➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय 'बाल' काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना'*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : फुटलेले ढग📘*
*🔸मंगळवार : ३० /सप्टेंबर /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*फुटलेले ढग*
फुटलेले ढग
सैराट सुटले
जिथे मिळेल वाट
तिकडे पळू लागले...१
घर झाडं,
यांच्या झाल्या होड्या
पाण्यावर तरंगू लागल्या
मोटर गाडया...२
शेताचे झाले तळे
पिकं लागले सडू
पाण्यात बुडाले मळे
बाप लागला रडू.....३
थांब ना रे पावसा
तुला देतो पैसा
दप्तर गेलं वाहून
सांग,अभ्यास करु कसा...४
आसमंताला आला पूर
गेला हंगाम घेऊन,
कावराबावरा बाप
आहे मेढीला धरून...५
तुझी परतीची वाट
अशी कशी रे दुखरी
येतो तुंबारा दाटून
तू ओसरून गेला तरी...६
*श्री काशिनाथ पैठणकर(नगरसुल)*
*ता येवला जि नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
फुटलेले ढग दिला
इशारा अतिवृष्टीचा
भयंकर केली हानी
पूर वाहतोय अश्नूचा
कशी पेटेल आता चुल
झोपडीत आलं पाणी
भांडीकुंडी लागली वाहू
मुल बघती केविलवाणी
दप्तरही ओले झाले रडू
लागली निरागस मुले
आईचा जीव टांगणीला
तिचे डोळे पाणावले
सभोवती पाणीच पाणी
परीसर जलमय झाला
तोंडचा घास गेला आता
शेतकरी हतबल झाला
पावसा जा ना रे आतातरी
थांबव तुझा तांडव जीवघेणा
पोहून गेले रे कितीतरी जीव
आम्हावर थोडी तू दया कर ना
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
तू यायचास पावसा जेव्हा,
मी नाचायचो रे किती
तुझं रोद्र रूप पाहून..
आता मनात दाटली भीती
गर्जनेसह आलास..
सोबत घेऊन वादळ वारा
सारं कवेत घेतलंस
अन् मांडलास पसारा
घर, शिवार, दाणापाणी,
सारं भिजून गेले
गोठ्यातले जनावर
बुडून दावणीलाच मेले
दप्तर नाही, पुस्तकं नाही
तू सारं च नेलंस वाहून
बालमन रडते रे
आईला रडतांना पाहून
तू आलास कि मित्रांसवे
भिजून गायचो तुझी गाणी
तू असा घातलास कहर
आमच्या डोळ्यात आणलंस पाणी
तूच शिव फुटलेले ढग
आणि निघ आता परतीला
परमेश्वरास प्रार्थना करतो
बळ दे आईबाबास लढण्याला.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*फुटलेले ढग*
फुटलेले ढग काळे
पाहून वाटते भीती
सिंहासारखी गर्जना
ढग करतात किती....!!
रागात धावली वीज
ओरडली कड कड
गडगड नि कडकड
होईना झोपही धड...!!
जिकडे तिकडे दिसे
समुद्रासारखे पाणी
चला म्हणू आपण
जा रे पावसा गाणी...!!
कळत नाही का रे?
काळ्या ढगा तुला
पाडतोस पाऊस
खेळता येईना मला...!!
रपरप टपटप तुझं
बंद कर रे कायम
संपला पावसाळा
ध्यानात ठेव नियम...!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या - मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
ढग फुटले रे, पाऊस आला,
थेंब थेंबातं खेळ सुरू झाला।
टपोरे मोती झरत झाडांवर,
चला चला बाळांनो धावून बाहेर।
डबकं डबकं पाण्याचं थाळं,
टप टप उडतं थेंबांचं जाळं।
बूट काढून पाय भिजवू,
गाणी म्हणतं नाचू-गाऊ।
काळा ढग रे, गडगडला जोर,
धडाम धूम वाजे आकाशी ढोल।
भीती नको, तो करतो खेळ,
पाऊसचं गाणं गातो बेल।
फुलं हसली, झाडं झुलली,
नदी नाचली, गाणी गुणगुणली।
कानात वारा गुपित सांगतो,
पाऊस पाऊस सगळीकडे रंगतो।
म्हणून बाळांनो, खुशाल हसा,
पावसात नाचा, आनंद लुटा।
फुटलेले ढग हे देतात गाणी,
निसर्गाची रे ही मजेशीर कहाणी।
*महेश पुरसों काणकोणकर*
*कालापूर बांध तिसवाडी गोवा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
सांग सांग भोलानाथ
पाऊस जाईल काय?
फुटलेल्या ढगातून
पाऊस थांबेल काय?
भोलानाथ सारीकडे
पाणी साचले रे
घरा - दारात पुराचे
पाणी गेले रे
शेत-शिवाऱ्याची किती
हानी झाली रे
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून
अश्रू वाही रे
भोलानाथ माझं तू
ऐकशील काय?
पावसाला जायला तू
सांगशील काय?
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
फुटलेले ढग
कोसळले खाली
पाण्याने सारी
धरतीच ओली
वाहून गेली पिके
वाहून गेले जीव
वरूणराजा तुला
येत नाही का कीव?
नदीनाले सर्व
भरलेले दुथडी
शेतक-यावर ही
संकटाची घडी
झाला जीव व्याकुळ
कळेच ना काही
नुकसान झाले खुप
कोण करेल भरपायी?
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
ये रे ये रे पावसा आम्ही कुठं म्हटलं,
तरीही का बरं असं आभाळ फाटलं...
तुझी तर आहे ना जाण्याची ही वेळ,
जायचा तुला लागला नाही का मेळ...
परतीच्या पावसाने थोडं फार पडावं,
मेघगर्जना करून एरवी उग भेडवावं...
तू तर भलतचं मनावर घेतलं वाटतं,
पाहून तुझं रूप,आमचं मन फाटतं...
काळाकुट्ट अंधार पडलेला तो बघून,
भीतीनं आम्ही गेलो किती घाबरून...
फुटलेले ढग जमिनीवर कोसळले,
क्षणार्धात सारे पाणीच पाणी झाले...
ढगफुटी होते,फक्त होती ऐकण्यात,
डोळ्यापुढे घडली,आली पाहण्यात...
घरादारात पाण्यानं भिजला पसारा,
शेतातले पाण्यानं उडाला बोजवारा...
गोदामाई वाहतेय काठोकाठ पाणी,
मायच्या डोळयातलं खंडणा पाणी...
धिर द्यावा आता मायबाप सरकार,
सगळीकुन नका हो करू निराधार...
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
बाबा बाबा मी बघितले
आकाशात फुटलेले ढग
ते होते काळे कुट्ट
वीज करायचे झगमग झगमग
सोसाट्याचा सुटला वारा
विजांचा झाला कडकडाट
धो धो पडू लागला पाऊस
दिसत नव्हती वाट
सारेच मुले घाबरले
इकडे तिकडे पळू लागले
आम्ही थांबलो छपरीत
गेलो मी मित्राच्या छत्रीत
जिकडे तिकडे पाणीच पाणी
दिसत होता समुद्रवाणी
शेतकऱ्याचे पीक गेले वाहत
तो बिचारा बसला पाहत
नदी नाले गेले भरून
पाहत होतो आम्ही दुरून
चिमणी पाखरे झाले हैराण
वाचवू लागले आपली जाण
हळू हळू गेलो घरी
भिजून गेले पुस्तक सारी
आईबाबा आले धावत
बसले मला पाहत
बाबा बाबा शेताचे
झालेजी बरेच नुकसान
शेतकरी बिचारा घाबरला
नाही राहणार एकही धान
कसा हा निसर्ग निर्दयी
विचार करत नसतो कुणाचा
केव्हाही आणतो संकट
करतो आपल्या मनाचा
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*फुटलेले ढग*
रोज रोज बरसून
कंटाळा कां येत नाही
सांग ना रे पावसा
विश्रांती कां घेत नाही..
फुटलेले ढग बघ
भळाभळा कोसळतात
सांग ना रे पावसा
कोणाशी ते लढतात
जिकडे तिकडे भरले
नदी नाल्यात पाणी
सांग ना रे पावसा
कडाडून वीज कशाला गाते गाणी
पाण्याचे तळे माझ्या
शाळेभोवती साचले
सांग ना रे पावसा
अंकांचे पाढे तू नाही कां वाचले
परत जातो सांगूनही
पुन्हा माघारी फिरलास
सांग ना रे पावसा
कां जीवावर बेतलास
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार 'आम्ही बालकवी' काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी