➖➖➖➖✍️⚜️✍️➖➖➖➖
*🚦सोमवारीय 'त्रिवेणी काव्यस्पर्धा*🚦
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*✍️परीक्षणीय मनोगत*
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*🤝"मदतीचा हात, मानवतेला साद"; वृंदा करमरकर*
*〽️सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण*
*🔹मला कालच माझ्या मैत्रिणीने तिच्या माहेरी बार्शीला नुकतीच घडलेली घटना सांगितली. तिथे ढगफुटी झाली. प्रचंड पाऊस अगदी आभाळ फाटल्यासारखा कोसळला. घरात, दारात, शेतात पाणी. कुणाला काही सुचेना. त्यांच्या गोठ्यात गुरे होती. त्यातील एक म्हैस वीत होती. पण अचानक गोठ्यात पाणी घुसले. खांबाला म्हैस बांधली होती. तिला सोडवता तर आलेच नाही, पण ती विणारी म्हैस, पिलू अर्धे बाहेर आलेले, तिला हंबरताही आले नाही. त्या पाण्यात वाहून गेली. काळाचे विक्राळ रूप ऐकले. डोळे अश्रूंनी भरले. करुण घटना. असा मृत्यू यावा त्या अश्राप जीवाला. मन विषण्ण झाले.सर्वत्र थोडीफार अशीच स्थिती आहे.*
*〽️सर्व प्राणीमात्र पृथ्वी,आप, तेज, वायू आणि आकाश या पंच महाभूतांपासून निर्माण झाले आहेत. "जे पिंडी ते ब्रह्मांडी" या उक्तीनुसार, ही पंचमहाभूते सर्व जीवसृष्टीत समान प्रमाणात आढळतात. त्यांचा समतोल राहिल्यास जीवन सुखकर होते. पण जेव्हा यांचा तोल बिघडतो, तेव्हा संकटे ओढवतात.जीवसृष्टी धोक्यात येते. आज आपल्यासमोर ऋतूचक्र बिघडल्याचे स्पष्ट चित्र दिसते. प्रदूषण, जंगलतोड, आणि पर्यावरणीय असंतुलन यामुळे अतीवृष्टी, भूकंप, ढगफुटी,सूर्य लपणे यांसारख्या आपत्ती वाढल्या आहेत. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.बळी राजाची हिरवी स्वप्ने पूर्ण न होता वाहून गेलीआहेत. पूरग्रस्तांचा आकांत,टाहो सर्वत्र निनादत आहे .अशावेळी आपण एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे.*
*🌀मानवी जीवन हे संकटांनी भरलेले आहे. प्रत्येकाला कधी ना कधी मदतीची गरज भासते. अशावेळी आपल्यातील माणुसकी जागवणे अत्यंत आवश्यक आहे. मदतीचा एक हात अनेकांचे आयुष्य वाचवू शकतो.आजारपण,अपघात, भूकंप,त्यात अतिरेकी हल्ले अशा रुपात संकटे फेर धरतात.त्यावेळी आर्थिक, वैद्यकीय, अन्नसामग्री, दिलासा, तत्काळ औषधोपचार अशी मदत गरजेची असते. दुर्दैवाची बाब म्हणजे अनेकदा दुर्घटना घडल्यावर मदती ऐवजी लोक फोटो, व्हिडीओ काढण्यात व्यस्त असतात. समाज माध्यमांवरील लाईक्स व कमेंट्सच्या नादात खरा हेतू हरवतो. ही बघ्याची भूमिका घातक आहे. बघे राहण्यापेक्षा कृती करणे महत्त्वाचे आहे.*
*🙏आपत्तीच्या काळात आपली जबाबदारी ओळखून, आपदग्रस्तांना मदतीचा हात देणे हीच खरी माणुसकी आहे. 'मदतीची भावना हीच आपल्याला खरा माणूस बनवते'. मनामनात मानवतेची ज्योत चेतवून मदतीचा हात देऊन आधार देण्याची गरज आहे. शासनाने सुध्दा वेळ न दवडता त्वरीत या संकटात आर्थिक, वैद्यकीय मदतीचा हात पुढे केला पाहिजे. विश्व बंधुत्वाची भावना मनोमनी जागावी. आपल्या आदरणीय राहुल सरांनी आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी 'मदतीचा हात' हा विषय देऊन एकप्रकारे मानवतेला सादच दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक. सर्व शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.*
➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.वृंदा (चित्रा) करमरकर*
*ता.सांगली,जि.सांगली*
*मुख्य मार्गदर्शक /सहप्रशासक/परीक्षक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
https://marathi.pratilipi.com/story/ #✍🏽 माझ्या लेखणीतून मदतीचा-हात-मानवतेला-साद-वृंदा-करमरकर-pbg6jp4afbkv?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_share
➖➖➖➖✍️📕✍️➖➖➖➖ #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताजी बातमीं