देशातील या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा तर महाराष्ट्रात २४ तासांत १० जणांचा मृत्यू
हवामान विभागाने महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा जारी केला आहे. माघारी परतणारा मान्सून मध्य प्रदेश ते बिहार आणि गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील बहुतेक भागात कहर करत आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. - Heavy rain warning issued in many states for the next two to three days