@pawarspeaks
@pawarspeaks

Sharad Pawar

Official Page of Sharad Pawar,President of Nationalist Congress Party & Former Union Minister. Avid supporter of sports,education,literature & art.

सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अंत:करणापासून आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात प्रचंड कष्ट घेतले, त्यांचेही मी आभार मानतो.  महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापर्यंत चार जागा जिंकल्या आहेत. परभणी, माढा मतदारसंघातील सर्व फेऱ्यांची मतदान मोजणी अद्याप बाकी आहे. या मतदारसंघांबाबत मी आशावादी आहे. लोकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. पराभवाबाबत विचार करू, चिंतन करू आणि लोकांशी संपर्क वाढवू. निवडणूक झाली आहे, निकाल लागले आहेत. पण आता लक्ष दुष्काळाकडे आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत ते पुढेही सुरुच ठेवणार.  #LoksabhaElections2019
#

शरद पवार

शरद पवार - ShareChat
23k जणांनी पाहिले
14 तासांपूर्वी
पिछले कई सालों से हम इफ्तार दावत का आयोजन करते है। आप लोग बडी संख्या मे इकठ्ठा होकर इस रोजा इफ्तार की शान बढाते है इसकी मुझे बडी खुशी होती है।  देश में चुनाव हो चुके है और देश किस राह पर जाऐगा, कौनसे विचारों की सरकार बनेगी ये कुछ दिनों मे पता चलेगा। लेकीन कल से मीडिया के माध्यम से इक अलग महौल तयार किया जा रहा है। कल से कई लोग मुझे संपर्क कर के चिंता व्यक्त कर रहे है। कुछ मीडिया चैनल सत्ताधारी पक्ष के हातों की कठपुतली बन गये है। लेकीन चिंता न करे, कुछ दिनों मे चित्र स्पष्ट होगा। चुनाव होते रहेंगे, सरकारे बनती रहेंगी। सरकार का काम है लोगों के सवाल हल करना, पर आज जिनके हाथों मे सरकार है वो राजधानी छोड कर हिमालय मे जाके बैठे है।   हम यहां भाईचारा बढाने की बात कर रहे है और कुछ लोग अलग संदेश देने की कोशिश कर रहे है। पर देश का माहौल जल्द बदलेगा इसका मुझे विश्वास है। देश मे भाईचारा बरकरार रहे, इसकी मे अल्लाह ताला से दुआ करता हूँ। #Iftar #IftarDinner
#

शरद पवार

शरद पवार - ShareChat
37.4k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यादरम्यान नवगण राजुरी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी आणि पत्रकारांशी संवाद साधला.  आज राज्यात भीषण दुष्काळ आहे, शेतकऱ्यांचं पीक गेलं आहे, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी पाणी नाही, टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही, पुरवठा होणारे पाणी दूषित असल्याने रोगराई होण्याची चिंता आहे, असे अनेक प्रश्न आहेत. राज्यातील शेतमजूर संकटात आहेत, रोजगार हमी योजनेतून काम मिळत नाही. मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून येत्या काही दिवसात भेटीची वेळ मागितली आहे. या सगळ्या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करून हवे ते सहकार्य करण्याची आमची तयारी आहे.   बीड येथील चारा छावण्यांमध्ये काही गैरप्रकार झाला असल्यास सरकारने कारवाई करावी, त्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, पण म्हणून सगळ्या चारा छावण्यांच्या चालकांकडे सरकारने गुन्हेगार म्हणून पाहू नये.  #Maharashtra #Drought #SharadPawar #शरदपवार #दुष्काळ
#

शरद पवार

शरद पवार - ShareChat
27.1k जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
सध्याचे सरकार दुष्काळाची जबाबदारी झटकत असल्याने मे महिना संपत आला तरी जनावरांच्या छावण्या, चारा त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचे नियोजन न केल्याने माण खटावसह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत गंभीर झाली आहे. माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीसी सामना करण्यासाठी राष्ट्रवादी तर्फे दुष्काळी जनतेला मदतीचा हातभार लागावा यासाठी दुष्काळ निवारणासाठी माझ्या खासदार फंडातून दीड कोटी रूपये पाणी चारा या साठी देत आहे.    आज बिजवडी (ता. माण) येथील नागरीकांच्या दुष्काळी अडचणी समजुन घेत त्यावर उपाययोजना कशा प्रकारे करावी लागेल यासाठी थेट संवाद साधला. त्यानंतर शिंदी खुर्द येथील दुष्काळी परिस्थिती व वाँटर कपची सुरु असलेली कामे व मार्डी व भालवडी छावणीची पाहणी करुन छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथून पालवण, वावरहिरे येथे रोजगार हमीतुन सुरु असलेल्या कामावर जावून मजुरांसोबत चर्चा करुन मजुरी व वेळेवर पगार मिळत नाही, सध्याच्या परिस्थितीत हि मजुरी तोकडी पडत असल्याचे मजुरांनी सांगितले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.    म्हसवड येथे बारामती अँग्रो फाऊंडेशनचे अध्यक्ष व पूणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्यावतीने माण तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पंन्नास टँकरचा खर्च करणार आहेत. यातील काही टँकर पाणी टंचाई भागात पाठवण्यात आले.
#

शरद पवार

शरद पवार - ShareChat
46.3k जणांनी पाहिले
11 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..