*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३० जानेवारी इ.स.१६४२*
महाराज शहाजी राजे कर्नाटकास जातातमाहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजी राजांना लिहीले आहे.
*३० जानेवारी इ.स.१६८०*
इंग्रज सैन्याने छत्रपती शिवरायांपुढे शरणागती पत्करली.
*३० जानेवारी इ.स.१६८१*
छत्रपती शंभूराजांनी "बुऱ्हाणपूर" शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले.
*३० जानेवारी इ.स.१७१५*
*कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह*
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली.
मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. १७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात
१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.
२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२९ जानेवारी इ.स.१६५७*
बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.
*२९ जानेवारी इ.स.१६६७*
छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या.किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले.
*२९ जानेवारी इ.स.१६७०*
*मराठ्यांचा मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर जवळील "सुलतानगड" वर हल्ला. सुलतानगड स्वराज्यात आला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२८ जानेवारी इ.स.१६४५*
छत्रपती शिवरायांनी रांझ्याचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली.
*२८ जानेवारी इ.स.१६४६*
*छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठी राज्याची राजमुद्रा’ वापरून लिहिलेले पहिले उपलब्ध पत्र.
*२८ जानेवारी इ.स.१६६०*
शहिस्तेखान आपल्या अफ्फाट सैन्यासह स्वराज्यावर चालून यायला निघाला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२७ जानेवारी इ.स.१६५८*
*छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून स्वराज्यात आणला.*
*ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी,*
*जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला.* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#प्रजासत्ताक दिन*
*लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे,घेऊया प्रण हा एक मुखाने.*
26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली, त्याच निमित्ताने प्रजासत्ताक दिन हा भारतातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतो, प्रजासत्ताक म्हणजे 'लोकांद्वारे लोकांसाठी शासन असं ही आपण याला म्हणू शकतो' 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला.
प्रजासत्ताक दिन हा विशेष सण म्हणून साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की हा भारतीय संविधानाचा स्थापना दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा इतिहास खूप रंजक आहे. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.
भारतीय नागरिकांच्या जीवनातील हा एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यामुळे प्रत्येकाला संविधान असण्याचे महत्त्व समजते. भारत देश हा लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखला जातो, भारतात लोकांच्या मतानुसार शासक निवडला जातो.
भारत हा जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. भारत घडविण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली तेव्हा कुठे प्रजासत्ताकाचे हे स्वप्न साकार झाले. आजच्या या पावन दिनी अशा सर्व देशभक्तांना शतशः नमन. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२५ जानेवारी इ.स.१६६४*
सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''.. Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.''
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोतरुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली.
*२५ जानेवारी इ.स.१६६५*
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील एक रत्न, राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.
*२५ जानेवारी इ.स.१६७३*
शिवरायांनी कैदेतील इंग्रज कैद्यांची सुटका केली.
*२५ जानेवारी इ.स.१६८४*
छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते . २५ जानेवारी १६८४ रोजी विसेरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो ….
"आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल ,मोगल निघून गेले तरी देखील संभाजीच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू अधिकारी नाहीत,किल्ले निरुपयोगी झालेत,गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे.द्रव्याची टंचाई आहेच,हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे …. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२४ जानेवारी इ.स.१६६७*
*छत्रपती श्री शिवरायांनी १२ मावळ मधील कानंद खोरे या मावळच्या वतनाचा तंटा मिटवला.मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी*
🚩 *#जय_जिजाऊ*
*#जय_शिवराय*
*#जय_शंभूराजे*🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#म्यानातून_उसळे_तलवारीची_पात*
*#वेडात_मराठे_वीर_दौडले_सात*
छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४ बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.*
छत्रपती शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.*
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
*#दगडात_दिसतील_अजुन्बी_तेथल्या_टाचा ,*
*#ओढ्यात_तरंगे_अजुनी_रंग_रक्ताच* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
छत्रपती शिवरायांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम.
छत्रपती शिवरायांची पहिली आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बिदनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली. स्वताचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमार स्वारी कर्नाटकमधील बिदनूरवर काढली. या मोहीमेकरता मालवण बंदरातून ८५ जहाँजे ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वता या सागरी सेनेचे नेतृत्व केले. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती.
शिवचरित्रात या बसरूर च्या स्वारीचे मोठे ऐतिहासीक महत्व आहे कारण या स्वारीनंतर महाराजांनी कोणत्याही आरमारी मोहिमेचे स्वतः नेतृत्व केलेले इतिहासात नमूद नाही बसरूर ची ही मोहीम शिवचरित्र्यातील पहिली व शेवटची मोहीम ठरली
प्रसिद्ध शिवचरित्राचकार शेजवलकर या मोहीमेचे महत्व सांगताना लिहितात "महाराजांच्या बसरूर च्या एकमेक आरमारी पर्यटनांनंतर पुनः कोणत्याही मराठी राजाने तरवांतून स्वारी केलेली नमूद नाही एकट्या महाराजांचेच लक्ष हिंदी राजांना अपरिचित अशा नूतन संरक्षण साधनाकडे पहिल्याने वळले व त्याचा यथाशक्य उपयोग करून घेण्याची तयारी त्यांनी चालवली यात त्यांच्या मोठेपणाचा एक पैलू दृष्टीस पडतो शिवचरित्र्यातील अफझलखान वध शाहिस्तेखानावरील छापा यांसारखे महाराजांचे प्रसिद्ध पराक्रम सर्वानाच परिचित आहेत त्या मानाने तेवढेच महत्व असणारा सागरांवरील हा पराक्रम उपेक्षित च राहिला #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२१ जानेवारी इ.स.१६६२*
विजापूरच्या आदीलशहाच्या ताब्यात असलेली कोकण कीणारपट्टी स्वराज्यात सामिल करण्याच्या दृष्टीने छत्रपती श्री शिवरायांनी आजच्या दिवशी कोकण स्वारीस प्रारंभ केला होता.
*२१ जानेवारी १६७५*
*छत्रपती श्री शिवरायांनी कुतुब खानाचा पराभव केला*
छत्रपती श्री शिवरायांनी बऱ्हाणपूर,धरणगाव ठाण्याची लुट करून परत रायगडाकडे येत असताना महाराजांना रोखण्यासाठी मोगली सेनापती कुतुब खान चालून आला. पण मराठ्यांचा जोर विलक्षण होता. कुतुब खानाचे ४०० सैनिक ठार झाले. प्राण भयास्तव कुतुब खान व मोगली सैन्य औरंगाबाद कडे पळून गेले.प्रचंड लुट घेऊन महाराज रायगडी परतले.
*२१ जानेवारी इ.स.१७४०*
स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), "..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये"! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.
*२१ जानेवारी इ.स.१७६१*
थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
*२१ जानेवारी इ.स.१८०५*
होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज









![🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिवावच (గ SHIV_vicha_pradischan] shiv vichar pratisthan शिवावच (గ SHIV_vicha_pradischan] shiv vichar pratisthan - ShareChat 🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिवावच (గ SHIV_vicha_pradischan] shiv vichar pratisthan शिवावच (గ SHIV_vicha_pradischan] shiv vichar pratisthan - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_679649_2d1d859d_1769225677553_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=553_sc.jpg)


