शारदीय नवरात्र
माळ - आठवी
रंग-मोरपंखी
जागर नवरात्री चा !!
देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे.
ॐ महागौरी दैव्ये नमो नम: ॥
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा॥
सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्।।
या देवी सर्वभूतेषु मां महागौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
दुर्गामातेचे आठवे रूप महागौरी. महागौरी देवीने स्वत:च्या पूर्व जन्मात भगवान श्री शंकराला पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती, ही कठोर तपस्या करत असतांना देवीचे शरीर निस्तेज होऊन पूर्ण काळे झाले होते. देवीची कठोर तपस्या बघून भगवान श्री शंकराला तिची दया आली व त्यांनी देवीचे शरीर गंगेच्या पवित्र द्रव्याने स्वच्छ केले त्यामुळे देवीचे शरीर गौरवर्णी दिसू लागली. म्हणूनच देवीला ” महागौरी ” असे संबोधण्यात आले. देवीला चार भुजा आहेत. एका भुजेची अभयमुद्रा, दुस-या भुजेत त्रिशूल, तिस-या भुजेत डमरू तर चौथ्या भुजेची वरमुद्रा आहे. देवीचे वाहन बैल आहे.महागौरी देवी कुमारीका अवस्थेत असल्याचे समजते म्हणुन ह्या देवीच्या पुजनाच्या दिवशी कुमारीकांचे पुजन देखील केले जाते.
आज आठवी माळ..
रंग - मोरपंखी
देवीचे रूप - #महागौरी
#शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 ##शारदीय नवरात्रौत्सव #नवरात्री आठवी माळ रंग मोरपंखी💙 #🌷देवी महागौरी🙏 ##🌹देवी महागौरी🙏
बदलती जीवनशैली आणि आहार हे आपल्या शरीरावर काही घातक परिणाम करत आहेत. दोन्हींचा ताळमेळ राखणं गरजेचे होत चालले आहे. आपल्या हृदयाचे आरोग्य राखणे आपले कर्तव्य आहे. नियमित व्यायाम करा, ताजे आणि योग्य ते अन्न खा, आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या हृदयाची काळजी घ्या.!
#जागतिक ह्दय दिन #❤️ जागतिक हृदय दिवस ❤️ #❤जागतिक हृदय दिवस #जागतिक हृदय ❤️ दिवस #जागतिक हृदय दिवस
शारदीय नवरात्र
।।उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा।।
माळ - सातवी
रंग नारंगी
जागर नवरात्री चा !!
देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे.
ॐ देवी कालरात्र्यै नमः ।।
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता । लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी । । वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा । वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ।।
नवरात्रीच्या सातव्या दिवशी, माता कालरात्रीची पूजा केली जाते. देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे, ज्याला कालरात्री म्हणतात, ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते. शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला. देवी गाढवावर स्वार होते. देवीला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार, त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहे. देवीला प्रसाद म्हणून भक्त गूळ देतात.
आज सातवी माळ..
रंग - नारंगी
देवीचे रूप - #कालरात्री
#देवी कालरात्री #🙏🌷सातवी माळ : रंग-नारंगी👏 ##शारदीय नवरात्रौत्सव #शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #🙏 आज सातवा दिन माता कालरात्री पूजन🪔
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ||
मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित विश्वातील सर्वांत मोठे स्वयंसेवी संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ_स्थापना_दिन
#RSS4Nation
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) #राष्ट्रीय स्वयंसेवक संघ #राष्ट्रीय स्वयंसेवक संघ🚩🇮🇳🚩आर एस एस 🚩 जय श्री राम जय शिवराय🚩🚩🇮🇳🚩 #राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिवस #🚩 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 🚩 #🚩RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
कन्या म्हणजे चैतन्य, घराची अस्मिता.. मुलांपेक्षा मुलींमध्ये नेहमीच सुज्ञपणा फार लवकर येतो.. लहानशी बोबडे बोलणारी कन्या मोठं होऊन सगळ्याच कुटुंबाची काळजी कधी घेऊ लागते ते कळतच नाही...
वात्सल्य, आत्मीयता आणि निस्वार्थ जिव्हाळा हा स्त्रीमध्ये मुळचाच असतो, म्हणूनच स्त्रीला भारतीय संस्कृतीत 'शक्ती स्वरूप' मानले जाते...
' नवरात्रोत्सव व जागतिक कन्या दिन म्हणजे दुग्ध शर्करा योग..' समाजातील प्रत्येक कन्येला निरोगी दीर्घायुष्य लाभावे, प्रत्येक लेकीचे स्वप्न पूर्ण व्हावे हीच सदिच्छा व जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#👸जागतिक कन्या दिन👸 #जागतिक कन्या दिन🧍♀️ #🌍 जागतिक कन्या दिन 👸 #जागतिक कन्या दिन👧 #जागतिक कन्या दिन
भारतीय कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारे हरितक्रांतीचे जनक भारतरत्न, डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
#एस. एस. स्वामीनाथन #स्वामीनाथन पुण्यतिथी #स्वामीनाथन #श्री एम. एस. स्वामीनाथन जी
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे थोर महान क्रांतिकारक भगत सिंग यांचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान खूप मोठे आहे. त्यांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार आणि लिखाणाने देशातील युवा पिढी स्वातंत्र्य चळवळीत उतरण्यासाठी प्रेरित झाली. देशासाठी त्यांनी केलेले सर्वोच्च बलिदान देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. शहीद भगत सिंग यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
#ShaheedBhagatSingh
#शहिद भगतसिंग जयंती💐 #शहीद भगतसिंग जयंती💐 #भगतसिंग जयंती #शहीद भगतसिंग जयंती #शहिद भगतसिंग जयंती
जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे संगीत क्षेत्रातला चिरतरुण आणि अजरामर आवाज. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीत विश्वातील ध्रुवतारा! त्यांच्या दैवी स्वरांनी आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध केले आहे. नानाविध भाषांमध्ये लतादीदींनी गायलेल्या असंख्य गाण्यांच्या माध्यमातून त्या कायमच आपल्यात जिवंत राहतील. गानकोकिळेस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#LataMangeshkar
#latamangeshkarji
#लता मंगेशकर #लता मंगेशकर जयंती #लता मंगेशकर जयंती💐 #🌷लता मंगेशकर जयंती 🎤 #🙏🌷गानसम्राज्ञी लता मंगेशकर जयंती💐
#🌷देवी कात्यायनी🙏
शारदीय नवरात्र
॥ उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा ॥
माळ - सहावी
रंग राखाडी
जागर नवरात्री चा !!
देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे.
ॐ देवी कात्यायन्यै नमः ।।
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना। कात्यायनी शुभं दद्याद् देवीं दानवघातिनी।। कात्यायनी
कात्यायनीचे रूप अत्यंत तेज:पुंज आहे. चार भुजा आहेत. उजव्या हातात वर अभयमुद्रा तर खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. वाहन सिंह आहे. अर्थ, धर्म, काम आणि मोल या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते.
आज सहावी माळ..
रंग - राखाडी
देवीचे रूप - #कात्यायनी
#शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 ##शारदीय नवरात्रौत्सव ##सहावी माळ : आजचा रंग-राखाडी🙏 #देवी कात्यायनी
देशाच्या विकासामध्ये पर्यटनाचे योगदान खूप महत्वाचे आहे. सुदैवाने आपला महाराष्ट्र अशा पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे.
चला आपण हा मौल्यवान ठेवा जतन कार्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी पाऊले उचलू या !
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#जागतिक पर्यटन दिवस #जागतिक पर्यटन दिन 🛩️🛫🛬🛩️ #जागतिक पर्यटन दिन #जागतिक पर्यटन दिन #🧳जागतिक पर्यटन दिवस ✈️