*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२१ जानेवारी इ.स.१६६२*
विजापूरच्या आदीलशहाच्या ताब्यात असलेली कोकण कीणारपट्टी स्वराज्यात सामिल करण्याच्या दृष्टीने छत्रपती श्री शिवरायांनी आजच्या दिवशी कोकण स्वारीस प्रारंभ केला होता.
*२१ जानेवारी १६७५*
*छत्रपती श्री शिवरायांनी कुतुब खानाचा पराभव केला*
छत्रपती श्री शिवरायांनी बऱ्हाणपूर,धरणगाव ठाण्याची लुट करून परत रायगडाकडे येत असताना महाराजांना रोखण्यासाठी मोगली सेनापती कुतुब खान चालून आला. पण मराठ्यांचा जोर विलक्षण होता. कुतुब खानाचे ४०० सैनिक ठार झाले. प्राण भयास्तव कुतुब खान व मोगली सैन्य औरंगाबाद कडे पळून गेले.प्रचंड लुट घेऊन महाराज रायगडी परतले.
*२१ जानेवारी इ.स.१७४०*
स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), "..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये"! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.
*२१ जानेवारी इ.स.१७६१*
थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
*२१ जानेवारी इ.स.१८०५*
होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२० जानेवारी इ.स.१६९६*
*सरसेनापती संताजी घोरपडे नावाचे वादळ*
हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली. सरसेनापती संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः सरसेनापती संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले. हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो सरसेनापती संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले. हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं. हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तामिळनाडू ढवळून निघाले, हाच तो संताजी ज्याचा मर्दुमकीमुळे मोगलांची दोड्डेरीकडे लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगण सोडून पळतोय हिंमतखानाने तडक संताजींचा पाठलाग सुरु केला. मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पळताना पाहिलंचं होतं कुणी तेव्हा? पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती. खान व त्यांचे सैन्य आपल्या कह्यात आल्याबरोबर. संताजी एकाएकी थांबले व पलटी खाऊन त्यांनी लढाईस सुरवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह, घेरले. संताजींचे अनेक बंदूकधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले. आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते. कचाट्यात सापडलेल्या हिंमतखानच्या सैन्याची चांगलीच लांडगेतोड मराठ्यांनी केली. सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान पराक्रमाने लढला. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली. व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण ५०० सैनिक ठार झाले. काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमतखान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याचं दिवशी मरण पावला खुद्द सरसेनापती संताजींना ह्या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे ही लढाई झाली २० जानेवारी १६९६ छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी कावा सरसेनापती संताजींनी पुरेपुर लक्षात ठेवाला. त्याचा वापर केला. आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१९ जानेवारी इ.स.१५९७*
*#महाराणा_प्रताप_यांचा_स्मृतिदिन*
*(जन्म ९ मे १५४०)*
राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहांच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रताप यांना १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. ते महाराणा झाले त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रताप यांनी त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रताप यांना न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापानी आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, महाराणा प्रताप यांचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’ #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१८ जानेवारी इ.स.१६७५*
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आव्हान दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन, प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात,”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे. पुढे शिवरायांच्या निधनानंतर "छत्रपती संभाजी महाराज" यांनी त्या जलदुर्गाचे काम पूर्ण केले. त्यास नाव दिले "किल्ले पद्मदुर्ग".
*१८ जानेवारी इ.स.१६८४*
गोव्यातील मांडवी नदीच्या तोंडावर आग्वाद(अॅग्वाडा) किल्ल्याच्या समोर स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी औरंगजेबचे लढाऊ आरमार धान्य व युद्ध सामग्री घेऊन उभे होते.
*१८ जानेवारी इ.स.१७६१*
नानासाहेबांनी १८ जानेवारी सन १७६१ रोजी माळव्याहून सदाशिवराव भाऊसाहेबांना जे पत्र लिहून पाठवले आहे त्यात ते म्हणतात "अब्दालीस कोंडून धरावे" याचा अर्थ पानिपतवरील घडलेल्या विपरीत घटना नानासाहेबांना कळाल्या नव्हत्या ते त्या काळी शक्यही नव्हते. कारण पानिपत ते माळवा यातील अंतर ६५० किमी आहे.
नानासाहेबांना पानिपतवर घटनेची सांकेतिक बातमी भेलसा येथे दिनांक २४ जानेवारी रोजी समजली. भेलसा पानिपतपासून सुमारे ५६० किलोमीटरवर आहे.
*१८ जानेवारी इ.स.१७६८*
राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होतीआणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले..नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ जानेवारी इ.स.१६४५*
*छत्रपती शिवरायांनी दादाजी नरसप्रभुंना पत्र पाठवले.*
रोहिड व वेलवंड भागाचे कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे शिवरायांबरोबर उठावात सामिल झाले, यामुळे विजापुर दरबाराने त्याना जरबेचे पत्र पाठवले, त्यामुळे हवालदिल झालेल्या दादाजींना छत्रपती शिवरायांनी पत्र पाठवून स्वराज्यात सामिल होण्याचे आवाहन केले.
*१७ जानेवारी इ.स.१६४८*
आदीलशहाने "नवाब मुस्तफाखान" यास हुकूम दिला की,कर्नाटक मध्ये जाऊन त्या बगावतखोर "शहाजी भोसले" ला गिरफ्तार करा.नवाब मुस्तफाखान" आणि "बाजी घोरपडे" प्रचंड फौज घेऊन महाबली शहाजी राजांना कैद करण्यासाठी विजापूरहून "किल्ले जिंजी" कडे निघाले." #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
⛳ *श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा* ⛳
*१६ जानेवारी इ. स.१६८१ रोजी राजे संभाजी महाराज छत्रपती झाले•*
*थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला•*
*१४, १५ व १६ जानेवारी १६८१ (रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले•*
*राज्याभिषेक प्रसंगी पुर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभुराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमुन त्यांना कारभार सांगितला गेला.* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*शिवविचार_प्रतिष्ठान*
*१५ जानेवारी इ.स.१७६८*
अलिजा बहाद्दूर महादजी शिंदेंना सरदारकी बहाल
पानिपतच्या तिसर्या लढाईत दत्ताजी शिंदे,जनकोजी शिंदे यांच्या मृत्युनंतर महादजी शिंदे यांना १५ जानेवारी १७६८ या दिवशी सरदारकी मिळाली, ते उज्जैनचे जहागीरदार बनले आणि त्यांना सरंजामी नेमणूकही मिळाली.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि ज्यांनी तिच्यावर कळस चढवला ते महादजी शिंदे,ज्यांच्याबद्दल कसल्याहि प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, काटकसरी, कृष्णभक्त, सुदृढ, मध्यम उंचीचा, काळासांवळा, साध्या रहाणीचा, कवि, परधर्मसहिष्णु, शकुनादिकांवर भरंवसा ठेवणारा, त्यावेळच्या मानानें सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा होते म्हटले जाते .
महादजी शिंदेचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. ग्वाल्हेरच्या या सिंहात असामान्य शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण होते. त्यांच्या कतुर्त्वामुळे इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जात. पानिपतची लढाई, वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसर्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. अस्थिर अशा मराठा साम्राज्याला महादजींमुळे स्थैर्य लाभले. मुघल, इंग्रज आणि आप्तस्वकीयांच्या विरुद्ध ते आजन्म लढले .
*१५ जानेवारी इ.स.१९१९*
कोल्हापूरचे"राजर्षि शाहू महाराज" यांनी आदेश काढुन स्प्रुश्य-अस्प्रुश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था करुन दीली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१४ जानेवारी इ.स.१७६१*
*#मराठा_शौर्यदिन -* *#पानिपतची_तिसरी_लढाई*
*हाच तो दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती. सदाशिवराव पेशेव, विश्वासराव, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, समशेर बहाद्दर, इब्राहिमखान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले.१४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.*
*पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठे जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर त्याचवेळी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता.पण असे घडले नाही .पानिपतची लढाईमुळे मराठी मानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.*
*पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतिक आहे, मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे ,"बचेंगे तो और लढेंगे " असे म्हणणारे दत्ताजी शिंदे पानिपत युद्धाच्या आधी शहीद झाले पण त्या वाक्यातून छत्रपतींचे स्वराज्य राखण्या वेळीचे सूत्र मात्र दिसून येते*
*"पानिपत १७६१" मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात," पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले."*
*गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात*
*कौरव - पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !*
*तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !!*
*पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेलायाची गणना नाही ...!!" तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे,मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१३ जानेवारी इ.स.१६८०*
छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांची पन्हाळा या गडावर ऐतिहासिक भेट
*१३ जानेवारी इ.स.१७०९ किंवा १७१०*
छत्रपति शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नरवीर जीवाजी महाले (संकपाळ) यांचा पुण्यदिन आहे.
जीवाजी महाले हे अफज़ल खानला जेंव्हा राजे भेटीला गेले तेंव्हा त्यांच्यासोबत जे दोन अंगरक्षक होते त्यातील एक म्हणजे जीवाजी महाले आणि दुसरे संभाजी कावजी कोंढाळकर
जेंव्हा अफज़ल चा कोथला शिवरायांनी बाहर काढला तेंव्हा खानाचा अंगरक्षक सयाद्द बंडा हा राजांच्या अंगावर राजे बेसावध असताना धावून आला तेंव्हा त्या सयाद्द बंडाला धरतीवर कायमचा झोपविनारा वीर म्हणजे जीवाजी महाले... अरे म्हणतात ना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी...
तर अश्या नरवीर जीवाजी महाले यांच्या पुण्यदिनांनिमित्य विन्रंम आभिवादंन... ! #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१२ जानेवारी इ.स.१५९८* *#राजमाता_जिजाऊ_जन्मोत्सव*
*१२ जानेवारी या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि* *स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड*
*राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती*
*स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली.*
*आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.*
*या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. *स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले.*
*स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला. जिजाऊच्या नव्हे तर कुणाच्या आशीर्वादाने.* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज











