आम्हाला समजले नाही. दोन दिवस गेले आणि तिची नवी आई आली. आम्हाला प्रचंड उत्सुकता... त्यामुळे आम्ही मुद्दाम वही द्यायचं निमित्त करून तिच्याकडे गेलो. 'तिला' पाहायला... मनात दडपण, भिती होती.. कशी असेल सावत्र आई ? तिच्याशी कसं बोलायचं? पण... नवीन आई इतरांची आई असते तशीच दिसत होती. ती आमच्याशी बोलली. आमची नावं विचारली. ईतकंच नाही तर तिने आम्हाला लाडु खायला दिला. "अंजलीशी खेळायला येत जा" असेही म्हणाली.. आम्हाला कसला अंदाजच येईना.. आमच्या तिघींचा एकच विषय.. नवीन आई... आम्ही अंजलीला अनेक प्रश्न विचारत होतो.. खोटं वाटेल, पण आम्ही तिचा डबा पण तपासून बघत होतो. तो व्यवस्थित असायचा. त्यामुळे आम्हाला जरा बरे वाटले. आता इतर मैत्रिणींनाही हे समजले होते. त्यामुळे त्या पण तिला विचारायच्या.. तिला उत्तर देतांना थोडं अवघडच वाटायचं.... आता लक्षात येतं, त्या कोवळ्या वयात नव्या आईला स्वीकारणं तिला किती जड गेलं असेल... तसेच तिच्या आईचीही अवस्था काय असेल ते आता... या वयात आम्ही समजू शकतो... काही दिवसानंतर ती म्हणाली... "माझ्या अक्षरावरून नवी आई मला आज रागावली. मला रोज शुद्धलेखन काढायला सांगितले आहे." मी म्हटलं, "हो का... यासाठी आई रागावली... मग ठीक आहे..." एकदा ती म्हणाली... "आई सारखा अभ्यास घेते. आई पाढे म्हणून घेते..." "जाऊदे पण मारत नाही ना ?" "नाही गं, मारतबीरत नाही," ती म्हणाली.. आम्हाला जरा बरे वाटले. "अगं माझी पण आई मला अभ्यासावरून रागवते......" ऊषा तीला म्हणाली.. असं होता होता.. अंजली सावरली.. सहामाही परीक्षेत तिला चांगले मार्क मिळाले. बाईंनी तिच्या अक्षराचं कौतुक केलं. दुसरे दिवशी तिने सांगितलं, आई तिच्यासाठी गंमत आणणार आहे बक्षीस म्हणून... मग हळूहळू अंजलीची नव्या आईशी गट्टीच जमली. आधी ती नवी आई म्हणायची, नंतर नुसती 'आई' म्हणायला लागली... काही दिवसांनी तर खऱ्या आईलाही विसरली.... इतकी त्या दोघींची जवळीक झाली. आम्हालाही तिची आई आवडायला लागली. आता वाटतं.. काही शब्दांचं असं असतं की ते ऐकल्यावर आपल्या मनात त्याची प्रतिमा तयार झालेली असते. ती लगेच समोर येते. त्याप्रमाणे आपले मन प्रतिसाद द्यायला लागते .शब्दांचं मनावर एक गारुडच असतं... 'सावत्र' हा शब्द असाच.. आमच्या लहानपणी भीतीदायकच वाटायचा.. त्याची दहशतच वाटायची.. त्यात उत्तानपाद राजा, त्याच्या दोन राण्या, सुरुची आणि सुनीती, आणि ध्रुव बाळ ही कथा प्रत्येकाला माहीत असायची. त्यामुळे सावत्र म्हणजे दुष्ट, त्रासदायक असंच एक चित्र आमच्या मनात होतं.. वय वाढेल तसं.... अर्थात हळूहळू शहाणपण येत जातं.. शब्द आणि त्यांचे अर्थ समजायला लागतात... त्यातला भाव लक्षात येतो. अंजली आली... आज आईच्याच विषयी ती बोलायला आली होती. "तुम्ही दोघींनी मला त्यावेळेस किती आधार दिला गं... तो आता फार जाणवतो. फारच अवघड होती ती वेळ..." "अगं तुझं दु:ख केवढं मोठं होतं हे तेव्हाही आम्हाला समजत होतं." "नीता.. नुकतीच आई गेली. तिने माझं आयुष्य फुलवलं, समृद्ध केलं.... अजून एक खूप फार मोठी गोष्ट तुला सांगायला आज मुद्दाम तुझ्याकडे आलेली आहे ..." हे म्हणतांना अनावर होऊन ती रडायला लागली. रडत रडत म्हणाली, "आई गेल्यानंतर बाबांनी सांगितलं की माझ्यावर अन्याय नको म्हणून आईने तिला स्वतःचं मूल होऊ दिलं नाही...... आणि हे मला कधी सांगायचं नाही असंही तीने बजावलं होतं.. सांग, कसे पांग फेडू गं त्या माऊलीचे नीता...." आम्ही दोघी धाय मोकलून रडत होतो.... कितीतरी वेळ आम्ही हातात हात घेऊन बसलो होतो.. नि:शब्द ... सावत्र - सख्खं असं काही नसतंच.. हे नुसते शब्दांचे खेळ ...आई ही आईच असते.. एवढंच खरं...... ©®नीता चंद्रकांत कुलकर्णी #आई
एका छोट्याशा घरात गरीब मायलेकी राहत होत्या. खूप गरीब होत्या, पण त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा होता. एके रात्री दरवाज्यावर टकटक झाली. मुलीने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. तिने खाली पाहिलं, तर एक चिठ्ठी पडलेली होती. ती उचलून वाचायला लागली, पण वाचताच तिचे हात थरथर कापू लागले. ती घाबरून जोरात ओरडली, “आई! इकडे ये लवकर! बघ ना, यात काय लिहिलंय!” आई पटकन आली आणि चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं — "बेटी, मी उद्या तुझ्या घरी येणार आहे, तुझ्या आणि तुझ्या आईला भेटायला. – देव" आईने चिठ्ठी वाचून हसत म्हणाली, “ही कोणाची मस्करी असावी, कुणीतरी चेष्टा करतंय.” पण मुलीला तो विनोद वाटला नाही. ती म्हणाली, “आई, मला वाटतं हे खरं आहे. मला खात्री आहे देव नक्की येणार.” त्या दोघींनी ठरवलं, घरात पाहुण्यांचं स्वागत उत्तम करायचं. घरात फक्त एक जुनी चटई होती, ती धुऊन नीट पसरली. पण स्वयंपाकघरात काहीच खायला नव्हतं. मग प्रश्न असा... देव आले तर त्यांना काय खाऊ घालायचं? मुलीने आपल्या बचतीतील ₹३०० काढले आणि म्हणाली, “आई, चल काहीतरी चांगलं आणू.” त्या बाजारात गेल्या. बाहेर पाऊस पडण्याची शक्यता होती, म्हणून त्यांनी छत्री आणि शॉल घेतली. बाजारात त्यांनी दूध, मिठाईचा एक डबा आणि थोडं सामान घेतलं — ₹२५० खर्च झाले, ₹५० उरले. दोघी आनंदाने घरी परतू लागल्या, मनात विचार — कदाचित देव आधीच आले असतील. घराजवळ आल्या, तेवढ्यात पाऊस सुरू झाला. रस्त्याच्या कडेला एक गरीब दांपत्य दिसलं — त्यांच्या हातात एक लहान मूल होतं, ते रडत होतं. दोघंही पूर्ण भिजलेले, थंडीने थरथरत होते. मुलीचं मन भरून आलं. तिने रिक्षावाल्याला सांगितलं, “दादा, थोडं थांबा.” ती उतरली आणि पाहिलं — त्या मुलाला ताप होता, आणि त्यांच्या जवळ ना खाणं होतं, ना उबदार कपडे. मुलीने काही क्षणही विचार केला नाही. ती म्हणाली, “देव कधीही येतील, पण यांना असं सोडून देणं पाप आहे.” तिने त्यांना सगळं दिलं — दूध, मिठाई, उरलेले ₹५०, शॉल आणि छत्री. ती म्हणाली, “हे सगळं देवाच्या वतीने आहे. तुम्ही घ्या.” त्या दांपत्याने भरल्या डोळ्यांनी आभार मानले. आई-मुलगी पावसात भिजतच घरी पोहोचल्या. पण घरात कोणीच नव्हतं — फक्त दरवाज्यावर आणखी एक चिठ्ठी पडली होती. मुलीने ती उघडली आणि वाचली — "बेटी, आज तुला भेटून खूप आनंद झाला. तू थोडी अशक्त झाली आहेस, पण अजूनही तितकीच गोड दिसतेस. मिठाईचा स्वाद अप्रतिम होता, शॉलने खूप उब दिली. आणि पावसात दिलेल्या छत्रीसाठी धन्यवाद. पुढच्या वेळी भेटू, तेव्हा सगळं परत देईन." चिट्ठी वाचून मुलीला आश्चर्य वाटलं. ती घराबाहेर पळत गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली. पण कोणीच दिसलं नाही तिला. एवढ्यात तीने चिट्ठीमधील शेवटची ओळ वाचायला घेतली, "मला बाहेर शोधू नकोस, बेटी. मी प्रत्येक ठिकाणी आहे — जिथे पवित्र विचार आणि निःस्वार्थ भाव असेल, तिथेच मी असेन. जेव्हा कुणाला मदत करशील, तेव्हा समज की तु मला भेटलीस." मुलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने आईला सगळं सांगितलं. मायलेकी त्या रात्री झोपूच शकल्या नाहीत — मनात फक्त एक विचार — "आपण गरीब नाही, कारण आपल्याकडे दयाळू मन आहे." 🌸 शिकवण : खरी श्रीमंती पैशात नसते, तर आपल्या कर्मात असते. पैसे आपण या जगात सोडून जातो, पण चांगले कर्म आपल्यासोबतच राहतात. म्हणून आयुष्यात नेहमी प्रयत्न करा की पैशाने नव्हे, तर मनाने आणि कृतीने श्रीमंत व्हा. #मनाचामोठेपणा #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - चिट्ठी वाचताच तिचे हात थरथर कापू लागले. ती घाबरून जोरात ओरडली, 4e _ चिट्ठी वाचताच तिचे हात थरथर कापू लागले. ती घाबरून जोरात ओरडली, 4e _ - ShareChat
आमिर खानच्या तीन लग्नाच्या बातमी पेक्षा हे पुढील पिढी पर्यंत पोहोचले पाहिजे, ही घटना साधारण २१ वर्षांपुर्वीची आहे. जवळपास एक वर्ष उलटले होते. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत: चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला..... पत्रात ते लिहीतात, त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीर मरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच, म्हणजेच ०७/०७/२००० रोजी येत आहे आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे वीरमरण आले ती जागा त्यांना व त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतु या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला. या शूरवीराच्या हुतात्मा दिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांच्या एकुलता एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली. तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खुप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला. शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले... “तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात... तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली ..? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्युट ला प्रतिसाद दिला असता..! ” "नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.” “मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमधील त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही..... ” व तो काही क्षण बोलायचं थांबला ..... शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “मला सांगा... जे काही मनात असेल ते कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा... मी रडणार नाही.....” “मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर... पण मी ही रडायला नको ना ....” तो सैनिक पुढे म्हणाला.... “त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीन गन ने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमचे हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेड च्या इतर सैनिकांची कुमक येण्यात विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते.. !! मग .... ” ...त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला. "पुढे काय झालं..?" शिक्षकाने विचारणा केली... सैनिक पुढे म्हणाला, "मी म्हणालो, "त्यांचा गोळीबार चालूच राहिल... वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही... मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या." मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रू च्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहीले व म्हणाला ‘तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत.... आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,' आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकर च्या दिशेने पळत सुटला." “पाकिस्तानी हेवी मशीन गन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.” “सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर, मी त्यांचे डोके हातात धरले त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. मी आपल्या वरिष्ठांना तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी देण्याची विनंती केली, परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगीरीवर मला पाठविण्यात आले." “कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतीम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहीली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर." आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला. शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मुक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभिर्याने पाहिले आणि सैनिकाने ही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले. शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली, त्याच्या वीर मृत्यूची बातमी..." “आता तो सदरा कोण घालेल... जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा या ठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती, परंतु आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या." त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले. कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते *जय हिंद ।* आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे ......कारगिल हिरोचे नाव: *कॅप्टन विक्रम बत्रा.* हिरोच्या वडिलांचे नाव: *गिरधारी लाल बत्रा.* हिरोच्या आईचे नाव: *कमल कांता.* माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत. या #बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या. Celebrate the Real Activists and not Just Celebrities. #हुतात्मा #कॅप्टन #विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. 🥷 *🇮🇳जय हिंद🇮🇳* 👩‍🎨 _*लेखक- अनामिक.*_ (मुळ इंग्रजी भाषेत असलेल्या या लेखाचा मी केलेला स्वैर अनुवाद. आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता शेअर करा ही विनंती. *मेघःशाम सोनवणे* आमिर खानच्या तीन लग्नाच्या बातमी पेक्षा 🤞हे पुढील पिढी पर्यंत पोहोचले पाहिजे, आपले जिगरबाज सैनिकच खरे हिरो आहेत.. #indian army #indian army
indian army - ShareChat