Sachin
ShareChat
click to see wallet page
@schn30
schn30
Sachin
@schn30
जय भवानी जय शिवाजी
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१५ ऑक्टोबर इ.स.१६४९* *छत्रपती शिवराय किल्ले पुरंदरावर आले. *१५ ऑक्टोबर इ.स.१६७९* खांदेरीजवळ कॅप्टन रिचर्ड केग्वीन आरमारासह नांगर टाकून सज्ज होता व ज्या गोष्टीची तो वाट पहात होता ती गोष्ट अखेर घडली.१५ ऑक्टोबर रोजी त्याला सुमारे ३५ नौकांचे मराठी आरमार खांदेरीच्या दिशेने येताना दिसले. ते दिसताच केग्वीन ने नांगर उचलले आणि तो युद्धाची तयारी करू लागला परंतु मराठी आरमार पुढे आलेच नाही उलट त्यांना इंग्रज आरमार दिसताच ते पुन्हा मागे फिरले आणि थळ जवळील उथळ समुद्रात नांगर टाकून थांबले. केग्वीन आता गोंधळात पडला त्याला नेमके काय करावे हे सुचेना त्यामुळे तो पुन्हा नांगर टाकून उभा राहिला. १६ तारखेला मराठ्यांच्या आरमारातील नागावच्या खाडीत शिरल्या. इंग्रज नौका काही काळ जाऊन मराठी नौकांवर गोळीबार करत असत परंतु भूमीवर गोळीच्या टप्प्यात येत नसल्या कारणे त्यांना पुन्हा मागे फिरावे लागत असत. मराठ्यांचे आरमार खांदेरीच्या आसमंतात आल्यामुळे एक गोष्ट मात्र घडली की इंग्रज नौकांना आता एकत्र राहणे भाग पडत होते कारण तसे न केल्यास मराठी आरमार एका जहाजाच्या मागे लागून ते जहाज पळवून नेऊ शकले असते. अशा रीतीने इंग्रजी नौका एकत्र आल्यामुळे खांदेरीची नाकेबंदी मात्र ढिली पडली आणि मराठ्यांच्या छोट्या होड्या त्यांना आश्चर्यकारक रित्या चकवून खांदेरीला पुरवठा करू लागल्या. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - RKR प्रतिष्छान 99 RKR प्रतिष्छान 99 - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१४ आॅक्टोबर इ.स.१६४३* बहादुरशाह (पहिला) मोगल सम्राटचा जन्म *१४ ऑक्टोबर इ.स.१६७३* *११ ऑक्टोबर ला बंकापुर मोहिमेस निघालेले छत्रपती शिवराय सातारा येथे मुक्कामी. *१४ आॅक्टोबर इ.स.१८४७* महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होते. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.* *(जन्म: १८ जानेवारी १७९३)* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिवविचार पतिष्ठान शिवविचार पतिष्ठान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१३ ऑक्टोबर इ.स.१६७३* *मराठ्यांनी वाई नजिकचा पांडवगड जिंकला. बाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला. *१३ आॅक्टोबर इ.स.१२४०* *रझिया सुलतान – दिल्ली तख्तावर राज्य करणारी पहिली महिला रजिया सुलतान हिचा मृत्यू झाला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - बिररविशर TIKaG & 8 बिररविशर TIKaG & 8 - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१२ ऑक्टोबर इ.स.१६७३* वाई जवळील पांडवगड किल्ल्यावर मराठा फौजेने हल्ला चढवला. *१२ ऑक्टोबर इ.स.१६८७* *औरंगजेब समोर बादशहा कुतुबशहा शरण आला. *१२ ऑक्टोबर इ.स.१७०७* खेड भागात सातारा संस्थानचे शाहूराजे व कोल्हापूर संस्थानच्या महाराणी ताराराणी यांच्यात युध्द झाले,त्या युद्धात महाराणी ताराबाई राणींचा पराभव झाला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - RKK प्रतिष्ान RKK प्रतिष्ान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *११ ऑक्टोबर इ.स.१६७३* *खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवरायांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. *११ ऑक्टोबर इ.स.१६७३* छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - J ऐिववियाए प्रतिष्ठान ऑक्टोबर इ.स.1६७३' *11 " बंकापूर छत्रपती शिवरायांनी वर चढाई केली. J ऐिववियाए प्रतिष्ठान ऑक्टोबर इ.स.1६७३' *11 " बंकापूर छत्रपती शिवरायांनी वर चढाई केली. - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१० ऑक्टोबर इ.स.१६६४* *छत्रपती शिवरायांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले..आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवरायांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवरायांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती.. *१० ऑक्टोबर इ.स.१६७५* शिवरायांनी किल्ले सिंहगडवर सुभा कचेरीत गोतसभा बोलवली. या गोतसभेला गडाखालील ३४ गावातील कारभारी पाटील मसलतीसाठी हजर झाले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - 8 ~ RKU पतिष्ठान *103آ033[.31664* *छत्रपती शिवरार्यांनीबघीगयपडेला @EECEuEugమo 8 ~ RKU पतिष्ठान *103آ033[.31664* *छत्रपती शिवरार्यांनीबघीगयपडेला @EECEuEugమo - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *जिवाजी महाला* *होता जिवा म्हणून वाचला शिवा*' *९ आॅक्टोबर इ.स.१६३५* शिवरक्षक जिवा महाले यांची आज जयंती. प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म ९ ऑक्टोबर १६३५ रोजी झाला. आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. स्वतःच्या जीवावर उदार होत ज्यांनी शिवरायांचा जीव वाचवला होता, महाराजांवर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला ज्याने यमसदनाला पाठवला आणि इतिहासात ज्याचा पराक्रम 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' या म्हणीने नोंदवला गेला त्या जीवा महालाची दखल भारतीय टपाल खात्याने घेतली असून 'वीर जिवाजी महाला - शिवरायांचे अंगरक्षक' या नावाने पोस्टाचे विशेष पाकिट प्रकाशित केले आहे. जीवा महाला ...जिवबा महाला यांच्याबद्दल न जाणणारा असा कोण आहे ज्याला माहिती नाही, श्री शिवछत्रपतींच्या प्रमुख मावळ्यापैकी एक असे हे जीवा महाला !! या मावळ्याचे संपूर्ण नाव म्हणजे जिवबा महाला संकपाळ असे होय, प्रतापगडावरील महाराजांचा पराक्रम तर सर्वश्रुतच आहे त्यामुळे मी तुम्हाला त्या पराक्रमाचे विश्लेषण सांगण्यापेक्षा इथे प्रेषित असलेल्या जिवबा महाला यांच्याबद्दल सभासद बखरीत असलेले प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन आणि जिवबा महाला यांचा पराक्रम सांगत अर्थात देत आहे :- छत्रपतींनी उजवे हातचे बिचव्याचा मारा चालवून खानची चरबी बाहेर काढली व चौथरीयाखाले उडी मारून निघुन गेले..इतक्यात सैदबंडा पटाईत धावला, त्याने राजे जवळ केले, पट्ट्याचे वार राज्यांवरी चालविले.तो शिवराय जिवा महाला जवळील आपला हुद्दीयाचा पट्टा घेऊन, पट्टा व बीचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले. पांचवे हाताने राजियास मारांवे तो इतकीयात जिवा महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैद्बंडीयास वार केला. तो पट्टीयाचा हात हत्यार समेत तोडीला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिवा महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.”आणि याच प्रतापगडावरील पराक्रमामुळे “होता जीवा म्हणून वाचला शिवा” अशी उक्ती प्रचलित झाली. अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा.. छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील एका निष्ठावंत मावळ्याची दखल घेण्याची ही घटना पोस्टाच्या आणि देशाच्याही इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे जिवा महालाच्या पराक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. प्रतागपगडावर महाराजांनी गाजवलेला पराक्रम तर सर्वश्रुत आहेच पण, त्या पराक्रमाची गोष्ट ज्याच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही असा महाराजांचा अत्यंत विश्वासू , शूर अंगरक्षक म्हणजे जिवा महाला. पण तो इतिहासाच्या पुस्तकातच राहिला. आजही प्रतापगडावर कुठेही जिवा महालाच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारी शिळा नाही की स्मारक नाही. जिवा महालाने हातातील ज्या दांडपट्याने सय्यद बंडावर वार केला होता त्या दांडपट्टाचे रेखांकीत चित्रही पाकिटाच्या एका बाजूस काढण्यात आले असून 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' ही म्हण सुद्धा या पाकिटावर हिंदी आणि इंग्रजीत लिहिण्यात आली आहे. यामुळे महाराजांच्या एका शूर अंगरक्षकाची ओळख देशाला होईल अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली….अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा.. धन्य ते शिवराय आणि धन्य ते शिवरायांचे मावळे. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - (JIRITT IKadె Qa z@@ (JIRITT IKadె Qa z@@ - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *८ ऑक्टोबर इ.स.१६६८* विजापूरच्या आदिलशहाने छत्रपती शिवरायांबरोबर तह केला. *८ ऑक्टोबर इ.स.१६७९* केग्वीन खांदेरीला पोचला. मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा. आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - whoain FKKA Saa *8 ऑक्टोबर इ.स.1668* विजापूरच्या आदिलथहाने छत्रपती शिवरायांबरोबर तह Wodly I whoain FKKA Saa *8 ऑक्टोबर इ.स.1668* विजापूरच्या आदिलथहाने छत्रपती शिवरायांबरोबर तह Wodly I - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *७ ऑक्टोबर इ.स.१६७०* दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर शिवराय परतीच्या मार्गावर निघाले. दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू.शहजादा मुअज्जमने दाऊदखानाला मराठ्यांना बागलाण-नाशिक येथे अडवण्यास सांगितले. *७ ऑक्टोबर इ.स.१६८९* खांदेरीवर कब्जा मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने इंग्रज अधिकारी केज्वीन दाखल झाला. *७ आॅक्टोबर इ.स.१९३०* भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ७ आॅक्टोबर १९३० रोजी फाशी सुनावली गेली आणि २३ मार्च १९३१ रोजी दिली गेली. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - FKKAF प्रतिष्ठान *७ ऑक्टोबर इ.स.1670* दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर थिवराय परतीच्या मार्गावर निघाले FKKAF प्रतिष्ठान *७ ऑक्टोबर इ.स.1670* दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर थिवराय परतीच्या मार्गावर निघाले - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *६ ऑक्टोबर इ.स.१६७४* छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले. आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. *६ ऑक्टोबर इ.स.१६७६* "दक्षिण दिग्विजय मोहीम" "छत्रपती शिवराय" दक्षिणेतील मोहीमेसाठी आज किल्ले रायगडवरून निघाले. आजच्या दिवशी दसरा होता. राजाभिषेक सोहळ्यानंतर प्रथमच महाराजांनी एवढ्या मोठ्या मोहीमेसाठी सिमोल्लंघन केले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिवविचार হনিগত @೦- शिवविचार হনিগত @೦- - ShareChat