Magic Share BannerEpisodic Banner

🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐

6K Posts • 6M views
ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
2K views • 2 days ago
वयाच्या 39व्या वर्षीही रोहित शर्मा आणि 38व्या वर्षात पदार्पण करणारा विराट कोहली यांची मैदानावरील ऊर्जा पाहिली की थक्क व्हायला होतं! आज रोहितने चपळाई दाखवत अप्रतिम रनआऊट केला, तर विराटने स्लिपमध्ये हवेत झेपावत एक भन्नाट कॅच टिपला. दोघांनीही आपल्या फिल्डिंगने सामन्यात रंगत आणली. खरं तर वय हा फक्त आकडा असतो, हे या दोघांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. यांची फिटनेस, चपळाई आणि मैदानावरील समर्पण पाहिलं की 20 वर्षांच्या युवा खेळाडूंनाही लाज वाटेल! फलंदाजीसोबतच फिल्डिंगमध्येही रोहित आणि विराट आजही तरुण खेळाडूंना तगडी टक्कर देत आहेत. ❤️🔥 #💪हिटमॅन रोहित शर्मा🔥 #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏆बेस्ट ऑफ वनडे क्रिकेट💐 #🏏पहिल्या वनडेत भारताची सरशी #🏏क्रिकेट
22 shares