गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
ही सकाळ सुन्न करणारी आहे !💔 राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक आहे.
प्रशासनावर असलेली पकड आणि मिश्किल - स्पष्ट स्वभाव यामुळे अजित दादा लोकप्रिय होते. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
दादा भावपूर्ण श्रद्धांजली ! 😭
#🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३४६ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
कावळ्याने कितीही हंसासारखा चालण्याचा प्रयत्न केला तरी तो हंस होत नाही. त्यामुळेच हे मठाधिशांनो साधूंनो तुम्ही आपले मठ सोडून द्या तो अभिमान सोडून द्या आणि सर्वश्रेष्ठ एक हरीचीच तुम्ही भेट घ्यावी. नाक नसताना नथ घालने म्हणजे उभ्या बाजारात स्वतःची फजिती करून घेतल्या सारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात याकरता मी सांगतो हे साधूजनहो मठाधिश हो कोणीही मी वैरागी आहे, मी ज्ञानी आहे, मी श्रेष्ठ भक्त आहे असा व्यर्थ अभिमान धरून फुंदू नका असा हुकूम मी देवाच्या वतीने तुम्हाला करीत आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२८/०१/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३४५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
मी सर्वात्मक आहे, आत्मरूपाने सर्वत्र व्यापक आहे अशी माझी दृष्टी झाली आहे व ती माझ्यापासून कोण हिराऊन नेइल? असे असले तरीदेखील मला भक्तीचीच आवड आहे आणि भक्तीचाच लाभ मला व्हावा असे मला वाटत आहे. आणि हीच माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अनेक जन्म घेत राहील. तुकाराम महाराज म्हणतात मी प्रत्येक जन्मात देवाची सेवा करीन व त्याला माझा ऋणी करून ठेवीन.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२७/०१/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३४४ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
भक्ताने एकदा तरी सत्य भक्तीचा अनुभव घ्यावा आणि माझ्या स्वामी कडून त्याचा गौरव व्हावा अशीच मी इच्छा करत आहे. सत्य भक्तीचा अनुभव हा अवीट असतो न भांगनारा असतो त्याचा एकदा की विस्तार झाला व खऱ्या भक्तीचे भक्ताला ज्ञान झाले की तो आपले पावले पुन्हा केव्हाही प्रपंचाकडे फिरू देत नाही. केवळ वाणीने भक्तीचा जो गौरव सांगतो त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही ज्याच्या मस्तकावर माझ्या स्वामींचा अभय हस्त असेल तोच खरा भक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी शुद्ध भक्त आहे असे आधीच म्हणून घेण्याची तातडी करू नये तर खरा भक्त तेव्हाच होतो जेव्हा त्याला देवाच्या पायाचा लाभ होतो दर्शन होते.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२६/०१/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३४३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
काही वैष्णव एका बोटाने कपाळाला गंध लावतात परंतु त्याचे मन शुद्ध नसेल तर, त्यांनी विनाकारण वैष्णवांचे सोंग घेतले आहे असेच म्हणावे लागेल. सर्व जग विष्णुमय आहे असे जाणणे म्हणजे खरा वैष्णवांचा हाच धर्म आहे परंतु ज्याला हे वर्म माहित नाही तो वैष्णवच नाही. तुकाराम महाराज म्हणतात खरे तर हे पापच आहे पण मी वैष्णवांची खरे माप करीत आहे व खऱ्या वैष्णवांचे लक्षण सांगत आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२५/०१/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३४२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देव आपल्या स्वयंप्रकाशाने आडवा-उभा या जगामध्ये सर्वत्र दाटून भरलेला आहे. देव एकविध नाही म्हणजे तो सर्वत्र वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या आकाराने व्यापलेला आहे असा जर आपला शुद्ध भक्तिभाव असेल तरच आपल्याला त्याची प्रचिती येते. जीव, जगत आणि देव यामधील भेद अभेद याच्यामध्ये वाद करत बसू नये कारण कितीही वाद केला तरी तो पूर्णत्वास जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात प्रापंचिक व्यवहाराविषयीचे बंधन तुम्ही नाहीसे करा मग तुम्हाला देवाचे यथार्थ ज्ञान होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२४/०१/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३४१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
सतीचे वाण घेणे परिणामी खूप कठीण आहे. कारण त्यासाठी जिवावर उदार व्हावे लागते व तसे केल्यानेच गौरव प्राप्त होतो जर वरवर केवळ दांभिकपणाचे सोंग आणले तर त्यांना गौरव प्राप्त होत नाही. ज्याची दृष्टी युद्ध पाहून व युद्ध करून दृढावलेली आहे त्यानेच युद्धाच्या गोष्टी कराव्यात नाहीतर करू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात कितीही बिकट प्रसंग अंगावर आला तरी आपल्या अंगामध्ये धैर्य पाहिजे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२३/०१/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३४० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवाशी अनन्य असलेली भक्त स्री म्हणते की हे सखयानों जश्या तुम्ही आता माझ्यापासून दूर आहात तशाच दूर रहा. माझ्या अंगी गोपाळ जडला आहे व त्याच्याशी व्याभिचार केल्याचा आळ माझ्यावर आला आहे तसा आळ तुमच्यावर येऊ देऊ नका. तुमच्या भोवती मृत्यू रुपी विक्राळ काळ आहे त्याच्या पासूनच तुमचे तुम्ही रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर माझ्यासारख्या देव वेड्या झालात तर तुम्ही ही माझ्यासारख्या जगात निंदेला पात्र व्हाल (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी सामान्य कोटीतील स्त्रियांना उपरोधिक भाषेमध्ये परमार्थाचा उपदेश केला आहे.)
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२२/०१/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३३९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
एक भक्त स्री देवाशी अनन्य झालेली असते व ती आपल्या मैत्रिणींना म्हणते हे, सख्यानों तुम्हाला बोलायचं असेल तर ते आपल्यापुरतेच मर्यादित बोला माझ्याशी बोलू नका कारण या आनंताने मला त्याच्यात गुंतून टाकले आहे. त्याने माझा पदर धरला आहे त्याला कितीही हिसका दिला तरी तो काही त्याच्या हातून माझा पदर सोडत नाही. तो त्याच्या जवळ जाणाऱ्या माणसाला वेधून टाकून माझा ही जीव त्याने वेधून टाकला असून त्याचेच वेध मला त्याने लावले आहे. अहो तुम्ही जे काही बोलता ते शब्द माझ्यासाठी केवळ कोरड्या गप्पा आहेत मला तर प्रत्यक्ष देवानेच मिठी मारली असून त्याचा अंग संग मला झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हालाही या भक्त स्री प्रमाणे होईल, जेव्हा तुम्हाला देवाचा अनुभव येईल त्यावेळेस तुमची देखील अशीच स्थिती होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२१/०१/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२३३८ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
मी जे काव्य केले आहे ते सहज रीतीने लीला रुपी काव्य केले आहे परंतु ते मी केले नसून केवळ मी त्याचा साक्षी आहे व त्याचा त्याग ही मी करू शकत नाही इतका मला त्या काव्याचा हेवा जडला आहे. हा जो माझ्या वाणीतुन काव्य रुपी उपक्रम चालू आहे तो पहिल्यापासून जे निशब्द असे ब्रम्ह आहे हे त्याचेच निरूपण करीत आहे व कोणत्याही माइक पदार्थाचे वर्णन करण्याच्या बंधनात माझी वाणी पडत नाही. सर्व अंधाराचा नाश सूर्य करतो व त्या सूऱ्याच्या उजडा मध्ये सर्व लोक आपापले व्यवहार करत असतात परंतु सर्वांच्या व्यवहारापासून सूर्य वेगळा राहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काव्य केले आहे त्याविषयी "मी काव्य केले" असा अभिमान माझा केव्हाच गेला आहे आता तो अभिमान केव्हाच परत येणार नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२०/०१/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #😇भक्तांचा शनिदेव #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏