लावणीचे दिवस
बालपणापासून गावाकडच्या अनेक आठवणी मनात रुतल्या आहेत. वयाची 18 वर्षे गावीच गेली.त्यामुळे मुंबईत वावरत असलो तरी गावच्या लाल मातीत पंचप्राण गुंतलेले असतात. या दिवसात पाऊस धोधो पडत असतो.मृग आद्रा संपत पुढे पुनर्वसू नक्षत्र सुरु होते. पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राला आम्ही तरणा आणि म्हातारा म्हणतो .पाऊस खळं करीत नाही.आमची सुख आणि करूळ या दोन्ही नद्या रांत्रदिवस कोकलत असतात.या दिवसात घरात कोण थांबत नाही.शाळा सांभाळून शेती करावी लागते.माणसांनी शेते भरलेली असतात. सोनाळी गावातील शेतात जाताना नदी ओलांडण्या साठी बांबूच्या साकवावरून जाताना कसरत करावी लागते. जोते मळ्यात नांगरत असतात.या दिवसात मुलखाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या दिवसात शेतात सकाळची रुचकर न्याहारी आणि दुपारच डाळ भात साधं जेवण अमृतापेक्षा गोड लागते.उखळ, दुढ ,तास सुरु असते.तरवा काढून झाल्यावर चिखलात भात लावणी सुरु होते.अंगाला लागलेली माती आणि लाल चिखल त्यातून एक रसिक सौंदर्य दिसते .भात लावणीतून एक महिना कोणाला पूरसद नसते
भातशेतीने मळे हिरवे गार दिसतात.जणू हिरव्या पोपटी पैठणीच्या साडी सारखे .सगळीकडे हिरवे गालिचे दिसतात. निरुंद लाल पाय वाटा .दुडदुडणारे पाण्याचे झरे,खेळोमेळीने सोबत दिसणारे अळू नि करड,कारफिले आजूबाजूचे भात हिरवे गार शेतीचे मळे पहायला मिळतात.भात माळ्यांची लागवड केली कि ते पाण्याने तुंबवून ठेवतो.जणू काही एकप्रकारे जलसंधारण म्हणावे लागेल.
या दिवसातील ही बिन वासाची फुले जागो जागी फुलतात पण त्याचबरोबर सौंदर्याकित दिसतात .असा सृष्टी सौंदर्याचा मनोहर नमुना मुलखात दृष्टीस पडतो.
वर्षाची बेगमीची तरतूद करण्यासाठी एक प्रचंड उत्साह,धडपड, असते.त्या आठवणी आजही जाग्या करतात.
.🥰🥰🥰🙏❤️ #🌳निसर्ग फोटोग्राफी #🌳निसर्ग फोटो #📸 माझी फोटोग्राफी