आणि आयुष्यातील पहिली कविता पहिल्या वेळेस विचारमंचावर सादर...
13 व्या परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलन येवला जि.नाशिक येथे आदरणीय लोककवी प्रशांत दादा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्यांच्या कित्येक कविता अभ्यासक्रमाला असलेले,कित्येक चित्रपटांचे बहारदार गीतं लिहिणारे,कवितेचा महावटवृक्ष आदरणीय कवी प्रकाश होळकर सरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या संमेलनात मान्यवरांच्या,कवींच्या व शब्द प्रेमींच्या पुढ्यात माझी पहिली कविता ठेवली आणि सर्वांनी भरभरून प्रेम दिले.
ती कवी संमेलनाच्या समारोपाची वेळ होती.उशीर झाला होता.आयोजकांनी निवेदक रवींद्र मालुंजकर सरांना 'आता राहिलेल्या कविता कॅन्सल करा!' अस सांगितलं पण सरांनी त्याचं कसब वापरून सर्वांना संधी दिली. मी व माझे मित्र रजनीकांत नवले आपआपला नंबर येण्याची वाट पाहत होतो. आमचा शेवटून दुसरा आणि तिसरा नंबर होता.नवले सर माझ्या कानात म्हणले,"सर आता स्टेजवरील मान्यवर कंटाळलेले आहेत आणि समोरील माणसं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत,आता आपलं खरं कसब लागणार आहे." मी म्हटलं चांगल्या धावपट्टीवर तर कोणीही शतक झळकावेल सर, परिस्थिती बिकट असताना,धावपट्टी चांगली नसताना आणि नऊ विकेट पडलेल्या असतात धावा करणं चांगल्या खेडाळूचं लक्षण आहे.आपण लढू!"
माझं नाव पुकारल्या गेलं.मी विचारमंचावर गेलो. फक्त 30-35 सेकंदच मी माझे शब्द सभागृहातील माणसांच्या कानावर फेकले.आणि शब्द जिंकले.मंचावरील मान्यवर माझ्याकडे बघून माझे शब्द एकाग्रतेने ऐकत होते तर समोरील माणसं पाखराने चोचीत दाणे टिपावे तद्वत माझे शब्द टिपत होते.भरभरून दाद देत होते.
कार्यक्रम संपल्यानंतर प्रशांत दादा मला म्हटले "प्रविण घाई का केलीस?मला तुला अजून ऐकायचं होत."
दादा संयोजकांनी वेळ कमी दिला होता,मी उत्तरलो.
"तरी पण चांगली रचना असल्यावर थांबायचं नसतं वेळ घ्यायचा असतो प्रविण." प्रशांत दादांच्या या शब्दांनी परिवर्त चा विचारमंच नाही तर जग जिंकल्यासारखं वाटतं होतं.ज्या माणसाने आपलं अख्ख आयुष्य शब्दासाठी व कवितेसाठी वाहिलं.जो व्यक्ती तुकोबा सारखं फक्त शब्दांवर प्रेम करतो.ज्यांच्या अंगातून रक्ताचा थेंब जरी पडला तरी तो रक्ताचा थेंब तालात कविताच म्हणेल अस असामान्य व्यक्तिमत्व.ज्यांनी आतापर्यंत लाखो कवींना ऐकलं त्यांचे शब्द काळजात साठवले अन् महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेरले.ज्यांच्या प्रत्येक श्वासात तालबद्ध शब्द आणि फक्त शब्दच आहेत. अशा प्रत्येक श्वासात शब्द जगणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपले शब्द आवडणे यापेक्षा मोठा सन्मान,पुरस्कार कोणता असू शकतो?
सोबतच प्रा.गंगाधर अहिरे सरांनी देखील माझी पाठ थोपटून आशीर्वाद दिला.प्रसंगी डॉ.सुधाकर शेलार सर,कवी लक्ष्मण बारहाते,निवेदनाच विद्यापीठ रविंद्र मालुंजकर सर,कवी संजय आहेर,कवी सोमदत्त मुंजवाडकर,कवी अमोल चिने,कवी गायक शरद शेजवळ,कवी रजनीकांत नवले,निवेदक सुहास सुरळीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रविण वाटोडे
व्याख्याते,लेखक.
मो.9922214407 Pravin Watode
#pravinwatode
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️ #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा
कवी अनंत राऊत
#📝कविता / शायरी/ चारोळी #🌹मराठी शायरी #मैत्री #friend #maitri
मागच्या कोरड्या दुष्काळात
नवऱ्याने गळफास घेतला,
यंदा ओल्या दुष्काळात
पोराने अखेरचा श्वास घेतला.
असा कसा नशिबाला विखारी पावसाळा...?
#🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ #😨मुंबईत कोसळधार पावसामुळे हाहाकार⛈️ #📹पाऊस व्हिडिओ⛈ #🆕ताजे अपडेट्स #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
ओल्या दुष्काळात होरपळतोय माझा मराठवाडा. #⚠️राज्यात पावसाचा हाहाकार⛈️ #🆕ताजे अपडेट्स #😨सावधान! मुंबईला रेड अलर्ट⛈️ #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒
"लिख रहा हूँ मैं अंजाम जिसका कल आगाज़ आएगा… मेरे लहू का हर एक कतरा इंकलाब लाएगा।" इंकलाब जिंदाबाद.
शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा.
प्रविण वाटोडे
व्याख्याते,लेखक.
मो.न.9922214407
#pravinwatode #भगतसिंग #भगत सिंह #bhagat #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
साहित्यरत्न,लोकशाहीर, शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा.
प्रविण वाटोडे
व्याख्याते,लेखक.
मो.9922214407
#अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव #अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा #💐💐🙏🙏लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती 💐💐🙏🙏 #लहुजी वस्ताद साळवे,अण्णा भाऊ साठे,,, #🙏 अण्णा भाऊ साठे जयंती 🙏



