❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
9K views • 6 months ago
#🚌बेस्ट बस आणि ट्रकचा मोठा अपघात😱
आणि बेस्ट खड्डयात गेली...!
मुंबईत बेस्ट बसचा अपघात, रस्ता खचून बस गेली खोल खड्ड्यात
बईतील गिरगावमध्ये ठाकूरद्वार परिसरात मेट्रो स्थानकाजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. रस्ता खचल्यामुळे बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली आहे. हा रहदारीचा रस्ता असल्याने तसेच सकाळच्या वेळी ऑफीसला जाण्यासाठी चाकमान्यांची वर्दळ असतानाच हा अपघात घडला आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
गिरगाव परिसरात मेट्रो 3 कुलाबा- वांद्रेचे काम सुरू आहे. गिरगाव मेट्रो स्थानकाचे या परिसरात काम सुरू आहे. त्याशेजारील रस्ता खचल्याने बस बेस्ट पाच फूल खोल खड्ड्यात अडकली. बसचे चाक पाच फूट खोल गेले आहे. त्यामुळे बस कलंडली आहे. मुंबई पाऊस सुरू असल्याने त्यात ही घटना घडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. बसचे चाक खड्ड्यात रुतल्याने बस कलंडत असल्याने प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याआधी याच परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना अवजड क्रेन कोसळली होती. त्यावेळी हा मार्ग तीन दिवस बंद होता. तसेच मेट्रोचे सुरू असणारे काम, जनतेला होणारा त्रास आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🤩11 जुलै अपडेट्स🆕 #मुंबई बातम्या #ताज्या बातम्या #ब्रेकिंग न्युज #मुंबई पालिका न्यूज #तिरंगा #🆕ताजे अपडेट्स
60 likes
75 shares