❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
58K views •
#😍वाचा: श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात❓
श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर व ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. पडद्यावरच्या तिच्या अभिनयाशिवाय तिचं मधुर हास्य आणि व्यक्तिमत्त्व यावर असंख्य तरुण जीव ओवाळून टाकतात.चित्रपटांव्यतिरिक्त श्रद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत असते. या वर्षात श्रद्धा अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान, तिची लव्ह लाईफ सुद्धा चर्चेत आहे. अभिनेत्रीने अद्याप तिच्या बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केलेला नाही. मात्र, मिडिया रिपोर्टनुसार,श्रद्धा राईटर राहुल मोदीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.अनेकदा त्यांना स्पॉट देखील करण्यात आलं आहे. परंतु, त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं नाही. अशातच आता लग्नावरून प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याला तिने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हल्ली श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. याद्वारे ती तिचे प्रोजेक्ट्स तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते. शिवाय ती लग्न कधी करणार याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. कमेंट्समध्ये ती चाहत्यांना अनेकदा रिप्लायही देते. अलिकडेच, तिने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली, ज्यावर एका चाहतीने तिला ,"श्रद्धा कपूर जी, तुम्ही लग्न कधी करणार?"यावर अभिनेत्री अगदी मजेशीर उत्तर देत म्हणाली, "हो, मी करेन, मी लग्न करणार... अभिनेत्रीच्या या उत्तराने तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.
#मनोरंजन बातम्या #मनोरंजन #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #व्हायरल
275 likes
4 comments • 1472 shares