*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*७ ऑक्टोबर इ.स.१६७०*
दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर शिवराय परतीच्या मार्गावर निघाले.
दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू.शहजादा मुअज्जमने दाऊदखानाला मराठ्यांना बागलाण-नाशिक येथे अडवण्यास सांगितले.
*७ ऑक्टोबर इ.स.१६८९*
खांदेरीवर कब्जा मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने इंग्रज अधिकारी केज्वीन दाखल झाला.
*७ आॅक्टोबर इ.स.१९३०*
भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ७ आॅक्टोबर १९३० रोजी फाशी सुनावली गेली आणि २३ मार्च १९३१ रोजी दिली गेली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*६ ऑक्टोबर इ.स.१६७४*
छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले.
आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला.
*६ ऑक्टोबर इ.स.१६७६*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
"छत्रपती शिवराय" दक्षिणेतील मोहीमेसाठी आज किल्ले रायगडवरून निघाले.
आजच्या दिवशी दसरा होता.
राजाभिषेक सोहळ्यानंतर प्रथमच महाराजांनी एवढ्या मोठ्या मोहीमेसाठी सिमोल्लंघन केले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
कवि कलश : एकनिष्ठ सेवक
डॉ. कदमांनी कलशाची फितुरीही ध्वनित केली आहे. मराठी कागदपत्रंच नव्हे
तर, खाफीखान, साकी मुस्तैदखान, भीमसेन सक्सेना हे तत्कालीन मोगल दरबारचे
इतिहास-लेखकही कलश फितूर झाले होते हे सांगत नाहीत. खुद्द खाफीखान कवि कलशांचा उल्लेख 'संभाजीच्या शूर सोबती सल्लागारांतील एकनिष्ठ प्रधान' म्हणून करतो. तत्कालीन मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर कलशाच्या फितुरीची
कथा सांगतो; पण त्याचा वृत्तांत या संदर्भात अत्यंत विसंगत व अनैतिहासिक विधानांनी भरलेला आहे. मनुची आणि आमच्या कलशांच्या फितुरीच्या कथा या तर बाजारगप्पाच होत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे - कलश फितूर झाले असते तर त्यांची बक्षिसी त्यास मिळाली असती; औरंगजेबाने त्यांचे असे हालहाल करून त्यास मारले नसते, हा तर्क दुर्लक्ष न करण्यासारखा आहे.सारांश, कवि कलश म्हणजे मंत्र-तंत्र करणारे, शाक्तपंथीय उत्तर प्रदेशी ब्राह्मण, फार फार तर विद्वान पंडित कवी अशी जी प्रतिमा इतिहासात नमूद आहे, ती परिपूर्ण नाही. त्यांचे पांडित्य हा त्याचा मुख्य स्वभावविशेष असला तरी केवळ पांडित्यामुळे ते संभाजीराजेंचे खास सल्लागार होते, असे नाही. त्यांच्याजवळ राजकारणी व प्रशासकीय गुण निश्चितपणे होते. म्हणूनच ते रायगडावरील राजकारणात प्रधानांच्या विरोधातही टिकून राहिले. मराठी राज्याची राजनैतिक बाजू सांभाळून त्यांनी आपले राजनैतिक गुणही सिद्ध केले आहेत. एवढेच नव्हे तर युद्धप्रयत्नांचे संयोजन व प्रत्यक्ष युद्धआघाडी याही क्षेत्रांत त्यांनीने आपली गती उत्तम प्रकारे दाखविली आहे. त्यांच्या अंगी असणाऱ्या या गुणांमुळेच संभाजी महाराजांनी त्यांला आपल्या कारभारातील प्रमुखपण (कुलयेख्तियारी) दिले. अशा प्रकारे मराठी कारभारात कोणाला ना कोणाला तरी प्रमुखपण येथून पुढे मिळत गेले आहे, ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. पुढच्या कालात महाराष्ट्रातील कारभारात रामचंद्रपंत अमात्यांना 'हुकमतपन्हा' म्हणून तर, कर्नाटकातील कारभारात प्रल्हाद निराजीस 'प्रतिनिधी' म्हणून राजाराम महाराजांनी कारभारातील प्रमुखपण दिलेले आहे. ताराबाईच्या कारकिर्दीत मराठी कारभारात त्यांचा खास विश्वासू अधिकारी म्हणून गिरजोजी यादव यास त्यांचा 'दिवाण' म्हणून प्रमुखपण मिळालेले आहे. पुढे शाहू महाराजांच्या काळात भट पेशवे राज्यकारभारप्रमुख बनले.संपूर्ण पेशवाई म्हणजे एक प्रकारची 'कुलयेख्तियारी'च आहे; पण मराठी इतिहासात उपरोक्त व्यक्तींच्या मराठी राज्याच्या कारभारातील 'कुलयेख्तियारी' ची बदनामी केली गेलेली नाही. कवि कलशाच्या कारभारातील प्रमुखपणाची मात्र ती केली गेली, यामागे तो मराठी नव्हते, परप्रांतीय होता, हेच खरे कारण होते.एका अमराठी माणसास मराठी राज्यात एवढे मोठे स्थान मिळावे, ही गोष्ट मराठी नोकरशाहीच्या पचनी पडणे शक्य नव्हते; पण आज तीनशे वर्षांनी या अमराठी माणसाने मराठी राजासाठी व मराठी राज्यासाठी केलेली एकनिष्ठ सेवा, शेवटी आपल्या धन्याबरोबर स्वीकारलेला यातनामय मृत्यू, याबद्दल निदान कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे, हे मराठी माणसाचे कर्तव्य राहील असे वाटते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*४ ऑक्टोबर इ.स.१६७०*
#द्वितीय_सुरत_लुट.
#द्वितीय_दिन.
शिवरायांनी दुसऱ्या दिवशी सुरतला इंग्रजांच्या वखारी लुटून मौल्यवान संपत्ती ताब्यात घेतली.
पाठवलेल्या पत्रानंतर सुद्धा सुभेदाराकडून काहीच उत्तर मिळाले नसल्याने मराठ्यांनी
३ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर असे तब्बल
३ दिवस सुरत लुटली.
इतक्या प्रचंड वेगाने २०००० मराठा फौज सुरतेवर पुन्हा हल्ला करेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटते नव्हते.
पण जे शत्रूला अपेक्षित नसते नेमके तेच करण्यात शिवराय तत्पर होते.
मराठ्यांनी आपला डाव साधला होता.
जिथल्या वेगाने ते सुरतेच्या दिशेने गेले तितक्याच वेगाने लुट घेऊन ते आता परतीच्या मार्गावर निघाले होते.
दख्खनेचा मुघल सेनापती दाऊदखान त्यांना अडवायला रवाना झाला होता.
मराठा फौज बागलाणमध्ये 'वणी-कांचन' येथे पोचल्याची बातमी त्याला मिळाली होती.
दख्खन सुभेदार मुअझ्झमने बाकीखानाला अधिक कुमक आणि रसद घेऊन दाऊदखानाकडे पाठवले तर बाकीखानाची वाट बघणाऱ्या दाऊदखानाने मराठ्यांचा माग काढायला इखलास खानमियाना याला पुढे धाडले होते.
मराठ्यांची १५००० फौज आघाडीला दौडत असताना इखलास खानमियाना याने सेनापती दाऊदखान आणि बाकीखानाची वाट न बघता मराठ्यांवर हल्ला चढवला. अर्थात तो त्याचा मोठाच मूर्खपणा ठरला. तो स्वतः त्याच्या फौजेसकट जबर जखमी झाला.
मराठ्यांनी मुघल फौजेची सरसकट कत्तल चालवली.
काही काळाने दाऊदखान आणि बाकीखान तेथे येऊन पोचले व मुघलांची बहुदा लढाईची कसलीच तयारी झालेली दिसत नव्हती.
मुघल फौजेने मराठा फौजेकडून सपाटून मार खाल्ला.
मुघलांसोबत असणाऱ्या 'बुंदेले' सैन्याने मराठ्यांना कसे बसे रोखून धरले होते. मराठ्यांचे लक्ष देखील लढाई करणे नव्हते. सोबत असलेला 'करोडो'चा खजिना सुखरूप मार्गी लावणे हे त्यांचे प्रथम उदिष्ट्य होते.
संपूर्ण दिवस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार प्रतिष्ठान*
*३ आॅक्टोबर इ.स.१६५७*
"छत्रपती शिवराय" कल्याण भागात पोचले, तिथल्या प्रदेशाचा आढावा घेतला.
*३ आॅक्टोबर इ.स.१६७०*
"द्वितीय सुरत लूट" - प्रथम दिन...
छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा सुरत लुटली. "पेशवे मोरोपंत पिंगळे" आणि "सरनोबत प्रतापराव गुजर" यांच्या समवेत १०,००० घोडदळ व ५००० पायदळ घेऊन दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी पहिल्या सुरत लुटीच्या मार्गानेच आज पोचले.
सुरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर -
"बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे." #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२ आॅक्टोबर इ.स.१६७०*
दुसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी छत्रपती शिवराय १५००० फौजेनिशी सुरतजवळ ५ कोस अंतरावर येऊन पोचले.
*२ आॅक्टोबर इ.स.१८६९*
#राष्ट्रपित_महात्मा_गांधी जयंती.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
*२ आॅक्टोबर इ.स.१९०४*
लालबहादुर शास्त्री जयंती.
लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१ ऑक्टोबर इ.स.१६५७*
शिवराय कल्याणच्या दिशेने रवाना झाले.
*१ ऑक्टोबर १६७३*
छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील भिमाजी पंडीत व इंग्रज अधिकारी जॉन चाईल्ड यांच्यात राजापूर विषयी बोलणी झाली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३० सप्टेंबर इ.स.१६५९*
स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार 'अफजलखान' याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम असणारे "कान्होजी जेधे" यांचे सुपुत्र व छत्रपती श्री शिवरायांचे बालमित्र "शिवाजी जेधे" यांना स्वराज्याच्या विरोधात जाण्यासाठी पत्र पाठवले. पण "शिवाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि महाराजांसमोर मुजरा करण्यास हजर झाले.
*३० सप्टेंबर इ.स.१६७७*
छत्रपती श्री शिवरायांनी मद्रास गव्हर्नरकडे तोफा व इंजिनिअर्सची मागणी केली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२९ सप्टेंबर इ.स.१६८०*
मराठ्यांच्या २०० मावळ्यांचा उंदेरीवर हल्ला.
*२९ सप्टेंबर इ.स.१६३५*
स्वता शहाजहान बादशहा थोरले महाराज साहेब फर्जद शहाजीराजेंचा बीमोड करण्यासाठी निघाला आणि तडक दौलताबादेस आला.
*२९ सप्टेंबर इ.स.१६५७*
छत्रपती शिवरायांनी तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यसाठी पुण्यात गोतसभा भरवली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२८ सप्टेंबर इ.स.१६६६*
आग्र्याहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवरायांनी बाल शंभूराजेंना मथुरेमध्ये एका सुरक्षित ठीकाणी ठेवलं होतं. आजच्या दिवशी मथुरेतील कृष्णाजीपंत आणि काशीपंत बाल शंभूराजेंना घेऊन राजगडावर दाखल झाले. राजगडावर आनंदाला उधान आले.
*२८ सप्टेंबर इ.स.१६७०*
इंग्रजांच्या मुंबई येथील गव्हर्नरने त्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की,
"छत्रपती शिवरायांच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे"
२८ सप्टेंबर १६७० रोजी ३००० फौज सोबत घेऊन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची छत्रपती शिवरायांकडून ३ दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेट पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरु झाली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज