महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यांपासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे.
अनेक वाड्या आणि खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हक्काचे वाहन म्हणजे एस.टी होय. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला जागणारी जनसामान्यांची ‘लालपरी’ अर्थात एस.टी आज दि.१ जून रोजी आपला ७७ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.
१ जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर पहिली एस.टी धावली. यादिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व कर्मचारी व प्रवासी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
आपल्या लाडक्या एस.टी, लालपरीला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#msrtc
#एसटी #लालपरी
#msrtc. #एसटी #लालपरी #🚍महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 🚍 #महाराष्ट्र परिवहन महामंडळ