@rahul7385363088
@rahul7385363088

मराठीचे शिलेदार

"मराठीचा अभिमान" 'मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास'👌

#

📝कविता / शायरी/ चारोळी

*♈संकलन, गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धा* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'गुरुवारीय चित्र चारोळी' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*❇ ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗* *🧩विषय : धुक्यात हरवली वाट🧩* *🔹गुरुवार : १९/ सप्टेंबर /२०१९*🔹 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *धुक्यात हरवली वाट.* सरसर बरसती धारा नागमोडी डोंगरघाट सर्वत्र अंधारली धरा धुक्यात हरवली वाट *श्री प्रदीप ना. विघ्ने.* *कळमेश्वर,नागपूर.* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* अंधारुनी पुढती आले धुक्यात हरवली वाट डोळ्यात प्राण आणून बघतेय माऊली वाट *सौ सविता झाडे पिसे* *चिमूर जि चंद्रपूर* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट.* शुभ्रांच्या तोऱ्यात मृगाची जणू धुक्यात हरवली वाट... सरत रजनी अन् गर्भाळून नव आशेची काढली पहाट... *✍अजित जाधव.* *मर्ढे,सातारा.* *©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* नयनरम्य तो सोहळा, आसमंती पहा कसा बहरला, धुक्यात हरवली वाट जणू, स्वर्ग अवणीवर अवतरला. *सौ. अलका सानप,मुंबई,* *© सदस्या,मराठीचे शिलेदार समूह.* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* डोंगर माथा, टपटप धारा धुक्यात हरवली वाट काळे मेघ, झोबंता गारवा हिरवाईने सजला थाट *मनिषा एन खालकर अहमदनगर* *©मराठी शिलेदार समुह सदस्या* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* नयनरम्य दृश्य असे हे ही सृष्टीची किमयाच न्यारी वेड लावी जीवाला ती वाट धुक्यात हरवलेली *सौ मंगल पाटील, नाशिक* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* धुक्यात हरवली वाट माझी नाहीच कळले कसे मला धुसर झाली आता आशा कळेल का एकदा तुला... *✍वृंदा पगडपल्लीवार* *मूल,जि.चंद्रपूर* *©सहप्रशासक/मराठीचे शिलेदार समूह.* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* दिवस असोत सुखाचे वा दुःखाचे मनापासून नाती जपावी लागतात जर धुक्यात हरवली वाट तुझी तर हेच हात तुझ्या मदतीला येतात *✍सौ.ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.* *©सदस्या - मराठीचे शिलेदार समूह.* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* दाट धुक्यात हरवली वाट करित जीवाचा प्रवास हरणे धावती जंगलात शोधती स्वतःची वहीवाट. *सौ सिंधू बोदेले, जालना* *©सदस्य मराठी शिलेदार समूह.* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *धुक्यात हरवली वाट* शिशिराचा आला ऋतू धुक्यात हरवली वाट रस्ताही धुरकट झाला झाली जरी रम्य पहाट *सौ.भारती सावंत, मुंबई* *©मराठीचे शिलेदार समूह सदस्या* 🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹⚜🔹 *📗'गुरुवारीय चित्र चारोळी' स्पर्धेतील वंदनीय विजेत्यांनी सन्मानपत्रासाठी "मुख्य प्रशासक राहुल पाटील" यांना आपले छायाचित्र त्वरीत पाठवून उपकृत करावे* ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 💐 *सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏 ➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻* *✒राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह* ➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖ #📝कविता / शायरी/ चारोळी #💐इतर शुभेच्छा #✨गुरुवार #✨शुक्रवार
5.6k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
➖➖➖➖📗🕊📗➖➖➖➖ *🇮🇳 काव्यांगणात मी....🇮🇳* ➖➖➖➖📗🧩📗➖➖➖➖ "अजाण त्या वाटेवरती जाणकारांची ओळख झाली, शब्दकुंचल्याच्या साह्याने सुगंधीत ती भावमाला ल्याली..." *🚩असाच काहीसा माझा शिलेदार प्रवास आहे. माझ्या एका शिक्षिका भगिणीने मला उपक्रमशिल शिक्षिका म्हणून , आणि माझ्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करुन देणारी शिक्षिका म्हणून राहुलदादास माझी ओळख दिली. लागलीच राहुलदादाने मराठीचे शिलेदार समूह 2 मध्ये सन 2015-16 ला स्थान प्राप्त करुन दिले.* *🇮🇳दादानी लगेच शाळेसाठी घेतलेले उपक्रमाची माहिती एका प्रपत्रात मागितली. माझ्याजवळ शालेय उपक्रम भरपूर होते. पण मोबाईलवर मराठीचे 'म' पण टंकलेखित करता येत नव्हते. दादाचा संदेश बघून मी गोंधळून गेले होते. मी काहीच संदेश न देता आपली उगाच बसले. एक दिवस, दोन दिवस तीन... त्यानंतर दादानी परत एक संदेश टाकला. आपणास काही अडचण असेल तर सांगा. मराठी टंकलेखनासाठी बरेच अॕप आहेत. तेंव्हा मी सेमी इंग्रजीतून माझी समस्या मांडली. त्याच कालावधीत प्रेरणादायी प्रेरणास्थान असणाऱ्या बरेच ताई आपल्या समूहात नित्यनियमाने लेखन करीत होत्या. त्यात मा.स्पृहाताई, अंजिताताई, लीनाताई , सायलीताई , कल्पनाताई दर्जेदार विविध उपक्रमाचे लेखन करत होत्या. मी त्यांचे विविध उपक्रमाचे नित्य वाचन करत होते. आणि माझी मराठीची गाडी 'शकुतंला' रेल्वेसारखी (इंग्रजाच्या काळापासून यवतमाळ जिल्ह्यात आजही लेकुरवाळी म्हणून शकुंतलेस ओळखले जाते.) हळूहळू धावत होती.* *📗स्पर्श मराठीच्या माध्यमातून माझे लेखन आणि उपक्रम सुरु होते. समूहातील इतर ताईचे लेखन बघून मला पण समूहात लेखन करण्याची ईच्छा असल्याचे राहुलदादास सांगितले. आणि इतर प्रेरणास्थान असणाऱ्या ताई दादासारखेच राहुलदादांनी मला माझे स्वतंत्र सदर सुरु करण्यास परवानगी दिली. त्या सदराचे नाव होते 'काव्यसरीता'. बहुतेक मराठीचे शिलेदार या शैक्षणिक समूहातील पहिले वहिले काव्यसदर होते. तेव्हा सोशल मिडीयात कुणीचेही कवितेचे सदर अथवा कवितेचे समूह नव्हते.लगेचच दादांनी मला कविता चारोळी समूह 3 मध्ये समाविष्ट केले. काव्यसरीता सदरात दररोज एक माझी अशा ५१ कविता प्रसिद्ध झाल्या. आणि त्यानंतर मात्र माझ्या लेखनास ग्रहण लागले.* *📗घरातील एका कौटुंबिक समस्येने माझी लेखनी बंद झाली. आणि माझे सदरही बंद झाले. पण काही महिन्यात फक्त मी वाचकच राहिले .पण लेखनी अस्वस्थ बसू देईना आणि समूहात परत दादाच्या प्रेरणेमुळे लेखन सुरु केले. 'लिहते व्हा' या दादाच्या एका वाक्याने माझे लेखन पूर्ववत झाले. आणि आज सप्ताहातील सर्वोत्कृष्ट रचना म्हणून 'मुक्तीसंग्राम' या विषयावरील माझ्या रचनेस मा. परीक्षकांनी निवड केली.त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. मुख्य परीक्षक वैशुताई, सविताताई, सहप्रशासक कल्पनाताई, अशोक दादा, संग्रामदादा व कमलेश दादा यांची कौतुकाची थाप तर आपणा सर्वांना मिळत असते. समूहातील ताई दादांची प्रेरणा माझ्या लेखनीस बळ देते. आपली सर्वांची प्रेरणा सदैव अशीच माझ्या पाठीशी राहो. हि माझी मनिच्छा...!!!*🙏 ➖➖➖➖🙏🇮🇳🙏➖➖➖➖ *✍कवयित्री सौ. सुचिता नाईक नांदेड* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* https://twitter.com/6umraD/status/1174868984392323072?s=19 ➖➖➖➖🙏🇮🇳🙏➖➖➖➖ #📝कविता / शायरी/ चारोळी #✨गुरुवार #💐इतर शुभेच्छा
#

📝कविता / शायरी/ चारोळी

मराठीचे शिलेदार on Twitter
“सर्वोत्कृष्ट रचनाकार कवयित्री सुचिता नाईक,नांदेड”
6k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
➖➖➖➖🏵💞🏵➖➖➖➖ 🥀🔥🥀🔥🥀🔥🥀🔥🥀🔥🥀 *मराठीचे शिलेदार 'चित्र चारोळी' समूहाचा उपक्रम* 🥀🔥🥀🔥🥀🔥🥀🔥🥀🔥🥀 https://chat.whatsapp.com/CkIF3LM1MRGIUsmkNyxX6y ➖➖➖➖🎋💙🎋➖➖➖➖ *🎋दिनांक :- २० सप्टेंबर २०१९🎋* *💙वार :- शुक्रवार 💙* *⭐चित्र चारोळीचा विषय: मुखवटा⭐* ➖➖➖➖🎋💙🎋➖➖➖➖ *🙏कृपया रचना रात्री ९ .०० पर्यंतच पाठवाव्यात...(इतरही चित्र व चारोळीसुद्धा आपण समूहात पाठवू शकता)* 〰〰〰〰🌈🌸🌈〰〰〰〰 *मुख्य समूह प्रशासक* *राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *©मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह* 〰〰〰〰🌈🌸🌈〰〰〰〰 *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* https://www.facebook.com/groups/100274427177019/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #📝कविता / शायरी/ चारोळी
#

📝कविता / शायरी/ चारोळी

📝कविता / शायरी/ चारोळी - 3 : 27 ال . ( 22 ) - ShareChat
143 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
➖➖➖➖🏅👑🏅➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *✍बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धा✍* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔥अजाण वाट🔥* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🌈मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूहात आयोजित १९/०९/२०१९ रोजीच्या 'बुधवारीय काव्यरत्न' स्पर्धेतील विजेत्यांचे संगीतमय प्रमाणपत्र चलचित्र स्वरुपात. खालील लिंकवर टच करुन विजेत्यांसह आपणही पाहू शकता*👇 ➖➖➖💫📺📺💫➖➖➖➖ https://youtu.be/B4w-scdrtA8 ➖➖➖➖🔹🔰🔹➖➖➖➖ *🔖मराठीचे शिलेदार समुहाचे मुख्य प्रशासक, परीक्षक व संकलक*🔖 ➖➖➖➖🔹🔰🔹➖➖➖➖ *🎈१) श्री राहुल पाटील* *🎈२) श्री अशोक लांडगे* *🎈३) सौ वैशाली अंड्रसकर* *🎈४) सौ सविता पाटील ठाकरे* *🎈५) श्री अरविंद उरकुडे* *🎈७) सौ स्पृहा पाटील* ➖➖➖➖🙏💐🙏➖➖➖➖ *📘मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे माफक दरात 'काव्यसंग्रह व चारोळीसंग्रह' काढण्यासाठी मुख्य प्रशासकांशी संपर्क करावा*📘 ➖➖➖➖💐🔰💐➖➖➖➖ *🙏संकल्पना/निर्मिती/सहप्रशासक🙏* *✍अशोक लांडगे* ९५२७३९८३६५ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖🌀🙏🌀➖➖➖➖ #📝कविता / शायरी/ चारोळी #🎼Singing Idol- माय सिंगिंग टॅलेंट #💐इतर शुभेच्छा #✨गुरुवार
#

📝कविता / शायरी/ चारोळी

youtube-preview
5.6k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
*⭐जगणं मांडताना...*⭐ "घेऊनी वादळ खांद्यावरी तुडविते मी अजाण वाट... नशिबाला या वाकवूनी चढते साहित्याचा माळघाट..." *⚜कृत्रिमता नको वाटते. जे लिहायचे ते हृदयातून लिहायचे. शब्द उलट सुलट झाले तरी चालतील; पण हृदयातून आलेले लिहायचे व मनातील भावना व्यक्त करायच्या, मनही हलके होते आणि समोर असणाऱ्या व्यक्तीस मग तो परिक्षक असो, की साहित्यातील दर्दी त्याच्या हृदयात ते उतरणारच.* *🔹हृदयातील ओल असते त्या शब्दांना, हृदयातील भावना अलंकारांनी सजून दुज्या मनाला भूरळ घालते असेच खरेखरे लिहिण्याचा मी सदोदीत प्रयत्न करीत असते.माझ्या हृदयातील सुख दुःखास शिलेदारांनी पाठीवर मायेचा हात देत कौतुकाची थाप दिली आहे. सद्विचारांची पेरणी शिलेदारांच्याच व्यासपीठावर झाली व माझी लेखणी पौर्णिमेच्या चंद्रासारखी खुलत राहिली.* *📗साहित्य क्षेत्रातील या हक्काच्या व्यासपीठावर माझ्या मनाला सदैव आनंद मिळत गेला. मी माझ्या मनाला शिलेदारात येऊन तासं न तास रमवते. जीवनाच्या अजाण वाटेवर भग्न झाले होते. मनातून उद्विग्न अशी अवस्था होती अशा परिस्थितीत शब्दांनी मनातील भावनांना बोलते केले व या भावनांना आधार लाभला शिलेदारांचा. अर्थात समूह प्रशासक राहुल पाटील सरांचा व माझ्या मनातील भावनांना छान वाट मिळाली.* *📗वरील चारोळीतून मनाची अवस्था व शारदेय साथ अशी वास्तववादी चारोळी मी विषयाला अनुसरुन साकारली व या रचनेला परिक्षक समितीने त्या भावना जाणून मान सन्मान दिला यामुळे मन हर्षोल्होसीत झाले.* *✍मुख्य प्रशासक 'राहुल पाटील' सरांचे या अजाण वाटेवर होतअसलेले मार्गदर्शन, वैशालीताईंची मायेची सावली व अशोकदादांची लाखमोलाची साथ या तिघांमुळेच मी साहित्याच्या वाटेवर परिपूर्ण परिपक्व होत चालले आहे, यांच्या या ऋणाईतच सदैव मी राहण्याचा प्रयत्न करेन. या तीनही रत्नाचा लाभ अनेकांनी घेतला. अनेक साहित्यिक, लेखक, कवी याच समूहाने या क्षेत्रास बहाल केले. त्या सर्वांचे शुभाशिष आजही समूहास प्रेरणादायी आहेच. त्यापैकी काही समूहात आजही लिहतात तर काहीनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या कार्यकुशलतेचा प्रवास नेहमीच सुखकर व्हावा अशी आशा व्यक्त करते. यासारखीच माझ्यासारखा पांथस्थाला साथ लाभावी हीच मनोमन सदिच्छा.🙏* ➖➖➖➖⚜💐⚜➖➖➖➖ *✍सौ. सविता पाटील ठाकरे* *कवयित्री/सहप्रशासक/परीक्षक/संकलक/लेखिका* *सिल्वासा,दादरा नगर हवेली* *©मराठीचे शिलेदार समूह* https://twitter.com/6umraD/status/1174640626668724224?s=19 ➖➖➖➖💐⚜💐➖➖➖➖ #📝कविता / शायरी/ चारोळी #💐इतर शुभेच्छा #✨गुरुवार
#

📝कविता / शायरी/ चारोळी

मराठीचे शिलेदार on Twitter
“सर्वोत्कृष्ट चारोळीकार विजेत्या सौ सविता पाटील ठाकरे”
5.8k जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#

📝कविता / शायरी/ चारोळी

*✏संकलन, बुधवारीय 'काव्यरत्न' स्पर्धा* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'बुधवारीय काव्यरत्न' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗* *❤विषय : अजाण वाट❤* *🍂बुधवार : १८/ सप्टेंबर /२०१९*🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *अजाण वाट* कधी सुख तर कधी दुःख जीवन संघर्षाचा सारीपाट ध्येयाच्या पूर्ततेसाठी... निवडावी लागते अजाण वाट निवडली जरी अजाण वाट आत्मविश्वास असावा अंतरी ज्याचे कार्य असे जगावेगळे त्याची कीर्ती पसरे चौफेरी अविरत करता कार्य शक्य असे रे सर्व आज नाही तर उद्या आपुला सोडू नये कधीही धैर्य पचवूनी अपयशाचे घोट चालत राहू अजाण वाट प्रयत्नांची पराकाष्ठा करता नक्कीच उजाडेल यशाची पहाट डगमगू न देता जीवननौका यशोशिखर आम्ही गाठणार निश्चयाच्या महामेरूने संसाररूपी भवसागर तरणार *किशोरकुमार बन्सोड,गोंदिया *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 *अजाण वाट* आली कुण्या दिशेने अन कुठे ही चालली ह्या आयुष्याच्या वळणावर ती अजाण वाट भेटली नेईल कुठे मज अशी वाट दिसते ती काटेरी कि कुणी असेल तिकडे अंथरणारा क्षण सोनेरी जपून टाकते मी अशी हळूच एकेक पाऊल लागेल का कुणाला माझ्या येण्याची चाहूल या अजाण वाटेवरती भेटेल का कुणी असे जो उमटवेल त्याच्या प्रितीचे खोलवर ठसे नेईल का ही अजाण वाट मज प्रेमाच्या सुंदर गावा जेथे वाटेल साऱ्यांना माझ्या प्रितीचा हेवा *सौ वंदना गांगुर्डे, नाशिक* *©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 *अजाण वाट...!* माहित नसते पुढे कशी कोण जाणे वाट कशी आहे अजाण हाती फक्त चालत राहणे लक्षपूर्वक टाकून पाऊले घेऊन अंदाज अजाण वाटेवरती नित्य ठेवावे चालणे.... माहेरावरुन सासरला येता असे अजाण वाटेवरी सासू सासरे नणंद दिर नवी नाते किती तरी अजाण सारी जरी असतील ठेवावी शोधक नजर बुजवायची असते खोल दुरावलेली दरी.... अजाण तुम्ही आम्ही या जगात असेच समाजात अजूनही वावरतो आहोत अजून कधी दुरावा झेलत कधी रागाला पेलत समाजातील सुख दुःख आनंदाने झेलून.... *मा.KVकल्याण राऊतसर* *मराठवाडाप्रदेश लातूर* *©सदस्य मराठी शिलेदार समुह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻 *अजाण वाट* जीवनातली अजाण वाट जपूनच चाल जरा बाई मार्ग हा काट्याकुट्याचा पुढे आहे बघ खोल खाई खाचखळगे येतील बघ कशी चालशील तू वाट एकाकी या मार्गावरती दिसेल वळणावरचा घाट अंधारल्या या वाटेवरून चालताना काटेरी हा मार्ग नको अडखळू पाऊल तुझे लागेल साफल्याचा स्वर्ग गाठ शिखरे त्या वाटेतली परमोच्च अशा या यशाची उमलतील कळ्या मार्गात चिंता नसे तुज कशाची कुस्करलेल्या कळ्यांना सांगावे अनुभवाचे बोल वाहतील चिंता स्वतःची उघडूया स्वार्थाचे हे पोल *सौ.भारती सावंत, मुंबई* *©मराठीचे शिलेदार समूह सदस्या* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 ------- *अजाण वाट* -------- अजाण वाट असूनही गुमान का चालतोस गड्या मेंढरावाणीच मागोमाग खोल गर्तेत मारतोस उड्या डोळे असून आंधळ्यावाणी अंधश्रद्धेची रोज गातोस गाणी जीवंतपणी नाही केलीस सेवा पिंडदानाचा का जपतोस ठेवा अजाण वाट चालण्याआधी जपून टाक पाऊल मंत्र साधा अज्ञानाच्या या अंधकारानेच डोक्याला अविचाराचीच बाधा अजाण वाट चालताना सदा सावज शोधतात स्वार्थी गिधाडं गोड बोलूनच लुटतात घबाड ईमान विकूनच बोलतात लबाड अजाण वाट रे चालण्याची उगीच करू नकोस कधी घाई सावध चाल अजाण वाटेवर स्वार न होता रे बेधुंद लाटेवर *श्री.संग्राम कुमठेकर* *मु.पो.कुमठा (बु.)* *ता.अहमदपूर जि.लातूर* *©सदस्य - मराठीचे शिलेदार समूह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 *अजाण वाट* शालेय जीवन संपल्यावर काँलेजच्या जीवनात पदार्पण होणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असते एक अजाण वाट म्हणून म्हणावं लागतं मुलांनो होऊ नका सैराट काँलेजच्या शिक्षणाचं भावविश्व असतं वेगळं मित्रमैत्रिणीमध्ये रमणं असतं सगळं असतो वेगळ्या पहरावांचा थाटमाट वाढतोय प्रेमप्रकरणाचा थयथयाट या अजाण वाटेवरून चालताना मुलामुलींनो जपून पाऊल टाकावं अजाणतेपणाने होणाऱ्या चुकांना सावधपणे टाळून पुढे चालावं अजाण असतात तुम्ही मुलं प्रेमप्रकरणात नका रमू प्रेमभंगापाई आत्महत्येला प्रवृत्त होऊन तुमच्यासाठी कष्ट करणाऱ्या आईवडिलांच्या डोळ्यात आणू नका अश्रु अजाण वाटेवर चालताना येतील खडतर प्रश्न पूर्ण करा उराशी बाळगलेली आईवडिलांची मोठी स्वप्न करिअर घडवण्याची मनाशी बांधा खुणगाठ येतील कितीही अडथळे जरी असली जरी अजाण वाट *सौ. रेखा बांदल, पुणे* *©सदस्य मराठीचे शिलेदार समुह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 *अजाण वाट* मनी भिती मनाला प्रश्न सतावतो आहे अजाण वाटेवरी गाव तिचे आहे ... होईल का भेट पुन्हा परत तिची आठवणीच्या आश्रूत नाव तिचे आहे ... गुलाबी गाल तिचे , ओठ लाल आहे केस लांब काळेभोर ,हाल माझेच आहे... मनी भिती मनाला प्रश्न सतावतो आहे अजाण वाटेवरी गाव तिचे आहे ... भिती वाटे काजव्याची ,रात अमवस्याची आहे चालताना वाटेवरती ,ओठि नाव तिचे आहे ... विसरलो मी तिला, का ?विसरली ती मला प्रश्न मनामध्ये, पंतगापरी दिव्याभवती फिरतो आहे.. मनी भिती मनाला प्रश्न सतावतो आहे अजाण वाटेवरी गाव तिचे आहे ... दिले वचन तिला जे पाळतो आहे भेट तिची आता मी टाळतो आहे... आठवणीच्या वाटेवरी चालतो एकटाच आहे मेहंदी भरलेल्या हाताचा निरोप आठवतो आहे... मनी भिती मनाला प्रश्न सतावतो आहे अजाण वाटेवरी गाव तिचे आहे ... सोडले गाव जे तिने, ते पुन्हा खुणावते आहे जिर्ण झाले वाडे जे ,आठवण काढत आहे ... अजाण वाटेवरी गाव तिचे नविन आहे ... *विजय शिर्के , औ. बाद* *© सदस्य मराठी शिलेदार समूह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 *अजाण वाट* या अजाण वाटेवर आम्ही देश द्रोहाचे काम करतो दोन वेळच मटन , ऐक वेळची दारू अन राजकारण्या मागे कुत्र्यागत फिरण्याचे काम करतो या अजाण वाटेवर आम्ही देश द्रोहाचे काम करतो दंगलीवादक भाषा तो नेता खुलेआम करतो त्यास आडवा कोन्ही आला तर आम्हीच त्यास घाम फोडतो या अजाण वाटेवर आम्ही देश द्रोहाचे काम करतो यांचा मुलगा हॅलो हाय आमचा च्याआयला म्हणतो टाय कोट मध्ये तो अन आमचा थीगळाच्या चड्डीत फिरतो या अजाण वाटेवर आम्ही देश द्रोहाचे काम करतो रात्रीत पक्ष बदलणारा नेता मैफीलीत त्यांच्या गोड होतो निवडनुकीत आडवा गेलेला आमच्यातलाच कोन्ही त्याचा मात्र आम्ही सुड घेतो या अजाण वाटेवर आम्ही देश द्रोहाचे काम करतो निवडनुक संपते उपासमारीस लागतो चिखलाच्या वाटेहुन चालतांना राजकारण्यांना आम्हीच शीव्या घालतो हाल अपेष्टाचे गऱ्हाणे ऐकमेकास करत असतो या अजाण वाटेवर आम्ही देश द्रोहाचे काम करतो निवडनुक येते आम्ही निष्ठावंत होतो ताफ्या मागे गाड्याच्यां तिसच तेल टाकुन पळतो त्याच वाटेवर आम्ही पुन्हा चालु लागतो या अजाण वाटेवर आम्ही देश द्रोहाचे काम करतो *श्री नितिन तूपलोंढे* *गंगापूर जि. औरंगाबाद* *सदस्य मराठीचे शिलेदार समुह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 *अजाण वाट* मी पांथस्थ पाच दसका पूर्वी मार्गस्थ झालेला अजाण वाटेचा वाटसरू........(१) मी साक्षी ऋतू नक्षत्रांचा तप्त सूर्याचा शितल चांदनाचा महामेरू..........(२) मी सारथी जीवन रथाचा ठेचाळलेल्या भाग्याचा अजाण वाटेचा वाटसरू............(३) मी पाईक या मातीचा शब्द सुमनाचा विश्व कल्याणाचा वाटसरू...........(४) मी भिक्षुक समानतेचा,बंधुप्रेमाचा रंजल्या गांजल्याचा उगवत्या सूर्याचा वाटसरू..............(५) अजाण वाट ही भुकेने आसुसलेली निर्धाराने जोखलेली यशापयशाने सजलेली युगांतराची..............(६) *श्री पैठणकर सर नाशिक* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 *अजाण वाट ...* अजाण वाट आयुष्याची निरंतर मी चालतो .. अंधार दाटला जरी आत्मदीप उजळतो .. वाट सांगे गोष्ट रोज अमाप सुखं येण्याची .. रक्त बंबाळ पावलांनी .. नवी सुखे फुलायची .. नाती इथे बहरती .. स्वार्थाची न लोभाची .. आर्त हाक साद देते माझी मलाच रोजची .. त्याग अऩ समर्पण जीवनाचे सार हे .. वंचिताचे जाण ह्रदय .. घाव नित्य सोसती जे .. आयुष्य म्हणजे काय हे मजला उमगले .. अंतरीचे गुज सारे .. शब्दांत सहज साकारले .. अजाण वाटेचा पांस्थत मी .. रोज नवा जन्मतो .. उगवणाऱ्या सूर्यासवे . नित्य नव्याने प्रकाशतो ... *अभिजीत कोळपे ..पुणे* *सदस्य* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* 🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃🕺🏻🍃 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺 *सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏 ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻* *✒राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ #📝कविता / शायरी/ चारोळी
5.4k जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..