-Kalpana K
13K views • 28 days ago
#💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश #🙏भक्ती सुविचार📝 . .ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll
. *****************************.
. सूर्य आहे म्हणून मानवी जीवन आहे. सूर्य जलाचे शोषण करतो आणि त्याचीच पुन्हा वृष्टी करतो. सर्व प्राण्यांचे जीवन व अमृत तो ईश्वरच आहे.
************************************************
. म्हणोनि अर्जुना मी नसे l ऐसा कवणु ठाव असे?l
. परि प्राणियांचे दैव कैसे l जे न देखती माते ll
*******************[ज्ञाने.९/३००]******************.
. ------- अर्थ ------
. म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु प्राण्यांचे दुर्दैव काय सांगावे? ते मला पाहातसुद्धा नाहीत.
. ------ विश्लेषण -----
. भगवंत पुढे म्हणतात, 'मीच उष्णता देतो, पर्जन्याचा साठा व वर्षाव मीच करतो. अमृत व मृत्यू मीच आहे व कार्यकारणही मीच आहे. मी नाही असे एकही ठिकाण नाही. मी सर्वव्यापी आहे.'
. सूर्य आहे म्हणून मानवी जीवन आहे. सूर्य जलाचे शोषण करतो आणि त्याचीच पुन्हा वृष्टी करतो. सर्व प्राण्यांचे जीवन व अमृत तो ईश्वरच आहे.
. भक्तांनी जर एकत्व भावाने निष्काम भक्ती केली तर ते ब्रम्हस्वरूप होतात. तीनही वेदांत विधान केलेली कर्मे करणारे व सोमरस पिणारे तसेच पापापासून पवित्र होणारे पुरुष यज्ञद्वारा माझे पूजन करून स्वर्गाच्या प्राप्तीसाठी इच्छा करतात. ते पुरुष माझ्या पुण्याचे फलरूप इंद्रलोकाला प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवाचे भोग भोगतात.पुण्याचा साठा संपला की पुन्हा जन्म-मृत्यूचे चक्र सुरू होते. त्रैविधा म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांचे ज्ञान असणारे लोक व जी माणसे यज्ञ करतात, जे तप करतात जे दान करतात त्या सर्वांना देवांचे भोग प्राप्त होतात.
. तथापि त्रैविधेचा आश्रय घेऊन केलेले कर्म सकाम असते म्हणून अशा सकामांना मोक्ष न मिळता स्वर्गादी लोक प्राप्त होतांत पण शेवटी मात्र त्यांचा पुण्यक्षय झाला की पुन्हा पृथ्वीवर जन्म घेऊन परत यावेच लागते.म्हणजे वेदांचा अभ्यास करायचा नाही की काय? तर वेदांचा अभ्यास जरूर करावा, यज्ञयाग जरूर करावा पण हे सर्व निष्काम भावनेने केले तर मात्र आत्मज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होतो.
. ll.राम कृष्ण हरी, माऊली ll
266 likes
1 comment • 318 shares