Video: भर कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी रॅपरने फडकावला भारताचा झेंडा
Viral Video: पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने भारतीय झेंडा फडकावला, ज्यामुळे सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू झाली. काहींनी त्याच्या वर्तनाची प्रशंसा केली, तर काहींनी पाकिस्तानचा अपमान केल्याचा आरोप केला. वाद वाढल्यानंतर रॅपरने भारतीय झेंडा फडकावण्याचे कारण सांगितले आहे.