Rani Chavan
4K views • 1 months ago
"अनुराग........ आपण इकडे कुठे आलोय.....???"
"अनु........ प्लिज बोल ना रे काहीतरी.......... अनुssssss........ काय झालं तुला...... तु असा गप्प का आहेस?????"
"अनुssssss.......... मी तुझ्याशी बोलतेय???" तिने आता त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालुन विचारलं......
त्याने नजर चोरत दुसरीकडे पाहिलं.......
आत्ता ते दोघे एका नदीच्या पुलावर होते, पावसाळी दिवस असल्यामुळे पुला खालून वाहणारी नदी दुथडी भरून वाहत होती.... वेगाचे वारे वाहत होते.... ज्या मुळे तिचे केस वाऱ्यावर भुरभूर उडत होते...... ती आपले केस सावरत त्याला प्रश्न करत होती, पण तो मात्र तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता पुढे झपझप पाऊल टाकत होता....
"अनुराग जाहागीरदार......... काय चालूय तुझ्या मनात मला कळेल का????? आपण पोलीस स्टेशनं मध्ये जाणार होतो....... मग तु मला इकडे का घेऊन आला आहेस सांगशील का????" ती आत्ता त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत त्याच्या समोर उभी राहून त्याला विचारत होती.....
त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तसाच ताड ताड पाऊल टाकत पुढे चालू लागला... ती त्याच्या मागुन तितक्याच स्पीड मध्ये चालत होती.... त्याला प्रश्न करत होती..... तिच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता............
शेवटी पुन्हा एकदा तिने त्याला गाठलं आणि आता त्याचा हात पकडला.....
"अनु............ प्लिज..... तु तरी मला समजुन घे..... तु तु तरी मला साथ दे..,........." तिच्या डोळ्यात वेदना होती... तडप होती......
त्याने मात्र एकवेळ तिच्याकडे पाहिलं आणि नंतर आपली नजर त्या उसळणाऱ्या नदीच्या पात्रा कडे वळवली........
"अनुराग..... मी तुला लास्टच विचारतेय....... तु जरी माझ्या सोबत नसलास तरी मला काहीच फरक नाही पडत........ मी मी तिला न्याय मिळऊन देईन.......... पण एक लक्षात ठेव मी त्या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिल्या शिवाय शांत बसणार नाही...." ती त्याच्या नजरेत पाहुन ठाम पणे बोलत होती.....
त्याचं वेळी त्याने तिचा हात पकडला आणि तिला नदीच्या पुलाच्या कठड्या जवळ घेऊन आला..... ती मात्र त्याच्या नजरेत बघत होती.....
खुप वेळ पाहुन पण आत्ता त्याच्या नजरेतले भाव तिला कळत नव्हते.....
"अनु.......... तु तु बोल ना काहीतरी.......... तु तु मला साथ देशील ना या न्यायाच्या लढाईत..... प्लिज बोल ना रे काहीतरी...." तिची पाट पाठीमागच्या कठड्याला टेकली होती......... आणि ती त्याचा हात हातात घेऊन पुन्हा पुन्हा आपल्या निर्णयात त्याची साथ मागत होती...........
"प्रीती....आय...... आय......... आय एम सॉरी.......
प्लिज म मम्म मला माफ कर..................." आत्ता कुठे त्याच्या दाटलेल्या कंटातून वाक्य बाहेर पडलं....
ती मात्र त्याच्या नजरेत विश्वास शोधत होती...... पण त्याचं वेळी अचानक तिचे पाय खालून उचलले गेले आणि पुढच्या क्षणाला एखाद्या निर्जीव बाहुली सारखी ती कठड्या वरून खाली फेकली गेली........
तिच्या हातात असलेला त्याचा हात सुटत गेला.................
आणि त्याचं वेळी............
"अनुरागsssssssss........!!!!!!" तिची ती भेदक किंकाळी...... त्याचं काळीज चिरत गेली........ तसा तो पायातले त्राण निघुन जाऊन आहे त्या जागेवर मटकन बसला...........
"प्रीती................." त्याच्या मुखातुन आह्हहा बाहेर पडला.... आणि त्याचं वेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली......
डोळ्यातुन अश्रूचा पूर वाहत होता...... चार...... चार वर्षांच प्रेम!!!!.......... चार वर्षांच्या नात्याला त्याने स्वतःच्या हाताने तिलांजली दिली होती....... क्षणात स्वतःच्या प्रेमाला त्याने संपवलं होत......... चार महिन्या पूर्वीच देवा ब्राम्हणाच्या साक्षीने दोघांची बांधलेली रेशीमगाठ त्याने तोडून टाकली होती.......
जिच्यावर जीव ओवाळून टाकत होता आज.... आज निर्घृण पणे त्याने तिचाच जीव घेतला होता........
तिचा त्याच्यावर असलेल्या अतूट विश्वासाचा क्षणात त्याने घात केला होता......
आत्ता स्वतःच्याच हातांकडे बघत तो ओक्साबोक्शी धाय मोकलून रडत होता....................
सर्वच संपलं होत............... त्याने स्वतः नेच आपलं सुंदर आयुष्य बरबाद केलं होत............
काळजातल्या अतीव प्रेमाचा अंत केला होता.......... मालवली होती प्रेमाची ज्योत..... दोघांनी सोबत पाहिलेलेल्या स्वप्नांची राख रांगोळी केली होती........
त्याने स्वतःच्या हातानेच सर्व संपवलं होत...........
आणि आत्ता तो सुद्धा पूर्ण पणे तुटून गेलेला.......
अजुनही वरून धो धो पाऊस कोसळत होता..............
आणि त्या पाऊसात त्याच्या डोळ्यातुन वाहणारे अश्रु विरून जात होते..........
तेवढ्यात तिथे एक इनोव्हा येऊन थांबली...........
त्यातून दोघे जण बाहेर आले आणि त्याला तसच उचलून गाडीत टाकून घेऊन निघुन गेले....................
राजकारण............
दोन गटातल्या राजकारणाने आज पुन्हा एक बळी घेतला.....
पाच वर्षा पूर्वी याच धर्तीवर याच ठिकाणी रानांगन माजल होत....
राजकारणाच्या या महासंग्रामात अनेकांचे बळी गेले होते.... कुटूंबच्या कुटूंब उध्वस्त झाली.... गावातल्या अर्ध्या हुन अधिक बायांची कपाळ पांढरी झाली..... विधवा झाल्या होत्या त्या...
रक्ताचे पाट वाहिले होते... भूतकाळाची, इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याने स्वतःच्या प्रेमाचा गळा घोटला........
पण................
पण इथेच संपेल का हे अग्नी तांडव....?
अजुनही धगधगत असेल का? प्रतिशोधाचा सुडाचा.... सुडाग्नी🔥
दोन वर्षा नंतर........................
वर्तमान.......
होम कुंडातला अग्नी धगधगत होता.... पण आत्ता त्याच्या भोवती फेरे घेण्यासाठी उभे असणारे नवरा आणि नवरी मात्र जागीच गोठून गेले होते....
मंत्र पठण करणाऱ्या गुरुजींचा जणू कोणी गळा दाबल्या सारखा त्यांचा आवाजच बंद झालेला..... भीतीने सर्वांग जणू थंड पडलेलं...
नवरदेव डोळे विस्फारून समोर उभ्या व्यक्तीकडे बघत होता... त्याचं वेळी घाबरलेल्या वधूने नजर वर करून त्या व्यक्तीकडे पाहिलं.... तसे त्याचे ते विस्तवा सारखे लाल बुंद डोळे पाहून तिला धडकी भरली...... भीतीने पोटात गोळा आला तिच्या..........
पूर्ण चेहरा कव्हर केल्यामुळे त्याचे फक्त ते आग ओकणारे दोन डोळे दृष्टीस पडत होते.... सुभानराव सोडला तर अजुन कोणीच ओळखलं नव्हत तो व्यक्ती नक्की आहे तरी कोण??
"बाजीssssssss..........." एका हाताने चेहऱ्यावरचा मास्क बाजुला करत त्याने त्याच्या साथीदाराला आवाज दिला.....
त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजुला झाला आणि तिथे असणाऱ्या सगळ्यांचेच डोळे विस्फारले....... सुभानरावाच्या सर्वांगातून भीतीची एक थंड लाट वाहून गेली.....
"सूर्याsssssss..........." एकाच वेळी तिथे असणाऱ्या अनेक लोकांच्या मुखातून उदगार बाहेर पडले......
त्याचं वेळी बाजी त्याच्या समोर हजर झाला.... त्याने डोळ्यांनीच बाजीला इशारा केला..... तसा पटकन बाजी पुढे झाला अन् त्या नवरदेवाच बकोट पकडून त्याला खासकन बाजुला केल.....
तसा आता नवरदेव सुटके साठी धडपड करू लागला..... तशी बाजीने त्याला एकच ठेऊन दिली....... अन् तो आवाज पूर्ण हॉल मध्ये घुमला अनेकांचे हात आपोआपच आपल्या गालावर आले.......
"गुरुजी....... मंत्र पठण सुरु करा........" सूर्याचा आवाज पूर्ण हॉल मध्ये गुंजला......... आणि इकडे नवरीच्या काळजाचा ठोका चुकला........
ती पुढे काही बोलायला तोंड उघडणार एवढ्यात...... बाजीने नवरदेवाच्या गळ्यातलं उपरण हिसका देऊन ओढलं आणि सूर्याच्या दिशेला भिरकावलं..... सूर्याने ते आपल्या एका खांध्यावरून गळ्यात घातलं अन् त्या उपरण्याची आणि तिच्या चुनरीची तिच्या नजरेत रोखून बघत गाठ बांधली.....
ती तर सुन्न झालेली... आपल्या सोबत हे काय होतंय तीच तिलाच समजतं नव्हत..... डोळे काटोकाट भरलेले भीतीने तोंडातून शब्दच फुटत नव्हता.... तिने एक नजर सुभानरावाकडे टाकली वाघा सारख्या डरकाळ्या फोडणारा सुभानराव आत्ता मात्र हतबल होऊन उभा होता..... एका हट्या कठ्या गुंडाने त्याच्या मस्तकावर गन रोखलेली....
सुभानरावाचा मोठा मुलगा समर मात्र हातपाय झटपटत होता पण त्याला सुद्धा दोन हट्या कट्या गुंडानी दाबून पकडून ठेवलं होत.....
इतक्या सगळ्यांच्या डोक्यावर बंदूका तानल्या होत्या ते पाहून पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते.... त्यांच्या साठी हे नवीन नव्हतंच राजकारणी कुटूंबातलं लग्न म्हणजे राडे होणार.... यात नाही पडलेलंच बर...... विचार करत फक्त आता समोर पुढे काय होईल याचा मनोमन अंदाज बांधत पूर्ण पोलीस फोर्स उभी होती...
"गुरुजी ऐकु येत ना तुम्हांला!!" सूर्याचा रांगडा धारदार आवाज कानावर आला... आणि गुरुजी दचकून उठून उभेच राहिले.....
"हम्म......" त्याने गुरुजींना ईशाऱ्याने सांगितलं.... तस त्यांनी थरथरत्या आवाजात मंत्र म्हणायला सुरुवात केली.... वधू थरथरत्या पायानी एक एक पाऊल पुढे टाकत होती आणि तो तिच्या मागे..... गुरुजींच मंत्र पठण सुरूच होत....
पुन्हा चार फेरे तो पुढे आणि ती मागे असं करत सप्तपदी संपन्न झाली.... त्याने येतानाच आणलेलं मंगळसूत्र खिशातून काढलं आणि तिच्या गळ्यात घालायला हात पुढे केला आणि त्या क्षणी त्याच्या नजरेला तिची नजर भिडली..... आणि त्या नजरेत भडकलेला ज्वालामुखी पाहून तीच काळीज जणू गोठून गेलं....
थरकाप उडाला तिच्या सर्वांगाचा...... त्याला विरोध करण्याची हिम्मत तर केव्हाच गळून पडली होती... पण आत्ता त्याच्या बाजुला असण्याने तिला जणू कापर भरलं... त्याच्या त्या एका नजरेनं जणू ती जळून खाक झालेली......
तीच मन आणि मेंदू जणू सुन्न झालेलं... बस्स गुरुजी सांगतील तसे विधी ती करत होती.....
एकदाच त्याने तिच्या भांगेत कुंकू भरलं....
"सुभानराव जाहगीरदार...... तुझा खेळ खल्लास....... आज आपल्यातल्या वैराची पुन्हा एकदा नांदी सुरु झालीय.... इथून पुढे खेळ मी खेळणार आणि याचा शेवट पण मीच करणार....... तु फक्त आता दिवस मोज...........!!" सूर्याचा एक एक शब्द सुभानरावंच्या काळजात भीतीची कळ देऊन जात होता.... त्या नव्या नवरीला तो तसच तिथुन फरफटत ओढत घेऊन जाऊ लागला......
समोरच दृश्य पाहून सुभानरावच्या काळजाला आग लागली... लाडक्या लेकीला असं ओढत फरफटत घेऊन जाताना बघुन नाही म्हंटल तरी बापाचं काळीज गहिवरलं....
"आप्पाsssss......... दादा वाचवा मला...... म मला वाचवा........ आप्पा वाचवा.......... वाचवा मला......" आत्ता कुठे तिच्या मुखातून भीतीदायक उदगार बाहेर पडले.....
कथा लिहून पूर्ण आहे खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही या कथेचे दोन्ही सिझन प्रतिलिपी वर वाचू शकता....
https://marathi.pratilipi.com/series/dn1gnaav7b3s?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_serier
#🌹प्रेमरंग #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📚मराठी रोमांचक कथा🧐 #☺️प्रेरक विचार
29 likes
28 shares